फुुुलपाखरू भाग#2
पहिली शिकवण
अस,म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात म्हणून तस काहीसे. बालपण लाडाकोडातच जरा जास्त च आणि बाकीचे वडिलांच्या मागे फिरण्यात,स्वत:च्या नादात रंगून जायचे मस्त. जे हवे ते करायचे आणि निवांत राहयचे.
अस चालू होते तिचे बालपण, तिच्या छोट्याश्या भावासोबत.
एकदा काय झाले,आई काही तरी काम करत होती म्हणून आई ने तितली ला झोका द्यायला सांगितला,छोट्या पाळण्यात निवांत झोपला होता,ती आपला झोका देतच होती. अचानक पाळण्याचा पाय फरशीवरून घसरला आणि पाळणा खाली पडला ,तसा छोट्या,अजून त्याच नाव नव्हते ठेवलेले म्हणून . छोट्या खाली पडला आणि जोरजोरात रडायला लागला,त्याचा आवाज ऐकुन, आई पण जोरात धावत आली.
“तितली काय झालं,कसा काय पडला,आई ने विचारले.
छोट्या ला उचलून घेत होते तेव्हा च तितली गायब.
आई पुढे अजून च उद्योग वाढवून तितली कुठे गेली असेल म्हणून आधीच आई तिच्यावर अजूनच चिडली.
छोट्याला घेऊन आई तितली ला शोधायला निघाली.
“अहो, तितली आली का वो निगडे काकू,”शेजारच्यांना विचारले.
त्यांनी सांगून टाकले नाही म्हणून,त्यांची काळजी अजूनच वाढली. मग थोडे पुढे जावून त्या तेथील मंदिरात गेल्या तर तिथे त्यांना तितली भेटली,
शांत डोळे झाकून ,रडत रडत गणपती बाप्पा जवळ हात जोडून आमच्या भैय्याला नीट कर,त्याला काय होऊ देऊ नको”,मोडक्या -थोडक्या शब्दात तिची हात जोडून विनवणी चालू होती.
तिला अस पाहून आई च्या डोळ्यात पाणी आले,आणि तिने तितली ला जवळ घेतले.
“भैय्या बरा आहे ना,आई,मी चुकून पडला,पण बाप्पाला सांगितले आहे मी आता,” तितली आईला सांगत होती.
आई ने तिला घट्ट जवळ घेतले आणि तिला घरी घेऊन गेली.
पण त्यानंतर दोन गोष्टी झाल्या छोट्याला टोपण नाव मिळाले,”भैय्या” आणि तिला एक मित्र भेटला “गणपती बाप्पा”,आणि विशेष हे दोघे तिच्या आयुष्यभर साथ देत, सोबत खंबीरपणे उभे राहिले.
तितली ला शाळा खूप आवडायची,पहिल्यांदा शाळेत ती आंगणवाडी मध्ये,दफ्तर न घेताच गेली,पहायची उत्स्तुकता होती तिला खूप.
शाळेविषयीची तिची गोडी कधीच कमी नाही झाली उलट ती वाढत च केली.
तिला सगळ्यात जास्त भीती वाटायचे ती तिच्या पहिलीला शिकवत असणार्या जेवरे बाईंची,त्यांची तिने एवढी भीती घेतली होती की तिने शाळेत जाण च बंद केले,रोज नवीन कारण सांगयाची,कधी पोट दुखतय तर कधी पाय.तिचे रोज चालू होते अस.
मग तिने न राहून तिच्या बाबांना सांगून टाकले की,” मला त्या वर्गात नको,मला ‘ब’ तुकडीत बसायचे आहे त्या बाई खूप जोर जोरात ओरडतता मग मला खूप रडू येते म्हणून मी शाळेत जात नाही.”
“अच्छा अस आहे तर,चल मी बोलतो तुमच्या बाईंशी”, बाबा म्हणाले.
शाळेत गेल्यावर सगळं प्रकार तिच्या वडिलांनी ,तिच्या मुख्याध्यापक आणि बाईंना सांगितला,मग बाई नी ठरवले की तिच्या मनातील भीती घालवण्यासाठी तिला याच वर्गामद्धे बसवूयात. आणि तिला संगितले की आजच पीएचकेटी इथे बस,मग उद्या ब वर्गात बस म्हणून. एक तर दिवस बसायचा आहे म्हणून ती तयार झाली आणि कस बस एक दिवस काढला,तिने,पण दुसर्या दिवशी पण बाईने तिला परत माघारी ‘अ’ तुकडीमध्येच बसायला संगितले,मग मात्र तिला रडूच यायला लागले.तेवढ्यात ‘ब’ तुकडीच्या बाई तिथे आल्या.
तितली ने पळत जावून ,बाईन ची साडीच धरली,’ब’ तुकडीच्या बाई म्हणजे आगवणे बाई.
“मला तुमच्या वर्गात च यायचे आहे,माझे बाबा पण काल सांगून गेले आहेत ना ,मला इथे नाही बसयाचे”,तितली जोरजोरात रडत ,बाई ना विनवण्या करत होती.
मग मात्र तिच्या हट्टाने तिने ‘ब’ तुकडीमध्ये प्रवेश घेतला ते ती चौथी पर्यंत ती तिथेच खूप काही शिकली. पहिल्या पाच नंबर मध्ये ती नेहमी असायचीच.
तितली चे एक वैशिष्ट्य म्हणजे तिला भेटलेला माणूस ,तिला कधीच विसरत नसे.
आता तितली माध्यमिक ला गेली,रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्येच तिने नीरा या शहरामध्ये सातवी पर्यन्त शिक्षण घेतले.
खरा विकास तिचा याच तीन वर्षात झाला,तिच्या सुप्त गुणांना वाव मिळाला,वेगवेगळ्या स्पर्धेत तिने भाग घेतला,खूप सारी तिने प्रशस्ती पत्रक जमवले,तसेच लेझिम ,झांज पण ती याच शाळेत शिकले.
तिला हुबेहूब चित्र काढयला येवू शकते,याचा पण प्रत्यय इथेच आला.
मानसाच्या आयुष्यात शाळा हा खूप महत्वाचा घटक आहे,त्याची नवीन ओळख करून द्यायला,त्याच्या पुढचे जीवनाचा पाया म्हणजे शाळा.
पण त्याच बरोबर हे सगळे चालू असताना,वडिलांनी शेती घेतली गावाकडे पाच एकर,त्यामुळे त्यांनी बर्याच लोकांकडून उसने काही व्याजाने पैसे घेतले,आणि ऑफिस चे पण काही काम नीट चालत नव्हते त्यामुळे पैशांची ताणातान चालू झाली होती.
घरी सगळे कसे आधी एकत्र राहत होते ,ते पण आता वेगळे झाले होते,म्हणून आता शेती पण कोणीच करत नव्हते.पगार वेळेवर होत नव्हते त्यात शहरात राहणे म्हणजे मुश्किलीचेच काम झाले होते.परिस्तिथी एवढी बिकट होत चालू होती की त्यांना आता तिथे राहणे मुश्किल झाले होते.
मग मात्र त्यांनी निरा सोडायचा विचार केला आणि त्यांच्या गावी जायचा विचार केला,अस गाव जे खूप मागासलेले आहे तिथे कस राहणार हे मोठे जिकरीचे होते.
खरा प्रवास आता चालू झाला होता,आयुष्य काय असते आणि ते जगण्यासाठी काय काय करावे लागते याची जाणीव दोघांनी जवळून पहिले होती.ठरले तर मग आता की इथले सगळ सोडून गावी जायचे,तो दिवस उजाडला ,जेवढे गाडीत सामान भरले,आणि परत कधी इथे येऊ की नाही याची शाश्वती मनात न ठेवताच,न आवडणारा प्रवास चालू झाला होता.
नक्की वाचत रहा आता चा खडतर प्रवास,नकोसे वाटणार गावं.
क्रमशः..