ब्रेकअप-प्रेमाचा नवा स्टार्टअप भाग#1
💕भाग # 1 💕
“काय करतेस” अभिमन्यू..
“काही नाही,असच” अक्षरा.
“सांगशील का नेमकं काय चालयं ते” अभिमन्यू.
“आपले जुने दिवस आठवतेय,म्हणजे बघ ना कसे होते ना ते दिवस” अक्षरा…
“नको…. अजिबात नको… या वयात मला ते अजिबात झेपणार नाही” अभिमन्यू….
तेवढ्यात जोरात आवाज येतो…
अक्षरा आणि अभिमन्यू पळतच जातात बेडरूम कडे…
“ओह,माय गॉड,लागल का तुला??”अक्षरा..
“अरे ,काय हा वेडेपणा तुला कळतं का?? अभिमन्यू..
तस अक्षरा थोडं पापण्या मिटतच अभि कडे पाहते..
“फस्टेड बॉक्स घेऊन येतो का,अभि” अक्षरा…
“हो ,आलोच” अभि.
“तुला खूप त्रास होतोय ना,कळतंय मला,मी तुला हे नाही विचारणार की काय त्रास होतोय तुला आणि कशाने,” अक्षरा….
“हे घे,मला हे सगळं पाहवल जात नाही ये,मी बाहेर थांबतो,आणि त्याच्यासाठी हळद दूध बनवून घेऊन येतो” अभि.
“थोडा त्रास होईल,काच बाहेर काढावी लागेल ना,मला.. तू पाहत रहा पण या काचेकडे बघ ना एवढी हिची हिंमत डायरेक्ट हातात घुसली आणि मी एवढ्या रेसिपी शिकून,नवीन नवीन डिश बनवून अन्नाचं रूपांतर उर्जे मध्ये केलं आणि काही घटकांच रक्त झालं आणि ही कुठली ,कोणती काच हातात काय घुसते आणि रक्त काढून एवढी सगळी मेहनत वाया घालवते…..” अक्षरा बोलत बोलत हळूच काच काढते पण आणि बँडेज करून पण टाकते..
त्याला समजायच्या आत, आई काय बोलतेय याचा तो अजून विचारच करत होता..
आई कडे पाहत होता.. आईच्या भावना… आणि समजावण्याची पद्धत….
“आणि हो ,कोणाची मजाल नाही ,माझ्या मुलाच्या….” अक्षरा बोलत असते आणि मधेच…
“की आईने खाऊ घातलेल्या एवढ्या रेसिपी शिकून,नवीन नवीन डिश बनवून अन्नाचं रूपांतर उर्जे मध्ये केलं आणि काही घटकांच रक्त झालं आणि ही कुठली ,कोणती काच हातात काय घुसते आणि रक्त काढून एवढी सगळी मेहनत वाया घालवते…..असं मुळीच नाही होणार.. आय एम सॉरी” अधिराज म्हणाला…
अक्षराने मिठी मारली…एवढ्या वेळ थांबवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली..
“हे ना आई मला शिकवं ना,सगळ्या गोष्टी तुझ्या सारख सगळं हसत पचवायला” अधिराज बोलत असतो त्यात अभिमन्यू आत येतो..
“आज काय भलतंच वार घरात शिरलंय का?? “अभिमन्यू..
“हो ,मग प्रेमाचा महिना जो चालू आहे ना…वार अंगात शिरणार ना आणि अंगात येऊन नाचणार पण ना…” अक्षरा म्हणते..
अभिच्या हातातली ग्लास खाली ठेवत,अभिच्या आणि अधिराजच्या हाताला धरून मस्त गणपती नाच करते…
“अंगात भरलंय वारं ही पिरतीची बाधा झाली
आता अधीर झालोया, बघ बधिर झालोया
आन तुझ्याचसाठी बनून मजनू मागं आलुया
उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट, रंगात आलंया
झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट”
“अग, बास तुला खरच भूतकाळाने झपाटले आहे का” अभि..
“म्हणजे डॅडा”अधिराज..
“आज नको ,आज मला सुट्टी आहे ना मग आपण बाहेर जाऊयात” अभि.
“नको,मस्त प्रेमाच्या गप्पा मारुयात” अक्षरा…
“प्रेमाच्या गप्पा,” अधिराज थोडं गंभीर होतच म्हणाला..
“आई आता आपल्याला काही विचारणार नाही ना ,या सगळ्या मागचं कारण आणि तिच्याविषयी..मी आईला अजून काहीच सांगितलं नाही… काय सांगू तिला खोट तरी कस सांगू तिला,देवा वाचावं” अधिराज मनातल्या मनात विचार करत होता,अगदी चेहऱ्यावर गंभीर दिसत होते एवढा विचारात गढून गेला होता…..
अक्षरा त्याचा चेहरा वाचत असते,तेवढ्यात…
“अरे,हे दूध हे पिऊन तुझ्यासाठी आणलं आहे,थंड होईल आणि थोडं बरं वाटेल” अभि..
“हा”अधिराज…
“अधिराज,मग काय करायचं तू सांग बाहेर जायचं का मस्त प्रेमाच्या गप्पाची मैफिल सजवायची” अक्षरा…
“नाही नको,बाहेर जाऊयात” अधिराज…
अक्षरा हसतच बेडरूम च्या बाहेर पडते…
अभि थोडा वेळ अधिराज सोबत घालवतो..
अक्षरा गॅलरी मध्ये जाते आणि विचार करत राहते….
“हीच योग्य वेळ आहे ,त्याच्याशी बोलायची,तो विषय काढेल की नाही माहीत नाही ,मी पण तर त्याच्या वयाची असताना हा विषय टाळतच असायचे ना,नको वाटायचे आई-बाबा सोबत बोलायला,अभिमन्यू सोबत बोलून पाहावं आणि अधिराज सोबत बोलून घ्यावं”अक्षरा च्या डोक्यात विचार चालू होते…
तेवढ्यात..
“आवरायला घ्या,मॅडम बाहेर जाऊयात आणि हो पटकन आवरायचं पण” अभिमन्यू म्हणतो..
तोच अक्षरा अभिचा हात धरते …
“आज आपण त्याच्याशी बोलायला पाहिजे ,तुला काय वाट्ते,तो माझा मुलगा आहे ,नाही सांगणार तो आपल्याला काही स्वतःहून” अक्षरा गंभीर होऊन बोलते…
“अग, पण घाई नाही का होत आणि कसं बोलायचं” अभि..
“मी बोलते तू पण फक्त बस आणि शांत बसून ऐकून घे” अक्षरा…
“बर बाई,तू म्हणशील अगदी तसंच” अभि…
तेवढ्यात अधिराज येतो…
“मला नाही जायचं बाहेर,प्लिज” अक्षरा मुद्दाम नाटक करत अभिचा हात पकडत…
“ठीक आहे ना,आई तू नसेल तुझी इच्छा तर आपण इथेच बसूयात” अधिराज आईला पाहून म्हणतो..
“माझं ते गुणांचं लेकरू”अक्षरा अभिला मिठी मारते..
आणि सुरू होते अक्षरा -अभिमन्यू ची स्टोरी आणि अधिराजच्या बैचेन मनाची सगळे प्रश्न आई कशी सोडवते ते,पाहण्याची ही वेळ…
क्रमशः