“आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कार्टं”

व्वा ! काय विषय दिलाय,मनात खदखद चालूच होती आणि विषय चालून पुढे आला,मनातील घालमेल आता सगळी लेखिनीतून उतरून येणार,कारण सगळ्याच आणि काही गोष्टी कोणालाच सांगता येत नाहीत ना ! कारण काहीही झाले तरी त्याला जबाबदार आपणच की,इकडून मुलगी आणि तिकडून सून,दोन्ही पण महत्व्व्पूर्ण भूमिकाच आल्या की…. असो पण हा विषय दिल्या बद्दल खरच आभार आणि यावेळी दिला म्हणून तर अजूनच आभार…

“आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कार्टं” याचा सगळ्यात जास्त अनुभव आला तो लग्न झाल्यावरच,तो पर्यन्त तर बाब्याच होते ना. लग्न झाले आणि पदोपदी या गोष्टीचा सामना करायला लागला,वाईट खूप वाटत होते,म्हणजे लग्न तर तुम्ही तुमच्या बाब्या सोबत लावले आहे ना मग थोडे तरी नको का आपले पनाची भावना.

रमा,लग्न करून सासरी आली. रमा शहरात वाढलेली आणि उच्च शिक्षण झालेली पण या सगळ्याचा अजिबात तिच्यावर कसलाच गर्व नव्हता,अगदी सगल्यानसोबत असताना ती विसरून जायची की ती एवढी उच्च शिक्षित असून पण या गावकडील आणि खूपच अडगळ लोकांसोबत मजेत राहण्याचे स्वप्न पहातेय.

माणुसकी होती,तिच्या मते माणुसकी सांभाळावी फक्त माणसाने नात्यांचा गोडावा राहतोच की,मानपान ज्याचा त्याला ज्याच्या त्याच्या कर्तुत्वाने आणि वयाने भेटतोच की.

कामाला प्राधान्य देणारी आणि थोडी सरळ मार्गीच होती ती,जिथे नको तिथे नाही म्हणारी पण समोरच्याला वाईट वाटणार नाही म्हणून तेवढ्याच तत्परतेने समोरचाच्या  आनंदासाठी स्वतला झोकून देणारी,रमा होती.

सासूबाईनी तिला कधीच स्वीकारले नाही,खूप कामाच्या वेळी,खूप पाहुणे आल्यावर किवा कोणी घरात आजरी असल्यावर तेवढ्यापुरती रमा त्यांना दिसायची इतर वेळी मग रमाच्या फक्त संस्काराची उधळण होयची,आमच्या रमाला शेतातील  काही येत नाही,एवढा मोठा गोठा पण कधी म्हणून ती गोठ्यात साधे पाहायला पण नाही गेली, जेवणात एकच भाजी करायची ना,तर दोन दोन करते आणि काय रोज नवीन काही तरी बनवते उगीच सामानाचे वाटोळे करून ठेवते, काय संसार करणार आहे काय माहिती माझ्या पोरासोबत काय माहिती,बाईच्या हातात असते संसार कसा वाढवायचा ते रमा म्हणजे नुसती उधळ भसकी,कोणी आले गेले की त्याला जेवून पाठविल्याशिवाय राहणार नाही,काय गरज आहे का ,आपल्या घरी काय ढीग लागलाय का किराणाचा….. अजून खूप काही. 

रमा त्यांना आवडत नव्हती हे रमाला पण माहीत होते पण तिच्या चांगल्या गोष्टी पण त्यांना दिसत नव्हत्या.त्यांच्या मनात एवढ्या वाईट विचार होते की,एकदा वॉशिंग मशीन ची पिनला करंट बसत होता आणि हे त्यांना माहीत होते,पण ज्या वेळी त्यांची मुलगी म्हणजे रमाची ननंद पिन बसवण्यासाठी पुढे गेली तर त्यांनी लागलीच तिला मागे खेचले आणि पिन ला हात लावू नको म्हणाल्या आणि रमाला बसवायला सांगितली पण बिचारी रमा तिला यातील काहीच माहीत नव्हते,आणि तिला जोराचा विजेचा धक्का बसला. किती ना वाईट स्वत:च्या मुलीला म्हणाले की नको पीएन सुनेला काहीही झाले तरी चालेन!

माणसाने एवढे पण आपला बाब्या बाब्या करत बसू नाही,तो कधी उलटेल ते नाही सांगता येत,रमा सासूबाईजवळ थोडेच दिवस असायची इतर वेळी तिच्या आणि नवर्‍याच्या कामामुळे शहरात राहत असे,त्यामुळे जेवढा पण वेळ ती गावी जायची तेव्हा तिचे काम ती स्वखुशीने करायची,पण त्यांनी तिला कधी आपुलकीने फोन केला नाही किवा कधी तिची विचारपूस पण नाही केली,त्यांच्या मुलासोबत बोलणं झाले की त्या खुश..

शेवटी एक दिवशी त्या घसरून पडल्या आणि त्यांच्या मणक्यात गॅप पडला म्हणून त्यांना शहरात घेऊन आले पण दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी नाही त्यांच्या मुलीकडे वेळ होता आणि नाही त्यांच्या मुलाकडे,शेवटी सगळं रमानेच केल अगदी आई सारखी सेवा केली,आता तरी तिला वाटत होते की आपण पण याच घरचा हिस्सा होऊन जाऊयात आणि आपल्या सासुबाईंचे बाब्या होऊ पण असे नाही झाले.

शेवटी आता लग्नाला 30 वर्षे होत आलीत पण ती फक्त सून च राहिली,तिची सगळी कर्तव्य तीने घरातील मुलगी आणि मुलगा असल्यासारखी निभावली आणि पार ही पाडली,आणि या सगळ्यात ती एक गोष्ट पण नकळत शिकली ते म्हणजे,“आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कार्टं” हे खरच आहे.

पण तुम्ही अस करू नका,आपलाय म्हणून सगळ्यांना आपलेस करा आणि मोठे मन दाखवा आणि मोठा परिवार बनवा..

(लेख कसा वाटला ते नक्की सांगा आणि हो आवडला तर like करा आणि comment नक्की करा आणि follow करायला  पण  विसरू नका)

Copyrights : Inspire In Marathi 

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: