Flamingo- रोहित पक्षी..
Flamingo,पाहिला की नाही अजून!
सगळ्यात देखणा आणि मनाला भुरळ घालणारा,एकदा पहिले तरी पाहतच बसावेसे असे वाटते.त्याला हात लावयाचा मोह काही केल्या आवरत नाही हे खर जरी असले तरी ते फक्त स्वप्नांनमधेच शक्य आहे. त्याची एक झलक च खूप आहे,दिल खुश होणे के लीये!
Flamingo तर पाहयचा तर आहे मग त्यासाठी जवळ जायचे कुठे, चला तर मग flamingo पहाण्यासाठी थोडी भटकंती करुयात.
Flamingo(रोहित पक्षी):
Country : India
State : Maharashtra
District: Solapur & Pune boundry lines.
Actual Places: Diksal(Bhigavan),Kumbhargaon,Ramwadi,Takali(R).
(near Bheema river edges)
How to go :
Pune – Bhigavan –Diksal phata – Bhima river bridge.

पुण्याहून निघला तर डायरेक्ट भिगवणला येऊन थांबायचे,भिगवन मध्ये तुमची पोटपूजा छान प्रकारे होईल,त्यात जर तुम्ही माश्यांचे खव्ययी असाल तर मग मनमुराद आनंद घेतल्याशिवाय राहणार नाही. तिथून पुढे डिकसळ फाट्यावरून सरळ गेला की तुम्हाला भव्य अशा भीमा नदीचे दर्शन होईल. भीमा नदीचे अवाढव्य रूप पाहयचे असेल तर खरी मज्जा पावसाळ्यातच,अंगावर थरकाप उठवणारे ते पाण्याच्या लाटा जणू आपल्याला सोबतच घेवून जाता येत की काय अस वाटते. जाताना थोडा रस्ता तुम्हाला कच्चा च लागेल,थोडा जास्तच धरून चला. म्हणावं तसा विकासकाम अजून त्या मार्गाचे काही झाले नाही, असो! तिथे गेल्यावर तुम्हाला बाकीच्या कोणत्याही सुखसुविधा मिळणार नाहीत,म्हणजे तिथे कोणत्याही हॉटेल्स वैगेरे नाहीत. फक्त मोकळा निसर्ग आणि लांबच लांब भीमा नदी ! जे काही घेऊन जावे लागेल ते भिगवन वरुन च. बोटिंग शक्योतो केले जात नाही कारण पाण्याची पातळी तिथे खूप खोल आहे,त्यामुळे कोणताही धोका पत्करायला नको. अजून सांगायचे झाले तर भीमा नदीवरचा पूल हा ब्रिटिश कालीन रेल्वेचा पूल आहे,ज्यावेळी 1990 च्या सुमारास तिथे लोकांना घेणून जाणारी नावं (होडी) बुडाली तेव्हा पासून हा पूल चालू केला,असं तेथील राहणारे रहीवाशी सांगतात.पुलाच्या पलीकडे पुढे गेल्यावर चिंचोली,टाकळी,खातगाव,जिंती तसेच तिथे मकाई साखर कारखाना देखील आहे.पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे तिथे ऊस मोठ्या प्रमाणात पिकावला जातो. रोहित पक्ष्यासोबत तुम्हाला अजून बर्याच पक्ष्यांची झलक मिळते,वेगवेगळ्या प्रकारचे बदक,बगळा ,खंड्या विविध प्रकारचे छोटे मोठे पक्षी पहायला मिळतील आणि त्यांच्या लीलया,नक्की तुमचा दिवस तिथे चांगला जाईल.
Flamingo पाहण्याचा सर्वात उत्तम काळ म्हणजे हिवाळा,नोव्हेंबर- डिसेंबर,कधी कधी जानेवारी मध्ये पण ते तिथे येतात.सकाळी लवकर सूर्योदयाच्या वेळी त्यांचे दर्शन नक्की झाल्याशिवाय राहत नाही,तसेच संध्याकाळच्या वेळी पण ते तुम्हाला दिसतील.खर तर ते मूळचे डिकसळ चे नाहीत हे तुम्हाला तर माहीतच असेल ,ते ईथे migration म्हणजे स्थांलांतर करून येतात. Flamingo हा फिनिकोप्टेरस या जातीमधील आहे. तो पाणथळ ठिकाणी ते थव्याने राहतात. त्यांच्या चार प्रजाती ह्या अमेरिका खंडामद्धे तर दोन प्रजाती ह्या आशिया खंडामद्धे आढळतात. ते उष्ण कटिबंधात राहतात.त्यांचे जास्त प्रमाण हे आफ्रिकेमध्ये आहे तर कच्छच्या रणात देखील वास्तव्याला आहेत. तेथील पावसाळा संपल्यावर आणि पाण्याची पातळी गुडघाभर झाल्यावर ते मातीचे म्हणजे गाळाचे छोटे किल्ले बांधून त्यात अंडी घालून पिलांना वाढवतात. तेथील पाणी संपल्यावर ते ईथे ऊजनी जलाशया कडे येतात. आपल्याला भेटायला येतात मग तुम्ही पण भेटणार ना त्यांना नक्की!