विजय नात्याचा..
सहज मनातल्या मनात,”थॅंक्स कोरोना” हसतच तिच्याच नादात,फोन हृदयायला लावून,रेश्मा एकटीच खिडकीतून बाहेर पाहत होती.
मागचे दिवस तिला आठवत होते,पहिल्या लाटेमध्ये घाबरून का होईना आणि लहान तेज मुळे पहिले गाव गाठले होते.
गाव म्हणले तरी नको वाटायचं ,आणि त्यात ते आजून खेडवळ असले की मग तर नकोच!
लाईट नाही,पाण्याची नीट सोय नाही,प्रशस्त घर नाही,एरव्ही सणासुधीला जायचे म्हणले तरी तोंड वाकडे होयचे.
रेश्मा गावी कधीच राहिली नाही त्यामुळे तर मग,तिचे कोणाशी कधीच जास्त संबंध आलेच नाही.
दीपक ने रेश्माशी प्रेमविवाह केला होता,त्यामुळे जस लग्न झाले तसे तो आणि ती ,हेच तिचे विश्व होते.तिला कधी जास्त दिवस तिच्या सासू सासरे किवा तिच्या नंदांशी फार काही असे सलोख्याचे आणि भावनिक असे नात झालाच नाही.
त्यामुळे तिला गावी नको वाटायचे ,दीपक असला की मग करमुन जायचे पण एरवी ती कधीच एकटी नाही राहिली.
कोरोंना जाईल लगेच असेच तिला वाटले फारतर १५ दिवसांनी सगळं नीट होईन आणि परत जाता येईल मुंबईला,म्हणून फार काही वाटत नव्हते.
“आलो गावी” दीपक तिचा हात घट्ट धरतच म्हणाला.
“पण ना,दिपू मला ना …..” रेशु एवढच म्हणली.
“पण काय ” दीपक म्हणाला.
“नाही काही ” रेश्मा म्हणते.
“थांबा,आई पाणी आणि तुकडा घेवून येतेय,तुमच्या दोघांच्या अंगावरून टाकायचे आहे,” सविता म्हणाली.
तिघे जागेवरच थांबले.
सासुबाईंनी तुकडा उतरवून टाकला.
काय बोलायचे इथून प्रश्न रेश्मा च्या मनात होते.
त्यात तिथे तिची नणंद पण आली होती,ते सगळेच आले होते त्यांची चार जण माणसे आणि ही तिघे आणि सासू सासरे ,बघता बघता झाले ना नऊ.
सासू ने दीपक ला पाणी दिले आणि तेजू ला घेवून बसल्या.
तिला अपेक्षा होती की त्यांनी तिला पण पानी द्यावे म्हणून पण आपेक्षा भंग पावली.
थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे म्हणून तिने पण लक्ष नाही दिले.
सुरवात होती रोज कुरघोडी चालत होत्या,पहिल्यांदा एवढ्या दिवस आली होती ना त्यांची सून आणि तिची वाहिनी म्हणल्यावर तिच्याकडून लाड करून नको का घ्यायला.
मुलांना पण तर मामी कडूनच सगळे पाहिजे होते.
पण या लाड पुरवण्याचा कार्यक्रम तिला त्रास च देत होता,सगळे तिचा पुरेपूर वापर करून घेत होते.
म्हणावे तसे घालून पाडून बोलत होते.
अंधश्रदधा तर नको तेवढ्या,बापरे त्यात तेजूचे खूप हाल होत होते,तरी पण ती काहीच बोलाली नाही.
दिवस आता खूप त्रासदायक होत होते,तिचे,सगळ्यांना दीपक हवा होता पण रेश्मा म्हणले की लगेच त्यांच्या पुढे येयची ती थोडक्यात कामवाली,सगळं तीनेच करायचे,मदत तर कोणतीच नाही पण कौतुक पण नाही,थोडे काही चुकले तरी एवढा मोठा विषय होयचा की त्याला काही लिमिटच नसे.
दिवस जात होते,पंधरा दिवसांचे लॉकडाऊन आता महिन्यांनावर वर येऊन ठेपले होते,आता तिचा संयमाचा बांध सुटत होता,चीड चीड खूप वाढली होती.
काय होतय तेच काळात नव्हते,आता खरच तिला सगलच नको झाले होते,पण पर्याय नव्हता.
“दीर्घ श्वास घेतला आणि मेडिटेशन करतच स्वताला शांत केले,स्वतला समजवतच ती बोलली ,दीपक माझा आहे ,त्यांच्यामुळे दीपक आहे मग मी एवढ नाही करू शकत का,पुन्हा अस कधी तरी होईल का ,कदाचित हे शेवटचे आहे,पुन्हा सगळ्यांच्या सोबत राहत येईल की नाही काही माहिती,त्यांचे संस्कार जे ते मला आपले मानत नाही,पण मी तर त्यांना आपले मानून पुन्हा भेट होणार नाही कधीच म्हणून तर छान राहू शकते ना,स्वतशीच बोलणं चालू होते,” रेश्मा चे स्वतला शांत करत,मनातील द्वेष काढून टाकत ,थोडे स्वतला हलके करत जे आहे तसच्या तसे तिने स्वीकारले होते.
जगण्याची कलाच जणू तिला माहीत होती,सुरवात जारी चांगली झाली नसेल पण शेवट मात्र तिला गोड करूनच जायचा होते.
रेश्मा खूप मनमिळावू ,सगळ्यांना लगेच आपलेसे करणारी,चिडकी होती खूप पण वेळेची खूप किमत तिला होती,नात्यांची ओढ पण होती पण ती पहिल्यापासून शहरात वाढलेली,तेथीलच संस्कृती जपलेली आणि खुल्या विचारांची होती आणि मॉडर्न जीवनशैलीची ,तिला आवडत होते छान राहायला आणि दिसायला पण.
आपल्या कडील संस्कृतीच म्हणावी लागेल ना,की जेवढे माणूस दिसण्यावरून छान ते तेवढे वाईटच असेल,आणि त्यात जर त्या मुली शहरात राहत असेल तर मग काय बोलूच नाही,याची प्रचिती निम्म्याहून लोकांना नक्कीच आली असेल.
असो………………………
रेश्माने ठरवले होते,कोरोंनाचा हा काळ घरच्यांच्या नावावर,इथून जाताना फक्त एक समाधानच घेवून जायचे,त्यांनी कस वागव हे त्यांची चॉइस आहे पण मी कस वागव ही माझी चॉइस आहे,म्हणून ती अगदी मनापसून आणि आनंदाने करत होती सगळ्यांसाठी अगदी वैयक्तिक लक्ष घालत होती.
हा फरक फक्त दीपकच्या लक्षात आला होता कारण,तिची किरकिरर बंद झाली होती आणि तिच्या चेहर्यावर एक समाधान दिसत होते.
आणि दीपक रावांना अजून तिच्या प्रेमात पाडायला,दीपक अजूनच जास्त प्रेम करायला लागले अगदी फुल्ल ऑन लठ्ठू झाला होता आणि ते काही लपत नव्हते.
अस कोणी त्यांच्याकडे पाहून म्हणत नव्हते की त्यांच्या लग्नाला आता १२ वर्ष झाली आहेत.
रेश्माचा प्रवास चालू झाला होता,सगळं छान करण्याचा,एक प्रयोगच होता तो आणि एवढा रिकामा वेळ तरी कुठे परत भेटणार होता तिला,निस्वार्थी नात एका बाजूने का होईना जपल जात होते आणि त्यात ती खुश होती आणि समोरच्या सगळ्या आठ जणांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होती.
सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ रोज बनवत असे,सगळ्यांना वेगवेगळ्या नवीन नवीन डिश बनवून खायला घालायला सुरवात झाली खर,म्हणतात ना,प्रेमाचा मार्ग पोटातून जातो,तेच हे.
सगळ्यांना भरभरून खायला घातले,आणि समोरून ही तसाच प्रतिसाद ही मिळाला,सगळ्यांची पोट तृप्त झाली ती ,मन ही तृप्त होयला वेळ लागला नाही आणि नेहमीच ती तिच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर होती.
हे सगळे करण तिच्यासाठी सोप्पं नव्हतं पण तिचे खूप त्रास होत होता,आणि कंटाळा तर बोलू नका,या सगळ्यात तिचे वजन ही खूप कमी झाले आणि अशक्तपना तोंड वर काढू लागला होता.
एखादे टवटवीत फूल जस सुकून जावावे अगदी तसच पण त्याचा सुगंध मात्र तसाच असतो,तसाच काहीसे रेश्मा चे झाले `होते.
लॉकडाऊन अगदी मजेत घालवण्याचे तिचा निर्णय आता तिलाच आवडत होता.हळू हळू घरातही वातावरण छान झाले होते.
मुलांच्या तोंडात पण आता सारखं मामी मामी चा आरडाओरडा चालू होता.
त्यात आला तिच्या नंदू बाईंचा वाढदिवस होता आणि आयताच तिला त्यांच्यासाठी काही तरी करण्याचा चान्स मिळाला होता.
गावाकडे केक मिळण थोडे मुश्किलच होते आणि त्यात लॉकडाऊन त्यामुळे तर सगळच अवघड झाले होते,पण मनावर घेतले म्हणल्यावर वाढदिवस जोरातच करणार होती ती.
“हॅलो,भाऊजी मी रेश्मा तुम्ही आता बाहेर आहात ना ,तिथून तुमच्या ओळखीने केक आणि पनीर भेटले तर बघा ना ,प्लीज?? रेश्मा फोन वर बोलत होती.
……………………,भाऊजी.
“ट्राय नको ,प्लीज काहीही करूनच घेऊन या ना,खूप गरजेचे आहे” रेश्मा म्हणाली.
…………………………….. भाऊजी.
“ओके” रेश्मा फोन ठेवते.
केक तर मिळून जाईल आणि आता प्रश्न आहे त्यांच्या जेवणाचा मेनू ठरवण्याचा ,तिला 20-25 दिवसातून तिला जेवढी आवड तिला माहीत होते त्याच्यावरून तिने त्यांच्यासाठी छान स्वयंपाक बनविला.
शेवायची मस्त ड्रायफ्रूटस घालून खीर ,बटाट्याचे कटलेट्स,मस्त पनीर टिक्का मसाला ,डाल तडका आणि जिरा राईस आणि सुककी पण झणझणीत मोड आलेले मटकी ,तोंडी लावायला कोशिंबीर हे सगळ खाण्यासाठी चपाती पण आणि थोड्या पुर्या पण केल्या होत्या.
“सकाळचे सगळी काम आवरून झालीत,आणि भाऊजी नी केक आणि पनीर घेऊन येणार आहेत,बाकी सगळं घरीच करणार आहे,गिफ्ट द्यायला काही नाही रे वस्तु माझ्याकडे ” रेश्मा दीपक ला सांगत होती.
“अग, बायगो एवढे छान जेवण देतेयस अजून काय गिफ्ट घेऊन बसतेस,तुझ्या हातचे जेवनाला सगळी गिफ्ट फिकी आहेत.” दिपू तिला जवळच घेत बोलला.
त्याच्या नजरेत अजूनच तिचा अभिमान दिसत होता,जणू काही त्याच्याजवळ अस काही जे जगात भारी आहे.
आणि खर आहे ,होतीच रेश्मा जगात भारी !
दुपारी सासू आणि सविता ताई म्हणजे त्यांची ननंद बाहेर जाणार होत्या,त्यांच्या नात्यातील कोणी आजरी होते म्हणून त्या भेटायला गेल्या.
मग काय मॅडम वर अजूनच लोड,त्यात तेजू आणि त्यांच्या दोन मुले आणि 15 लोकांचा घातलेला घाट,नकोच झालं तिला.
पुन्हा सगळं बळ एकवटून सगळे केले तिने.
संध्याकाळचे सहा वाजून गेले होते,ऑल्मोस्ट सगळं स्वयंपाक झाला होता,दुपार पासून बिचारी उभी होती.
सात पर्यन्त सगळे घरी आले होते,तोपर्यंत तिचे किचन मध्ये काम चालूच होते.
तिने सविता ताईना आवरायला संगितले आणि केक घेऊन हॉल मध्ये शेजारील आणि त्यांच्या तेथील जवळच्या मैत्रीना बोलावून घेतले होते.
सगळेजण खुशीत होते,सगळ्यांनी छान आवरले होते,पण रेश्मा किचन मधील आवरण्यात आणि सगळ काम करण्यात,कामवाली पेक्षा काही कमी दिसत नव्हती.
तो आवतार पाहण्यासारखाच होता तिचा,पण त्याच्या मागचा घाट कोणालच दिसत नव्हता.
शेवटी तेवढी नजर असते तर रेश्माला कधीच सगळ्यांनी ओळखले असते.
असो…
वाढदिवस छान आणि जोरात झाला आणि सगळे अगदी खुशीने पोटभरून सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
आज खर्या अर्थाने ती सुखावली होती,पाय मात्र सुजले होते आणि चेहर्यावर कधी झोपेल अस झाले होते.
सविताकडून काहीच प्रतिसाद नाही मिळाला,तशीच तिने पण काही अपेक्षा ठेवून थोडी ना काही केले होते.
दुसर्यादिवशी सकाळी सगळ आवरून किचन मध्ये जाते तर काय आश्चर्यचकीतच होते की..
“हे घ्या वाहिनी ,मस्त गरम गरम चहा आणि मस्त पोह्याची प्लेट हातात घेऊन सविता ,रेश्माला म्हणते.
“अहो कशाला,थोडा उशीरच झाला ना मला आज उठायला,सॉरी” थोड्या अपराधीपानाच्या भावनेनेच रेश्मा म्हणाली.
“सविता ने तिला घट्ट मिठी मारली आणि तिला थॅंक्स म्हणाली ,काल माझा पहिल्यांदा एवढा छान वाढदिवस साजरा केला,तुम्हाला माहीत नाही माझ्याकडे शब्द नाहीत,”सविताच्या कडा डोळ्यांच्या ओल्या झाल्या होत्या.
आणि इकडे रेश्मा पण भावूकच झाली होती खूप.
एक प्रसंग तिला आता एका घट्ट नात्यात बांधून ठेवला होता.
सविता तिच्यापेक्षा सहा वर्षानी मोठी होती पण आज रेश्मा सगळ्यांच्या नजरेत ती मोठी झाली होती.
मनाची लॉक आता कुठेतरी निघाली होती,कायमची.
रेश्मा ला ताईच्या रूपात,मोठी बहीण मिळाली होती आणि मैत्रीण मिळाली होती आणि नाती अगदी सहज झाली होती.
लॉक डाऊन मधील हा नात्याचा सगळ्यात मोठा विजय होता,अर्थातच त्यासाठी तेवढा वेळ लागला होता आणि लॉकडाऊन चा सगळ्यात मोठा रोल होता,म्हणून ताईंच्या सोबत फोन वर बोलून मनातल्या मनात थॅंक्स म्हणत होती.