ओंजळ भरलेली..
#भरलेली ओंजळ…….
खर सांगायचं झालंच तर आपली ओंजळ भरलेली आहे का रिकामी हे फक्त ज्याचा त्याचा दृष्टिकोनच ठरवू शकतो ,नाही तर तुम्हाला सगळयांना माहीतच आहे की,अर्धा ग्लास रिकामा आहे म्हणून रडणारे पण इथेच आपण पाहिले आहेत आणि अर्धा ग्लास भरला आहे म्हणून आनंदित राहणारे पण पाहिलेच आहेत. आपली ओंजळ नेहमी भरलेली असावी म्हणून प्रत्येकालाच नेहमी वाटते पण दृष्टिकोनात जर थोडासा बदल केला तर नक्कीच नेहमी आपली ओंजळ भरलेली आहे असं आपल्याला वाटेल.
गौरी, नावत काय आहे असं म्हणतात ना ते हेच.
गौरी म्हणलं की नाही म्हणल तरी सगळयांच्या डोळ्यासमोर गणपतीबाप्पा आल्याशिवाय राहत नाही.जिची ओंजळ नेहमीच गणपतीबाप्पा च्या आशीर्वादाने भरली आहे तिला कशाची काही कमी कधी भासेल का?????
“तुझं बर आहे बाई,सरांनी तुला क्लास मधून बाहेर नाही काढलं ” मोना.
“अग, तुला माहीत नाही का,तिच्यावर कोणाचा हात आहे ते??” मनाली.
“बास बास काय पण काय चाललंय तुमचं” गौरी.
“बघ ना सगळे आम्ही घाबरलो होतो फक्त तूच शांत होती आणि म्हणत होती की गणू मामा काही नाही करणार आणि तसच झालं ना” दिपू.
आता गनुमामा म्हणजे दुसर कोणी नसून गणपतीबाप्पा च !!
” हो,या बाबतीत मी खूप ठाम आहे ,कितीही मोठं संकट आले ना तरी मला प्रत्येकवेळी माझा गनुमामा मला सगळ्यातून वाचवणार,माझा जन्मच अंगारकी चतुर्थीचा आहे म्हणून खरं माझं नाव गौरी ठेवलं आणि त्यांनतर मला कळत नव्हतं तेव्हापासून म्हणजे जेमतेम दुसरीत असल्यापासून मी चतुर्थी धरायला लागले आणि उपवास करायला लागले परत कोणी मैत्रीण नव्हती म्हणून सगळं मनातील गनुमामासोबतच शेअर करायला सुरुवात केली आणि तिथुनपुढे चालू झाल ते माझं आणि गनुमामाचे सख्ख नात अगदी मैत्रीचं ते अजून पण टिकून आहे बघ ,कधी कधी तर मी गनुमामावर चिडते पण आणि मंदिरात जाऊन बोलत नाही त्याच्याशी कधी नमस्कार करत नाही,एवढं गहन नात आहे बघ आमचं.”गौरी तिच्या मैत्रिणींना अगदी मनापासून सगळं सांगण्यात गुंग होती.
“हो , तुझं वेगळं आहे पण काही पण म्हण,त्यामुळेच तुझ्या पाठीशी विघ्नहर्ता आहे ,आणि आम्हाला ते जाणवत बघ”मनाली.
“हो ग मनु ,पण ना मला दुसऱ्या कोणत्याच मंदिरात जाऊ वाटत नाही फक्त गणपती बाप्पा. “गौरी.
“खरं, सांगतेस की काय” मोना.
“हो ग,माझ्या घरी विचार मग समजेल आणि माझी आई पण बघ किती ओरडतेय ते समजेल तुला” गौरी हसतच म्हणाली.
हे खरं होते की गौरीला बाप्पाची साथ होती म्हणून आणि तिची खूप श्रध्दा पण होती तिला विश्वास होता की बाप्पा तिची ओंजळ कधीच रिकामी करणार नाही म्हणून नेहमी कठीण प्रसंगांमध्ये पण ती ठाम उभी होती आणि सगळ्या परिस्तिथीवर मात देत पुढे जात होती.
कशी वाटली गौरीची कथा नक्की सांगा आणि अजून पुढच्या कथा वाचण्यासाठी नक्की follow करा आणि वाचत राहा.
Copyrights : Inspire In Marathi.