विचार – एक नई सोच
विचार-एक नई सोच..
विचारांनी माणूस घडतो…
नेहमी चांगले विचार केले पाहिजेत..
चांगले विचार केले तर नेहमी चांगलेच होणार..
आपण कोणाचा चांगला विचार केला,तर आपल्या पण बाबतीत चांगलंच होणारं..
किती छान वाटते ना,हे सगळं दुसऱ्यांना सांगायला..
चांगला विचार करावाच, दुसऱ्याच सोडा पण स्वतःचा तरी तुम्ही चांगला विचार करता का???🤔🤔
म्हणजे अस होत असेल ना,तुमच्या पण बाबतीत..
कधी तर खूप परिस्थिती वाईट असते आणि आपण अजून काही तरी वाईट होईल म्हणून विचार करत असतो ,म्हणजे आपल्याला मनापासून वाटत नसते की आपल्या बाबतीत काही वाईट व्हावं पण मनात येत ना!!!
“मन चिंती ते वैरी न चिंती” ही म्हण लागो पडतेच सगळ्यांच्या बाबतीत…
पण एक गोष्ट खरी आहे,आपले विचार आपल्याला घडवतात…
आजचा आपला एक विचार पुढच्या सगळ्या गोष्टीवर परिमाणकारक ठरत असतो…
अजून…
अस होते का,की समोरच्याच्या वागण्यावरून तुमचे स्वतःचे विचार बदलतात का???
म्हणजे अजून खोलात..
समजा,समोरचा तुमच्याशी खूप गोड गोड बोलला तर तो तुम्हाला तो छान अगदी मस्त असा वाटतो ना….
आणि तोच माणूस तुमच्याशी रागाने उद्धटपणाने वागला तर तुमचं मत पण लगेच का बरं बदलते,की तो माणूस लगेच वाईट का होतो….
माणूस एक च असतो पण आपण आपल्या दृष्टिकोन त्याच्या वागण्यावर अवलंबून ठेवतो..
आपला स्वतःचा विचार समोरच्याच्या वागण्यावर का अवलंबून ठेवावा??
तुम्हाला काय वाटते???
म्हणजे ठीक आहे,समोरचा कसा वागतोय याच्यावर आपल्या मूडवर,स्वभावावर परिणाम होतो…
कारण आपले विचार तेवढे दुबळे असतात…
आपण कधी विचार केलाच नाही की आपल्या विचारांची परिपक्वता किती कमकुवत आहे…
जिथे विचार ठाम ना,तिथे निर्णय पण पक्का असतोच…
स्वतःचा विचार हा फक्त स्वतःचा असला पाहिजे,कोणी दुसऱ्याच्या वागण्यावरून तो नाही ठरवला पाहिजे…
समोरचा काही ही बोलेल कारण तो त्याचा विचार,त्याचा संस्कार आहे…
आपला विचार काय आहे,समोर भेटलेली व्यक्ती छानच आहे आणि आता परिस्थिती वेगळी आहे ,त्याला काही तरी अडचण असेल म्हणून तो तसा असेल.. त्याच्या वागण्याचा माझ्या विचारावर काहीच परिणाम होणार नाही…
कारण माझा विचार शांत स्वभावाचा आहे,माझे संस्कार शांत आहेत आणि ते एवढे पक्के आहेत की त्याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही…
स्वतःच्या मनाला तिथेच आपण समोरच्याच्या वाईट बोलण्यावर थांबवू शकतो ,समजून सांगू शकतो आपल्या विचारांनी शांत करू शकतो…
त्यासाठी स्वतःचे विचार हे पक्के असावेत,समोरच्याच्या वागण्यावरून ते अजिबात डगमगले नाही पाहिजे..
जिथे विचार पक्के तिथे माणूस पण परिपक्व च असतो..
म्हणूनच म्हणतात..
फक्त आणि फक्त चांगला विचार करत राहायचं..वेळ वाईट असो किंवा समोरचा माणूस वाईट असो..कधी कधी परिस्थिती हाताबाहेर असते तेव्हा देखील..मनाला वेळीच लगाम लावायचा आणि विचार पक्का करायचा…
कारण,“एक चांगला विचार जग बद्दलवण्याची ताकद ठेवतो”…..