गुलामी की अधिराज्य in 2022

21 व्या शतकात,गुलाम  आहात का???

“कोणाचे???”

“कशाचे???”

“काय त्रास होतो,गुलामी मध्ये??”

“2022 मध्ये ,ते पण गुलामीचे जगणं”

‘विश्वास बसत नाही ना,के आहे हे 2022 सारख्या वर्षात ते पण गुलाम म्हणून जगायचं, आणि कोणाचं तर ह्यांच….’

“म्हणजे कोणाचं???” 

“काही समजलं की नाही”

“तुम्ही कोणाचे गुलाम आहात,सगळ्यात आता काय त्रासदायक आहे,तुमच्यासाठी??”

हो,गुलामीच..

आहे ना आपण गुलाम ,सगळ्यात जास्त म्हणजे मोबाईलचे…

किती आणि कसं ना!!! 

एक साधा फोटो काढायचा म्हणल,तरी त्यासाठी आरामात अर्धा तास जातोच…

कधी कधी अगदी नकळत का होईना पण छानसा फोटो काढून जातो…

फोटो काढावेत,आठवणींच्या रुपात ते आपल्या सोबत असतात,अगदी कायमस्वरूपी.. 

पण ते फोटो आपण social media वर अपलोड करतो आणि त्यानंतर चालू होते ते social media चे अधिराज्य जे आपल्या सारख्यावर राज्य करतात आणि आपण त्यांचे गुलाम बनतो..

हो ना….

नाही पटलं ना????

फोटो ला जर खूप लाइक्स भेटले तर मग आपण खूप खुश आणि नाही भेटले तर मग मात्र वाजतात ना आपल्या मुडचे बारा..

ही पण एक प्रकारची गुलमाचीच…

आपला फोटो आपल्याला आवडला एवढं कारण पुरे  नाही का?? 

जेवढे लाइक्स तेवढे तो चांगला अस का बरं?? 

असं पण होते ना ,की कधी कधी फोटो खूप सुंदर असतो पण पाहणारे आंधळे असतील….😊😊😊

Social Media आणि फोटो गणित जवळच आणि लवकर समजण्यासारखे म्हणून सांगितलं..

दैनंदिन जीवनात आपण रोजच कशाचे ना कशाचे नेहमीच गुलाम असतो पण फरक एवढाच असतो की ते आपल्याला दिसत नाही..

कधी गुलामी चांगली वाटते आपल्याला म्हणून आपण खुश असतो आणि ती स्वीकारतो ,त्याच्या दुष्परिणामांचा विचार न करता….

एखाद्या  चांगल्या गोष्टीवरच प्रेम हे आपल्याला चांगलंच फळ देत आणि वाईट गोष्टीवरच प्रेम हे वाईटच अनुभव देत हे,त्रिकालबाधित सत्य आहे..

Social Media चे गुलाम  होऊन ,स्वतःच्या मूड खराब करून घेण्यात मजा नाही,कारण त्या एका फोटो मागे जवळ जवळ एक दिवस वाया गेलेला असतो आणि एक दिवस म्हणजे एक नवी सुरवात.. एक नवीन ईच्छा…एक नवीन संकल्प… एक नवीन ध्येय… आणि एक आयुष्यातील घालवलेला दिवस… जो परत कधीच येणार नसतो…

थोडक्यात कोणाच्या किती गुलामी मध्ये राहायचे जगायचे हे आपल्या हातात आहे…

चांगल्या गोष्टीची गुलामी नक्की असावी…

फिटनेस,वाचन ,motivational.. आणि बरंच काही….

मग,काय ठरलं…शोधून काढा,2022 मध्ये तुम्ही कशाचे गुलाम आहात, ज्याने तुम्हाला स्वतःला त्रास होतोय..ज्याने तुमचा दिवस वाया जातोय…

शोधा आणि गुलामीतून बाहेर पडा..

तुम्ही स्वतंत्र आहात आणि स्वतंत्र व्यतिमत्व जगण्याचा तुमचा अधिकार आहे…

तुमच्यावर फक्त तुमच्या मनाचं च अधिराज्य असायला हवं,गुलामीचे आहारीपण नाही…..

गुलामी की अधिराज्य !! Audio Clip
Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: