मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

लघुकथा संग्रह

चार दिवस दिवाळीचे!!

“अहो,आई अजून सुट्ट्या नाहीत,तिचे सी..बी.एस.सी. बोर्ड नाही का म्हणजे केंद्रीय शाळा त्यामुळे तिला नाही लागत दिवाळीच्या सुट्ट्या लगेच,दिवाळीच्या आधी लागतात दोन -तीन दिवस मग मी येईल” श्रुती फोन वर बोलत होती. 

“……… “,तिकडून आई.

“ठेवू आता काम आहेत अजून खूप”श्रुती अस म्हणतच फोन ठेवून देते.

आशु तुझ्या शाळेमुळे ना माझी पुरती धावपळ होती बघ,अजून सगळ्यांना कपडे घेयचेत,आकाशकंदील घेयाचं ,पणत्या ,रांगोळी सगळं घेऊन गावी जायचंय,”श्रुती आशूला सांगत होती. 

“झालं आई अजून फक्त एक दिवस मग आपण लगेच गावी जाऊयात ” आशु श्रुतीला म्हणते.

“हो ना,तुमची शाळा दिवाळीच्या आधी एक आठवडा का सुट्टी देत नाही ना तेच कळत नाही” श्रुती थोडं चिडतच आशूला म्हणते. 

“पुढच्या मिटिंग मध्ये ना आई हे तू नक्की सांग,की दिवाळीच्या आधी एक आठवडा सुट्टी देत जा म्हणून ” आशु हसत श्रुतीला म्हणते.

श्रुती पण त्यावर लगेच हसते.

“उद्याचा एक दिवस आणि परवा तर जेवढ्या सकाळी जात येईल तेवढ्या सकाळी जाऊ यात आपण,तुम्ही आम्हाला सोडून या गावी परत वाटले तर”श्रुती राघव ला म्हणत होती.

“हो करूयात सगळं व्यवस्थित नको काळजी करू” राघव तिला म्हणतो. 

श्रुतीच्या डोक्यात फक्त दिवाळी आणि दिवाळीचे फराळ आणि कमीतकमी असणारा वेळ एवढ्याच गणित चालू होते आणि बाकी घरातल्या सगळ्यांच्या डोक्यात खरेदी आणि धम्माल.

लग्नाधीच्या दिवाळीत जी मजा असते ना ती लग्न झाल्यावर नसते एवढं नक्की,कधी कधी तर फराळ करता करता सण निघून पण जातो,दिवाळीची कपडे पण नवीन नीट घालता येत नाहीत की नीट मिरवता पण येत नाही. 

श्रुतिच्या डोक्यात विचारांचे चक्र चालूच असते.

तसे अजून दिवाळी चालू होयला चार दिवस असतात बाकी पण श्रुतीच्या घाई आधीच चालू असते कारण धनत्रयोदशी दिवशी परत तिला वाशिला येण्याचं असते आणि परत पाडव्याला गावी म्हणून तिची दिवाळी म्हणले की धांदल उडायची. 

एकटीच होती ना त्यामुळे सगळं तिला वेळेवर आणि छानच करायचे असते म्हणून सगळं हा अट्टहास.

दुसऱ्यादिवशी आशुचे स्कूल सुटले की पाहिले शॉपिंग ला जायचं होते म्हणून श्रुतीने आधीच बॅग भरून ठेवल्या होत्या.घरातील जवळपास सगळी भराभरी झाली होती. 

तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते……

“आले” श्रुती दरवाजा उघडते.

“बर झालं आशु तू लवकर आलीस,जा पटकन आवरून घे आणि हो जेवून पण घे पण आपण लगेच खरेदीला निघुयात आणि जमल तर आजच गावी जाऊयात”श्रुती आशूला म्हणते. 

“हो ग आई ,लगेच आले”आशु आईला म्हणते. 

“हॅलो,येताय ना तुम्ही झालाय आमचं म्हणजे तुम्ही येईपर्यन्त आम्ही खाली येतो मग जाऊयात आपण” श्रुती राघव ला फोन वर बोलत असते.

(फोन लाऊडस्पीकर वर असतो)

“माझं थोडं ऑफिस च काम राहिलाय,तुम्ही दोघी पुढे व्हा,मी आलोच मागून”राघव तिला म्हणतो. 

“अहो पण आम्ही जाणार कसं रिक्षाने खूप वेळ लागेल आणि समान पण खूप आहे,मग कस होणार आहे”श्रुती राघवला म्हणते.

“मग काय करतेस,बघ तुला जमेल तसं कर” राघव श्रुतीला म्हणतो आणि फोन ठेवून जातो. 

श्रुतीची खूप चीड चीड होत असते,काय पण दिवाळीमुळे माझी पुरती हालत बेकार होतीये.

श्रुती ,आशूला घेऊन खरेदीला जाते,रिक्षाने जमेल तसं ते खरेदी करतात आणि रात्री त्यांना राघव पण येऊन भेटतो. 

उशीर झाल्यामुळे बाहेरूनच जेवण करून येतात.

“मी काय म्हणतेय,घरी तर सगळं आवरून झालाय मग जायचं का आताच आपण गावी,दहा तर वाजले आहेत तीन तासात पोहचू म्हणजे मला तेवढंच पूर्ण दिवस भेटतील फराळ बनवायला आणि मग धनत्रयोदशी दिवशी निघुयात दुपारी”श्रुती राघव ला म्हणते.

“बरं ,पण मला खूप कंटाळा आलाय आणि उद्या परत ऑफिस पण आहे ग” राघव तिला म्हणतो.

“म्हणून तर म्हणले रात्री आम्हाला सोडा आणि परत सकाळी या”श्रुती हट्टाहासाने सांगतच असते की आताच जाऊ आपण म्हणून.

शेवटी श्रुतीच्या आग्रहाने सगळे रात्रीचेच गावी जातात,पण राघवचा डोळा लागतो आणि अपघात होता होता वाचतो. 

तसे सगळं शांत वाटायला लागते आणि मनात विचार चक्र चालू होते,खरंच या सगळ्याची गरज आहे का??

दिवाळी सगळ्यांनी मिळून मिसळून एकत्र करावी ही परंपरा पण त्यामध्ये जर एवढी ओढाताण होत असेल तर गावची दिवाळी शहरात झाली तर बिघडलं कुठे,इथे पण असतेच की सगळं,हा अट्टहास काय कामाचा.…..

सगळ्या विचारात गाव पण येते.

श्रुतीची सासू येते.

“एवढ्या उशिरा कशाला आलीस,सवय लागलीये तुम्हाला रात्रीचे फिरायची” सासूबाई श्रुतीला म्हणतात.

“आई,दमालोय खूप आम्ही झोपतो जाऊन “राघव आईला म्हणतो.

सगळे शांत जाऊन झोपतात.

सकाळ थोडी लवकरच होते गावाकडे,नाही का?????

श्रुती इकडे आठ वाजता उठायची पण गावाकडे आली की तिची सकाळ साडेपाच लाच होयची,सकाळी लवकर उठून अंगण झाडून सगळं आवरून सगळ्यांसाठी साडेसात ला तर नाश्ता तयार असायचा,गावाकडे सगळंच लवकर आवरते पण दिवाळीत काही लवकर आवरत नाही.

आज आणि उद्याचा दोन च दिवस होते तिच्याकडे पर्वा परत तिला वाशिला जायचं होते.

सकाळी तिने किराणाची यादी बनवली आणि पाठवून पण दिली गावात,श्रुतीचे आजचे नियोजन चालू होतं,लायटिंगच्या माळा,आकाशकंदील लावायचा परत सगळं निवडून काही भाजून ,वाळवून सगळं तयार ठेवायचं आणि मग लगेच दिवाळी फराळ बनवायला घ्यायचा,अस सगळं डोक्यात होतेच,आजचा दिवस तिचा सगळं वाळवण्यात आणि भाजण्यातच गेला परत संध्याकाळी स्वयंपाक होताच की गावाकडे सगळेच लवकर जेवण करतात म्हणून तिने सगळं आवरून घेतले .

रात्री जेवण झाली,सगळे झोपायला गेले पण ही च्या डोक्यात घड्याळाचे काटे फिरत होते त्यामुळे की काय झोप काही लागेना,अस पण काम ठेवून झोपेल ती श्रुती कसली! 

“झोप आता,कधी पण काय पण करत बसते,” सासूबाई तिकडून म्हणल्याच.

“शंकरपाळी आणि कापन्या करून घेते आत्ताच”श्रुती सासू बाईना म्हणाली. 

“तुला एक झोप नाही ,आम्हाला आहे झोप,कर काय करायचं ते”सासूबाई रागातच आणि खेसकतच तिला म्हणाल्या.

लक्ष न देता रात्रीच श्रुतीने सगळं आवरून घेतले,शंकरपाळ्या आणि कापण्या पण केल्या,घड्याळात पाहिले तर बारा वाजले होते पण अजून अर्धा तास होऊन जाईल म्हणून अनारसे पण करून घेतले. 

बाराचे एक कधी झाले तेच समजले नाही. 

“देवा,जीव खूप दमला बघ,पण हौसेला मोल नाही,” श्रुती स्वतःशीच बडबड करत जाऊन झोपली ही…

आज वसुबारस, म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचे म्हणजे गाई-म्हशींना ओवळायच,त्याची छान पूजा करायची,गवार आणि बाजरीची भाकरी करायची आणि नेवेद्य दाखवायचा. 

श्रुती फक्त गोठ्यात वसुबारसला जात असे,तिला जनावरे,शेती मध्ये काहीच रस नव्हता आणि गाव पण तिला आवडत नसायचं पण सासू-सासाऱ्यांना आई-बापाप्रमाणे जपणारी श्रुती मात्र कधीच कोणाला दिसली नाही. 

श्रुतीने ठरवलं असते तर तिने वाशी मध्येच छान दिवाळी साजरी केली असते पण सासू- सासाऱ्यांसाठी ती गावी येण्याचा अट्टहास करत असे,असो!!

सगळं नेहमीप्रमाणे आवरून आज दिवसभरात चकली,लाडू आणि चिवडा पार पडला,झालेली तिची तानाताण तिलाच माहिते,उभे राहून पायाचे गोळे बाहेर पडले होते ,अंगात त्राण नव्हता पण दिवाळी गावीच करायची,हा तिचाच अट्टहास,त्यामुळे बोलणार कोणाला आणि चिडणार कोणावर आणि हो,सासूबाई होत्याच की टोमणे द्यायला त्यांच्या टोमान्यांनी डोळे भरून येयचे तिचे.

संध्याकाळी छान दरवाजपुढे रांगोळी काढली नंतर छान स्वयंपाक केला आणि गोठ्यात सगळ्याच गाई तिला सारख्या दिसायच्या,मनात भीती असताना पण त्या तिला घाबरायच्या आणि ही गाईंना घाबरायची,कशी- बशी पूजा करून घेयची पण ती.

“अरे,देवा करंज्या कधी करू आता,आज सगळं आवरायलाच खूपच उशीर झालाय जवळजवळ साडेदहा वाजलेत आणि त्यात पीठ पण भिजवले नाही”श्रुती सासूबाईंना म्हणते.

“तुझं कामच असल असते,जा झोप आता,सकाळी करून जा पण” सासूबाई श्रुतीला म्हणतात.

“हो हो करावंच लागेल”श्रुती म्हणते .

श्रुती झोपायला निघून जाते.

आज धनत्रयोदशी ,आज राघव पण माघारी येणार असतो त्यांना घेयला. 

उठल्या उठल्याच करंजीचे पिठ मळून ठेवते आणि बाकीचे आवरून घेते.

जाण्याची वेळ आली तरी ही करंज्याच करत असते.

“राहू दे ते,करेल की आई,किती उशीर झालाय आधीच”राघव श्रुतीला चिडतच बोलतो.

“हो झालाच तुम्ही जेवून घ्या,मी काही जेवणार नाही,मो तोपर्यंत तेवढ्याच होतील तेवढया करून घेते.”श्रुती अगदी शांतपणे राघवला म्हणते.

धनत्रयोदशी आजची पूजा तशी खूपच महत्वाची आरोग्याच्या दृष्टीने,सगळ्यांना चांगले आरोग्य मिळावे म्हणून प्रार्थना केलाय जाते,धन्वंतरी देवीला.आयुर्वेदिक पूजा म्हणलं तरी चालेल,सगळ्यांना चांगलं आरोग्य भेटू दे म्हणून ही पूजा केली जाते.

तसे सकाळी जरी ही पूजा केली तरी चालते कॅलेंडर मध्ये तशा वेळा ठरवून दिलेल्या असतातच.

श्रुती गावाकडची पण पूजा करते काही न खाताच थोडी थोडी दिवाळी फराळ घेऊन वाशीला जायला निघते.

“केवढा उशीर केलास ,नाहीतर येऊ नको तू ” राघव जास्तच चिडत श्रुतीला म्हणतो.

“हम्म झालाय चला”श्रुती म्हणते. 

श्रुतीने काही खाल्लं नसते आणि पूजा पण करायची असते जाऊन तिच्या घरी म्हणजे वाशी मध्ये…

“आपण काही तरी खावूयात का,भूक लागली आहे बेक्कार”श्रुती राघव ला म्हणते.

“पार्सल घेऊयात,वेळ वाचेल”राघव तिला म्हणतो.

“बरं” श्रुती म्हणते. 

रात्री नाही नाही म्हणता आठ वाजले त्यांना वाशी मध्ये.

पटकन आवरून अगदी नटून-थटून श्रुती आनंदाने धनत्रयोदशीची पूजा करते आणि समाधानी होते.

झालेली धावपळ अगदी विसरून जाऊन आज ती थोडी निवांतच घालवते आणि स्वतःच स्वतःच्या विचारांमध्ये हरवून जाते.

उद्या काही नसते म्हणून सगळं निवांतच चालू असते,मस्त उशिरा उठून छान नाश्ता बनवून उद्याच्या तयारी आणि पुन्हा पूजा करून गावी पण जायचे असते ना.

अहो,तेथील लक्ष्मीपुजन नको का,आशीर्वाद तरी घ्यायला. 

आज थोडा वेळ होताच म्हणून थोडे चिरोटे आणि आशूला आवडतात म्हणून बेसनपीठाचे लाडू पण केले.उद्याच्या पूजेचे सामान पण घेऊन आली.

आज अभ्यंगस्नान, त्यामुळे काय सकाळ उठणं काढण्यात आणि पाहटे पासून उठा उठा करण्यातच कधी सात वाजतात तेच समजत नाही.

नरकचतुर्दशी पण असते ना,दिवस उजडायच्या आत अंघोळ करून तयार नको का राहिला नाही फार नरकात जाते माणूस!

श्रुतीने तर सगळं आवरून छान दिवे लावून मस्त रांगोळी पण काढली होती.

पण आशु आणि राघव उठायचं नाव घेत नव्हते.

त्याच आवरता आवरता कधी दुपार होते तेच समजत नाही.

पुन्हा लक्ष्मीपूजनच्या पूजेची तयारी चालू होते,सगळ्या पायऱ्यांवरून दारात सगळीकडे दिवे आणि रांगोळीची आरास असते,सगळीकडे अगदी दिव्यांनी खुलून गेलेलं असते.मनाची मळभ पण दूर झालेली असते,वातावरण पण अगदी प्रफुल्लित झालेले असते.

लक्ष्मीपूजन ला खूप महत्व असते,कलशावर ठेवून श्रीफळ घेऊन याला  लक्ष्मी बनवली जाते,घरात असलेल्या सोन्या-चांदीची पूजा केली जाते तसेच केरसुणी आणून त्याची पूजा केली जाते. 

लाह्या आणि बत्ताशा ही देवीला वाहिला जातो. 

हो ,पण लक्ष्मीपूजनचा पण ठराविक मुहूर्तच असतो तेवढ्या वेळात ती आवरावी लागते.

“झाली का सगळी तयारी,श्रुती” राघव विचारतो.

“हो झालीये,पूजा झाली की निघूयात”श्रुती म्हणते.

“जेवनाच काय”राघव म्हणतो”

“विसरलेच,मी म्हंटल पाडव्याची पार्टी आहे वाटत आज”श्रुती लटकतच हसत म्हणते.

“चला “राघव म्हणतो.

आशु,राघव,श्रुती छान मनापासून पूजा करतात आणि गणपतीची आणि लक्ष्मीची पण आरती करून सगळं नीट बंद करून गावाला जायला निघतात.

वाटेमध्येच जेवण करतात आणि सुखरूप घरी पोहचतात.

गावी गेले की सगळे झोपलेले असतात,तरी देवापुढे जाऊन आशीर्वाद घेतात त्यांच्या येण्याने सासू- सासरे जागे झालेलं असतात,त्यामुळे त्यांचे पण अगदी मनापासून आशीर्वाद घेतात आणि निवांत बाहेर बसतात. 

पाडवा, आज सगळ्या सुवासिनींनी पती देवाला ओवळायचे असते आणि पतीदेव त्यांना ओवाळणी टाकतो.

“राघव,चल उठणं काढून घेते आणि मग तुला अंघोळ घालते” श्रुती राघव ला म्हणते.

“हो ना,यावर्षी ते डायरेक्ट पुढच्याच वर्षी की”राघव तिला म्हणतो.

“गप चल”श्रुती त्याला हसतच म्हणते.

उठणं लावून,मळी काढून श्रुती रागावला अंघोळ घालते आणि त्याला ओवाळते,तो पण तिला ओवाळणी टाकतो.

पाडवा छान पार पाडतो,पाहुण्यांचे फराळाचे डब्बे भरायचे असतात त्यांना पाठवायचे असतात,कोणाचे आलेले असतात ते परत भरून देण्याचे असतात. 

दिवाळीची खरी मजा सगळ्यांना देण्यातच असते!

उद्या श्रुती माहेरी जाणार असते,म्हणून सासू ची किरकिर चालूच असते.

“हॅलो ,उद्या पाच वाजताच ये ,नको सकाळी येऊ ” श्रुती तिच्या भावाला सांगत असते.

श्रुती एवढंच बोलून फोन ठेवते आणि झोपायला निघून जाते.

भाऊबीज बहीण- भावाच्या घट्ट नात्याला बांधणारी घट्ट वीण,कधीच न तुटणार पण सारखे रुसव्या फुगव्यांनी भरलेले नात म्हणजे हे नातं.

सकाळपासून स्वयंपाकाची रेलचेल चालू होती, आज नणंद येणार होती ना!

केवढ्या त्या खुश होत्या,आनंदच गगनात मावत नव्हता…

हाच आनंद श्रुती आल्यावर दाखवला असता ना तर धन्य झाला असता,सासूबाई तुम्ही,वेळ न येवो आणि श्रुतीने दिवाळीला गावी येण्याच बंद न करो,असो..

जेवणाचा एकदम छान बेत झाला,आशुची पण छान भाऊबीज झाली,राघवची त्याच्या सगळ्या चुलत ,मावस बहिणीसोबत पण छान भाऊबीज झाली.

श्रुती मात्र स्वयंपाक आणि जेवण च बनवत होती.

मन आतुरतेने भावाची वाट पाहत होते ,कधी तो येईल आणि एकदाची सुनेच्या जबाबदारी मधून आवडत्या लेकीचा रोल निभावेल अस तिला झालं होतं.

पण कालच भैयाला उशीरा ये म्हणून सांगितलं होतं ना,सगळ्यांच भाऊबीज झाल्याशिवाय पण तिला जाता येत नाही. 

शेवटी भैया आला,तो आल्यावर खायला द्यायला ला पण मुभा नसायची,आहे हे दिवाळीचे फराळ तिने दिले आणि त्याच्यासोबत सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन एकदाची ती माहेरी गेली.

श्रुती स्वतःला अतोनात त्रास करून घेऊन फक्त राघवच्या आई -वडीलांसाठी म्हणजे तिच्या सासू-सासाऱ्यांसाठी ती दिवाळी सगळ्यांसोबतच साजरी करावी म्हणून परंपरा ती जपत असते ,सगळ्यांच्या मनाचा विचार करत धडपडत असते ,मदतीची अपेक्षा नसते हो तिला कौतुकाची एक थाप हवी असते आणि दोन गोड शब्द! 

अशा श्रुती अजून आहेत म्हणून दिवाळीला खरी रौनक आहे नाहीतर आज पण आपण सगळीकडे पाहतोच की टी.टी.एम.एम. तुझं तू आणि माझं मी.

चला मग चार दिवसाची दिवाळी मजेत साजरी करूयात.

Subscribe to Channel
Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: