मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

लघुकथा संग्रह

लघुकथा:”तू जन्माला”

अविस्मरणीय कथा

अविस्मरणीय गोष्ट म्हणण्यापेक्षा असा अनुभव आहे ,ज्याच्याशी मुक्ताचे  नंतरचे आयुष्याच जोडले गेले.सगळ्या गोष्टी च तिच्या आयुष्यामधील बदलूनच गेल्या,जशी बातमी समजली तसे सगळेच बदलून गेले.रोज नवीन काही तरी ऐकायला मिळायचे,रोज नवीनच काही तरी बदल होयचा,सगळे कस अगदी “कभी खुशी,कभी गम” असं चालू होते.हा अनुभव म्हणजे तिचे आयुष्य बनले पण त्याबरोबर ती भीती पण मनात घर करून राहिली,”त्याला काय होणार तर नाही  ना?”अस काय झाले ते सांगते ना मी!

तिला गरोदर पानाचे वेध लागले होते,तिला सारखे वाटायचे की मी गरोदर असेल,ह्या महिन्याची मासिक पाळी चुकेल आणि आनंदाची गोड बातमी कानावर येईल.अस काही नव्हते की ती पहिल्यांदा आई होतेय,या आधी तिला एक मुलगी पण आहे आणि तिची ती जगातील एक नंबर भारी आई आहे,हे सगळ्यांना च माहीत होते. पण यावेळी तिला अस का वाटत होते ते कोणाला च सांगता येत नव्हते म्हणून तिने मला तिच्या घरी बोलावले आणि म्हणली,” प्लीज,येताना प्रेगंनन्सी किट  पण घेऊन ये.”

मी ” ओके म्हणाले”.आता म्हणले सगळे तिला भेटूनच बोलावे,नेमकं काय झालय य ते तरी कळेन.

तिच्या घरी पोहचले!

तर थोड्या विचलित च अवस्थेत होती;

“काय झालं गं ?”, मी विचारले.

“अगं,मला असं वाटतय की मी प्रेगंनंट आहे,पण ना अजून मला मासिक पाळी आलेल्याला एक महिना पण पूर्ण नाही झाला,पण ना मला आतून सारखे वाटतय की मी आता आई होणार आहे.फक्त मनाची शंका काढण्यासाठी मला टेस्ट   करायची आहे,मला कळतय तुला पण असंच वाटत असेल म्हणून काय वेडेपणा करत आहेस,सायन्स स्टुडेंट होतीस म्हणून तरी बरं आहे,मनाची खात्री साठी फक्त !”

Momspresso Share this Post

तिची उत्कंठा आणि मनाची चलबिचल पाहून मी पण म्हणाले,”चल ठीक आहे.कर टेस्ट.”

यावेळी तिचे मनं जिंकले होते,एक महिना पूर्ण झालेला नसतानाही टेस्ट पॉजिटिव येण चुकीचेच होते खर,म्हणून परत उद्या सकाळी नवीन टेस्ट करुयात असं सुचविले मी.

मनाची ताकद म्हणायची का किट मधील फॉल्ट यावर चर्चा नकोच म्हणले आता,मस्त छान गप्पा मारल्या ,जेवण वैगरे झाले आणि घरी आले. उद्या खरच महत्त्वाचा दिवस होता.

सकाळीच फोन आला ,” अगं,टेस्ट नेगेटिव आली,पण ना नंतर मी परत दोन केल्या तर त्या मधील परत एक पॉजिटिव तर एक नेगेटिव आली गं,काहीच कळेना बघ.”

“हम्म,अस कर ना अजून थोडा संयम ठेव आणि एक महिना झाला की डॉक्टर कडे जा,मग तर सगळेच समजेल”,मी एवढे म्हण्यापेक्षा दुसर अजून काही च सांगू शकत नव्हते.

तिची रोजची तळमळ चालू होती ,जणू काही तिला वेध लागले होते,ती प्रत्येक गोष्ट मनापासून आणि बारकाईने अनुभवत होते.तिचा आत्मविश्वास तुटू नये ,एवढच मला वाटत होते.

आणि तो दिवस उगवला,बरोबर महिना पकडून आम्ही दोघी डॉक्टर कडे गेलो खर,पण डॉक्टर हसले ना आमच्यावरच,अस नसते म्हणले अजून थोडे दिवस जावुद्यात मग बघूयात.मासिक पाळी उशिरा येण्याची बाकी पण खूप कारण असतात,थोडा वेळ जावू द्या मग आपण बघूयात. अजून पंधरा दिवस काढायचे म्हणजे अवघडच होते ,तिच्यासाठी. पण तिने नक्की ठरवले की तिच्या पोटात एक नवीन जीव वाढतोय आणि आता तिला त्याची पण काळजी   घ्यायची ची आहे. छान सगळे तिने नियोजन केले ,खाण्या -पिण्याचे,व्यायाम ,आणि थोडे वाचन पण करायचे ठरवले. ही गोष्ट तिने तिच्या नवर्‍याला आणि फक्त आईला  च संगितली  होती. दोघे पण तिला समजून घेऊन साथ देत होते. यावेळी ती जरा मुद्दाम च डॉक्टर कडे उशिरा गेली म्हणजे दोन महीने झाले होते. तिच्यामते आता डॉक्टर माघारी नाही पाठवणार. छान मूड मध्ये,डॉक्टर कडे गेली,डॉक्टर ने पण तपासणी केली,औषध दिले आणि परत पंधरा दिवस झाले की बोलावले. स्वारी आता खुश होती,सगळे मजेत चालले   होती. काय करायचे ,काही नको  हे पण ती सगळे करत होती वाचत होती. त्रास मात्र कसलाच होत नव्हता,त्यामुळे अजून च मस्त चालले होते सगळे !

सोनोग्राफी चा दिवस आला आणि तिला माहीत होते आज काही नीट दिसणार नाही आपला जीव पण तरी खुश च होती ती ! सोनोग्राफी झाली,सगळे टेस्ट झाल्या,आणि 

डॉक्टर ने बोलावून घेतले आणि सांगून टाकले की ,”तुमच्या पोटात जे काही आहे त्याला हृद च नाही म्हणून ही प्रेगंनंसी ग्राह्य धरली  जाणार नाही,तुम्ही ताबडतोप पुढचे उपचार घ्या,तसे जास्त वेळ झालेला नाही म्हणून त्रास पण जास्त होणार नाही.”

ठीक आहे,मॅडम. मी परत येते.” ती म्हणाली आणि भरल्या डोळ्याने पहिले तिने अभि चे ऑफिस गाठले,हो म्हणजे तिचा नवरा! तिचे रडण त्याला बघवत नव्हते,ते दोघे घरी आले. तिने झालेले सगळे संगितले.

“ठीक आहे,तू शांत हो पहिले रडू नको,आपण दुसरीकडे दाखवूयात असेल काही मिसटेक,शांत हो तू.”,अभि समजवत होता.

दु:खाचा  डोंगर तर त्याच्यावर पण कोसळाच होता की, पण तिची अवस्था पाहून त्याने कसाबसा स्वत:ला: सावरायचा प्रयत्न करत होता.

Momspresso Gold blog winner

ती खूप रडत होती,पण तिचे मन अजून पण या गोष्टीला मानायला तयार नव्हते की पोटात एक जीव नाही म्हणून.

रडून-रडून झोपी गेली,त्या दिवशी तिने काहीच खाल्ले नाही आणि कोणाशी जास्त बोलली पण नाही.

परीक्षा होती तिच्या श्रद्धेची आणि तिच्या विश्वासाची. एकीकडे मेडिकल सायन्स होते आणि एकीकडे अपार विश्वास!

तिने सकाळी उठल्यावर तिच्या ओळखीच्या डॉक्टरला भेटायचे ठरवले आणि त्यांच्याशी बोलून मग ठरवायचे ,पुढे काय करायचे ते.

डॉक्टर तश्या खूपच वयस्कर होत्या अंदाजे साठी गाठलीच असेल,त्यांना अनुभव होता म्हणून तिने त्यांना झालेला सगळं प्रकार सांगितला,रीपोर्ट पहिले.त्या पण सुन्न झाल्या. तिच्या डोळ्यातून धारा वाहतच होत्या,कितीही खंबीर होयचे म्हणले तरी ते आई च मन शेवटी ते वाहतच असते,प्रेमाचा उदंड सागर घेऊन ,उराशी.

 डॉक्टर ला तिने संगितले की,”मला मनापासून आतून वाटते आहे की खरच एक जीवंत जीव माझ्या पोटात वाढतोय आणि माझी अजिबात तयारी नाही की मी त्याला या जगात च आणू नाही,प्लीज मॅडम समजून घ्या माझ्या भावना,काही तरी असेल ना उपाय याच्यावर.प्लीज”

“हम्म,अस करुयात अजून पंधरा दिवस पाहुयात आणि मग पुन्हा सोनोग्राफी करुयात,पण हे सगळे तुझ्या जबाबदारीने,तुझा वेडा हट्ट आहे म्हणून,.मला पण पटत नाही तुझ वागणे ,पण बघूयात!”

डॉक्टर ने रीपोर्ट हातात देत तिला संगितले आणि तिचा निरोप घेतला.

तिने लहानपणापासून एक घट्ट दोस्त बनवला होता,तिच्या सगळ्या छोटयातील छोट्या गोष्टी त्याला माहीत होत्या म्हणून तिने ठरवले की एका त्याच्याकडे जावावे ,मन मोकळे करून सगळे सांगावे ,भरभरून रडावे. आणि खर सांगायचे म्हणले ना अगदी लहानपणापासून तिला त्याची ओढ होती ,आवड होती,ती त्याला त्याचे हक्काचे स्थान मानायची,कधी रुसायची पण तर कधी बोलायची पण नाही,तिच्यासाठी तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे म्हणजे तो विघ्नहर्ता होता.

हो,सगळ्यांचा आवडीचा आपला “गणपती बाप्पा”, तिच्यासाठी अगदी ती लहान होती ना तेव्हा पासून त्याला गणपती बाप्पा तिच्या जवळचा होता.

अभि आणि ती ,गणपती च्या मंदिरात गेले आणि निवांत वेळ घालवला तिने तिथे. डोळ्यांमधील पाणी आता कुठे थांबले होते आणि तिचा आत्मविश्वास आता अजूनच वाढला होता,तिच्या डोळ्यात ते दिसत होते. 

अभि ने समजून घेतले होते की ती अजून १५ दिवस थांबायचा विचार केला आहे म्हणून,त्याला अस वाटत होते  की उगीच तीने हा निर्णय घेऊन तिच्या आयुष्याची खेळायला नको,उगिच काही बरं वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण ,तिला सांगावे सगळे तर तिला असं  वाटायला ला नको की , मी तीची साथ देत नाही म्हणून,या विचारानेच अभि पण शांत च बसला आणि बाप्पा पुढे हात जोडून सगळे चांगले होऊ दे ,ची प्रार्थणा केली.

तिच्यामनातून विचार जात नव्हता पण विश्वास कधी कधी डगमगायला लागला होता. खाण-पिण, सगळे सोडले होते,फक्त झोपून राहत होती. या सगळ्यात ती पूर्ण विसरूनच गेली होती की अजून पण एक छोटीशी प्यारी तिला गुडिया होती,ती पण लहान च होती. तिला आणि छोटी ला  सांभाळताना अभि ची मोठी तारेवरची कसरत होत होती,पण कोणाला सांगयाचे आणि काय ,हेच समजत नव्हते. कसे -बसे पंधरा दिवस गेले.

सकाळी,सगळे आवरून छोटीला स्कूल मध्ये सोडवून ती हॉस्पिटल मध्ये गेली आणि डायरेक्ट सोनोग्राफी करून मग डॉक्टरला भेटूयात अस तिने ठरवले. सोनोग्राफी करताना च तिने विचारले कसे आहे,बेबी.त्या ठीक आहे बोलल्या,हृदयाचे ठोके नियमित आहेत पण ना…….

“पण,काय डॉक्टर,.”क्षणाचा पण विलंब न करता तिने लगेच विचारले.

“काही नाही,इमेज नीट दिसत नाही ,गर्भात सगळे रक्तच आहे,पडली होतेस का ?”डॉक्टर म्हणल्या.

“नाही वो,तस काहीच नाही झोपून आहे मी तर पंधरा दिवस झाले,”ती म्हणाली.

आता नवीन काय,ह्या विचारानेच तिला नको झाले.

.डॉक्टर म्हणले,” आपण परत सोनोग्राफी करुयात पाच महीने झाले की पण तो पर्यंत  काही सांगता येणार नाही म्हणजे गर्भ फक्त मांसाचा गोळा आहे की एक नविन जीव.”

नकोच झाले तिला,पण या गोष्टीने तिला फारसा काही फरक नाही पडला.तिला आता वाटायला  लागले की जर हृद नसताना माझा विश्वास जिंकू शकतो तर हा गोळा नक्कीच आकार घेणार. छान मजेत होऊन ती डॉक्टरला  भेटून औषधे घेऊन आली.हे तिने फक्त तिच्या पुरतेच ठेवले उगीच काळजी नको म्हणून.

“हुश्श,जिंकले तर तू”अभि तीला म्हणला. तुझ जिंकने च खूप गरजेचे होते गं.

ती पण “हम्म” म्हणाली , पण तू लगेच कोणाला सांगू नको की आपल्या घरी नवीन पाहुणा येणार आहे म्हणून,पाच महीने झाले की सांग.डॉक्टर नेच संगीतले म्हणून म्हणले,अभिला ती म्हणली आणि बेडरूम मध्ये निघून गेली.

On Momspresso more than 50k views

त्याने पण आपले मान हलवले आणि एवढा काय विचार नाही केला.

मस्त छान डोहाळ्यात आणि आरामात दोन महीने कसे गेले ते काही कळले नाही.

यावेळ अभि पण सोबत आला होता,सोनोग्राफी झाली आणि डॉक्टर ने संगितले चमत्कारच की गं. दोन किलो चा गुटगुटीत गर्भ आहे,तिला डॉक्टर ने काय दाखवला नाही पण. 

आज जो आनंद तिला मिळाला होता ना तो कधीच काहीच देऊन मिळाला नसता. . एक समाधान होते.बाप्पा ला किती आभार मानावे ते तिलाच माहिती.

नंतरचे महीने मात्र तिने कधीच बसून किंवा झोपून घालवले नाही. मस्त मजेत मस्ती करत घालवले. कधी बंडमिंट खेळत तर कधी मस्त उंच टेकडीवर जावून फिरण्यात,खरच छान जगली ती.

शेवटची वेळ आली,त्रास तर खूप झाला तिला पण ज्याला जन्म दिला त्याला सगळ्यात आधी पाहायला मात्र ती नव्हती. बेशुद्ध होऊन पडली  होती,शुद्धीवर आली तेव्हा, गोल-मोटोळ गूटगुटित,हरणसारख्या डोळ्यांचे,दुधासारख्या पांढर्‍या शुभ्र कांतीचे छोटेसे बाळ,तिच्याकडे पाहत होते,हात हलवून हलवून तिला काही तरी सांगत होते.

तिचे डोळे पाण्याने भरलेले होते आणि एक समाधान,तू खूप त्रास दिला म्हणून सांगत होते ,तिचे डोळे.

Listen on Spotify..

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: