स्त्रीत्व – Happy Woman’s Day…..
#मिटवा भेद सारे……
विषय समोर आणि मनात खंत आली….
म्हणजे याचा कधी आपण विचारच केला नसेल ना!!!
पूर्वीपासून आलेल्या परंपरेने आणि तशाच त्या वाढवत त्याच संगोपन करत…त्यांना कुरवाळत आणि त्याच पुढच्या पिढीला वारसा म्हणून ठणकावून सांगत,किती तरी चुकीच्या गोष्टी देत असतो….
कधी विचार केलाच नाही,जी गोष्ट आपल्यासाठी बरोबर आहे ती समोरच्याला कशी योग्य ठरू शकते……
नकळत का होईना,पण जेव्हा नात्यांना नाव येते ना,तेव्हा नकळत का होईना त्याच्या मर्यादा पण येतात….
त्या मर्यादा घालून दिल्या कोणी आणि गरज नसताना आपण त्या का ,अजून ही पाळत आहे.. हे काही समजलं नाही….
मनातले भेद, नात्यातील भेद, विचारातील भेद,शिकवण्यातील भेद आणि शिकण्यातील भेद.. एवढंच नाही तर आपलं आणि परकं हा पण मोठा भेदच आला की.. त्याहूनही पुढे जाऊन सासर आणि माहेर….
दोन मुलांमध्ये पण नकळत का होईना पण भेदभाव होतोच की…
सगळे भेदभाव मिटवून,सगळ्यांना समान आणि सारखी वागणूक देता येईल का??
याचा विचार पण कधी डोक्यात आला नाही पण या विषयामुळे… स्वतः किती तरी भेदभाव करतोय याची नकळत का होईना जाणीव झाली….
स्वतःवर जेव्हा दुसरे भेदभावाचे खापर फोडतात तेव्हा मात्र जीवाची तगमग होते ना…
आणि हाच भेदभाव जेव्हा स्वतःच्या हातातून होतो तेव्हा,ते पण अगदी कधी कधी जाणूनबुजून आणि कधी कधी नकळत….
प्रत्येक नात्याची सीमा आहे ,मान्य आहे…मर्यादा आहेत… मान्य आहे…पण प्रेमाला ,समजूतदारपणाला कुठे आहेत मर्यादा….
नात्याची परिसीमा प्रेमाने ओलांडू शकतो,हे कळतच नाही कोणाला…
“मी” पासूनच प्रवास जेव्हा चालू होतो ना आणि तो जेव्हा “आपण” म्हणून संपतो ,तेव्हा खरी लढाई आपण जिंकलेली असते…
एक स्त्री, दोन्ही घराची प्रमुख व्यक्ती असते…माहेरची म्हणाल तर लाडाची लेक असते आणि तीच सासरची सून असते,भविष्य असते…
सासरची जबाबदारी अगदी निमूटपणे सांभाळणारी ती ,माहेरची जबाबदारी भावावर देऊन शांत होते.. स्वतःच्याच आई- बाबांसाठी देखील उभं राहू शकत नाही…
सासू-सासाऱ्यांना अगदी हौशीने सांभाळते ,काय हवं नको ते बघते, मग त्याच आई वडिलांना सोबत घेऊन राहण्याच स्वतः ती का नाही पाहिलं पाऊल उचलत…
भेद करतेच ना,या भेदामध्ये,तीच नक्कीच झुकत माप माहेरी असते,ते प्रेमाने भरलेले असते पण मर्यादेच्या विळख्यात असते… माहेरची माणसं घेतील समजून म्हणून च ,नकळत का होईना करतेच की अन्याय…
हा विळखा मनावर एवढा बळकट आहे ना,की तो विळखा स्वतः सोडवल्याशिवाय सुटणारच नाही….
एक नाही तर अनेक भेद आहेत असे…जे खरच त्याची गरज नाही काही…
एवढंच काय पण…
स्वतःच्या बाबतीत पण भेदभाव करतोच की ज्याला वयाच्या मर्यादेचे लोढणे अडकवून..
मनात एक असते पण समाज आणि परंपरेने वाढत चाललेल्या खुळचट गोष्टींना बळकट कसे केलं जाईल याचीच तर वाट पाहत असतो ना, आपण….
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला नकार देत नाही, तेव्हा त्या गोष्टीला आपण पाठिंबा देतोय,तसाच त्याचा अर्थ ग्राह्य धरला जातो….
ठरवलं समजा,सगळ्या मतभेदाच्या दऱ्या आज मिटवून एक नवी सुरवात करूयात..
सगळ्यांना सारख आणि समान धरून,पुढे जाऊयात..
“तर,जमेल ना हे?” म्हणून पहिला प्रश्न समोर येईल….
कधीतरी मनाला आजमावयाला पाहिजे… कधीतरी चौकट पार करावी लागणार आहे…
डोक्यात नसलेली कल्पना,समोर आली आहे आणि ती नक्कीच सगळ्यांना आवडली असेल…जास्त नाही पण स्वतःच्या बाबतीत तरी निरनिराळे मतभेद दूर करूयात.. आपल्याच घरातील सगळ्या लोकांना प्रेमाची मर्यादा न ठेवता…जपुयात…मनात कुढत बसण्यापेक्षा.. थोडं मोकळं होऊयात..
स्वछंदि आणि मंत्र मुग्धतेने आयुष्य जगुयात….
मिळून सगळे सारे भेद मिटवूयात…
नवीन संकल्पनेला वाव देत आणि त्याच अवलंबन करूयात…
तुम्हा सगळ्या माझ्या पावरफुल बघिणीना या महिला जागतिक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा….💐💐
Happy Women’s Day…..