मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

कथा-कादंबरी

फुलपाखरू भाग# ४

हॉस्टेल आणि मामाचे गावं

हॉस्टेलला राहावे लागणार होते,सगळे पाहुणे होते पण ,उगीच ओझे नको कोणाला आणि उपकाराच्या ओझ्याखाली रोज दबण्यापेक्षा,बाहेर राहिलेलं कधी पण सोयीस्करच!

आता हॉस्टेल म्हणलेले की सगळे नवीनच आले,सगळे बदललेच की परत,८१% टक्के म्हणले की सगळ्यांना वाटत च होते की आता प्रवेश नक्कीच समजावा पण झाले सगळे उलटेच,सोलापूर जिल्ह्याची मेरीट लिस्ट ९६% लाच बंद झाली,आणि आता प्रवेश भेटणे खूप अवघड काम झाले.

त्यावेळी तितली ला मनातल्यामनातच वाटून गेले,स्पर्धा कधी पूर्ण होतच नाही,बाहेरच्या जगाशी स्पर्धा तर कधीच करू नये,खरतर एवढे चांगला अभ्यास करून पण जर आज आपल्याला प्रवेश मिळत नसेल तर आपण शूद्रच झालो की ,का या गोष्टीवर आपण खुश होयचो की आपण बोर्ड परीक्षेमद्धे ,केंद्रात पहिले आलोय,आपले नाव शाळेच्या ऑफिस मध्ये अशा एका पेंट ने लिहिले आहे ते कधीच पुसले जाणार नाही आणि ते तसच ईतिहास जमा होईल.शेवटी आनंद मानण्यात असतो.एक तर नक्की आहे की,इथून पुढे स्पर्धा स्वत:शी मागची बेरीज करायची आणि अजून काय काय राहिले आणि काय काय वजा करायचे आहे ते पाहत च पुढे जायचे ,पण बाहेरच्या जगाची स्पर्धा नको रे बाबा ! मन कमजोर होऊन जाते आणि नैराश्य येते मग लगेच. मानवी मन तर असे आहे ना की,सुखात ही दु:खच जास्त शोधत असते,थोड्या दुखा:त तर जगण्याची अपेक्षाच नको. म्हणून तर आता फक्त स्वत:चा विकास करायचा आणि खूप मोठे होयचे ,खूप मोठे! पण तितली ने अजून ठरवले नव्हते नेमकं काय होयचे आहे ते,फक्त एवढेच वाटायचे की खूप मोठे होयचे ,एक ओळख बनवायची,स्वत:ची.

कसे बसे करून ,थोडा मोठ्या लोकांच्या ओळखीने आणि तिच्या गुणांमुळे तिला प्रवेश मिळाला खरं,प्रवेश झाला,तिथेच होस्टेलला पण प्रवेश घेतला,कॉलेज चालू होण्याची तारीख पण संगितले,आता पुन्हा सगळे बदलणार होते,पण हा बदल तिला चांगला वाटत होता,गाव आता सुटणार होते,शिकण्यासाठी का होईना.

कॉलेज ला जायचे म्हणल्यावर,सगळे खरेदी तर करावी लागणार ना,गादी,बादली-मग,गजरचे घड्याळ,तिथे रोज वापरायला नवीन कपडे आणि बरच काही,चांगले मार्क्स मिळाले होते म्हणून तितलीच्या बाबांनी पण काही काटकसर केली नाही,तिला जे पाहिजे ते तिला सगळे त्यांनी दिले. आई आली होती तिच्यासोबत खरेदीला ,काय नको काय पाहिजे ते सगळे घेतले.

तितली आणि तिच्या आई चे कधीच जास्त अस नात छान नव्हते म्हणजे आपण मालिका मध्ये पाहतो ना तसं,तितली ला नेहमी वाटायचे की तिच्या आईला ती अजिबात आवडत नाही म्हणून सारखी तिला मारायची आणि खूप कठोर शब्दात बोलायची पण तितली ला त्या मागचे प्रेम ,आईची माया कधीच समजली नाही. तिच्या बाबांना वाटले की आता तरी दोघी लांब राहिल्यावर तर समजेल पण तस काहीच झाले नाही. चूक तितलीची होती ,तितली ने कधीच आईचे ओरडणे चांगल्या हेतूने घेतले नाही,प्रत्येकवेळी तिला असच वाटायचे की माझ्या आईला मी नको आहे म्हणून,पण एक दिवस हे सगळं बदलणार होते आणि एक घट्ट मैत्रीचे नाते तयार होणार होते,हे कधी होणार हे मात्र कोणालाच माहीत नव्हते.

तितली उद्या जाणार म्हणून आईने तिला खावू साठी लाडू ,चिवडा आणि शंकरपाळया तसेच शेंगदाण्याचे लाडू करून दिले.

जाताना कशी तितली हसत गेली,जाताना खूप खुश होती,नवीन ठिकाणी,नवीन सगळे. तिला हेही माहीत नव्हते की तिच्यासोबत त्या अजून तीन मुली कोण आहेत म्हणून,तिच्या डोक्यात विचार चालू होते ,कोणी का असेना आपण छान अभ्यास करायचा,आपण चांगले तर मग मैत्रिणी पण चांगल्याच होतील ना ! 

होस्टेलचा पहिला दिवस,छानच गेला,सगळे कसे नवीन होते,ओळख करण्यातच वेळ गेला,बाबांच्या ओळखीच्या त्यांच्या मित्राच्या काही मुली होत्या,त्या आल्या होत्या त्यांनी नीट सगळे दाखवले आणि काही टिप्स पण दिल्या.काही अडचणी आल्या तर नक्की सांग अस सांगून पण गेल्या.आहे कोणीतरी म्हणून खोटा का होईना पण दिलासा होताच!

जेवायाला आता गरम नव्हते मिळणार,आईच्या हाताची चटणी भाकरी पण खूप छान लागते आपल्या सगळ्यांनाच तसेच तितलीचे पण झाले,जेवण काही मनासारखे मिळेना ,काहीच आवडेना,मग काय आईच्या हातचे लाडू चिवड्यात च खुश. हळू हळू सवय होयला लागली होती,घरी फोन करायचा म्हणजे ,कॉईनबॉक्स असायचे आणि त्याला लांबच लांब रांगा,जेव्हा नंबर येईल तेव्हा मग बोलायचे,तितली तिच्या बाबांशी बोलल्याशिवाय कधीच चैन पडत नसे,आईला कधी कधीच फोन करायची पण बाबांना रोज च बोलणं होयचे.कॅम्पस आवडायला लागला आणि आता नवीन मैत्रिणी झाल्या,एक आठवडा झाला म्हणून तितलीचे बाबा तिला तिथेच भेटायला आले होते,खूप गप्पा मारल्या,त्यावेळी बाबांनी संगितले तिला,तू आईला फोन करायला पाहिजे होता,ती खूप रडली तू होस्टेलला आल्यावर ,तुझ्या फोन ची ती खूप वाट पाहत असते,बोलत जा तिच्याशी,तितलीला पण खूप वाईट वाटले आणि तिला तिची चूक पण कळाली॰

पंधरा दिवसातून एकदा घरी सोडत असे,त्यावेळी ती बाबांना सोबत घरी यायची,दोन दिवस निवांत राहायची आणि परत सोमवारी माघारी,होस्टेलला.

दहावी पर्यन्तचे सगळे शिक्षण मराठी मीडियम ने झाल्यामुळे,अकरावी ला सगळे इंग्लिश मधून थोडे अवघडच जात होते पण अभ्यास जोरात चालू होता,जसा जमेल तस,परत पाटी हातात आली होती,जे जमत नव्हते ते रट्टा मारून मारून ,पाठीवर घोटून घोटून पाठ करायचे चालले होते. समजतय की नाही हेच कळत नव्हते,मग अभ्यास चालू होता.म्हणावं तसे इथे ती अभ्यासमध्ये काही चमकली नाही,त्यात पहिलीला भेटल्या तशाच तिला इथे पण जेवरे बाईसारख्याच गायकवाड मॅम भेटल्या,अकरावी चे वर्ष कसेतरी तिने काढले आणि बारावीला तिने बायोलॉजी च विषय बदलून टाकला,त्या शिकवत होत्या ना म्हणून ,तिच्या मनातील भीती कधीच संपत नसायची. तितली ने भीती ला कधीच सामोरी गेली नाही,त्याला कधीच तिने फेस केले नाही,तिने प्रत्येकवेळी तो विषयच सोडून दिला आणि इथेच ती नेहमी चुकत आली,त्या चुकीची शिक्षा ती नेहमी भोगत आली,असो.

म्हणजे आता डॉक्टर होण्याचे विषय इथेच संपला आता फक्त गणित ,त्यावर तिने खूप भर दिला म्हणावं तस तिला काही चांगला असा अभ्यास झाला नाही आणि ती पण कदाचित कमी पडली होती.

नवीन नवीन कॉलेज होते ,सगळे नवीन होते ,नवीन जीवनशैली होती. वेगवेगळ्या स्पर्धा होत्या,नवीन अॅक्टिविटी होत्या,सगळे कसे परिपूर्ण असे कॉलेज होते तिचे,हॉस्टेल ला रोज प्रार्थना होती ,खेळायला मोठे मैदान होते ,वाचायाला खूप मोठी ग्रंथालय होते.एक चांगला आणि विकसित माणूस घडण्यासाठी जे जे पाहिजे होते ते सगळे तितलीला ईथे भेटणार होते. तितलीला फिरायला खूप आवडायचे ,तिने खरी ट्रेकिंग ला सुरवात पण ईथेच केली.

तितलीला मोठ मोठ्या व्यक्तींची व्याख्यान पण इथेच ऐकायला मिळाली,त्यांचा संघर्ष आणि त्याची कामगिरी,हे ऐकून तिला अजूनच स्फूर्ती मिळायची,स्वत:ची ओळख निर्माण करण्याची.

पण कसे असते ना ,मानवी स्वभाव च की जिथे जे असते तिथे त्याची काही किंमत नसते. असच,तितलीचे पण झाले.तितलीचे म्हणावं तास काही खास अस वर्षे नाही गेले,मैत्रिणीच्या नादात तिने तिचे सगळे नवीन शिकण्याचे आणि विकास करण्याचे राहूनच गेले.बारावीचा पेपर चे दिवस आले तो पर्यन्त सगळे तिच्या हातातून गेले होते,मैत्रिणी करत करत सगळयाच मैत्रिणी लांब झाल्या,कामपुरता सगळ्यांनी तिचा वापर करून घेतला आणि तिला एकटीला सोडलं. तितलीचे एकटेपण तितलीलाच हवेसे वाटायला लागले त्यामुळे शेवटच्या दिवसात का होईना पण तितलीचा चांगला अभ्यास झाला. शिवाय सगळयांना अपेक्षा तर होत्याच ना,दहावी मध्ये एवढे चांगले मार्क्स मिळाले होते म्हणल्यावर तर बारावी मध्ये तर अजून चांगलेच मिळाले पाहिजेत अस अट्टहास तर होताच की.परीक्षा जशा जवळ येतील तसे तसे,ताण यायला लागला होता,समजत नव्हते की काय होणार आहे,त्यात तिला एक च खास अशी मैत्रीण राहिले होती ती पण हॉस्टेल ला नव्हती राहत,ती अप-डाऊन करायची त्यामुळे दिवस जायचा पण रात्री नको वाटायचे,रूममेट्स बोलत नसायच्या,मग तिने रूम मध्ये न राहता ,तिच्या चुलत आत्याच्या मुलीच्या रूम मध्येच राहायला लागले. सगळे तिला नको झाले होते,मैत्रिणी च्या नजरेतुन तितली चुकीचे आहे असं सगळयांना वाटायचे पण तितली ला नेहमी अस वाटायचे की त्यांचं च चुकलंय.तितलीचे सगळयांना ग्राह्य धरण चुकत होते,तिच्या मैत्रिणीनी तिचेच ऐकले पाहिजे,तिला सोडून कोणासोबत गेले नाही पाहिजे,परत सगळं तितलीसोबतच शेअर केले पाहिजे म्हणजे तितली तिच्या मैत्रिणींवर जर जास्तच हक्क दाखवत होती,त्यामुळे त्याचा त्रास आता मैत्रिणींना होयाला लागला होता म्हणून सगळे तिच्यापासून लांब जायला लागले होते.हे तितलीच्या उशिराच डोक्यात आले पण त्याचा तिच्यावर काय जास्त फरक नाही पडला.शेवटचे दिवस चालू होते म्हणून तिने पण एवढे मनावर नाही घेतले आणि जोमाने अभ्यास केला. त्यात सीईटी नवीनच चालू झाली होती आणि त्यासाठी क्लास लावायला हजारो रुपये लागणार होते आणि ते सगळे क्लास लातुर ला जाऊन शिकायचे होते म्हणून तर मग अजूनच पेच निर्माण झाला होता.घरची एकंदरीत परिस्तिथी तिने पाहिले होती,म्हणावं तस काही खास नव्हते चालले पण ठीक होते.आपण नाही दिले तरी चालेल अस तिला वाटले आणि त्यावेळी एवढे पण सांगणार कोणी नव्हते की सीईटी किती महत्वाची आहे म्हणून,तसे तिच्या मनात चालले होते की ती बी.सी.एस ला च प्रवेश घेईल म्हणून ,म्हणून एवढे लक्ष नाही दिले. पेपर गेले जेमतेम,सुट्ट्या लागल्या आणि आता परत हॉस्टेल खाली करायची वेळ आली मग तिने ठरवले की आता परत नाही येयचे इथे,मग तिने आत्याच्या च घरी सामान ठेवले आणि हॉस्टेल ला आणि तिच्या ज्युनिअर कॉलेज ला रामराम ठोकला.

पण नियती कधी कोणते खेळ खेळणं कधी कोणाला समजलंय का,तिला तरी कुठे माहीत होते की परत इथेच यायचे आहे की नाही.पण म्हणून तर गेली की परत हे कॉलेज नाही म्हणून.ते पाहुयात आपण पुढे!

दोन -अडीच महिने सुट्ट्या होत्या,मग काही तरी शिकावं म्हणून तिने मामाचे गाव घाठले.

मामाचे गावं,जगातील सगळ्यात भारी जागा. तितलीला नेहमी वाटायचे,आजीची लाडू होती,तर मामा-मामींची परी होती आणि सगळ्याच गावाची आवडीची वाहिनी होती ना! आता वहिनी म्हणजे आत्याच्या मुलगी म्हणजे वाहिनीच झाली ना! गाव तस छोटेसे पण फलटण च्या शेजारचे,डोंगर आणि टेकड्यांनी सगळ्याबाजुनी वेढलेले,तिला खूप आवडायचे. ती शाळेत जात नसताना आणि जेव्हा पासून शाळा चालू झाली तेव्हापासून ती प्रत्येक सुट्टीला मामाचे गाव,तिचे नेहमी ठरलेले असायचे.

मामाचे गावं,जगातील सगळ्यात भारी जागा. तितलीला नेहमी वाटायचे,आजीची लाडू होती,तर मामा-मामींची परी होती आणि सगळ्याच गावाची आवडीची वाहिनी होती ना! आता वहिनी म्हणजे आत्याच्या मुलगी म्हणजे वाहिनीच झाली ना! गाव तस छोटेसे पण फलटण च्या शेजारचे,डोंगर आणि टेकड्यांनी सगळ्याबाजुनी वेढलेले,तिला खूप आवडायचे. ती शाळेत जात नसताना आणि जेव्हा पासून शाळा चालू झाली तेव्हापासून ती प्रत्येक सुट्टीला मामाचे गाव,तिचे नेहमी ठरलेले असायचे.

चिंचा पाडणे आणि दिवस – दिवस खेळणं ही दोनच कामे ती करायची,मस्त मध्ये कोणताही वार न पळता,दणकून मटन,चिकन खायचं,मामाचे गाव म्हणले की तिला या गोष्टी आल्याच.

12 वीची परीक्षेनंतर बऱ्याच सुट्ट्या होत्या म्हणून तिने तिथेच फलटण ला कॉम्पुटरचे क्लास लावले,एम.एस.सीआईटी केली,रोज येऊन जाऊन लाल परिमधून प्रवास केला,आणि फलटण पण पाहिले. 

त्याच दरम्यान 12 वी चा निकाल पण लागला,सगळयांना अपेक्षा होती पण अपेक्षापेक्षा खूपच कमी गुण मिळाले,फक्त ६०% च,बाबा तर जाम चिडले होते,ते काही बोललेच नाहीत,अस पण मामा कडे असल्यामुळे फोन वरच ओरडा बसला तो खूप झाला होता.आता प्रश्न होताच की पुढे काय करायचे,बाबा बोलत नव्हते मग कमी पैसे लागतील असेच काहीतरी करू म्हणून तिने ग्रॅज्युअशन करायचे ठरवले. कॉम्पुटर सायन्स मध्ये पदवी घ्यायची होती ते आता प्लेन सायन्स ला प्रवेश घ्यावा लागला आणि ते पण त्याच कॉलेज मध्ये ज्याचं कधी तोंड पहायचे नव्हते. 

नियतीच्या चमत्कारापुढे कोणाचा निभाव लागला आहे का तेव्हा तितलीचा लागणार होता. बाबा काय आलेच नव्हते मग मामा सोबत जाऊन च प्रवेश घेतला आणि त्याच होस्टेलला प्रवेश पण,याच दरम्यान तिला एक चांगला मित्र पण झाला होता,मामाच्या मुलाचा मित्र,त्यांची फक्त घट्ट मैत्रीचं झाली,मैत्रीच्या पुढे गेले असते पण तितलीचा निकालाचा परिणाम तिच्यावर झाला आणि पुन्हा सगळं फोकस तिने पुन्हा करिअर वर केला.

तितलीला प्रेमाची भावना आवडत होती,कोणीतरी आपली काळजी घेतय,आपल्यासाठी काही तरी करताय सगळं तिला छान वाटत जरी असले तरी,तिला नेहमी असं वाटायचं की प्रेमाच्या भाणगडीत पडून उगीच वेळ वाया जातोय आणि जिथे द्यायला पाहिजे तिथे देता येत नाही. म्हणून खरं प्रेम तितलीला कधीच मिळाले नाही आणि तिला कधी होईल म्हणून पण कोणाला वाटत नसे.

बघुयात तितलीचा पुढचा प्रवास तेच कॉलेज आणि पुढची पाच वर्षे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युअशन होईपर्यंत तिथेच काढतेय का अजून काही असं अनपेक्षित होतंय का की तीच जग परत बदलतंय. प्रेमात पडून करिअर तर नाही सुटणार ना!

त्यासाठी वाचत रहा,तितली नावच “फुलपाखरू”…

क्रमशः…

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: