ब्रेकअप- प्रेमाचा नवा स्टार्टअप भाग #२
💕भाग # 2 💕
“तुमच्या मायालेकराच प्रेम पाहिलं ना ,की छान वाटतं” अभिमन्यू म्हणाला….
“तुम्ही पण या”अधिराज..
सगळ्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारतात…
“आई ,मी तुझ्या आवडीची कॉफी बनवतो “अभिराज म्हणाला..
“आणि मी स्नॅक्स मागवतो”अभि…
“ठीक आहे,मी आपल्या मैफिलीची तयारी करते,बसण्याची व्यवस्था पाहते” अक्षरा…
संध्याकाळची वेळ असते,दिवसभर उन्हाने तापून निघालेली जमीन आणि शांतपणे उभी असलेली हळुवारपणे डुलणारी झाडे.. नुकतंच बगीचा मध्ये पाणी मारलेले असते त्यामुळे येणारी थंड हवेची झुळूक..सगळं कसं छान वाटत होते…
मन पण गुलाबी गुलाबी होत होते…
बसायची छान व्यवस्था केली होती अक्षराने…
“झालं का आई,आय अम रेडी विथ कॉफी” अधिराज येतो..
त्याच्या मागून लगेच अभिमन्यू पण मोबाईल मध्ये पाहत येतो…
“सॉरी, धिस इज नॉट अलाऊड”अक्षरा अभिच्या हातातली मोबाईल काढून घेते आणि म्हणते…
अक्षराच्या हातात एक छोटा बाउल असतो,त्यामध्ये तिने तिचा फोन ठेवला असतो आणि त्यामध्ये अभिचा पण ठेवते आणि अधिराज ला पण ठेवायला सांगते….
“चल आता तू पण” अक्षरा अधिराज कडे पाहून म्हणते..
सगळे निवांत बसतात,गप्पाची मैफिल जमते..
“वातावरण छान आहे ना” अक्षरा…
“हो ना,तुझ्या आवडीचा महिना काय ग” अभि..
“हो ना,मला हा महिना खुप आवडायचा, अगदी पहिल्या पासून,थंडी जात असते आणि नुकतीच उन्हाळ्याची चाहूल लागते” अक्षरा…
“तुला सांगू का अधिराज,जेव्हा सकाळी प्रॅक्टिकल असायचे ना तेव्हा,जाड-जुड जर्किन घालून येत असायची आणि मग नंतर दुपारी त्याच ओझं होयच ना मग मात्र माझ्याकडे द्यायची ,मला सगळीकडे फिरवत बसायला लागायचं,आणि सगळ्यांचे टोमणे पण” अभि सांगत होता..
“हा,मग काय झालं ” अक्षरा..
“आई,पहिल्यापासूनच अशी आहे का?? म्हणजे आता जशी आहे तशीच”?? अधिराज..
“नाही रे बाबा,याच्या पेक्षा महा त्रासदायक होती,आता वयाच्या मानाने शांत आली आहे”अभि
“हो का,काही पण, वय असते ते होत असे सगळ्यांच च,हो ना अधिराज” अक्षरा अधिराज कडे पाहत म्हणते..
“म्हणजे” अधिराज गंभीरपणे पाहत म्हणाला…
“तुला सांगू का,अधिराज” अभिमन्यू विषय अधिराजच्या प्रॉब्लेम कडे वळवत म्हणाला..
“ही ना, खूप वेगळीच होती, म्हणजे ना,सगळ्या मुलींपेक्षा अशी वेगळी” अभि..
“आता पण माझी आई आहेच खरं वेगळी,मला पण तिच्यासारखं बनावस वाटतं” अधिराज.
“माझं गोड पिल्लू,माझा मुलगा आहेस तू म्हणल्यावर बनणार ना माझ्यासारखाच,मी पण अशीच होते रे तुझ्या वयात” अक्षरा अधिराजचा हात हातात घेत म्हणाली..
अधिराज आता कुठे थोडा शांत होत आला होता…
अधिराज ने त्याच्या मनातील बोलावं एवढीच अपेक्षा होती तिची एवढंच…
मनात कुढुन बसण्यात काही अर्थ नव्हता,शेवटी आई-बाबा झालं की आपल्या मुलांपेक्षा काही महत्त्वाच नसते…
“तुला सांगू का,हेच ते वय असते जिथं स्वतःला सिद्ध करायचं असते आणि हेच ते वय असते जिथं स्वतःच्या बरोबरीने चालणाऱ्या जोडीदाराला थांबवायचं असतं, पण जबाबदारी च भान ठेवून” अभि बोलला…
“झालं,बापाने लगेच बापासारखं होण्यापेक्षा मित्र च का नाही राहावं” अक्षरा अभिला म्हणाली..
“हो,मॅडम पण बाप आहे ना जशी तू मैत्रीण असून पण आई आहेस ना तसाच” अभि..
“माझ्या अशा वागण्याने दोघे पण खुप काळजीत आहेत पण मी सांगण्याची वाट पाहत आहेत,मी सांगू तरी कसं यांना,माझं प्रेम आहे तिच्यावर हे तिलाच अजून पटत नाही मग मी कसं,म्हणे ब्रेक अप करून पार्टी करतेय सगळ्यांसोबत ते पण माझ्याच ग्रुपसोबत,याला प्रेम नाही म्हणता येणार ना”अधिराज स्वतःच्याच विचारात जातो..
अक्षरा आणि अभि आता त्यांना समजत होते ,आता विषयाला हात घालायला काहीच हरकत नाही…
त्यांना अस वाटायला लागलं होतं की ,कधी पण अधिराज बोलायला लागेल…
पण…
उलटंच होऊन बसलं..
“मी जाऊ का,मला थोडी रेस्ट हवी आहे” अधिराज अगदीच हताश मूड ने म्हणतो…
“ठीक आहे,” अक्षरा त्याला बळजबरी नव्हती करणार..
अक्षरा कितीही केलं तरी आईची काळजी, चलबिचल तर होणारच..
अक्षराच्या चेहरयावर ते दिसत होते,अभि ने ते पटकन टिपलं…
“का रे,झोप लागणार आहे का तुला?? थोडं बस गप्पा मार मग थोडं मोकळं वाटेल, जेवढं दाबून ठेवशील तेवढ्याच मोठ्या वेगाने ते बाहेर पडेल ,अगदी ज्वालामुखीच्या उद्रेका सारख,जस अक्षराने केमिस्ट्री लॅब मध्ये केलं होतं ,मला भेटण्यासाठी” अभिमन्यू ने वातावरण मोकळं करण्यासाठी जुनी आठवण काढली…
“काय सांगता बाबा” अधिराज..
“हो,एक नंबरची हुशार आणि तेवढीच टपोरी होती तुझी आई,मला तर काही कळायचं नाही हीच,भीतीच वाटायची मला,जगावेगळी तुझी आई” अभिमन्यू..
“म्हणून जगात भारी,माझी आई” अधिराज…
“सांग ना मला अजून, माझ्या जन्माची स्टोरी” अधिराज…
“तू पण लागला की आई सारख बोलायला”अभि..
अक्षरा पण हसायला लागली….
“हो,सांगणार ना,खूप डिप नाही ,पण सांगतो ,तस आमची स्टोरी,खूप काही वर्षांची नाही..दोनच वर्ष आणि परत दिड वर्ष काहीच बोलणं नाही आणि परत चक्क लग्न च केलं आम्ही” अभिमन्यू सांगत होता…
“मला थोडी कल्पना आहे तुमच्या लग्नाची ,आजी कडून ऐकलं होतं, पण आजी म्हणत होती की तुमचं अरेंज मॅरेज आहे म्हणून ,मामा म्हणाला घरात कोणाला माहीत नाही अजून लव मॅरेज आहे तुमचं म्हणून” अधिराज म्हणाला….
“तीच तर गंमत आहे,जी तुला पण माहीत असावी” अक्षरा म्हणते…
“तीच तर गंमत आहे,जी तुला पण माहीत असावी” अक्षरा म्हणते…
“मग सांगा ना,मला मी नाही कोणाला सांगणार आता” अधिराज म्हणाला..
“आणि सांगितलं तर” अक्षरा आणि अभि दोघे हसत म्हणतात …
“काय होणार तेव्हा”अधिराज पण हसतो…
क्रमशः