मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

कथा-कादंबरी

फुलपाखरू भाग# 3

नकोस वाटणार- गावं


चला जे होते नव्हते ते सगळं घेवून खर आलो गावाला,आता इथे किती दिवस राहयचे हे काही अजून ठरले नाही,पण कदाचित काय,स्वरूपी रहावे लागणार ,एवढे तरी नक्की होते.
गाव आणि शेती यामध्ये जवळ जवळ दोन किलोमीटर चे अंतर होते म्हणून गावामध्ये राहणे तर शक्यच नव्हते,पण अडचण अशी होती की गावामध्ये घर चांगलं होते राहण्यासारखे आणि सगळ्या सुविधा पण होत्या पण शाळा पण लांबच होती,मग सगळा विचार करून परत शेतात च राहायचा निर्णय झाला.
शेत,जिथे दूर दूर वर मनुष्य वस्ती नाही,जोरात ओरडले तर मदतीला कोणी सुद्धा धावून येणार नाही. तितली च्या बाबांनी छप्पर चे घर आधीच बांधले होते,त्यावेळी तशी घर बांधन सोपे जायचे आणि कमी खर्चाचे पण असायचे.त्याच बरोबर अजून थोडेस चांगलं बांधूयात म्हणून पत्र्याचे शेड उभे केले,चारी बाजूने पत्रा आणि त्याला पण खूप सारी मोठी मोठी भोके,बाहेर काय चाललाय ते आरामात दिसायचे म्हणून खिडकीची अजिबात गरज च पडली नाही,खाली मात्र सिमेंटचा कोबा केला होता,मऊ मऊ.पण वावरणे सगळं छ्परच्या घरताच असे.तस दोन्ही घर शेजारी शेजारीच होती. सगळं बदलले होते,सगळच.
नवीन शाळा,नवीन माणसे,नवीन परिसर आणि विशेष म्हणजे नवीन असलेली जीवनशैली.
शाळा तिथून जवळच होती तरी चालत म्हणले तर वीस -पंचवीस मिनिट लागतील,चालत जात असे ती,तिच्या चुलत बहिणीसोबत,पहिला दिवस म्हणजे सगळ्यात भयानक असतो ना!
वर्ग च सापडेना,बहीण सोबत होती म्हणून बर झाले होते,थोडे दिवस तिच्याजवळच जेवायला वैगेरे जायचे मग झाली ओळख हळूहळू.
वर्ग तरी कसले म्हणायचे आणि ती शाळा तरी कसली,अजून बांधकाम पण पूर्ण झाले नव्हते ,खाली बसले तरी खडबुडा सिमेंटचा थर सगळा पायाला रुतायचा आणि खूप टोचायचा,बसून बसून पायाला नको नको होयचे.
तितली ला नको झाले होते,तिला जुन्या शाळेची खूप आठवण येत होती,इथे काही दिवस सगळे तिच्याकडे फक्त पाहतच होते,बोलायचे ते फक्त शिक्षक चं. त्यामुळे तिने अभ्यासतचं स्वता:ला जास्त वाहून घेतले,आता ती आठविला गेली होती.इथे शिकलेले तिला बर्‍याच गोष्टींचा उपयोग तिला ह्या नवीन शाळेत झाला,त्यामुळे सगळ्यांना असे वाटयला लागले की, तितली खूपच हुशार आहे. तिचे वेगळेपण सगळ्यांपासून दिसून येयचे.
तिला सांगायला लाज वाटायची की आम्ही छप्परच्या घरात राहतो म्हणून,ती कधीच तिच्या मैत्रिणी असताना घराबद्दल ती कधीच बोलायची नाही,शांत बसायची.तिच्या हे सगळे हळू हळू डोक्यात बसायला लागले होते,आपण सगळे चित्र बदलायचे अस तिने ठरवले,खूप शिकायचे आणि खूप मोठी जास्त पैशाची नोकरी मिळवायची.
शाळेतील सुट्टीमध्ये वर्गातील मुली छान मालिकांचे विषय रंगावायचे,ह्या मालिका मध्ये हे झाले त्या मालिका मध्ये असच होईल,त्याने ते केल,सगळं ती ऐकत असायची पण तिला काहीच माहीत नसायचे:कारण त्यांच्याकडे लाईट पण नव्हती साधी हे पण ती कोणालाच सांगू शकत नव्हती,सगळे जग बदलेले होते.कधी कधी रडू येयचे तिला.
घरी आई -बाबांची शेती करताना ची धडपड बघून परत ती शांत होयची,तिच्या मनाची घालमेल तिने कधीच कोणाला संगितले नाही.वर्गात घट्ट मैत्रीण अशी कोणीच झाली नाही,परिस्थिती चं अशी होती की सगळेच टिंगल करायचे म्हणून तिने स्वतला चं बंद करून घेतले,तिचा मनमोकळ स्वभाव आता शांत आणि अबोल झाला होता,मनात आपल्याकडे लाईट नाही,राहयला नीट घर नाही आणि विशेष म्हणजे तिच्याकडे गणवेश सोडून दूसरा फक्त दोनच ड्रेस होते आणि ते पण तिला ते गुरुवारी घालायला लागायचे,बाकीचे दर गुरुवारी नवीन ड्रेस घालायचे आणि ती आहे तेच आलटून पालटून तेच ड्रेस घालायची,तिच्याकडे तिकडचे पॅंट-टॉप होते पण ते घालून गेली तर सगळेच हसायला लागले.
तिच्या मनात आता न्युंगंड तयार होयला लागला होता,जमेल तेवढा सगळा भर तिने अभ्यासातच दिला. आठवीला तिचा सगळ्या वर्गात पहिलं नंबर आला आणि एकच गोंधळ झाला,तिला पण नव्हते कधी वाटले की तिचा कधी वर्गात पहिलानंबर येईल म्हणून,आता थोडा फार विश्वास वाढायला लागला होता,आता तिच्याकडे स्व्त:हून मुली यायला लागल्या ,नवीन मैत्रिणी झाल्या,आता थोडे तिला ती गावाकडची शाळा आपली शाळा वाटयाला लागली.
कस तरी आठवीचे वर्ष संपले,नववी मध्ये घराची परिस्थिती तर अजूनच ढासळली.जे आहे त्यात सुख मनायला आता तिला चांगलचं जमायला लागले होते.
तिला सायन्स आणि गणित हे दोन विषय कमालीचे आवडायचे,खुपचं.त्याच्यावर तिने एवढे लक्ष दिले की त्या विषयामध्ये तिला पैकी च्या पैकी गुण मिळायला लागले,तिची स्वत:ची ओळख झाली होती,सगळ्या गावात चर्चा होती,खूपच हुशार मुलगी आहे म्हणून,हे ऐकुन बाबा अजूनच खुश होयचे.
एकदा काय झाले,तिच्या शाळेमध्ये बक्षीस समारंभ होता,तिचा नववी मध्ये पहिला नंबर आला होता म्हणून पहिले बक्षीस तिलाच मिळणार होते,हे तिला पण माहीत होते. पण झाले अस की,तिला तीन नंबर चे बक्षीस देण्यात आले आणि ज्या सरांची पुतणी होती ना तिला पहिले त्यामुळे तिला काय गोंधळ झालाय तेच कळेना.
तिला अस वाटले की,त्या सरांनी सगळ्यांसमोर त्यांच्या पुतणीचा सत्कार करायचा म्हणून माझे नाव काढून तिला दिले आणि तिचे मला,तितलीच्या डोक्यात हा विचार चालूच होता,यावेळी तर तिच्या भावना ,तिचा आत्मसन्मान अजूनच त्रीव झाला,ती कार्यक्रमात गोंधळ नको म्हणू शांत बसली आणि घरी गेली. तिला कळत नव्हते नक्की अस का केले म्हणून,मग तिने घरी सांगायचा विचार केला.
बाबा तर घरी नव्हते .त्यांना अधून मधून काम आले की त्यांना निरेला जाव लागायचे ,त्यांनी काम सोडले नव्हते ना ,काम चालूच होते पण जेव्हा असेल तेव्हाच ,रोज नाही जावे लागायचे.
मग तिने आईशी बोलायचे ठरवले,”अगं आई,माझा पहिला नंबर आला होता तरी सगळयांसमोर मला तिसरा नंबर दिला आणि त्या शितलला पहिला दिला,ती पण काहीच म्हणली नाही गं,पळत पळत गेली स्टेज वर.म्हणजे तिला माहीत होते अस करणार आहेत म्हणून,मला खूप राग आला होता पण बाहेरचे पाहुणे होते म्हणून शांत बसले होते ,तू विचार ना आमच्या सरांना.”तितली ने आईला संगितले.
आई म्हणाली आधी तू सांग उद्या सरांना,बाबा आले की मी पाठवते शाळेत त्यांना,तस चुकीचेच आहे हे,तिथेच तू म्हणायला पाहिजे होतेस अस का केल म्हणून,तुझ्या कष्टाचे मार्क होते ते अस नव्हते होयला पाहिजे.”आई ने तिला समजावून सांगितले.
तिच्या डोक्यात आता एक गोष्ट नक्की बसली ती म्हणजे आपल्या हक्काचे आणि कष्टाचे मागायला कधीच मागे-पुढे पहायचे नाही.
दुसर्‍या दिवशी वर्गात तिने सरांना सांगितले, सर म्हणाले,”चुकून झाले,तुला तुझे बक्षीस लगेच देतो,पहिलं नंबर ला दोन वह्या जास्त होत्या ,त्यांनी त्या वह्या लगेच दिल्या”
ठीक आहे सर,पण प्रश्न वह्यांचा नाही,माझ्या आत्म सन्मानचा आहे,मी वह्या पाहिजेत म्हणून नाही सांगितले”,तितली ने सरांना सांगितले.
सर काहीच बोलले नाही आणि खाली बसा म्हणाले.
वेळ निघून गेली होती आणि त्या बरोबर तो क्षण गेला होता.
आपल्यासोबत काही तरी नेहमी चुकीचेच होते आणि ते पण आपल्या परिस्थितीमुळेच हे तिला कळत होते.
नववीच्या परीक्षा झाल्या,आता सुट्ट्या लागल्या,सुट्ट्या लागल्या की ती नेहमी मामाच्या गावाला जायची,तिचे हे नेहमीचे ठरलेले असे.पण यावेळी जाण शक्य नव्हते आता,कारण दहावीचे वर्ग चालू होणार होते,थोडेच दिवस सुट्ट्या होत्या,म्हणून आता परीक्षा झाल्यावरच जावू असे तिचे ठरले. दहावी म्हणल्यावर अभ्यास जास्त आला,कंदिला मध्ये किती अभ्यास करणार,त्यात पहिले येणे जास्त महत्त्वाचे होते,पुढे प्रवेश घेयला अडचण नको म्हणून,सगळे चक्र तिच्या डोक्यात चालूच होती. त्यात बाकीच्यानसारखे एकस्ट्रा चे क्लास नव्हते तिच्याकडे ,जेवढे काय शिकवतील ते वर्गातीलच समजून घेयचे, ईतर काही पुस्तके नव्हती,आहे हे पाठयपुस्तक च तयारी अशी करायची ना की सगळेच आले पाहिजे.
दहावी चालू झाली,सगळं लक्ष आता अभ्यास आणि अभ्यास!
शाळा कधीच नाही तिने बुडवली,नेहमी रोज हजर,रोज छान अभ्यास.सहमाहि चे पेपर मध्ये फक्त तिला साठ च टक्के पडले,एवढे कमी कस काय पडले तेच तिला समजले नाही,अभ्यास तर ती करत होती पण तिचे लक्ष अभ्यासात नव्हते,मनात गोंधळ चालू होता,मन बैचेन होते. दहावीच्या पुढे शिकायला मिळेन की नाही या विचारात च तिचे सहमाही तर गेली.
तिच्या आई ने संगितले,”असच,चालू राहिले तर तुला अकरावी मध्ये टाकून काय फायदा,अभ्यासच नाही केला तर फुकट पैसे कशाला वाया घालवायचे.”
आजोबा पण बसले होते तिथेच ते म्हणाले ,” बाईच्या जातीने शिकून काय करणार ,करावे तर लागणार लग्न च ,घरातील कामे,मंगल हिला गुरांचे शेण पण काढायला सांगत जा, आणि रानात पण घेऊन जात जा खुरपायला ,कसला नवरा भेटतोय आणि कसला नाही,पांडुरंगा.”
तितली सुन्न ,शांत…..
बाबा कधी येतील आणि कधी त्यांच्याशी बोलेन याचा च विचार करत होती.तिच्या मनातील घालमेल तिला बोलून दाखवयाची होती ,मन शांत झाल्याशिवाय तर तिचे अभ्यासात लक्ष कसे लागणार होते.
उद्या आल्यावर बोलू असे तिने ठरवले खर.
ती बाहेर गेली होती,आजोबांकडे ,तेथून आल्यावर लगेच बोलायचे ,मनात तिच्या विचार चालूच होता,घरी गेली तर आजी आणि बाबा न च्या मध्ये काय वाद चालू होता,ते समजलं नाही पण तिने एवढेच ऐकले,”माझी पोरगी आहे,मी काय पण करेल,तिला विहिरीत म्हणले तरी ढकलून देईन.” बाबा आजी ला ओरडून बोलत होते.
ती तिथेच उभी होते,काहीच न म्हणता पुस्तके घेतली आणि आंब्याच्या झाडाखाली गेली वाचायला. डोक्यात अजूनच विचार चालू झाले,जास्त विचार कराची सवय तिला याच काळात लागले,आता बाबानं सोबत काय बोलणार ,तिथेच पूर्णविराम भेटला.
घरात सगळे शांत च होते,विचारायची सोय नाही अजिबात,का तर मोठ्यांच्या बोलण्यात लहानांनी लक्ष देयचे नसते आणि त्यांचे मत तर अजिबातच मांडायचे नसते.
दुसर्‍या दिवशी न राहून म्हणले,
आई ला म्हणले,” बाबा अस का म्हणले गं,मला खरच विहिरीत ढकलून देतील का ?”
“वेडी आहेस का, सगळ्यात जास्त जीव तुझ्यावर आहे त्यांचा,असच रागात म्हणले असतील,तू भरपूर अभ्यास कर,मला नाही शिकता आली शाळा पण तू खूप शाळा शिकावी असं वाटते मला.”आई तितलीच्या वेण्या घालत सांगत होती.सगळ आवरल्यावर तितली शाळेत गेली.
चला,आई साठी का होईना तितली अभ्यास करणार होती,आता परीक्षेला खूपच थोडे दिवस राहिले होते,अभ्यास जोमाने चालू केला.
मग बाबांनी लाईट ची सोय करायचे ठरवले,त्यांनी ४०० फुटावरून त्यांनी केबल टाकून लाईट जोडली खरी पण ज्यावेळी त्या लोकांना लाईट पाहिजे तेव्हा ते काढून टाकत केबल ,परत कोणी तरी घरून चालत जायचे,सगळे खाली अंथरलेली केबल तपासत,कुठे तुटली आहे का,काय झालाय का,मग तिथे गेल्यावर जोडायची.
बाहेर एक मोठा बल्ब जोडला होता ,मग त्याला दिसायचा खालून लाईट लागले आहे.
परत त्यांनी मोटरसायकल वर पण लाईट जोडून बल्ब लावला होता.
आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा जास्त शिकावे हे या दोघांना वाटत होते,नेहमी.
या दोन्ही गोष्टी लाईटच्या अपयशी ठरल्या म्हणाव्या तेवढा काही उपयोग झाला नाही,शेवटी कंदील चं.
परीक्षा जवळ येत होती ,अभ्यासात व्यत्यय नको म्हणून सगळेच काळजी घेत होते.
ऐन परीक्षेच्या महिनाभर आजी घसरून पडली,आणि तिला उठताच आले नाही,मग तिला इंदापूरला दवाखान्यात भरती केल,थोडे दिवस काकू थांबली ,कधी बाबा ,काका पण कोणी तरी स्त्री तिथेच पाहिजेच होती.
आजीचा खुबा मोडला होता,तिच्या पायात आणि खुब्यात रॉड टाकले,मग मात्र आईला पण जावे लागले दवाखान्यात १०-१५ दिवस ,मग मात्र तितली ची तारेवरची कसरत चालू झाली,जेवयाला चुलतिकडे जायची ती कधी कधी पण बाकीचे सगळेच आवरायला लागायचे ,शिवाय भैय्या होताच ना,तो पण तर लहानच ना किती केल तरी. सगळे घर झाडून काढायचे,आंगण,त्यांचे कपडे आणि जवळ जवळ सगळेच आवरून मग परत शाळेत जायचे त्यात अभ्यास अजिबातच होयचा नाही त्यात मग अजून तिची चीड चीड होयची ,कसे बसे पंधरा दिवस काढले तिने,परत आई आजीलाच घरी घेऊन आली.
तितलीच्या घरात जागा नव्हती म्हणून चुलत्यांच्या घरातच तिला ठेवले,आजी तिची झोपून होती.देवाने अस नव्हते करायचे खर,आजी खूप छान होती,तितली चा जीव होता आजीवर,तसे आजी चांगली होती तेव्हा ,तितली नेहमी रोज शाळेतून आली की चहा करून देयची आजीला,नविन काय खावू आणला असेल तर तो पण देयची.तितली ने कधीच म्हातार्‍या लोकांचा रागराग नाही केला,संस्कारच झाले होते तसे तिच्यावर!
आजीवर जागेवर होती,तेव्हा शाळेत जाताना तितली आठवणीने तिला ज्यूस देयचीच फळांचा,भेटूनच जायची तिला.
परीक्षेचे वेळापत्रक आले होते,अभ्यास झालाच होता.परीक्षा दुसर्‍या गावात नेमके यायच्या ,त्यांच्या शाळेला अजून ग्रँड नव्हते मिळाले,म्हणून त्यांना दुसरीकडे जावे लागायाचे,परत आलीच ना दुसरी शाळा.
शाळेत जायला परीक्षेला एक टेंपोच केला होता छोटा,त्यातच सगळे विद्यार्थी जायचे,आणि शिक्षक ही सोबत असायचे. गाव हे गाव असते कारण ते गावसारखे च राहायचे हेच ते मान्य करत असते ,बदले असते तर मोठी शहर नसते का झालं.
सगळे पेपर कसे छान झाले,सगळे पेपर बद्दल काहीच शंका नव्हते ,सगळे मनासारखे होते,त्यामुळे काहीच टेंशन वाटत नव्हते त्यात ती घरी आल्यावर अंदाजे गुण पण काढत होती.
खरा प्रॉब्लेम आला तो तिला भूमितीच्या पेपर ला,शेवटचा तीस मार्क्सचा प्रश्नच चुकीचा छापून आला,अर्थातच हे नंतर समजले.
पण तिने गणीतामध्ये दीडशे च्या दीडशे धरले होते तिला एक पण मार्क घालवायचा नव्हता तसा तिने अभ्यास केला होता.
भूमितीच्या पेपरचा शेवटचा प्रश्न काय सोडवायला आला नाही म्हणून,ती घरी येतानाच खूप रडली आणि परत घरी गेल्यावर पण खूप रडली. जेवढे भेटतील तेवढ्या सगळ्यांना माहीत झाले की भूमितीच्या पेपर मध्ये काही तरी प्रॉब्लेम होता म्हणून,शेवटी न जेवताच तितली झोपली.
दुसर्‍यादिवशी ती त्या विषयाच्या सरांसोबत बोलली आणि सर पण म्हणाले ,प्रिंटिंग चूक आहे ,निघेल काही तरी मार्ग ,नको मनावर घेऊ,फक्त प्रश्न लिहिलेला पाहिजे ,तू तो सोडवायचा प्रयत्न तरी केलेला असावा ,म्हणजे त्याचे गुण तुला भेटून जातील.
शेवटी तिचे मार्क्स तिला भेटेले ,बोर्डाने तस शाळेमध्ये संगितले,आता सुट्टी कशी निवांत जाणार होती,थोडे दिवस ती सुट्टीला मामा कडे गेली मग,तिला मामाचा गाव खूप आवडायचं ,मजेत राहत होती ती.
आजी खूपच आजारी पडत चालली होती म्हणून ती परत त्यांच्या गावी आली,आजी खाण-पिण बंद केले होते.
निकलची वेळ पण जवळ आली होती,दोन दिवसावर आले होते तसे तिला अजूनच टेंशन म्हणा किवा दडपण असं काही दिसत नव्हते,तिला,तिला आत्मविश्वास होता की नक्की चांगले मार्क्स मिळतील म्हणून,सध्या सगळ्यांना काळजी आजीच होती,खर.
घर नव्हते म्हणून त्यांच्याकडे कोणी पाहुणे पण येत नव्हते ,याची खंत नेहमी वाटायची. आजीला भेटायला खूप लांबून लांबून पाहुणे आले पण तितलीच्या घरी कोणीच नाही आले,ज्यांना खरच माणुसकी होती तेवढेच फक्त तिच्या घरी यायचे.
गरीबी आणि श्रीमंती याचा दूरवर काही संबंध नसलेले माणुसकी.
या दोन परस्पर विरोधी दोन गोष्टी काय म्हणून जुळवत असेल ,हे न उकलेले गूढ आहे. दिवसांमागून दिवस जातातच.
तितली ला नेहमी अस वाटायचे की,अशी नातेवाईक नसलेले बर ना,जेव्हा सगळे होते ,तेव्हा हेच सगळे जन निवांत राहयचे,खरतर तिला नेहमी वाटायचे की जेव्हा माणुसकी संपेल ना तेव्हा आपण त्या माणसाशी असलेले नाते तोडावे,त्याचा संपती शी काय संबंध.जमीन घेतल्यामुळे आणि बाबांची नोकरी यामुळे हे दिवस आले होते,नीट नियोजन झाले नव्हते पैशांचे म्हणून सगळे निर्णय फसले होते खर,पण ज्याच्याजवळ जिद्द आहे ना,तो काही पण करू शकतो,हे तिचे आई -बाबा नेहमी सांगत आणि नक्की दिवस जातील,चांगले दिवस पण लवकर येतील,असा विश्वास त्यांनी दोन्ही मुलांना नेहमी दिला.पण हे कठोर दिवस मात्र त्या सगळ्यांच्या मनात कायमस्वरूपी आठवण म्हणून राहतील,हे मात्र खर होते.
असो,पण कोवळ्यावयात तिला माणसे सांभाळायची सवय लागली,नात्यांची कींमत समजली,जीवनाचा किती बहुमूल्य तत्व ती शिकली होती ,याची जाणीव तिला आता नक्कीच नव्हते,पण पुढच्या आयुष्यात हेच तिची ताकद होणार होते.
निकालाचा दिवस उगवला,एक वाजता निकाल लागणार होता,त्यांचे सर गेले होते निकाल आणायला,ते कधी येतात आणि कधी एकदाचा निकाल कळतोय हेच सगळ्यांच्या मनात होतो.
आतुरतेने फोनची वाट पाहत होते आणि तो फोन आलाच तितलीला ८१.०७% पडले आहेत आणि तितली शाळेतच नाही तर आख्ख्या केतुर केंद्रात पहिली आली.
तिचे आई -बाबांचे डोळे पाण्याने भरले होते आणि छाती अभिमानाने ताठ होती. तो आनंद च वेगळा होता. सगळे खूश,सगळीकडे तिचीच चर्चा,कोणत्याही सुविधा नसताना तिने एवढे मार्क्स मिळवले.
अजून आई -बापाला काय हवे असते म्हणा.
तितली खुश होती,आता खरी कसोटी पुढे होती. दहावी झाली ,पुढे कुठे जायचे ,गावात फक्त दहावीपर्यंत च शिक्षण होते. पैसे किती लागतील आणि एकटीने सगळ निभवेल का ??
एका गोष्टीचा शेवट होतो ,तेव्हा नवीन कहाणी चालू होत असते,हेच खर आयुष्य असते ,जे नेहमीच अनपेक्षित असते. त्याच्यासमोर हार मानायची नसते कधीच मुळात नाही तर खरच ते हारायला लावते.
तितली चे कॉलेज ,आकर्षण आणि डियर जिंदगी मधील आलिया सारखे प्रेम पाहुयात पुढील भागात,नक्की वाचत रहा,फुलपाखरू.

क्रमशः…

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: