मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

ललित लेख

निसर्गा, तू जिंकलास रे..

निसर्गा तू जिंकलास रे…...

“निसर्गा, तू जिंकलास रे,आता तुझ वागणे खरच सहन होईना झालय बघ. तुझ्या प्रकोपाने होत्याच नव्हते झालाय आणि तू पुन्हा आम्हाला दाखवून दिलेस की निसरगापुढे पुन्हा मानावा तू शून्य आहे. त्याचे रौद्र रूप पाहण्याचे आणि ते सहन करण्याची ताकद आपल्यात नाही. हे आता आपल्या चांगल्याच लक्षात आले असेल.निसर्गासोबत जगण्यात त्याची काळजी घेण्यात ,तो साथ देतोय म्हणून आपण एवढी प्रगती करू शकतोय हे आपण मनाशी पक्की घाठ्च बांधायला पाहिजे. कराण त्याचा विधवंस म्हणजे जे आहे ते पण गमवल्यासारखे आहे, आणि त्याची पुन:उभारणी करणे खूप जिकिरचे काम आहे. निसर्गाला सोबत घेऊन त्याच्या सोबत आपण आपला विकास करुयात.

2019 ल झालेले सांगली चे महापूर आणि परत या वर्षी तलीये मधील दरड कोसळणे असो. हे होतय कारण याला सर्वस्वी आपण जबाबदार आहोत का? तर सगळेच म्हणतील आमचा काय संबध, आम्ही थोडी गेलो होतो तेथे, दरड कोसळावी म्हणून! अति नुकसान झालेल्या लोकांच्या मनात घर करून राहते ती, ज्यांनी त्यांचं खरच सगळे गमवले दुख त्याच फक्त त्यांनाच माहीते. ते दिवस ,ते क्षण, स्वतचे अस्तिव, त्यांचे जग असतो वो ते. त्यामुळे म्हण आहे आपल्याकडे” ज्याचं जळत त्यालाच कळत.” आणि आपण बघे असतो फक्त. पुन्हा सुरवात होते, याला कारणीभूत कोण? राजकीय क्षेत्र की तेथील बांधकाम व्यवसाय का तेथील च ग्रामीण लोक , का मी स्वत:??

जसे दिवस जातील,तसे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग पण भेटतात. माणुसकीच्या नात्याने मदतीचा ओघ पण येतात. सरकारी मदत म्हणा किंवा नातेवाईक , मित्रपरिवार असो, ज्याच्या जवळ जे आहे मदत करण्यासारखे ते आपल्या परस्थीतीने मदत करत असतात. एक रुपयाची केलेली मदत ही सुद्धा ही तेवढीच अनमोल वाटते कारण वेळेचं तशी असते.

आयुष्याचे सार कळायला लागतो,आपण केलेल्या चांगल्या कामांची जणू आपण परतफेड च मिळवत असतो. हळू हळू आता सगळे पाहिल्यासारखे करू या जोष मध्ये नवीन सुरवात तर केलेली असते पण आपण मागे जी चुका केल्यात त्याच तर करत नाही याचा थोडासा फेरविचार तर आपण करायला विसरलो नाही ना?

आपले अतिक्रमण झाले होते ना निसर्गावर म्हणून तर ही वेळ आली होती आपल्यावर,हे विसरून नाही जमणार ना! नुकसान आपले झालाय मग आपण काय करू शकतो आपल्या प्राथमिक पातळीवर याचा विचार करायला पाहिजे. मी स्वत: , माझी जबाबदारी, म्हणून मी काय करू शकतो याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. थोडे पुढे जावून तोच आपण आपल्या वस्ती, गाव,जिल्हा ई. क्षेत्रांनुसार विचार करून निर्णय घेऊ शकतो. या गोष्टीमद्धे किती जण सहकार्य करतील, याचा विचार न करता ,जेवढे सोबत येतील तेवढ्यांना घेऊन चुका बरोबर करून, निसर्गाला सोबत घेऊन जायचे आहे.

प्रत्येकाला आपली Privacy हवी असते, घरात चार माणसे जरी असले तरी प्रत्येकाला आपली जागा, आपली Privacy पाहिजे असते. मग निसर्गाची Privacy मध्ये हस्तांतर करण्याचा तर मुळीच अधिकार आपल्याला नाही. निसर्गाला बोलता येत नाही म्हणून तो आपल्याला वेळेवर आडवत नाही, पण एखाद्यादिवशी अस, काही करतो की मग आपल्याला आठवत जरा जास्तच अति झालेय आता! पण वेळ निघून गेल्यावर काही अर्थ नाही राहत त्या सगळ्या शहाणपणाला.

सांगायचे एवढेच की आपल्याकडे काही Reserved Forest Area आहेत. त्यांची नियमावली चे काटेकोर पालन आपण करू शकतो. नद्यांचे पण स्वत:चे पात्र आहे,त्याची पण नियमावली वेगळी आहे. डोंगर, उंच उंच दिसणारे टेकड्या ,त्यांच्यावरती लावलेली झाडे,किंवा तेथील जैवविवीधता जपायला पाहिजे. त्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. ते आपल्याजवळ आहे म्हणून आपल्याला त्याचा अभिमान असायला पाहिजे,साधा विचार करा आपण एक आंब्याचे झाड लावले तर साधारण 3-5 वर्षे आरामात लगातात,मग आंबा खायला भेटतो. मग तसेच आहे, एका झाडाला एवढा कालावधी लागतो तर ही सगळी निसर्गाची धनदौलत कमवायला तर आपल्या पुढच्या किती तरी पिढ्या जाव्या लागतील. त्यामुळे जे आहे ते खूप मौल्यवान आहे,त्याची खरच संरक्षण करणे ही माझी,तुमची,आपल्या सगळ्यांनाची च पहिली जबाबदारी आहे.

COVID-19, कोरोना मध्ये तर सगळ्यांनाच समजले आहे की शहर फक्त प्रगतीची साधन असू शकतात पण,खरच जगायचे असेल तर असल्या महामारी मध्ये सगळ्यांजवळच गावी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. हे सगळ्यांनी अनुभवले आहे,फक्त गरज आहे ती अनुभुवातून काही तरी नवीन शिकण्याची आणि खर्‍या अर्थाने आपली निसर्गबद्दलची जबाबदारी घेण्याची!

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: