मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

प्रेमकथा

ब्रेकअप-प्रेमाचा नवा स्टार्टअप 💕 भाग# ४💕

💕भाग# 4💕

“परत दोन दिवस ही मला दिसलीच नाही,क्लास मध्ये पण नव्हती” अभिमन्यू..

“मी कॉलेजला येत होते पण आमची कलासरूम बदलली होती ना,म्हणून भेट झाली नाही,माझ्या मनात ओढ होती भेटण्याची पण त्याच्याकडून म्हणावा तसा काहीच रिस्पॉन्स आला नाही म्हणून मग मी शांतच बसले” अक्षरा..

“हो,माझीच वाट पाहत बसायची,जेव्हा मी विचारेल तेव्हाच इतरवेळी मग फक्त फक्त शांत बसायची,मनातील काही बोलायची नाही… अगदी तुझ्या सारखी” अभिमन्यू..

“नाही बोलता येत सगळयांना मनातली,धाडस पण होत नाही आणि भीती पण राहते ना मनात” अधिराज गंभीर होत म्हणाला…

“हे खरं आहे,नव्हतं येत मला बोलायला सगळं,पण अभि ला चांगलं जमत होते माझ्या मनातील ओळखायला”अक्षरा..

“पण तुम्ही बोलला कसं” अधिराज पुन्हा स्टोरी ऐकण्यासाठी उत्सुक…

“दिसली ना,मला तिसऱ्या दिवशी ,लॅब च्या बाहेर…बुक होत हातात,पाहत होती ,तोंड पाडून ..’काय झालं,काही समजत नाही का,?? आणि कुठे गायब होतीस?? पहिला नंबर दे तुझा मला” अभिमन्यू..

“ही रिअकॅशन समजत नाही मला… आणि इथेच होते कलासरूम बदलली होती ना…आठवण येत होती का तुला??” अक्षरा..

“म्हणजे तस नाही,पण तू म्हणली होती ना म्हणून म्हणलं, मला आज हिचा नंबर पाहिजेच होता कसल्याही परिस्थिती मध्ये..म्हणून मग म्हणलं ,मोबाईल पाहू तुझा” अभिमन्यू..

“अस,म्हणत त्याने माझ्या हातातून फोन घेतला आणि त्याचा नंबर सेव पण केला आणि रिंग पण दिली… “अभिमन्यू” नाव आहे तर… छान आहेस” अक्षरा म्हणाली..

“आता सुरवात झाली होती आमची.. बोलायची आणि घट्ट मैत्रीची….” अभिमन्यू….

“म्हणजे तुम्ही एकमेकांना प्रपोज नाही केलं का??” अधिराज..

” लगेच नव्हतं करायचं आम्हला, दोघांच्या घरून लव रिलेशन ला विरोधच होणार होता म्हणून एकमेकांना वेळ घालवायला आवडत होते म्हणून आम्ही मैत्रीचं नाव ठेवलं..पण त्यात तेवढीच काळजी होती आणि परिपूर्ण प्रेम पण” अक्षरा म्हणाली..

“मला एवढं तर माहीत होते की मला तिच्यासोबत राहायला आवडत होते,वेळ कसा जात होत होता तेच समजायचं नाही,ती अगदी माझ्यावर हक्क दाखवायची, जेवणासाठी थांबायची..कधी कधी तर माझं प्रॅक्टिकल उशीर पर्यन्त चालू राहील ना,तर बेधडक आत यायची आणि बाय म्हणण्यासाठी, मला न भेटता कधीच घरी नाही गेली ती”अभिमन्यू..

“म्हणजे हो,एकमेकांसाठी च आहोत आपण..म्हणून सगळा जीव ओतून मी त्याच्यासोबतच नात जपत होते…लग्नाचा विचार दोघांनी नव्हता केला खास असा..कधी रोमान्स पण नाही किंवा कधी प्रेमाच्या गोष्टी पण नाही केल्या..”अक्षरा…

“हो,याकडे मी कटाक्षाने लक्ष दिले होते,अस मी तिला कधीच काही बोललो नाही पण मला खात्री होती की हिच्या आयुष्यात माझ्या शिवाय अजून दुसर कोणी येणार पण नाही आणि कोणी आलं तरी ही मला नक्की सांगेल”अभिमन्यू…

“हो,मी पण याच्यावर लक्ष ठेवले होते…मी त्याला छोट्यातील छोटी गोष्ट सांगत असायची.. आमचे चाटिंग चालूच असायचं…त्यामुळे आम्ही जेवढ जास्त बोलायचो ना तेव्हढ जास्त ओळखायचो एकमेकांना” अक्षरा…

“कधी तुम्ही कुठे बाहेर किंवा कधी आऊटिंगला नाही गेला का?? अधिराज म्हणाला..

“नाही रे,खास नाही अजून प्रपोज राहील होते ना,आणि मी प्रपोज करणार नाही हे मला चांगलं माहीत होते आणि अभि ला पण”अक्षरा अभिमन्यू कडे पाहत म्हणाली..

“तुला राग नाही आला का आईचा,प्रेम पण करत होती पण सांगत नव्हती तुला,बोलून दाखवत नव्हती म्हणून”अधीराज म्हणाला..

“राग येण्यासारखं काही नव्हतं रे,तिच्या वागण्यात प्रेम होते आणि जिथं खर प्रेम आहे ना ते कधी लांब राहूच शकत नाही,मी पण प्रपोज नाही केलं,लवकर…रोज उद्या उद्या म्हणून मी दोन वर्षे तिच्यासोबत मजेत जगलो…नाव नव्हतं नात्याला..पण दोघांच्या मनाने एकमेकांना स्वीकारलं होते..” अभिमन्यू…

“अरे,अस कस म्हणतोस तू डॅड, जर समजा आई ला दुसरंच कोणी प्रपोज केलं असते आणि तू काही बोलला नाही म्हणून आई त्याला हो म्हणाली असते म्हणजे आणि आई तुला भीती नाही वाटली का,की डॅड ला दुसर कोणी आवडलं तर” अधिराज आता टेंशन मध्ये येऊन दोघांना विचारात होता…

“हो,खूप वेळा मनात येत होते, कोणा मुलीसोबत बोलला तर टेन्शन यायचं पण खरे पणा लगेच समोर यायचा…तुझा डॅड लगेच सांगायचा किंवा मी पाहिलं असेल लांबून तर लगेच मला बोलवायचं आणि ओळख करून घ्यायचा.. मग मी अजूनच प्रेमात पडायचे” अक्षरा अगदी लाजतच म्हणाली..

“खूप प्रेम होतं का तुमच्यात म्हणजे आहेच ना आता पण,असं सगळ्यांना थोडी भेटते ना?” अधिराज…

“नाही ,अधिराज.. आमच्यात पण भांडण होयची मग तुझी आई लगेच मॅसेज करायची ब्रेक अप,मला तुझ्याशी नाही बोलायचं… आणि स्वतःला त्रास करून घ्यायची” अभिमन्यु..

“मग,पुढे” अधिराज.

“काही नाही अजून आम्ही कनफेस नव्हतं केलं ना की आमचं नात मैत्रीच्या पलीकडे आहे म्हणून म्हणजे प्रेम आहे आमच्यात,म्हणून माझी अजून चिडचिड होत असायची,पण घरी समजलं तर कधीच मान्य होणार नाही म्हणून मग मी पण शांत बसत होते,पण भीती आणि चीड चीड वाढत चालली होती अधांतरी नात आता राहू शकत नव्हतं कारण कॉलेजचे शेवटचे दोन महिने राहिले होते आणि त्यात परीक्षेचा कालावधी होता म्हणून अजून चीड चीड,मला समजत होते की आता बोलणं गरजेचे आहे नाहीतर अभ्यास पण नाही होणार” अक्षरा बोलत होती जणू ती ते क्षण नव्याने जगत होती…

“तिची अवस्था तीच माझी होती,ती जास्त हडबडी होती पण मी शांत विचारांचा होतो,तिला समजून घेत होतो म्हणून हा प्रोब्लेम मी सोडवायचा ठरवलं,फिल्मी नाही पण जमेल तर तिला प्रपोज करायचं ठरवलं”अभिमन्यू म्हणाला..

” अरे,वा म्हणजे केलं तर तुम्ही आई ला प्रपोज” अधीराज म्हणाला..

” हो ना,करणं गरजेचे होते,नाहीतर तुझी आई काही स्वतःहून बोलली नसते,तशीच रडत बसली असते आणि माझ्याशी भांडत म्हणून माझं पक्के होते पण की माझं प्रेम आहे आणि लग्न हिच्याशी करायचं म्हणून कसं पण मग..वाटल तर थांबायचं अजून पण घरी सांगून मोठ्या थाटात करायचं कारण तुझी आई खुपच हौशी आहे ना” अभिमन्यू चिडवतच म्हणाला..

“हो ना,पण आई तू का नाही डॅड ला सांगितलं की प्रेम आहे तुझं म्हणून” अधिराज..

“पण तुझ्या डॅड ला समजलं नाही का माझ्या वागण्यातून ,माझ्या काळजीतून ,माझ्या त्याच्या विषयी असणारया ओढीमधून म्हणून नाही सांगितलं” अक्षरा म्हणाली.

“पण आई त्याला मैत्री पण म्हणता आली असते ना” अधिराज..

“नाही,मैत्रीच्या पलीकडची ओढ होती हे समजलं होते आम्हाला आणि ते अनुभवलं होते आम्ही दोघांनी,तेवढा वेळ दिला होता ना आम्ही,एकमेकांना”अक्षरा म्हणाली..

“मग कधी आला तो दिवस,नात्याला नाव मिळालं” अधिराज..

“नाव कुठलं,मला थोडा निवांत वेळ हवा होता म्हणून मग मी म्हणलं एक्साम्झ झालं की करावं प्रपोज अजून दीड महिना होता ना शेवटच्या पेपरला” अभिमन्यू..

“आणि माझी चीड चीड शिगेला पोहोचली म्हणून मी ब्रेक अप केलं आणि बोलणं बंद, भेटणं बंद, मॅसेज बंद ,फक्त आणि फक्त अभ्यास” अक्षरा…

“काय सांगतेस आई,कस जमलं  तुला हे”अधिराज

“कुठलं काय तेव्हा,मॅडम चुकून समोर आल्या तर डोळ्यातून धारा वाहायच्या, मी प्रॅक्टिकल मुळे कधी जेवलो नाही तर,टिफिन बॅग मध्ये गुपचूप ठेवून जायची,तर कधी चिप्स,तर कधी चॉकलेट, आणि ना मला हेच खूप आवडायच म्हणून मग मी पण मला सगळं कळत असून पण न कळल्यासारखं करायचो आणि मस्त अजून तिच्या प्रेमात पडायचो” अभिमन्यू..

“हो,पण मी कोणा दुसरया सोबत बोलत असले की मग मात्र तुझ्या डॅड चा पारा एवढा चढायचा की जोरजोरात ओरडायचा त्याच्या फ्रेंड्सच्या नावाने,कधी पार्कींग मध्ये असेल तर गाडीचा हॉर्न वाजवायचा तर कधी कॅन्टीन मध्ये गेले तर जोरजोरात प्लेट वाजवायचा” अक्षरा म्हणाली..

“हो ,मग ब्रेकअप केलं होतं फक्त पण प्रेम तर होते ना…. ब्रेक अप म्हणजे थोडा ना शेवट असतो ,एक प्रेमाचा नवा स्टार्टअप पण असतोच की..” अभिमन्यू म्हणाला..

“अरे,केवढी समज होती ना तुम्हाला, नाही तर आम्ही… पण डॅड प्रपोज कस केलं ते तर सांग ना मला..पुढची स्टोरी माहीत आहे मला, तू पाहायला कसा गेला आईकडे आणि अगदी कसा ऍटिटूड दिला म्हणून ,आणि हो ,मुलगी पसंद आहे का तर” अधिराज…

“तर बोलला मला वेळ हवाय म्हणून ,दोन दिवसात सांगेल म्हणून”अक्षरा म्हणाली..

“हो ना,मजा च यायची तुझ्या आईला चिडवून द्यायची” अभिमन्यू म्हणाला…

“भारी ना..समजून घेत होत आई तुम्हाला..आणि तुम्ही पण..पण मला हटके तुमचं प्रपोजल तेवढं ऐकायचं आहे ,सांग ना तेवढं आणि माझ्या पोटात कावळे पण ओरडतात, जेवण पण करायचं आहे ना” अधिराज दोघांकडे पाहत म्हणाला..

“सांगतो रे”अक्षरा म्हणाली…

Listen Full Story
Subscribe to Channel
Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: