मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

प्रेरणादायी कथा

निसर्गाचा शिक्षक..

#यांच्यामुळे घडलो....
खर सांगायचे म्हणजे  भाग्यच होते की या कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला होता. खर सांगायचे म्हणले तर जास्त सहवास नव्हता लाभला ,पण एका वर्षातच त्यांनी यशस्वी जगणे म्हणजे काय ते खूप थोडक्यात सांगून गेले.प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचा खूप मोठा वाटा असतो.सगळ्यात जास्त जर प्रभाव पडत असेल तर आपल्यावर तर ते आपल्या आवडत्या शिक्षकाने आपल्याला काही शिकवले आणि काही नवीन गोष्टी सांगितल्या असतील तर ! आयुष्याचा अविभाज्य घटक म्हणजे शिक्षक.
बी.एस.सी च्या पहिल्या वर्षाला होतो,तेव्हा नव्याने  पर्यावरणशास्त्र हा विषय आला होता.अगोदर सगळ्यांना असच वाटायचे की यात काही फार अभ्यास करण्यासारखे नसेल म्हणून रोज काही लेक्चर ला गेलेच पाहिजे अस काही नाही,आरामात यात आपण पास होवूच,अस वाटायचे.त्यामुळे सुरवातीला काही लेक्चर च नाही केले जास्तीचे,पण नंतर एकदा पाहावं तरी लेक्चर ला जावून सर काय शिकवतात ते म्हणून सगळेच गेलो.
पहिले दोन -तीन च लेक्चर सरांनी वर्गात घेतले त्यानंतर चे सगळे लेक्चर मात्र त्यांनी झाडाखालीच घेतले,त्यांचे ठाम मत होते की जर पर्यावरण शिकायचे तर बाहेरच शिकूयात,मोकळ्या वातावरणात,ज्याला क्षितिज्याच्या भिंती असतीला आणि विशाल अशा आभाळाचे छत असेल,झाडांच्या फांद्या हलून येणारी मंद अशी झुळूक असेल आणि तापणारा पण रोजचं न विसरता उगवणारा सूर्य त्याच्या प्रकाशात,उघड डोळ्यानी आणि तल्ल्ख मेंदूने शिकले पाहिजे.
आता तुम्हाला त्यांच्या नावाची नक्कीच उत्सुकता लागली असेल,अस कोण आहे जे २१ व्या शतकात पण एवढ्या तळमळीने शिकवण्याचा घाठ घालतेय,त्यांनी पर्यावरण तर शिकवलेच आम्हाला पण प्रत्येकाला स्वत:ची :ओळख पण करून दिली,तर असे हे निसर्गाचे आणि सगळ्यांचे अवलिया डॉ.महेश गायकवाड.
डॉ.महेश गायकवाड,आम्हाला बी.एस.सी.ला पहिल्या वर्षाला शिकवत असे,त्यांनी खूपच कमी वयात पी.अच.डी.केली होती,त्यांचा डॉक्टरेटचा विषय तसा वेगळाच होता,कारण त्यांनी वटवाघूळ यांवर संशोधन केले होते.त्यामुळे तर त्यांचे अजूनच वेगळेपण वाटायचे,ते आमच्यातील कोणीतरी आहेत असं नेहमी वाटायचे,त्यांचे आणि विद्यार्थ्यांचे नात म्हणजे नेहमीच मैत्रीचे राहिले.
प्रत्येकात काहीतरी असा सुप्त गुण असतो आणि तेच त्याची आवड असते,कशात तरी पारंगत असते,हे आपल्या पैकी बऱ्याच लोकांना समजत नाही,त्यात जर मन अजून चंचल असेल तर मग खूपच कठीण होऊन जाते सगळे.
वर्गातील सगळ्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये काही तरी क्वालिटी आहेत,आणि त्या घेऊन तुम्ही पुढे जावा अस ते नेहमी सांगत,ती तुमची युनिक अशी ओळख आहे,ते ओळखा आणि तिला passion करा. 
माझ्यासाठी लेखन करण हे त्यांनीच प्रकाशझोत घातलेली,एक कला आहे. पाहिल्यादा कधीच वाटले नव्हते की लिहू शकेल म्हणून पण सरांच्या प्रोत्साहनामुळे पहिल्यांदा लिहिले आणि विशेष सांगायचे म्हणजे पहिलाच लेख लिहिला आणि तो सकालवृत्तपेपर मध्ये प्रकाशित पण झाला. लेखन करू शकते यावर विश्वास त्यांनीच दिला आणि वेळोवेळी त्यांनी प्रोत्साहन पण दिले.
त्यांच्यामुळे पुस्तक तर वाचायला तर लागलोच आम्ही,सगळ्या वर्गाला त्यांनी वाचनाने वेड करून सोडले होते,इतर वेळी मोकळ्या वेळात निवांत गप्पा मारायच्या सोडून सगळेच एखादं झाड पकडून पुस्तके वाचायला लागले. आणखी एक खासियत सांगायची म्हणजे ,जे पुस्तक वाचलंय त्यातील जे काही प्रेरणा देणारे किंवा मनाला पटणार असेल ते एक छान वहिमध्ये लिहून काढायची सवय ही त्यांनीच लावली. त्यांनी तशी वही पण दिले होती,ही पण आठवण गोड च राहिली.
खूप सारी पुस्तके वाचण्याबरोबर त्यांनी निसर्ग पण वाचायला शिकवला,वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकिंगला घेऊन जाणे,तिथे गेल्यावर तिथले जैवविविधता शिकवणे आणि ती समजावून सांगणे,ही त्यांची कलाच होती.लोहगड,जावळी,धुमालवाडी,कळसुबाई,भंडारदरा ,नळदुर्ग असो किंवा राजगड,तिकोना सगळे ट्रेक त्यांच्यासोबत करायला भेटले आणि तिथली माहिती ही त्यांनी अगदी पर्यावरणपूरक दिली. तसे त्यांनी हिमालयात पण बरेच ट्रेक घेऊन गेले अजूनही जातात.फिरण्याची आवड आणि तिथे गेल्यावर त्याच लोकांच्यात राहून त्यांच्यातीलच एक होऊन त्यांच्यासोबत निसर्ग खरच त्यांनी जगायला शिकवला. 
अजूनही आठवणतं,कळसूबाईच्या ट्रेक ला गेल्यावर ,हॉटेल मध्ये न जेवता,त्याच ठाकर आदिवासी लोकांच्या घरात जेवण करण आणि त्यांचे नृत्य पाहणे हा एक अविस्मरणीय क्षण च ठरला,असा क्षण परत कधी जगायला आणि पाहायला पण मिळला नाही.आदिवासी लोकांच्या कला आणि त्याचे पारंपरिक नृत्य याला ही त्यांनी सगळ्या जगासमोर आणले. त्यांना विविध रोजगराच्या संधी ही उपलबध्द करून दिल्या. शिक्षणाचे महत्व ही त्यांना सांगितले,त्या आदिवासी भागात १२ -१५ वर्षाची मुले सर्रास व्यसनेच्या आहारी गेली होती,एवढ्या कोवळ्या वयात पुस्तके हातात घेण्याची सोडून ते बिडी,सिगारेट,तंबाखू ,दारू च्या आहारी गेलेली पाहिले,आम्ही. म्हणजे फारच विदारक रूप आहे,एकीकडे आपण विकसित देशाचे रोल मॉडेल बनवतो तर दुसरीकडे त्याच महाराष्ट्र्रात जिथे कळसुबाईचे उंच शिखर आहे,ही एवढी ओळख असताना तिथेच ही कोवळी मुले व्यसनाधीन झालेली. हे चित्र पाहू शकलो,आपल्याकडे काय आहे आणि आपण त्याचा कसा वापर केला याची नकळत का होईना पण जाणीव त्यांनी आम्हाला करून दिले होती.
ट्रेकिंग म्हणजे फक्त मौजमजेचा विषय नसतो,तिथले वेगळेपण शिकणं,तेथील विविध प्रकारची झाडे,झुडपे,फुलपाखरू,पक्षी,छोटे छोटे किडे आणि बरच काही.प्रत्येक ठिकाणचे वेगळेपण असते,ती त्याची खासियत असते,तिचे संवर्धन करणे आणि निसर्गाला त्रास न देता त्याची काळजी घेणं हे त्यांचीच शिकवण आहे.
निसर्ग वाचायला आणि जगायला गायकवाड सरांनीच शिकवले,पुन्हा पर्यावरण शास्त्रात उच्चपदवी घेत असताना ही एवढे चांगला पर्यावरण कोणीच नाही शिकवले.
तर,डॉ. गायकवाड सरांसोबतच्या अजून काही शिकवणाऱ्या आठवणी # भाग 2 मध्ये पाहुयात,वाचत राहा.
#भाग 2
डॉ. गायकवाड सर हे निसर्गाचे सगळ्यात जवळचे मित्र होते,म्हणून कधी कधी पक्षी अगदी त्यांच्या खांद्यावर तर कधी डोक्यावर येऊन बसायचे,पक्षी ओळखण्यापासून ते त्याचे शास्त्रीय नाव काय आहे ह्याची चांगली ओळख त्यांनीच करून दिली. पक्ष्यांच्या बद्दल सांगायचे म्हणले तर,त्यानी सवयच करून दिले,ती अजून ही छंद म्हणून जोपासता येत आहे.कावळा आणि चिमणी,मैना फार तर खंड्या इथपर्यंतच माहिती असायची पण जेव्हा सर भेटले तेव्हापासून सातभाई पक्षी,तो का एवढा गोंधळ करतो,त्यांचा ग्रुप किती आहे,त्यात नर किती आणि मादी किती हे त्यांच्या मुळेच समजले. एवढच, नाही तर कोकिळा मध्ये छान सुरात गाण कोण म्हणते,अगोदर अस वाटायचे की मादी कोकिळा गाण म्हणत असेल पण त्यांनी संगितले की नर कोकिळा मादी ला आकर्षित करण्यासाठी सुरात ओरडते.पक्ष्यांचे जीवन,त्यांच्या भावना,मानसाच्या भाषेत सांगायचे म्हणले तर त्यांचे प्रेम!

नळदुर्ग च्या ट्रेकला असताना  सुगरण पक्ष्यांने अट्टहासाने बांधलेले सुंदर घरटे,ते आवडले नाही म्हणून अर्धवट सोडून पुन्हा नव्याने घरटे बांधणारे इवलेशे पिवळे सुगरण पक्षी, कधीच दमत नाही का?,सर नसते तर कदाचित पुढच्या आयुष्यात कधी याचा विचार पण डोक्यात आला नसता.
अजून एक आठवण सांगायचीच म्हणले तर,मारुती चितमपल्ली एवढ्या मोठ्या निसर्गाच्या अवलियाला गायकवाड सरांमुळेच भेटता आले,त्यांचे व्याख्यान ,त्यांची दूरदृष्टी निसार्गाबद्दलचा जिव्हाळा त्यामुळेच जवळून अनुभवता आला आणि चकवा चांदणं,पुस्तक वाचायला भाग पडाव लागले.एक नाही तर अशा बर्‍याच आठवणी त्यांच्यासोबत जगायला मिळाल्या ,अनुभवल्या,पक्ष्यांबद्दलचे गैरसमज दूर होयला मदत झाली,आवाजावरून पक्षी ओळखायला येऊ लागले,गर्दी गोंधळात पण आवाज फक्त पक्ष्यांचेच कानी पडू लागले.पक्षी प्रेम एवढे वाढले की कधी कोणता पक्षी अडचणीत असला की त्याच्याकडे पहिले लक्ष जायला लागले आणि एक निस्वार्थीपनाची घट्ट मैत्रीचा आंनद घेण्याचे भाग्य मिळाले.
त्यातलाच एक पक्षी म्हणजे सूर्यपक्षी, आता,सवयच झाली होती,जिथे जाईल तिथे बारकाईने पाहण्याची,साधे उभे राहिले तरी आजूबाजूचा निसर्गाचा आवाज ऐकण्याची आणि समजून घेण्याची.दुपारची वेळ होती,ग्रंथालयात अभ्यास करताना सहज खिडकीकडे लक्ष गेले आणि छोटेसे हलकचं हलणार एक घरटे दिसले त्यात छोटी छान दोन अंडी होती.सुरावात झाली आता,हा पक्षी कोणता मग त्यातील मादी कुठली आणि नर कोणता,किती दिवसातून पिल्ल बाहेर येणार,सगळे डोक्यातील चक्र चालू झाली होती.सगळं अगदी जवळून अनुभवता येत होते पण गायकवाड सर सुट्टीवर होते,त्यामुळे त्यांच्याकडुन लगेच काही मदत नाही मिळाले पण त्यांची शिकवण मात्र कामी आली. अंड्यातून पिल्ले बाहेर आली पण त्यांनतर त्यांना मुंग्या लागल्या म्हणून त्या पिल्लांना घेऊन रूम वर आलो खर पण असं ऐकले होते की पक्ष्यांच्या पिल्लांना जर मानसाळले तर त्यांना पुन्हा स्वीकारले जात नाही. खूप कठीण काळ होता की त्यांना मुंग्या चावू नाही म्हणून रूम वर आणले आणि उद्या त्यांनाच नाही स्वीकारले तर ते न खाण्यामुळे जर मेले तर,मनात विचार होते,रात्रभर तर ते जगले,दुसऱ्यादिवशी सकाळी जाऊन सूर्योदयाच्यावेळी त्यांना पुन्हा घरट्यात ठेवून आलो खरं आणि लांब पाहून वाट पाहत बसलो की त्यांचे पुढे काय होणार पण पुन्हा जे ऐकले होते ते खोटं ठरले आणि सुर्यपक्ष्याच्या एवढ्या लांब चोचीने पिल्लांना खाऊ भरवला ,जो पर्यँत ते स्वतःच्या पंखांनी उडून जात नाहीत.तोपर्यंत सर पण आले होते,त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष्यांचे जीव वाचले होते पण छान असं फोटोग्राफी पण झाली.पक्ष्यांकडून तर कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही आणि स्वतःचे काम करत राहायचे,खूप चांगल्यारीतीने समजले.
डॉ.गायकवाड सरांमुळे योग्य त्या वयात योग्य ते मार्गदर्शन मिळाले,निसर्गाकडून शिकण्याची कला अवगत झाली. निसर्गासारखा संयम त्याच्यांमुळेच समजला.तसेच त्यांनी पर्यावरणपूरक जीवन शिकायला शिकवले, छोटे छोटे उपक्रम त्यांनी राबविले,जसं की शाडूचे गणपती,प्लॅस्टिकचा कमी वापर,सापांविषयीचे अंधश्रद्धा असे विविध छोटे-मोठे उपक्रम त्यांनी घेतले.
निसर्ग शिकवणारा शिक्षक लाभले त्यामुळे निसर्गाची किमया कळाली.असे शिक्षक परत न होणे.विशेष,म्हणजे ते अजूनही निसर्गासाठी काम करतात,अजून किती तरी जणांना निसर्ग शिकवतात.
Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: