ब्रेकअप-प्रेमाचा नवा स्टार्टअप भाग# 3
💕भाग#३💕
“तुझी आई माझ्या पेक्षा तशी दोन वर्षांनी लहानच,त्यादिवशी मी लॅब मध्ये होतो, माझं प्रोजेक्ट चालू होते आणि मला काही केल्या रिझल्ट मिळत नव्हता म्हणून मी पूर्ण जीव ओतून काम करत होतो, तेवढ्यात लॅब च्या दरवाज्यात मला आवाज आला…’प्लिज मॅम,तुम्ही साइन नाही केली तर इंटर्नलचे मार्क्स नाही मिळणार मला….त्यादिवशी खरंच घरी प्रॉब्लेम होता म्हणून मी येऊ नाही शकले पण तुम्ही चेक करा ना आता,हवं तर मी परत प्रॅक्टिकल करून दाखवते’ एवढं कोण आहे ते पण मोरे मॅडम ला विनवण्या करत आहे म्हणून मी सहज पाहिलं.. ‘सुंदर गुलाबी टॉप घातलेली,पेन्सिल बॉटम ची जीन्स,हातात जर्नल आणि केस मोकळे सोडलेले,मस्त दिसत होती ती” अभिमन्यू सांगत होता.
“माझं काही लक्ष नव्हतं पण मला जाणीव होती की कोणी तरी माझ्याकडे पाहतय म्हणून,मी हळूच पाहण्याचा प्रयत्न केला पण मॅडम समोर होत्या ना म्हणून मग नाही पाहिलं मी” अक्षरा ने सांगितलं…
“म्हणजे आईने अजून पहिलच नाही का तुम्हाला” अधिराज म्हणाला…
“तेव्हाच नाही,पुढचे सात दिवस ती कोणत्या क्लासला आहे हे मला समजलेच नाही ,एवढंच नाही परत ती मला दिसलीच नाही,कुठेच” अभिमन्यू म्हणाला..
“माझ्या तर काही डोक्यातच नव्हतं, कोणी मला पाहण्यासाठी एवढं आतुर आहे म्हणून” अक्षरा …
“साधारणतः सात दिवसानंतर माझं प्रॅक्टिकल संपल्यावर मी तिथेच बाहेर ,पलीकडे क्लास रूमच्या बाहेर बसलो होतो म्हणजे सगळेच आम्ही,तेव्हा पण मी आधीच दमून गेलो होतो प्रॅक्टिकल मुळे आणि पुन्हा तोच आवाज….’सर,माझ्या फ्रेंड आल्या नाहीत म्हणून मी पण नाही आले कॉलेजला ,मी कशी येणार ना,एकटी खरंच सांगतेय मी सर, परत तीच मुलगी…अप्रतिम… सर हसत होते तिच्या निरागस पणावर…सगळा क्लास पाहत होता तिच्याकडे…. परत ती बोलते..’सर,मला खोट नाही बोलता येत,दुसर काही कारण असते तर मी सांगितलं असते पण त्यादिवशी ह्या चौघी नाही आल्या मग मी कसं येणार ना’ सर परत हसले…’ बसा खाली ,बसा’…. थोडं हुश्श करत तिने दरवाज्यातून बाहेर पाहिलं आणि बाहेर मी तिच्याकडे एकटक पाहत होतो…माझ्या पण चेहऱ्यावर स्मित हास्य होते ,ते पाहून ती पण हसली…. जणू काही आमची ओळखच आहे म्हणून” अभिमन्यू सांगत होता….
“हो ना,म्हणजे माझ्या मनात काही नव्हतं,समोरचा हसला की हसायचं आपण पण ,स्माईल कुठे विकत आणावी लागते म्हणून हसले ,अस काही फिलिंगस नव्हत्या.. आणि त्या दिवशी क्लास मध्ये सगळेच माझ्यावर हसत होते ना,म्हणून मग त्याला पण समजलं असेल म्हणून हसत असेल तो म्हणून मी पण हसले,एवढंच…” अक्षरा…..
” त्या नंतर,मला एवढं तर समजलं होते की ,तिचा तो क्लास आहे,आता जेव्हा पण वेळ भेटायचा तेव्हा मी तिच्या क्लास समोर जाऊन बसायचो,तिला रोज पाहायचो…तिचा गोंधळ…कधी बेंच वर उभ राहून मस्ती करताना..तर कधी जोक्स करताना…. भारी वाटायचं मला तिच्याकडे पाहिलं की…आणि तुला सांगू जेव्हा पण मी स्माईल केली ना की लगेच ती पण स्माईल रिटर्न द्यायची मला….तिच्या स्माईल ची जादू अजून पण आहेच ना माझ्यावर….” अभिमन्यू म्हणाला…
“मला माहित नव्हतं ,की हा का हसतोय ते..माझ्या मैत्रिणींना मी सांगून टाकले पण तुझे बाबा शांत व्यक्तिमत्वाचे त्यामुळे काय पुढे होईल म्हणून वाटत नव्हतं…आणि मला सिनिअर असल्यामुळे माझ्या मनात त्यांच्या बद्दल आदरच होता ,आता पण आहेच की” अक्षरा…
“तिच्याशी बोलावं आणि नंबर घ्यावा तिच्याकडुन, म्हणजे कळेन एवढ्या सुंदर मुलीच्या आयुष्यात आहे की काय अजून कोणी म्हणून,माझ्या प्रोजेक्ट कडे दुर्लक्ष झाले होते आणि सगळा फोकस आता तुझ्या आईकडे होता…फक्त आई….नाव माहीत नव्हतं…. मग लक्षात आलं,तिचे जरनल आमच्या लॅब ला आहे..तिथे मिळून जाईल नाव तीच..पण एवढ्या सगळ्यात तीच नाव कुठे शोधायचं…म्हणून मी सगळे जरनल पाहिले,एक सुंदर अगदी टॉप टीप अक्षर असलेले स्वच्छ ,सुंदर जर्नल पाहिलं..त्यावर नाव होते..’अक्षरा प्रदीप पाटील”.. हीच ती…मनं सांगत होते मला..फक्त आता खात्री करायची होती…”
“छान आहे तुमची सुरवात,घाई नव्हती झाली का तुम्हाला आई बद्दल अजून जाणून घेण्याची” अधिराज म्हणाला..
“अजिबात नाही,मी फक्त मला प्रेयसी नव्हतो शोधत आयुष्यभराचा जोडीदार पाहत होतो ना..” अभिमन्यू म्हणाला….
“म्हणजे तुला समजलं होते का की,हीच परफेक्ट लाईफ पार्टनर आहे म्हणून”अधिराज खूप कुतूहलतेने विचारतो…
“म्हणजे तस नाही अजून मला तिला जाणून घेयचं होते ,तिचा स्वभाव ,तिच्या आवडी निवडी मग मी ठरवणार होतो,म्हणजे आधी मी मैत्री करणार होतो,जर चांगली मैत्रीण झाली तर मग पुढे जाऊयात,अस मनोमन चालू होते,माझ्या मनात..” अभिमन्यू बोलला..
“मला त्याच्या स्माइल मध्ये आधार वाटायचा,म्हणजे फिलिंगस काही नव्हत्या,खास पण सिनिअर असल्यामुळे खूप सारा आदर होता ना!!”अक्षरा म्हणाली..
“पण तुम्ही बोलला कधी???” अधिराज…
“त्यादिवशी मला मॅडम ने यांच्या लॅब मधून जर्नल आणायला लावले होते.. म्हणून मी खाली गेले होते….यांची लॅब मोठी होती म्हणून त्याला सहा दरवाजे होते ते, पण दोन्ही बाजूने,मी पहिल्या दरवाज्यातून आत आले तर,अभि समोर होता,”अक्षरा बोलत होती तेवढ्यात..
“मला पाहून थोडी लाजली आणि माघारी गेली आणि दुसरया दरवज्यातून आता आले,ते तिथे पण मीच होतो.. मग मी मात्र हिला थांबवल, काय झालं??काय हवंय???” अभि…
“आमचे जर्नल हवेत,मॅडम ने सांगितले आहेत…अस मी म्हणाले..” अक्षरा..
जर्नल हातात घेऊन तेवढ्यात अभि आला..
“अक्षरा…छान आहे नाव पण आणि हँड रायटिंग पण… मस्त लिहिलं आहेस..मी म्हणालो तिला” अभिमन्यू..
“पण तेवढंच खराब केमिस्ट्री आहे माझं,जमतच नाही मला,” अक्षरा…
“मग ,डॅड ने शिकवलं तुला” अधिराज…
“हो,मी म्हणलं..मी आहे ना,काही येत नाही ते ,कॉलेज नंतर सांगेल तुला?? मला पण तिच्याशी बोलायचं होते आणि मैत्री पण वाढवायची होती ना”.. अभिमन्यू म्हणाला..
“मला थोडं दडपणच आलं होतं की कस अनोळखी माणसाकडून शिकायचं म्हणून,पण मला थोडा बरा वाटला म्हणून मी ,हो म्हणून टाकलं..” अक्षरा…
“पण त्या दिवशी ती लॅब मध्ये आलीच नाही,कॉलेज सुटल्यावर मॅडम डायरेक्ट गायब ना” अभिमन्यू…
“म्हणजे माझ्या लक्षात होते पण लगेच कशाला मागे लागायचं म्हणून मी पेशन्स ठेवले,बघू आता उद्या तो काय म्हणतोय आणि त्यात मला नाव पण माहीत नव्हतं,मी माझ्या मैत्रिणी सोबत गेले मी घरी” अक्षरा…
“पण माझ्या स्वप्नात ती ,होती. तिच्यासोबत मला आवडत होते राहायला. तीच निरागस पण भलतेच भारी होत रे” अभिमन्यू..
“आता नाही का,मी तशी” अक्षरा म्हणाली….
“किती स्लो चालू ये तुमची लव्हस्टोरी,आम्ही आता पर्यंत लव यु म्हणून पण रिकाम झालो असतो” अधिराज भावनेच्या भारात म्हणून गेला..
“म्हणून तर ना,तुमचं ब्रेकअप पण तसेच फास्ट होते,त्याच हेच कारण आहे सगळ्यात म्हत्वाच,समजून घ्या एकमेकांना मग ठरावा ना,तुमचे सूर जुळतात का?? मन काय म्हणतंय, काय करतोय आपण, थोडं बघा स्वतःकडे” अक्षरा अधिराजचा हात हातात घेत म्हणते…
“हो ,आई नक्की,पण तुम्ही लग्नाच्या निर्णयापर्यंत कसं येता ते मला नक्की ऐकायचं आहे ” अधिराज…
“हो ,सगळं सांगणार आहे ,जो पर्यंत तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला आमच्या स्टोरी मधून समजत नाही,तोपर्यंत” अभिमन्यू म्हणाला…
“डॅडा”अधिराज थोडा लाजतच म्हणाला..
क्रमशः