संस्कार बालपणीचे!!
आई -“The Dominant & Powerful Person”
“बालपण”
आईपण कधी चालू होते,अस म्हणल्यावर नक्कीच डोक्यात विचार येतो ना,पण खर तर आई होण्याची जेव्हा मनाची तयारी होते तेव्हा पासूनच आईपणाचे वेध चालू होतात.
“मी माझ्या बाळाला हे करेल,ते करेल ,त्याला पौष्टिक खावू घालेन,बाहेर जाताना परी सारखी नटवून घेऊन जाईल,अशी फ्रॉक घेईन तो गॉगल घेईल,असे शूज हवेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तो खूप चांगला माणूस असेल.”,अस सगळ्यांच्या डोक्यात नसेल आल तरच नवलं!
आपली मुले म्हणजे आपले सर्वस्व असते मग त्यांना आई म्हणून काय काय आपण शिकवले,जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या ना,नक्की !
आई बद्दल कोणी काय सांगणार,शब्दांचा सागर वाहायला लागतो,त्या माऊलीच्यात ताकदच असते एवढी,तीच माऊली आपले आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज घडवू शकते तर दुसरीकडे तीच भूमी उद्ध्वस्त करणारे भामटे पण निर्माण करू शकते.म्हणूनच,थोडे थांबून,शांत होऊन ,हलकाच थोडा विचार करून,कस वाटले तुम्हाला ,थोडसं डोक जड झाल्यासारखे वाटत असेल ना!
कस होते ,अगोदर अगदी संस्कार न कळतपणे आणि जबाबदारीने होयचे ,घरात मोठी माणसे असायची त्यांची मदत होयची ,नातेवाईकांकडे जाण-येण असायचे त्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी सहज जमायच्या पण आता तस होत नाही.
“बाबा कधी घरी येतील ग आई” जीवा ने विचारले.
“का रे,आज चक्क बाबा” आई म्हणते.
“हम्म,फोन पाहिजे होता तुझा डाटा संपला ना विडिओ पाहून पाहून म्हणून म्हणले “,जीवा उत्तरला.
तुम्हीच सांगा ,हे वाचून किती लोकांच्या मनात डोक मिनिटात गार पडले.
जीवाला बाबांची काळजी नाहीतर त्याला फोन ची वाट पाहतोय.
अस,होयला नको असचं वाटले ना!
मग त्यासाठी काय करायचे,हे पण तर आपण शिकवलेले आहे ना!
कधी कधी नकळत पणे म्हणतोच की,बाबा आले की घे त्यांचा फोन.
मग आपणच शिकवलेले चुकीचे कसे झाले.
म्हणूनच आई होण,खूप जबाबदारीचे आणि खूप कृतीशील काम आहे,ते उत्तमरीत्या करण म्हणजे संस्कार आहेत.
असे संस्कार जे त्यांच्या सोबत आयुष्यभर सोबत राहणार आहेत.
अशी गोष्ट नक्कीच त्यांना आपल्याला द्यायला आवडतील ना!
सगळ्यात महत्वाचे म्हणजे सुरवात आपण करुयात म्हणजे की,आपल्या पाल्याबद्दल एक ही शब्द नकारार्थी बोलायचं नाही आणि दुसर्यांना तर अजिबातच सांगायची गरज नाही की ‘तो जेवतच नाही,काही ऐकतच नाही,सारखे मारतो,खूपच त्रास देतो,नको नको झालाय आणि बरच काही.’
ज्यावेळी मुले त्यांच्या कानावर नेहमी ऐकत राहतात ते पण त्यांच्याच आईच्या तोंडून तर मग त्यांना तर ते अजूनच खूपच खर वाटणार नाही का आणि त्यांना घट्ट मनाशी पकडून ठेवणार ना!
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याच जीवाला कोणतेही वाईट लेबल लावू नका,तुम्ही स्वत:.
तुमचे लेबल त्यांना त्यांची ओळख वाटते आणि ते तेच करतात.
तुम्हाला ते कस हव आहे,कस असले पाहिजे,याचा विचार करा आणि त्याला प्रोत्साहित करा.आता तो नाही चपळ,पण पाहिजे ना तसा म्हणून त्याला सारखे म्हणत रहा,’ तू खूप चपळ आहे,तुझी सगळी कामे तू खूप लवकर आवरतो’.
तो तस वागत नसताना पण तो कसा असावा,हे बोलन तस कठीणच,ते करताना स्वत:च्या रागावर तर नियंत्रण राहायला पाहिजे,आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रोज करायचे आहे जो पर्यन्त तो खरच चपळ होत नाही आणि त्याचा आत्मविश्वास वाढत नाही तो पर्यन्त. साहजिकच त्यासाठी संयम खूप मोठा रोल निभावणार आहे. लेबल चांगलच लावयाचे आहे कारण ती त्याची ओळख असते,आणि ती लेबल पालकच लावतात म्हणून ती अजून अग्र स्थानी असतात.
तर,पाल्याच्या सभोवती फक्त आता चांगले बोला,त्यांची स्तुति करा ,त्यांना प्रोत्साहन द्या पण वाईट नको.

लहान मुले मातीचा गोळा असतो,जसा आकार देऊ तसा तो घडत असतो,कारण त्याचा . घडवणारा कुंभार स्वत: आई असते.
त्याला पॉजिटिव ऊर्जेचे खतपाणी तर घातले पण तेवढ्यावर वर भागणार आहे का?
काही नियम स्वत:ला पण तर घातलेच पाहिजेत ना,कधी कधी काय होते की आपलीच चूक आपल्याला कळत नाही म्हणजे आपल्या बोलण्यातून बालकांच्या मनावर काय परिणाम होतोय तेच समजत नाही आणि मग विचार चालू होतो मी तर नाही शिकवले मग झाले कस काय!
प्रत्येकाला म्हणजे पृथ्वीवर जेवढे आई-बाबा आहेत त्यांना सगळ्यांना असच वाटते की दोन्ही मुलांनी मिळून मिसळून राहावं ,एकत्र राहावं पण ना,लहानपणी तर छान राहतात मग मोठीपणी काय होते,का त्याचे खत पाणी आपण लहानपणीच तर घालत नाही ना,जाणूनबुजून कशाला कोण असे करेल पण नकळतपणे !
तर तुलना कोण कोण करते,कोण एकला सारखे चांगलं म्हणते आणि भले ही दुसर्याला काही नका म्हणू पण तुलना होतेय,आवडनिवड होतेय आणि त्याची मुळे नकळत रुजली जात आहेत.
म्हणून सगळ्यात म्हत्त्वाचे त्यांची अजिबात तुलना करू नका,नाही त्याच्या भावंडासोबत,नाही शेजारी ,नाही मित्रासोबत आणि नातेवाईकांच्या मुलांसोबत अगदी कोणासोबतच तुलना करू नका. त्यामुळे काय होतय,तर मुलांच्या कोवळ्या मनात ईर्षा निर्माण होयला मदत होतेय आणि ती एवढी खोल वर जातेय की त्यांना त्या व्यक्तीचा राग ,क्लेश वाटायला लागतो आणि प्रत्येकवेळी स्पर्धा त्या व्यक्तीच्या गुणांसोबत न होता त्या डायरेक्ट त्या व्यक्तिसोबत होतेय आणि त्याचे गंभीर परिणाम म्हणजे नाती तुटू लागली आहेत,आपलेच भाऊ -बहीण शत्रू वाटू लागले आहेत.म्हणून नकळत का होइना त्यांना खत पाणी घालू नका.
आता,स्पर्धाच करायची आहे तर ती स्वत:, सोबत करा,स्वताला सुधारा हे त्यांना आताच शिकवा ,हे खूप गरजेच आहे.
बालपण म्हणले की वेगवेगळे कार्टून्स आले खूपच!
कार्टून्स पहिले तर आपली मुले काय होणार आहेत?????????
नक्कीच कार्टून्स च होणार !

आणि हो,बर्याच घरात दिसून पण येते ,मी शिवा ,मी डोरेमन,मी शिझुका अजून मी माशा ,मी पेपा पिग आणि बरच! आणि कधी कधी ते तस वागतात पण त्यावेळी आपल्याला हसू येत पण काय हो त्यावेळी जर हसू येत मग जेव्हा ती त्यांच्यासारखा हट्ट करतात हेच पाहिजे तेच पाहिजे पाहण्यासाठी हट्ट करतात तेव्हा पारा का चढतो,
आईचा !
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक खूप वाईटच असतो,मुल घडवण म्हणजे सोप काम नाही त्यासाठी त्यांना स्वत:चा वेळ हवा आहे तुमची गॅजेट्स नको. नेमकं उलट करतो आपण त्यांना हातात मस्त फोन देतो ,अजून पुढे जावून टॅब ,लॅपटॉप सगळे छान देतो,आणि वेळ मात्र देत नाही.
मग काय बोलणं कमी होते ,संवाद नको वाटते त्यापेक्षा कार्टून्स पाहिलेले बर ना ! पुढे जावून हा जास्त बोलतच नाही सारखा आपले शांत शांत.
अहो ,पण जेव्हा त्याला बोलायचे होते तेव्हा तुम्ही त्याला गॅजेट्स दिले ना,मग आता काय!
मुलांना नवीन टेक्नॉलजी माहीत असण चांगली गोष्ट आहे पण त्याचा अतिरेक नको.
कार्टून्स पहिले तर आपली मुले काय होणार आहेत?????????
नक्कीच कार्टून्स च होणार ! म्हणून त्यांना अस काही दाखवा जे त्यांना ऊपयोगी आहे,ज्यातून त्यांचा विकास होयला मदत मिळणार आहे,त्यांना वेळ ठरवून द्या,आणि स्वंयमशिस्त लावा.
हे तुम्हीपण कधीच विसरू नका की आपला इतिहास राजांचा आहे आणि त्याच भगतसिंग आणि राजगुरूंचा आहे.
जेवण करताना किवा खूप रडू लागलाय म्हणून तर कधीच गजेट्स देऊ नका,त्या समस्येविषयी बोला आणि नात मजबूत करा.
अजून बालवयात नेहमी घडणार म्हणजे ,”त्याला एखादी गोष्ट नको म्हणली की तो जोरात रडतो,भर रस्त्यात रडतो,म्हणजे त्याला अस वाटते की आपल्या गोंधळ करण्याने वस्तु नक्की मिळेन.”
अस जिथे होते,तिथे मुलांना नाही हा शब्द नीट समजलेला नसतो. नाही म्हणजे फक्त नाहीच होते,त्याला कोणतेही एक्स्कुज्स नसतात हे त्यांना पटवून द्यायला पालक कमी पडलेले असतात. हाच त्यांचा गुण वाढत जावून मोठेपणी डोकेदुखी बनतो आणि पर्याय खूपच नाही चा अतिरेक झाला की शेवट नैराश्य आणि आत्महत्याचा विचार आणि एकटेपणा वाटायला लागतो.
मुले आहेत ती हट्ट तर करणार पण त्यांच्या गरजा आणि त्यांची इच्छा याच्यातील फरक आधी ओळखा आणि त्यांना पण त्या समजावून सांगा.
जरि आपण पालक म्हणून सगळं देऊ शकत असलो तरी पुढील भावी आयुष्यासाठी त्यांना हे योग्यचं राहणार आहे. सगळ्याच गोष्टी आयुष्यात भेटतील अस नाही ना,म्हणून नाही म्हणणं आधी शिकवा आणि आचरणात आणा ,थोडा त्रास देईल कदाचित खूप रडेल ,खूप आरडाओरडा करेल पण तुमच्या नाही शब्दावर ठाम रहा.
खूप ज्यावेळी रडत असेल तेव्हा त्याचे लक्ष दुसरीकडे वळवा,खूप रडतोयस ,रडू नको म्हणून तो शांत होणार नाही आणि समजावायला गेला तर अजिबात समजणार नाही म्हणून लक्ष दुसरीकडे केन्द्रित करा आणि त्याच्या बद्दल मनात पॉजिटिव विचार करा आणि त्याला तो सांगा,नक्की यामुळे बदल दिसून येईल.
अजून खूप मोठा विषय होत चालला आहे तो म्हणजे जेवण….
श्रुति,आशू जेवनच करत नाही ग,काही खातच नाही फक्त मॅगी,चोकोस,बिसकिट,केक्स आणि मधून मधून पिझ्झा ,बर्गर अगदी आवडीने खातो.” दीपा म्हणाली.
“मग खातोय की तो जे नको आहे तेच ,श्रुती म्हणाली.
“पौष्टिक काहीच खात नाही गं,म्हणून”,दीपा म्हणाली.
असे संभाषण आता सगळीकडेच अगदी कॉमन झालाय,जिथे जावाव तिथे ऐकायला भेटतं.
जेवणात बदल असावं पण किती,अगदी सवय होऊन जावावी अस नाही ना!
मुलांना खर सुरवात पौष्टिक आणि खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी कशा लावल्या जातील याकडेच जास्तीचे लक्ष देण्याची गरज आहे.
लहानपणी त्यांना म्हणजे ८-९ महिन्याचे बाळ झाले की त्याला चव कळायला सुरवात होते,त्याचवेळी खर्या नावाप्रमाणे पदार्थांची ओळख करून द्या,त्यांना कोणत्याच पदार्थाला वाईट नाव ठेवू नका,शक्यतो बाहेरचे फळांशिवाय त्याला काही देऊ नका. आवडनिवडीची चॉईस त्यांच्याजवळ ठेवूच नका.
अन्न हे पूर्णब्रह्म आहे,हे त्याला शिकवा,ताटात दिलेले आणि अन्नाला नाव न ठेवता खाण्याची सवय पण तुम्हाला लहानपणीच लावायची आहे.
आज काल सगळीकडे, आपल्या मुलाचे खूप लाड केले जातात,त्याचा अतिरेक होत चाललाय.
काय तर म्हणे,”माझ्या मुलाला मी राजासारखे वागवेल!”
हो,पण राजा पण तर शिकण्यासाठी गुरुकुल मध्ये जातच होता ,त्यावेळी त्याला तिथे कष्टाची चाहूल येतच होती,त्याने ते स्वत : भोगल्यामुळे त्याची किंमत त्यांना कळलेली असते.याची पण जाणीव आपल्या लक्षात ठेवली पाहिजे.
आज जे पेरणार आहोत तेच उद्या संस्कार बनून उद्या येणार आहेत,त्यासाठी आता कष्ट घेण गरजेचे आहे.
हे सगळं आई एकदम उत्तमरित्या करू शकते आणि ते सत्यात उतरवू पण शकते.म्हणून आई ही सामर्थ्यशाली आणि पावरफुल आहे आणि त्याचे उदाहरण म्हणजे जिजाऊ.

जिथे जिजाऊ आहे तिथेच शिवराय जन्माला येतो,हे कधीच विसरून जाता कामा नये.
copyrights:Inspire In Marathi
(पालकत्वाचे अजून काही लेख वाचण्यासाठी नक्की follow करा आणि आवडले असेल तर नक्की like करा,यात अजून आपण पुढे teengers वर आणि लग्न झाल्यावरची मुले -मुली यावर लेख पाहणार आहोत,त्यासाठी नक्की follow करा आणि कसं वाटले ते comment मध्ये नक्की सांगा)
Don’t Forget to Visit ⬇️⬇️& Click on🔔