सुख-दुःख- Talks
सुख आणि दुःखात फरक काय???
सुख मनाला आनंद देते,ते हवं हवं स वाटते.
दुःख मनाला वेदना देत, ते नकोस वाटते.
अजून…….
दुःख बेधडकपणे पणे आयुष्यात प्रवेश करते आणि सगळं हादरून सोडते.
त्याउलट सुखाचं आहे, सुख येत असते पण ते दिसत नाही,आपल्याला दरवाजा उघडायला लागतो त्याला आत घेऊन यावं लागत आणि मग ते आपल्याला आपलंसं करते हे अस असते सुख.
म्हणून तर कधी कधी जवळ असून पण सुख दिसत नाही आणि आपण दुःखाच्या विळख्यातून बाहेर पडत नाही.
ज्यावेळी पण दुःख वाट्याला येईल ना,तेव्हा तेव्हा नीट लक्ष देऊन राहा काय माहिती त्याच्या मागोमाग सुख आणि आनंद मागे येत असतो फक्त त्याला आदराने आपल्या आयुष्यात घ्यायचा आहे,अगदी हसत आणि सुखाने सुख स्वीकारायचं आहे….
जेव्हा आपण सुख स्वीकारु तेव्हा दुःख नक्कीच मागे हटते…..