फुलपाखरू भाग #६
तितलीचं “फुलपाखरू” उडालं
लग्न झाले,रीतिरिवाज चालू झाल्या,एक वर्ष तर खूप काही काही असते,सगळे सण नव्याने होऊ लागलं,जे कधी पाहिले नव्हते ते पाहत होती.माणसे नवीन होती,तिथल्या चालीरीती वेगळ्या होत्या,विचारसरणी वेगळी होती.
जे अपेक्षित होते त्यापेक्षा सगळंच वेगळं होते,विचारसरणी बुसरटलेली होती,शिक्षणाचे शून्य महत्त्व होते,लग्न झाले की झाले त्यांचं ऐकायचे,काही केलं तरी लग्न मोडायचे नाही,नवीन नवीन तर भांडण अजिबातच करायचे नाही आणि एकदा लग्न झाले की अर्थी तिथूनच उठेल अस च राहायचं कसल्याही परिस्तिथीमध्ये,माहेर नावाचा विषय ज्यावेळी कन्यादान केले तेव्हाच संपला. खूपच विचित्र वाटत होते तितली ला,पण खर सांगायचे तर माणसे मात्र मायाळू होती,तिच्यावर जीव ओवाळून टाकत होती म्हणून तितलीने पण काही लक्ष नाही दिले.
कॉलेज ला पण जायचे होते,म्हणून जास्त दिवस कुठे राहायचं म्हणून तिने दुर्लक्ष केलं आणि ते जे सांगतील ते ऐकले अगदी निमूटपणे,उलट कधी उत्तर नाही,आले-गेलेले पाहुण्यांचा पाहुणचार,सगळं अगदी जिथल्या तिथल्या,सासू -सासऱ्यांना आई वडीलांपेक्षा जास्त जीव लावला.सगळं मजेत होते कारण तितली समजूतदार होती.
कॉलेज जास्त बुडवून जमणार नव्हतें आणि तिच्या नवऱ्याच्या सुट्ट्या पण संपत आल्या होत्या म्हणून ते दोघे पुण्यात आले त्यांचा नव्याने संसार चालू झाला ,स्वयंपाक नावचा नवीन प्रयोग रोज फसत होता,कधी कधी चांगला जमत होता तर कधी कधी खूपच वाईट,पण त्यांचे केमिस्ट्रीचे सर नेहमी म्हणायचे ज्याला केमिस्ट्री जमलं त्याला स्वयंपाक नक्की जमतोच.या विश्वासावर स्वयंपाक छान जमायला लागला,हळू हळू पाहिले वर्ष पण संपत आले होते,परीक्षा चालु झाल्या,अभ्यास पण छान चालू होता. सगळ छान आणि मस्त चालले होते.परीक्षा संपल्या ,निकाल आला ,चांगले गुण पण मिळालं आता दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेण्याचा तर फी कोण भरणार,लग्न झाल्यामुळे नवऱ्यालाच भरावी लागणार होती पण त्याने नाही म्हणून सांगितले,अजून वडिलांना त्रास नको म्हणून तिने प्रवेश च घेतला नाही.यावेळी मात्र तितलीला त्रास होयला लागला,शिक्षण थांबल्यामुळे चिडचिड होत होती आणि नकळत त्याचा प्रभाव तिच्या संसारावर पडत होता.नवरा स्वभावाने खूप कडक होता,त्याला मनवने म्हणजे खूप मुश्किल काम होते,जास्त माग लागले तर दोन कानाखाली देण्याचा आणि शिव्या तर एवढ्या देयचा की कानातून धूर निघाल्यासारखं वाटायचं.
तितली माहेरी काही सांगू शकत नव्हती,अजून त्यांना त्रास नको आणि त्याची आवड मुलाची चुकलीये अस त्यांना वाटू नये म्हणून ती संयमाने घेत होती,तसा तिचा खूप जीव होता तिच्या नवऱ्यावर आणि नवऱ्याचा पण तिच्यावर,पण त्याला तिने शिकावं अस अजिबात वाटत नव्हते. ती फक्त त्यांच्यासाठीच हजर असावी अस त्याला वाटायचे.
तितलीची शिकण्याची तळमळ त्याला कळत नव्हती आणि तितली ते पटवून देऊ शकत नव्हती. मनात सगळं दाबून दाबून तितली घाबरत जगत होती ,आता ती हळू हळू डिप्रेशन मध्ये जायला लागली,जगण्याची ईच्छा च नाही राहिली आणि त्याच वेळी तितलीच्या पोटात एक जीव वाढत होता,त्याची नुकतीच चाहूल लागली होती,नवीन बाळाच्या विचाराने कधी कधी मनातले विचार जायचे,करिअर चे पण,थोड्या वेळापूरते.आपण काही तरी करावं सारख तिला वाटत असायचे आणि शिकावं आपण काही तरी. म्हणून ती सारखी नवीन नवीन गोष्टी अजमवायला लागली,स्वयंपाक चांगला शिकली,लोकरीच्या टोप्या,छोट्या फ्रॉकी शिकली.
तितलीचे शिकणं कधीच थांबवले नाही,काही ना काही शिकत राहिली आणि कधी तरी आपली वेळ येईल,सगळ्यांसाठी केल्याची कधी तरी परतफेड होईल म्हणून ती तिचे काम अगदी प्रामाणिकपणे करत होती.
नवरा एखाद्या गोष्टीला नाही म्हणला की त्या गोष्टीला पूर्णविराम बसायचा,पुढे सगळं बंद लगेच तितली नवीन काही तरी करायची आणि मन शिकत राहत होते.कधी पुस्तके वाचायची तर कधी पेपर ची एक ना एक ओळ.
असच चालू होते,म्हणावं तस,सासरच्या लोकांनी तिला कधी आपले मानलच नाही,सून फक्त सून च राहिली,मुलीची कर्तव्य पार पाडून पण कधीच मुलगी झालीच नाही.नवऱ्याची जगातील भारी बायको झाली पण हट्ट करणारी प्रेयसी कधीच होऊ नाही शकली.
तिच्या मुलांची मात्र सुपरमॉम होती ती,आणि जर सगळ्यात जास्त जीव जर कोणी लावला असेल तर तिच्या मुलांनीच.जगण्याला बळ त्यांनीच दिले.
मुलांसोबत तितली पण वाढत होती,विस्कटलेली नाती सरळ करत होती,पण स्वतः मात्र कवढीभर पण इज्जत नाही कमवू शकली.
तिच्या मनातून आता भीती निर्माण झाली होती,उद्या आपल्याच मुलांनी पण आपल्याला अस केलं तर,काय राहिले मग.
काय होतीस तू तितली,कुठं डोळ्यात स्वप्न होती तर आता भीती आहे.
असलं जगणं न जगण्याबरोबरच होते,जगून काय होणार,त्यापेक्षा न जगलेले बरं नाही का? विचार डोकं खात होते,मन रोज मरत होते.
बाहेरच्या जगाला अस वाटायचं की तितलीचे सगळं भारी आहे,तिच्याजवळ सगळं महागाईचे आहे,ब्रँडचे आहे,भारी घड्याळ,भारी फोन,सगळ्यात महागाईच्या साड्या,तेवढेच मॅचिंगची दागिने,सगळ होते तिच्याजवळ ,जे खूप काही करून पण पाहायला पण मिळत नाही,या सगळ्याची तिला खरच काही किंमत नव्हती,तिला अस वाटत होते की ते सगळं नसते तरी तिला चालले असते पण स्वत:साठी काही तरी कराव अस तिला नेहमी वाटत होते.
बाहेरच्या जगाच्या तुलनेने सगळ्यात नशीबवान होती ती पण आतून अगदीच तुटली होती ती.
पण खर सांगायचे तर ती स्वत: साठी तरी कुठे काय करत होती,फक्त रडत आणि मनातल्या मनात ठरवत होती,मनातले कधीच बोलून दाखविले नाही,त्यामुळे कोणाला कळाले नाही आणि मन तसच कुढत राहिले.
त्यादिवशी त्यांच्या घरात खूप कडाक्याच भांडण झाले आणि तितलीवर खूप मोठा आरोप घेतला गेला आणि तिचे म्हणणं ही ऐकुन घेण्याचे कोणी जरूरी नाही समजले,तिच्यावर नको ते आरोप झाले आणि तितली वाईट झाली.
तितली खूप एकटी पडली,तिने आत्महत्या करण्याचा पण प्रयत्न केला पण ती वाचली.तितली आता खरच तुटली होती,लग्न संपवण्याचा विचार तिच्या डोक्यात येत होता पण मुलांचे काय,त्यांची काय चूक ,तिच्या लक्षात आले होते की तिच्या तीन मुलांना सांभाळण्याची पण औकात तिची नाही.तिच्याकडे स्वत:चे अस काहीच नाही. एक रुपया पण नाही,सगळ संपल्यात जमा होते.
ज्यांना आपले मानात तिने आयुष्यातील लग्नानंतरची पंधरा वर्ष घालवली होती,त्याच लोकांनी तिला एका सेकंदामध्ये झटकून दिले होते,ज्यांनी जन्म दिला त्यांनी पण हात वर केले,पण शेवटी परत मुले राहिलीच होती,ज्यांच्यासाठी त्यांची आई म्हणजे त्यांचे विश्व होते.त्यांच्याकडे पाहून तितली सावरली.
आता मात्र तितलीवर कोणतेच ओझे नव्हते,कुठल्या अपेक्षा नव्हती आणि नाही संसाराची स्वप्न.तितलीचे मन शांत झाले होते,पण तरी सुद्धा तितली त्याच लोकांच्यात राहून जगत होती,स्वत: साठी आपल्या मुलांसाठी जगत होती.पण तितली आता पूर्ण तुटली होती आणि ज्या प्रकारे तिची जखम भरत होती ती फारच वेगळ्या प्रकारची चेतावणी देत होती.तिने आता ठरवले होते आता रोज जे काही करेन ते स्वत:साठी करेल. तितलीला जे आवडत होते ते करू लागली,लहान मुलांना शिकवायला लागली नुकतेच इंटरनेट चे युग आले होते त्याचा तिने पुरेपूर फायदा घेतला आणि मिळेन त्या वेळात मिळेन त्या विद्यार्थ्यांना ती शिकवू लागली,संस्कराचे धडे देऊ लागली,मुलांशी मोकळा संवाद करू लागली,लिहू लागली ,वाचू लागली याची भणक मात्र कोणालाच पडली नाही.
तितलीचे फुलपाखरू आता कोशातून बाहेर आले होते आणि उंच झेप घेण्यासाठी तयार झाले होते,कधीच न थांबता जगण्याचे कौशल्य शिकवत सगळ्यांना सांगत ते पुढे चालले होते आणि लाइफ स्किल नावच्या विषयाची मोठी कामगिरी बचावत होते.
सारांश :
तितलीने तिची जिद्द कायम नाही ठेवली कधी,आपल्या निर्णयावर कधी ठाम नाही राहिली.कधी वडील तर कधी नवरा यांच्याविचाराने स्वत:च्या स्वप्नांनासाठीच ती उभी नाही रहिली.स्वत: खुश राहू तर इतरांना खुश ठेवू हे खूप उशिरा समजली. तितलीचे आयुष्य खरच खूप छान होते पण तिचे विचार आणि मन एवढे चंचल होते की ती तेवढी हिम्मत नाही ठेवू शकली,स्वप्नांसाठी लढण्याची, स्वत:ला औकातिच्या बाहेर पाहण्याची,स्वत:ला अजमावण्याची.
तितली नावाचे फुलपाखरू थोडे उशिरा नक्कीच उडाले आपण परत मागच्या चुका न करता उडाले ते कधीच न थांबण्यासाठी.
“स्वप्न पाहण्याची जेवढी आपण हिम्मत ठेवतो ना,तेवढीच हिम्मत ती पूर्ण करताना ठेवायची असते आणि वेळ आल्यावर ती दाखवायची असते.”
Copyrights : Inspire In Marathi.
(लेखनाबद्दल काही तक्रार असेल तर डायरेक्ट लेखकाशी संपर्क साधावा,काही साम्य आढळले तर निव्वळ योगायोग समजावा .)
(तितली नावाची मुलगी,तिने पाहिलेले स्वप्न आणि पूर्ण न करता आल्यामुळे झालेली धडपड …. तसेच परत नव्याने उभारून वयाच्या 30 व्या वर्षी नवीन संघर्ष चालू केला तो स्वत: साठी जगण्याचा … ओळख घडवण्याचा…)
समाप्त..