मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

ललित लेख

अगं,सखी जरा एकतेस का???

अगं सखी,जरा ऐकतेस का???

हो,तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर माझे थोडे ऐकतेस का?? मी तर म्हंतेय ऐकच! आज आपण फक्त तुझ्याबद्दल बोलायचे आहे,फक्त तू. म्हणजे आता तुझ्यातील पुन्हा rolls नाही. जस की आई,बहीण,आजी,माऊशी, काकी,मामी आणि खूप काही. आज फक्त तू म्हणजे तूच.अस, वाटत असेल ना, मी तर मला केव्हाचीच विसरून गेलेय,आता माझ्याबद्दल बोलायचे म्हणल्यावर परत कस तरीच वाटायला लागले ना! हो ना! T.V. मधील जाहिरात किंवा मालिका पाहताना छान वाटते ना,कस छान दाखवले असते,सखी ला,स्वत:चे अस्तित्व सहज सावरताना! मला पण खूप छान वाटते, तुम्हाला पण नक्कीच छान वाटत असेल.

स्वत:चे  अस्तित्व म्हणजे नेमकं काय, परत आलेच की तिथेच! सगळे तर माझेच आहे,माझी माणसे,माझी मुले,माझे आई-बाबा,सासू –सासरे आणि सगळेच ज्यांच्याशी आपण जोडले आहोत ते सगळे च आपल्याला आपले वाटते मग अजून काही आपले आहे किवा अस वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे?? असं,सगळ्यांच्याच बाबतीत होते. सगळे त्यांच्या मार्गी लागले की मग सखी ला ती आठवते.

 सखी, तू कोण आहेस गं! सगळ्या नात्यांच्या विळख्यातून आता बाहेर ये! स्वता:ला विचार की मी कोण आहे, आणि मी माझ्यासाठी काय करते? काही पण, असू दे जे तुला आवडते ते छोटयातील छोटी का गोष्ट असेना पण ती केल्याने तुला आनंद भेटतो. जी फक्त तुझ्यासाठी आहे.

हम्म! निम्म्या च्या वर सखींकडे याचे उत्तर च नसेल तर, काही नी अजून पण आपले आवड-निवड किंवा छंद छान पद्धधीने जोपासला पण असेल,त्या सखींचे खरच मनापासून कौतुक! स्वत:चे काही तरी असणे,हे खूप गरजेचे झालेय,कधी कधी स्वता:ला दाखवून देण्याची गरज असते,की मी कोण आहे आणि काय करू शकते. स्वता:ला कधी तुम्ही Challenge केले आहे का ?

चला, आज थोडे स्वत:कडे पाहुयात एका नव्या दृष्टीने,स्वत:चा खर्‍या अर्थाने विकास करुयात. स्वत:ची नव्याने ओळख करुयात. सुरवात आरशापासून करुयात का, ते सगळ्यांनाच आवडीचे ठिकाण पण आहे. थोडे, आरशात पहा! स्वत:कडे पाहून काय वाटते का? म्हणजे की कशाची गरज आहे का? ते जाऊ दे! गरज असो अथवा नसो,पण जर सकाळची सुरवात छान अशी योगासनं ,प्राणायाम,सूर्यनमस्कार किंवा अजून वेगळा असं झुंबा वैगेरे जे आपले आरोग्य सुव्यवस्थित ठेवयाला मदत करेल म्हणून अस काही तरी करुयात.याचा फायदा असा होईल की तुम्हाला आजारी पडण्याचा धोका कमी वाटेल आणि अजून नवीन काही तरी करण्याची उर्मी मिळेल. थोडे आता सौदर्याकडे पाहुयात,नेहमीच Parlour ला जाण्यापेक्षा,म्हणजे कधी कधी तेवढा पण वेळ भेटत नाही आपल्या बाकीच्या तयारीत थोड्या किचनमधील च वस्तु किंवा साहित्य घेऊन आपण आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतो. हो,कारण naturally छान दिसण्यात जे आहे ते हजारो रुपये खर्च करून पण न मिळणार सुख आहे. म्हणजे अस की आरशापुढे उभे राहून बघण्याचा उद्देश एवढाच की आपण आजारांना आमंत्रण तर नाही देत ना? आजकाल ची जीवनशैली च मुळात फार वेगळी झालेली आहे.स्वत:कडे पाहायला वेळेचं नाही कोणला कसलाच! जेव्हा हॉस्पिटल ची पायरी चढू तेव्हा मग लक्षात येते.रोज तर आरशात पाहत होते मी तर ,पण काय पाहत होते,बाहयगोष्टीने केलेली रंगरंगोटी ?? का स्वत:च्या आंतरतम्याला. ते तुम्हीच ठरवायचेच की फक्त छान दिसायचे आहे का खरच छान होयचे आहे. Fit & Fine!!!!

सांगायचे एवढच की थोडा वेळ स्वता:साठी द्याच! अर्थातच, हे रोज ऑफिस ला जाणार्‍या किंवा All Ready स्वता:चे अस्तित्व सिद्ध करतायेत त्यांच्यासाठी नाहीच हे मूळी , तरी त्यांना हे आवडले तर मला छान च वाटणार आहे.

ज्या अशा सखी आहेत ज्या पडद्यामागे राहून सगळे rolls निभावतता आणि स्वत:ला विसरून जातात. त्या स्वता:ला विसरतात म्हणून बाकीच्यांना ही सहज त्यांचे अस्तित्व विसरायला मदत होते. स्वतसाठी जगा,तुम्हाला जे आवडते ते करा,दिवसभरातील दोन तास तरी काढा, आणि त्याच्यावर काम करा, घरात बसून पण तुम्ही खूप काही करू शकता. प्रत्येकाला काही ना काही छंद असतात,काही कला असतात आणि त्यात ते तरबेज पण असतात,त्याच आपल्यातील सुप्त गुणांना वाव देवून त्यावर थोडे रोज तास- दोन तास तरी काम करुयात. त्याने काय होईल,आपण काहीतरी करतोय त्याचे समाधान तर मिळेनच पण आपण आपल्या कलेमध्ये अजून जास्त पारंगत होऊ. त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती घेवू शकतो त्यामधले त्रुटी शोधू शकतो आणि खर्‍या अर्थाने आपण आपल्यासाठी काही करतोय त्याच सुख च वेगळे असते खऱ! सध्याच्या काळात Social Media ने तर अजूनच तुमचे काम सोप केले आहे.विविध लोकांपर्यंत ते तुम्ही पोहचवू शकता आणि स्वत:चे  अस्तित्व सिद्ध करू शकता त्याच्या ही पुढे जावून आपला छंद आपण अर्थाजनाचे साधन म्हणून पण वाढवू शकतो.

अस ही,ईश्वराने प्रत्येकाला कोणता तरी खास असा गुण घेऊनच पृथ्वी वर पाठवले आहे,त्याला शोधून तो जोपासणे सगळ्यांचं शक्य नसते. तेवढा वेळ सगळ्यांकडे नसतो,आपल्याकडे आहे तर त्याचा पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे.

 आयुष्याच्या सरतेशेवटी,सगळे त्यांच्या जीवनात अगदी मस्त रमून गेलेले असतात,आणि आपण त्यांना ईथपर्यंत पोहचवायला पडद्यामागे राहून मोठी कामगिरी निभावलेले असते खरी! पण आता तुमच्या कमगिरिची एवढी गरज पण राहिलेले नसते वो, मग परत एकटेपणा वाटायला लागतो,मी त्याच्यासाठी हे केल ,ते केल एवढा वेळ दिला. हे म्हणत बसण्यापेक्षा त्यांच्याबरोबरीने पडद्यामागे खंबीरपणे उभी राहून,थोडा वेळ काढून सखी तू स्वत:साठी पण काही तरी करावे,अस व्यक्तीगतपणे सगळ्यांनाच वाटते.

मग चला काही तरी नव्याने स्वता:ला शोधूयात,नव्याने एक स्वत:ची ओळख बनवू.

Subscribe to Channel
Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: