फुुुलपाखरू भाग #1
फुलपाखरू
गोड बातमी- “तितली”
सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात शेवटचे गाव अगदी कडेला म्हणले तरी चालेन,अर्थातच त्यामुळे त्याचा अजिबातच विकास नाही,अजून ही त्या गावला जायचे म्हणले ना की आपली लाल परी जात नाही.हो,तिथे अजून एस.टी. जात नाही,दुसर्या मार्गावरून म्हणजे पुणे जिल्ह्यात जायचे म्हणले तर जाता येत नाही. पण त्याच जिल्ह्याची लाल परी येते सकाळी एकदा च,पण तिचा काही फारसा उपयोग होत नाही,कारण सगळ्यांचे वावरायचे ठिकाण पुणे जिल्ह्यातच आहे ना.
असो,तिथेच गणपतराव सातार्यावरून रुसून आले होते आणि त्याच गावामध्ये स्थायीक झाले,त्यांचे नातू म्हणजे हनुमंत पाटील. हनुमंत चे वडील म्हणजे राम पाटील. गणपत रावांनी खूप कष्ट आणि मेहनत करून शेती कमवली,तसेच त्यावेळी ते नेहमी घोडा वापरत,घोड्यावरून प्रवास म्हणजे त्याचे ते वाहन झाले.त्यांचा थाट च वेगळा होता. दुसर्या गावातून येवून पण त्यांनी त्यांचे अस्तित्व तयार केले होते. मजूर त्यांना घाबरत असतं. चुकीला माफी कधीच त्यांनी ठेवली नाही,एक दरारा होता त्यांच्या शिस्तीचा.दुसरी बाजू अशी की ते तेवढेच दत्ताचे परमभक्त होते आणि आज ही त्यांच्या वंशजाकडेच दत्ताचा मुकुट आणि पैजण आहेत,तशी त्या गावात दत्त जयंती ची प्रथा त्यांनीच काढली आणि अजुनही ती कार्यरत आहे.खर तर दत्त जयंतीचा सोहळा संध्याकाळी सहा वाजता असतो,सगळीकडे पण इथे नाही. इथे दुपारी बारा वाजता च गुलाल पडतो आणि जेवण म्हणून प्रसाद असतो. त्यानंतर गणपतराव गानगापूर ला संध्याकाळी दत्तजयंती ला जायचे,एवढे ते अस्सीम दत्ताचे भक्त होते.
त्यांना दोन मुलेच होती,पण दोन्ही आळशी आणि आहे त्यात समाधानी असणारी. वडिलांकडून मिळालेली वारसा हक्काची जमीन आणि काही जनावरे ,दोन ट्रक आणि एक ट्रॅक्टर हे पण त्यांना आपल्या मुलांना देता आले नाही. त्यांचा थोरला मुलगा राम तो नंतर ट्रक ड्रायवर झाला आणि बारामती मध्येच स्थायीक झाला. दूसरा शिवाजी मात्र तो गावातच राहून शेती पाहत असे.
राम ला तीन मुले आणि दोन मुली होत्या.थोरला मुलगा एसटी मध्ये ड्रायवर झाला तर मधवा शेती आणि धाकटा म्हणजे हनुमंतच,तो मात्र अथक प्रयत्नानंतर पाटबंधारे विभागात कामाला लागला आणि दोन्ही मुलींची लग्न झाली,त्या त्यांच्या संसारात खुश आणि रमून गेल्या होत्या.राम कधी मुलांसोबत राहिला नाही,त्याने शेवटपर्यंत एकटाच राहिला,जेवला मात्र तो महिना महिना अस आपल्या मुलांच्या घरी जायचा.आयुष्यात खूप अतिपना केला पण आयुष्याच्या शेवटी त्याने खूप वाचन आणि देवधर्म केला. त्याचा नातवंडांवर त्याचा खूप जीव होता. शेवटी सगळ्या बारा नातवंडांना भेटून च जीव सोडला.
पण त्यांचा सगळ्यात जास्त जीव त्यांच्या सगळ्यात लहान मुलावर होता म्हणजे पाच नंबरच्या,हो म्हणजे हनुमंत वर,त्यांचे फारसे पटत नसे,पण त्यांचे प्रेम एकमेकांवरचे कधीच झाकले नाही.तो घरी येई पर्यन्त बापाचा डोळा लागला तर कसं. हनुमंत ने त्यांच्या उतार वयात मात्र बापाची खूप सेवा केली आणि आयुष्याचे पुण्य मिळवले.
हनुमंत,सगळ्यात लहान,पण तेवढाच आगवू आणि हुशार,पण ना स्वभावाचा मात्र अंदाज कोणालाच कधीच लावता मात्र आला नाही.त्यांच्या घरची परिस्तिथी खूपच हलाकीची झाली होती,वडील फार काय करत नव्हते, जे करत ते स्वत:साठी आणि दारू पिण्यासाठी.त्यामुळे त्याला लहानपणापासूनच वडिलांचा राग यायचा.त्याने आठवी पर्यन्त शिक्षण पूर्ण केल कस तरी परत मात्र शाळा सोडली ती सोडलीच. रोजच्या वैतागाने घर पण सोळाव्या वर्षी सोडले. मनाची तयारी ठेवून,पडेल ते काम करण्याची ताकद ठेवून खर घर सोडले. कधी ट्रक वर कीन्नर ची नोकरी केली तर कधी डब्याच्या भाकरी थापुन द्यायची.चांगले सांगणारे कोणी नाही,जे भेटले ते सगळेच जगण्याची धडपड करणारे.नंतर हनुमंत ने त्याच्या दाजींच्या ओळखीने पाटबंधारे विभागात काम मिळवले पण पोस्ट काही मिळवले नाही. जमेल ते काम केले,नंतर मात्र त्याला ड्रायवर म्हणून घेतले त्यावेळी देवमाणूस भेटावे तसे मोरे नावचे साहेब त्याला भेटले,मग मात्र चित्र पालटायला लागले,शर्ट ची बटन लावण्यापासून ते कॉलर खाली ठेवण्यापर्यंत सगळ्या छोट्या गोष्टी तो तिथेच शिकला. आता सगळे समजायला लागलं होते,परिस्थितीने पण कूस बदलली होती. हनुमंत ने ही मंगल सोबत लग्न केले.लग्न झालेच की महिनाभरत त्याची पुण्याला बदली झाली आणि ती दोघे पुण्यात आली. मंगल बद्दल काय सांगणार ती एक वाघिन होती,खरच वाघिन. शाळेत ती कधी गेली नाही,तिच्या घरची जबाबदारी तिच्यावरच होती म्हणून,पण ना हे खूप कमी लोकांना माहीत आहे. शाळेत जरी ती गेली नसली तरी तिला बाहेरच्या जगाची माहिती होती आणि ती मुळातच खूप हुशार होती. तिचे गणित म्हणजे आपण शाळा शिकून काही येणार नाही एवढे परफेक्ट होते.खूप कष्टाळू आणि खूप कडक पण स्वभावाने.
लग्नानंतरच एका वर्षाने त्यांच्या घरी एक गोड बातमी आली,त्यांना एक कन्या रत्न प्राप्त झाले. कन्या म्हणजे लक्ष्मी माननारे ते, मुलगी झाली म्हणून खूपच आनंदित होते. पण हा आनंद फक्त मंगल च साजरा करू शकत होती कारण आदल्यादिवशीच हनुमंत चे आजोबा वारले होते,म्हणून तिच्या सासर हून कोणीच आले नव्हते.
झाली तेव्हा दिसायला काय फार छान दिसत नव्हती,कुरुळे केस.सावळा रंग आणि कुपोषित असल्यासारखा बांधा.पण प्रत्येक आई बापाला त्यांचे मूल कस पण असले तरी प्रियच असते.ती खूप नशीबवान होती ते तिने यांच्या पोटी जन्म घेतला होता.त्याची प्रचिती तिला वेळोवेळी मिळणारच होती,हे तिला पण माहीत नसेल. पण नाशिब घेऊन आणि बाप्पाचा वरदहस्त घेऊनच ती आली होती. तिच्या येण्याने सगळे खुश होते. आता तिचे नाव ठेवलेले सांगायला पाहिजे ना,तिच्यावर तर पुढचे सगळे आहे,
त्यांनी तिचे छान नाव ठेवले,“तितली”,म्हणजे फुलपाखरू. विविधरंग अंगावर घेऊन,मनमोकळे फिरणारे,ह्या फुलावरून त्या फुलावर बसणार. बेधुंद जीवन जगणार.
आशा होती त्यांना पण की तिचे आयुष्य पण असच असावे.तितली तिच्या वडिलांची आणि आजोबांची खूपच लाडकी. सगळ्यात जास्त लाड जर कोणी केले असतील तिचे तिच्या मामाच्या गावाने. खरच खूप सगळे सुख आणि सगळ्यांच्या चेहर्यावर गोड हसू घेऊन आली होती.
तितलीचे बोलणं म्हणजे जणू पक्ष्यांचे चिवचिवाट.जसे मोठी होईल तसा तिचा रंग आता सावल्यामधून गोरा होत चालला होता आणि तब्येत पण चांगली झाली होती.
बाहेर जाताना वडिलांच्या दोन पायांना धरून ठेवणे म्हणजे तिचे रोज च काम झाले. वडिलांचे पाच-दहा मिनिटे घेतल्याशिवाय ती सोडायची नाही आणि रात्री कितीही उशीर झाला ,म्हणजे अगदी एक-दोन जारी वाजले तरी ते पाखरू वडिलांची वाट पाहत बसायचे,आणि आल्यावर जे झाले ते सगळे सांगत बसायचे आणि सांगता सांगता झोपी जयचे,ही तिची सवय मात्र कायम राहिले.लग्न करून सासरी आल्यावर पण तिने वडिलांना रात्री फोन करून गप्पा मारायच्या बंद नाही केल्या आणि कधी -मधे माहेरी गेल्यावर तर रात्र पुरत नाही. दृष्ट लावण्यजोगे होते त्यांचे बाप-लेकीचे नात !
पण लहानपणी तिला आई खूप कठोर आणि दृष्ट वाटायची.आईल खूप घाबरायची ती. आणि त्यामुळे त्यांचे कधीच पटले नाही. सारख मार खायची,तितली. एकीकडे आई म्हणजे तिला भयानक वाटायची तर दुसरीकडे बाप म्हणजे प्रेमाचा सागर!
तितलीचा अजून एकावर खूप जीव होता तो म्हणजे तिचा छोटा भाऊ,तिच्यापेक्षा तीन वर्षानी लहान. तितली खरच फुलपाखरू होती.
क्रमशः….