जागतिक महिला दिनानिमित्त..
थोडं कठोरच….
काही गरज नाही,आज जागतिक महिला दिवस साजरी करण्याची आणि हो, उधारीचा आणि उसना मोठेपणा मिळवून,महिलांना पण काही गरज नाही आज मिरवण्याची….
काय हा तोरा,आजच्या दिवसाचा…सगळ्या चॅनेल वर वर्षाव चालू आहे,महिलांच्या कतृत्वाचा त्यांच्यातील बाईपणाला जपता जपता,पुरुषांच्या नाकावर टिचून स्वतःच अस्तित्व निमार्ण केल्याचा….
आजचा दिवस म्हणाला की,झाले पुरुष वर्गाच्या काळजाचा तिळपापड होतो आणि मेंदूत सनक जाते ,ह्यांच्या महाशयांच्या…
क्वचितच पुरुष त्याच्या स्त्रियांच्या पाठीमागे खंबीर उभे असतील आणि हो तेवढ्याच ताकदीने लढण्याचे बळ देत असतील…
जिच्या गौरवाची रोजच पात्रता आहे ,तिला अस एखाद्या दिवशी नामांकित आणि मानांकित करणं म्हणजे अजून अपमानच की……
आज मोठ्या गप्पा होतात,महिलांच्या पण त्याच स्त्रीच्या अजून एक गोष्ट जास्त प्रचलित आहे,ती म्हणजे त्यांची आईपणाचा.. त्यांची बाई असण्याचा.. त्यांची शरीराची…वारंवार होणार उद्गारच म्हणायला लागेल ना…
आणि हो तो कशातून होतो तर, शिव्यामधून…
चालता बोलता तुम्ही आईवरून शिवी देता!!!!
“पण का देता?? तुमचं प्रेम नाही का तुमच्या आईवर??? की तिने आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केलीये की तिने तुम्हाला जन्म दिला?????”
कशासाठी करता तुम्ही शिव्यामधून…..
“नाही कळणार हे तुम्हाला कधी,कारण तुम्ही पुरुष म्हणून जन्माला आलाय ना,स्त्रीचा मान-अपमान ,कस ठरवता येईल ना…..”
स्त्रीच असते प्रत्येक पुरुषाच्या मागे,अगदी ठामपणे उभी असते आई च्या रूपाने स्त्रीच….
“प्रत्येक आई जन्म देते पण कर्म नाही देऊ शकत ना!!! चांगले संस्कार करू शकते ना पण ते त्याच्यावर लादवू नाही शकत ना!! ”
21 व्या शतकात पण खूप अन्याय सहन करावा लागत याच दुर्देवी काही असू शकत नाही,ह्याची जाणीव सगळयांना आहे पण काही अशा पण स्त्रिया आहेत ज्याच्यामुळे स्त्री असण्यावर पण प्रश्नचिन्ह आहे….
सगळ्यांना एकाच तराजुमध्ये तोलता येत नाही,अगदी तसेच आहे सगळ्यांचा…
समोरची स्त्री अशी आहे म्हणून घरातील स्त्रीवर निर्बद्ध घातले जातात…
चूक परखण्याची असते,अंदाज बांधणाऱ्याची असते….
उडण्याला बळ लागते, आणि उडण्यासारखं वातावरण….
आणि हो,उंच उडण्याचं बळ सगळ्यातच नसते…ज्याच्यात आहे,त्याच्या पंख कुरताडण्यापेक्षा… त्याच्या पंखाना बळ द्या… एक भरारी घेऊद्याच त्यांना…. साथ द्याच…
एक गोष्ट अगदी खरी आहे..स्त्री कधीच दुबळी नव्हती…कधी असणार पण नाही…
पुरुषाला तरी स्त्रीच्या पाठींब्याची गरज असते पण स्त्रियांना तशी गरज नसतेच…
तीच मन अडकते,ते आई म्हणून जाताना आईच्या मायेत.. पत्नी म्हणून जगताना पतीच्या धर्मात…. आणि सून – मुलगी म्हणून जगताना जबाबरदारीच्या कर्तव्यात….
या सगळ्यांना सोबत घेऊन ती शेवटी जिंकतेच की,पण ह्या सगळ्यात तुमची सगळ्याची साथ असेल तर मार्ग अजून सुखकर होऊन जातो..
आणि तिचा प्रेमाचा सागर अखंड तुमच्यासाठी अविरत राहतो…
आजचाच दिवस नाही तर येणारा प्रत्येक दिवस महिला दिन आहे..
एक तीच आहे जिच्यात लढण्याची ताकद आहे आणि सगळं पोटात घालून निमूटपणे त्रास करण्याची सहनशीलता…
तिच्यासारखं दुसर कोणी कधीच नव्हतं आणि कधी होऊ पण शकत नाही…..
जेवढ्या लवकर समजून घेतला तेवढ्या लवकर सगळ्यांना समजेल,सगळे सोबत चालाल आणि नाही सोबत चालला तरी एकटी चालण्याच बळ पण आहेच की तिच्यात…..