इमोजीचा गोडवा😊😊
इमोजीचा खेळ आणतो नात्यात गोडवा…
शर्वरी आणि राकेश ची दुनिया सगळी इमोजीच्याच मागे, 📱हातात घेतला तर ना फक्त काही तरी चित्र दिसतात आणि त्यांचं बोलणं त्यांनाच कळो,तो 📱 जाणे.
त्यांचे भांडण सुद्धा इमोजीनेच असते आणि ते मिटत पण इमोजीनेच….
किती छान ना,मनात काही वैर नको का तोंडातून काही वाईट साईट आणि जास्त बोलायला नको,पटापट ईमोजी पाठवायच्या,भयाण… न थांबता आणि न थकता….
ईमोजी मुळे शब्दांना अजून भावनांची साथ मात्र मिळाली.
प्रेम व्यक्त करायला,शब्दांपेक्षा इमोजीच जास्त कामी येऊ लागल्या….
राग काढायला पण काय ईमोजी मागे नाहीत बर का,,
ना नाविध प्रकार त्यांच्यातपन आहेत…
लांबलचक शब्द लिहीत बसण्यापेक्षा एक ईमोजी टाकला की झालं काम सोपं…..
पण चुकून गेलेले ईमोजी पण ना,नवीन भांडण उभा करतात हे पण काय नवीन नाही…
शर्वरी आणि राकेश एक छान आणि गोड कपल,आताच्या काळातील,त्या दोघांमध्ये सख्खा जोडीदार आणि साक्षीदार म्हणजे 📱,हे महाशय पण आलेच की.

शर्वरी : गुड मॉर्निंग🌹🌹🌹🌹
राकेश: गुड मॉर्निंग 🦋,👉👉👉💐💐💐..💞
शर्वरी: 😊.… कुठे🤔….
राकेश :🏠..👉👉👉
शर्वरी :💇💇💇
राकेश:😏😏😏
शर्वरी:🙄😔😔😖
राकेश:😤😤
शर्वरी:👹👹😡
राकेश:🤥🤥.…👿☕☕
शर्वरी:☹️☹️
राकेश :😘🙏🙏
शर्वरी:😐
राकेश :😍😘😘
शर्वरी: 👍👍☕☕
राकेश: 🙌
शर्वरी:🙌….
किती गोड ना,बिलकुल शब्द न वापरता,अगदी गोड बोलणं झालं आणि थोडं नाजूक भांडण आणि पुन्हा छान कॉफी….शर्वरी ने केस कापलेले त्याला आवडत नाही आणि हलकेच रागावतो आणि ही पण लगेच चिडते ,तोंड पाडून,आणि परत हाच सावरत तिला कॉफी साठी विचारतो.
हे ईमोजी वापरात असताना खर,ईमोजी म्हणजे त्याच व्यक्तीचे चेहरे समोर आल्याशिवाय राहत नसतील,जणू काही त्यांचे जिवंतच भाव समोर आहेत.
शब्दांने शब्द वाढतो म्हणे पण ना इमोजीने पण आता शब्द मागे पडायला लागला आहे.
आज काल तर इमोजीची नवीन भाषा आली आहे आणि त्यापेक्षा सांगायच्या म्हणजे आपल्यापेक्षा त्या नव्या पिढीला जास्त अवगत आहे.
इमोजीचा एक फायदा म्हणजे मनात तेढ मात्र राहत नाही बघा.शब्दांच्या मारापेक्षा इमोजीच बेस्ट.☺️☺️☺️
Don’t Forget To Visit & Click On 🔔🔔
http://nutrirecipes.inspireinmarathi.com
Blog✅