संजोऱ्या-श्रावनस्मृती
श्रावणस्मृती
सांजोर्या,सगळ्यांना माहीतच असतील,नव्या नवरीला श्रावण पाठी देण्याची अजूनही पद्धत सगळीकडे आहे,पण प्रत्येक ठिकाणची सांजोर्या बनवण्याची पाककला मात्र वेगळीच आहे. माझे सासर आहे सोलापुरी पद्धतीचे आणि माहेर आहे पुण्याचे,झाले असे की दोन टोके वेगवेगळी,चालीरीती पण आल्या ना मग वेगळ्याच,खाण-पिण तर वेगळेच असते त्यात अजून भाषा तर अजून च वेगळी असते. पण माणुसकीची भाषा मात्र सारखीच म्हणून माझे खर निभावले.
म्हणजे आमच्याकडे ,सासरी सांजोर्या चे सारण असते ना,ते असते गव्हाच्या बारीक कण्या पासून बनवलेले,खाण्यासाठी चांगलेच लागते ते ,पण आमच्याकडून होते काय त्याचे की ते तेल खूप धरते,म्हणजे खूप चिप चिप वाटते म्हणून माहेरी कोणी खात नाही. मग आईने थोडी युक्ति काढून आणि स्वयंपाकामधील दांडगा अनुभव असल्यामुळे तिने सारणचं बदलले,यावेळी तिने गव्हाच्या ऐवजी तांदळाचे सारण वापरले आणि माझी श्रावण पाठीला त्याच्याच सांजोर्या दिल्या.बिलकुल तेल धरले नव्हते आणि खाण्यासाठी पण अगदीच चविष्ट होत्या.
सासरी गेल्यावर लगेच नकोच म्हणले सांगायला ,सगळ्यांनी खावून झाल्या की मग सांगायचे की ,किंवा खाताना सगळ्यांच्या लक्षात तर येणारच ना!
“खूपच,छान झाले आहे गं”,गव्हाचे दिसत नाही,पण मस्त लागतेय.” सासूबाई म्हणल्या.
हुश्श,एकदाचे आवडले त्यांना पण,त्या दिवसापासून आम्ही पण तांदळाचे सारण वापरुन सांजोर्या करायला लागलो ते अजून पण त्याच करतो.
अशी ही सांजोर्यांची गंमत !