फुलपाखरू भाग #५

आमचं पुणं आणि तिथं लग्न”

मागील चार भाग तुम्ही वाचलेच असतील त्यातच हा पाचवा भाग!

इच्छा नसताना आणि पैशांची कमकरता असल्यामुळे,सगळ्यात मोठे कारण पण होतेच की कमी गुण असल्यामुळे कोणालाच काही सांगता आले नाही.

तेच कॉलेज,तेच हॉस्टेल पण सगळ नवीन वाटतं होते,मैत्रिणी मात्र वेगळ्या होत्या,जुन्या सगळ्या सोडून नवीन कॉलेज ला गेल्या होत्या आणि तितली मात्र इथेच. जुन्या मैत्रिणी नाहीत म्हणून तितलीला थोडे बरं वाटले,मागचे आता काहीच नको,नवीन सुरवात करयाची,सगळ जुनेच होते पण सगळ ती नव्याने पाहत होती,आता खूप काही करण्यासाठी ती सज्ज आहे असं तिला वाटायला लागले होते,चांगल्या सवयी लावून घेयच्या आणि त्या रोज नीतीनेमाने करायच्या,सगळे वेळापत्रक ठरले तिचे! जरा जास्तच धक्का बसला होता तिला,स्वत:ला चांगले वळण लावून घेत होती पण तिचा स्वभाव खूपच चंचल होता त्यामुळे हे किती दिवस चालेन काय माहिती,पण असो सुरवात तर झाली होती.

तितलीने स्वत:ला बदलले होते,तिची सकाळ आता रोज मैदानात होत होती,रोज व्यायाम,योगा आणि प्राणायाम ,वेळ मिळेन तेव्हा अवांतर वाचन,मोजक्याच मैत्रिणी. जास्त कोणाच्या जवळ नाही.कॉलेज मध्ये पण पुन्हा अभ्यासात चमकू लागली,नवीन विषय घ्यावा म्हणून तिने पर्यावरणविषय घेतला आणि जोमाने अभ्यास सुरवात केला,गणित पण जोडीला होतेच.गुणांची पातळी वाढली होती. सगळे चांगले चालले होते,जोरात अभ्यास,अवांतर वाचन,योगा आणि ट्रेकिंग तसेच बर्‍याच बाकीच्या कॉलेज मधील स्पर्धा तसेच नवीन कार्यक्रम मध्ये भाग घेणे. सारखे अॅक्टिव राहिल्यामुळे तितली चर्चेचा विषय झाली,सगळ्यांना तिचे कौतुक वाटायला लागले,आणि ती कॉलेज मध्ये नामांकित विध्यर्थिनी पण झाली.

परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पण आले पण एका विषयाने घात केला,चांगला पेपर लिहिणं ही तितली त्यात काही पास झाली नाही,तो म्हणजे रसायनशास्त्र. तितलीला काही झाले तरी तो विषय काही जमेना,पण पुढे पदवी घेयची तर दुसरा चांगला विषय नव्हता म्हणून पुन्हा तिने जोमाने अभ्यास केला तरी सुद्धा दुसर्‍या सत्रात पण तो विषय निघाला नाही आणि तितलीच्या निकालावर ए.टी.के.टी. चा छान लेबल लागले.

तर दुसरीकडे बाबांची एकीकडे बदली पण पुण्याला झाली होती आणि भैय्या पण अकरावीला जाणार होता,दोघांना होस्टेलला ठेवण्यापेक्षा सगळेच पुण्याला रहायचे ठरले.

तितलीला नुकतच,न आवडीचे कॉलेजं कुठेतरी आवडायला लागले होते,तिची आता खरच इच्छा नव्हती नवीन कॉलेज ला जायला पण परत पर्याय नव्हता.

तितली आली तर पुण्याला खर,पण पुण्याने तीच्यासाठी काय ठरवलय!

पुण तिथे काय उण! घरापासून जवळच कॉलेज शोधण्याचा अट्टहास,पुण्यात कोणी ओळखीचे नाही ना,आणि मुळात पुण तिच्या ओळखीचे नाही ना! हे काय कमी आहे आहे का,कारण असो. प्रवेश तर घेयचे ठरवले जवळच कॉलेज होते तिथे ,ते पण काही कमी कॉलेज नव्हते सगळ्यात,मोठे म्हणजे पुण्याचे टॉप कॉलेजमधील होते.कॉलेज च्या प्रिन्सिपल ला  भेटून संगितले तितलीने की,”मॅडम,मला केमिस्ट्रि समजले नव्हते म्हणून मला बॅक राहिलेत पण मला केमिस्ट्री समजली की नक्की लगेच बॅक काढेल,मला प्रवेश द्या.”

तितलीच्या प्रामाणिक पणावर विश्वास ठेवून तिला प्रवेश तर मिळाला.

कोणीच ओळखीचे नाही,पहिल्याच दिवशी कोणीच बोलले नाही,म्हणजे कोणाला घेण-देणच नव्हते की वर्गात कोणी नवीन आलाय म्हणून शाळेत विचारतात तरी कोण आहेस,कुठून आलात पण इथे तस काहीच नव्हते.

पहिला दिवस तर गेला आता दुसर्‍या दिवशी एक मुलगी येऊन म्हणाली,”नवीन आहेस का? चल तुला एल.आर. दाखवते अस एकटी नको बाहेर बसत जावू.”

तितलीच्या मनात आले आता हे काय नवीन ,तिने नाव पण कधी ऐकले नव्हते.

“हो,चल आणि थॅंक्स “,तितली म्हणाली.

दोघी गप्पा मारत गेल्या आणि तितलीला पहिली मैत्रीण झाली आणि ती पण तिच्याच वर्गातील. तिच्याच अजून दोन अशा चार मैत्रिणी झाल्या आणि त्या चौघी पण एकत्र राहिला लागल्या॰ 

त्या अगोदरच फोन वर ठरवयाच्या कॉलेज ला जायचे की नाही.एक दिवशी त्या तिघी येणार नव्हत्या आणि त्यांच्याकडे तसे न येण्याचे कारण ही होते,दोघींचा अपघात झाला होता छोटासा आणि एकीची बसच आली नव्हती म्हणून त्या येणार नव्हत्या पण त्या आल्या नाहीत म्हणून ती पण नाही आली.

नेमकं दुसर्‍या दिवशी त्यांच्या सरांनी विचारले,”काल,न आलेले जागेवर उभा रहा.”

ते प्रत्येकाला जागेवर जावून विचारायला लागले सगळ्यांकडे कारण होती पण तितली काय सांगणार हेच सुचत नव्हते.

तेवढ्यात तितलीला सरांनी विचारले,”तुम्ही का नाही आला?”

“ह्या कोणीच नव्हत्या येणार म्हणून मी पण नाही आले,”तितली ने सरांना संगितले.

सगळ्या वर्गात एकाच हशा झाला. तितली खूप निर्मळ मनाची आहे, आणि निरागस पण.ह्या नकली शहरात तिचे निरागस पण सगळ्यांच्या ध्यानात नसेल आले तर च नवलं ! 

 बाह्य दिखावा शहराला लाभतो  आणि मनाचा दिखावा गावाला लाभतो. तिला हे कळून चुकले होते.त्यामुळे प्रेमाची भानगड तिच्यापर्यंत आलीच नाही.झाले ते फक्त मित्र -मैत्रिणी.

त्यामुळे अभ्यास आणि त्या चौघी ,हेच तिचे विश्व झाले.

केमिस्ट्रीचे सर आणि मॅडम खूप च चांगल्या भेटल्या,खरा केमिस्ट्री तिला आता समजला आणि बॅक पण निघाले लगेच आणि तिला केमिस्ट्रीची भीती पण गेली म्हणून तिने शेवटी स्पेशल विषय केमिस्ट्रीच ठेवला. 

यावेळी तर सर एवढे चांगले भेटले न की तिचे ऑरगॅनिक केमिस्ट्री पण चांगले झाले आणि तिला चांगले मार्क्स मिळाले.

या दोन वर्षात खास अस काही तिच्या कॉलेजच्या आयुष्यात झाले नाही. पण घरी बरीच लगबघ चालू होती. तितली आता पदवीधर झाली होती म्हणजे लग्नाचे वय झालेच होते.त्यात त्यांच्या घरात एवढे उशिरा कोणाचे लग्न झाले नव्हते म्हणून तर अजूनच आई बाबांवर दबाव येत होता. 

त्यात आजोबा,”माझे डोळे मिटायच्या आत हिचे लग्न पाहू दे रे मला,”नेहमीचे त्यांचे ठरलेले.

घरात मोकळी अशी चर्चा नव्हती पण सगळे चालू होते,ते तिला जाणवत होते.तिच्यापर्यंत काही आले नाही.

चला आता अजून पुढे दोन वर्ष शिकायचे आणि मस्त नोकरी लागणार तर,कोणी पण प्रोफेसर म्हणून घेईल,रोज तितली स्वप्न पाहत असायची आणि ती पूर्ण होतील,मग काय काय करायचे हे नेहमी तिच्या डोक्यात ठरलेले असायचे. 

बाबांची अजिबात इच्छा नव्हती की तितली ने पुढे शिकाव म्हणून पण त्यांनी तिला कधी बोलून नाही दाखविले.

आता प्रवेश घ्यायचा कुठे,मोठा प्रश्न,केमिस्ट्री म्हणले की दिवस -रात्र पाळी आली आणि आपल्याला कोण करून देणार नोकरी म्हणून केमिस्ट्री नको,एवढा पुढचा विचार करून केमिस्ट्री तिने नाकारला.मग कॉलेज ला नवीन च बायोडाइवरसिटि विषय आला होता आणि तसा तिला फिरण्यात रस पण खूप होता,मग त्याचा तिने जोमाने अभ्यास केला आणि प्रवेश परीक्षा पास झाली आणि प्रवेश पण मिळवला पण फी खूप होती पण बाबांनी भरले.

कॉलेज चालू झाले,सगळे छान चालले होते,लग्नाला स्थळ पण येत होती,पण तितलीची इच्छा काय नव्हती.

अभ्यास नवीन होता,जैवविविधता चा पूर्ण अभ्यास करण ते पण दोन वर्षे म्हणजे थोडे आवाहनात्मकच होते.तितली चे मन चंचल होते,रोज तेच तेच अभ्यास करण म्हणजे नको वाटायचे म्हणून तिने हा निर्णय घेतला.कोणी सोबत नसताना एवढा मोठी निर्णय तिने घेतला होता,पुढचा सगळं स्कोप चा विचार करून तिने आवडीला निवडले होते. आता अगदी आपण आपल्या स्वप्नाच्या जवळ आहे आणि ते लवकरच पूर्ण होणार आहे. रोज तिच्या डोक्यात तेच असायचे.

बराक ओबामांची बरीच पुस्तके तिने वाचली होती,त्यावेळी म्हणून तिला जगाला ओळख करून द्यायची होती,ही पण वेगळंच स्वप्न होते. तिच्यासोबत असणाऱ्या सगळयांना लग्नाचे वेध होते आणि तिला स्वतःची ओळख करायची होती. मोठं होण्याचे वेड लागले होते आणि ओळख बनवण्याची. 

अभ्यास एकीकडे चालू होता तर दुसरीकडे मुलगा पाहण्याची तयारी पण एवढ्याच जोमाने चालू होती. बाबांना खूप सांगितले तितलीने की मला शिकायचे आहे म्हणून पण बाबांवर पण तेवढाच जीव होता तिचा म्हणून तिने बाबांच्या आणि आईच्या एका शर्थीवर ती लग्नाला तयार झाली काही झाले तरी शिक्षण थांबणार नाही. 

स्थळे येत होती,आवड-निवड चालू होती,हिचे आपले अभ्यास चालू होता,अभ्यास करता करता ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पण करत होती,वनधिकारी तरी होऊयात म्हणजे सगळे प्रश्नच सुटतील.

कॉलेज चालू झाले आणि लग्न पण अचानकच जमले,त्या लोकांनी शिकण्याची परवानगी पण दाखवली त्यामुळे काय सगळे मजेत होते,आता तर फक्त कॉलेज चे शेवटचे वर्ष च होते आणि अस पण ती लग्न झाल्यावर पुण्यातच राहणार होती त्यामुळे काहीच लग्न करायला अडचण नव्हती. खुश होती तितली,लग्न छान घरात होतंय म्हणून आणि तिचे करिअर पण होतंय म्हणून. 

लग्न खूप जोरात लावून दिले,नको तेवढी हौस झाली तिची,अस लग्न पण कोणी केलं नसेल एवढे छान लग्न झाले तिचे,सगळ्या प्रकारची भांडी,नवीन मधील बेड आणि कपाट,तसेच कपडे धुण्यासाठी मशीन,कणिक मळायला नको म्हणून फूड प्रोसेसर सगळं कसं काहीच कमी न ठेवता दिले होते सोन नाणं तर सगळंच दिले होते अगदी लक्ष्मी दिसत होती तितली लग्नात अगदी लक्ष्मी. 

लग्न छान झालं आणि सुरू झाला जीवनाचा नवीन अध्याय,जो सगळ्यात कठीण असतो आणि तो आपण कधी न भेटलेल्या माणसांच्यात एकटेच राहून पूर्ण करणार होतो.कोणीच सोबत नाही पण फक्त सगळ्यांची साथ ती पण लांबूनच. त्यावेळी परिस्तिथी पण वेगळी होती,आता सारखी मोकळीक नव्हती,लग्न झाल्यावर बोलणं ,ओळख आणि आवडनिवड. स्वतःच्याच लग्नात दोन अनोळखी माणसं,आणि पुढच्या संसाराची सुरवात करण्याची सात वचन पूर्ण करून आयुष्याची स्वप्न रंगवतात.काय तर,लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात.खूप खोलात गेले तर ना ना फाटे फुटतील. 

आता तितलीचे तर लग्न झाले आणि संसार पण चालू होणारच पण करिअर पण होणार का की लग्न नावाच्या खेळात,करिअर नावाचे स्वप्न दुभंगणार. 

तितली खरच एवढ्या आत्मविश्वासाने स्वतःसाठी उभी राहणार का परत आई-बाबा आणि आता नवरा यासाठी स्वतःची आहुती देणार,त्यासाठी वाचत राहा पुढचा आणि शेवटचा भाग,”फुलपाखरू”…..

क्रमशः.

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: