ललित लेख:जगायचं कसं🌼..
जगायचं कसं…..
मोठा प्रश्नच आहे की जगायचं कस,आपल्या जगण्यात काही चुकीचं आणि काय बरोबर याचा ठाव,जो तो ज्याच्या त्याच्या सोयीने घेतो ,हे काही वेगळं सांगायची गरज नाही,कधी कधी शिष्टाचाराच्या गोष्टी करणारा माणूस पण चुकतोच की,तुम्ही पण हे अनुभवलच असेल आणि कधी कधी गबाळा माणूस काहीतरी महत्त्व पूर्ण गोष्ट सांगून जातो,तेव्हा मात्र आश्चर्य वाटते, ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार वागणं झालं ते म्हणा!!
पण परत प्रश्न आहेच की जगायचं कस पण….
म्हणजे सगळ्यांना मदत केली पाहिजे, सगळ्यांशी चांगलं बोललं पाहिजे,वयाने मोठ्या असणाऱ्यांचा आदर केला पाहिजे आणि हो प्रामाणिकपणे राहील पाहिजे….
अजून बरच काही……
हे झालं ,सगळं पण खरं सांगू का एक चांगला माणूस फक्त छान वागून किंवा छान बोलून होत नाही ना…. भले तो बाहेर छान वागत असेल पम घरात तो दिवसभर चांगलं वागलेल्याच फस्ट्रेशन काढत असेल तर मग…. 😊😊
मदत करणं चांगला गुण आहे पण स्वतःच्याच घरात काही न ठेवता मदत करणं पण चुकीचं झालं ना…..
आता सगळ्यात मोठा प्रश्न पडतोय की मग प्रामाणिकपणाचा….
अहो,सवय लागली आहे जाता जाता खोट बोलायची.. अगदी ,”थांबा पाच मिनिटात आलो म्हणता म्हणता एक तास कधी होतो ,ते सांगणाऱ्या ला नाही कळत पण वाट बघणारा नक्की सांगेल ना”….
जगाची प्रामाणिक राहणं सोडाच,आपण फक्त ना स्वतःशी प्रामाणिक राहायचं,स्वतःच्या नजरेत…
झोपताना रात्री हिशोब नसावा कशाचा,ह्याला आपण काय म्हणालो त्याला काय म्हणालो…..
पडलं की झोपलं पाहिजे,मनात अपराधी भावना नसावी,कसली चिंता नसावी,राग नसावा आणि लोभ पण….
आजच्या काळात अस जगणं म्हणजे कठिण आणि भलतंच आहे की…
सुरवात करा आणि कधी सवय होऊन जाईल समजणार पण नाही…
आता तुम्हीच मला सांगा…

जगायचं अस ,जणू आपल्यातील लहान मुलं अजून जिवंत आहे ,त्यांच्यातील निरागसता तेवढीच भरभरून आहे आणि तल्लख बुद्धी तेवडीच तत्पर आहे…
पाहिजे त्या गोष्टी साठी वेड होऊन हट्ट करणार मनं लहान मुलांकडेच….
फरक एवढाच आहे,लहानपणीचा हट्ट मोठेपणी जिद्दीमध्ये बनवायचा आहे…
पण स्वभाव मात्र निरागसच ठेवायचा…
जे वयाने मोठे होऊन पण एखाद्या फुलासारखा स्वतःच्या अस्तीत्वाचा सुगंध दरवळत ठेवत असतात….
मग ,समजलं ना,जगायचं कस ते…..