अंधारलेली दिवाळी

“सगळ्यांच्या घरी किती आनंद आहे,सगळे बाहेर खरेदी करतात,आपण कुठेच का नाही गेलो मम्मी,यावेळी नवीन कपडे नाही,नवीन खरेदी नाही,यावेळी दिवाळी ला काही मज्जाच नाही” रिया तिच्या आई ला म्हणजे सरिता ला म्हणते.

सरिता आणि राकेश अगोदरच खूप तणावपूर्वक आयुष्य जगत असतात.

“हो ना,थोडी अडचण आहे ग,पिल्लू” बाबा लवकरच सोडवतील मग आपण परत पहिल्या सारख छान दिवाळी करूयात. 

“पण नकळत समजलं होते,ज्यावेळी होते तेव्हा कशाचीच पर्वा केली नाही. पाहिजे ते घेतले,खूप मोठ्या उत्साहाने सण साजरे केले पण रितीपेक्षा जास्त पैसेच खर्च केले,कोणाला माहीत होते लक्ष्मी अशी पाठ फिरवलं आणि दोन वर्षे रुसून बसेल,केवढा हा रुसवा आता नको झालाय आणि आमच्या चूक पण लक्षात आल्यात आमच्या,आता सोड ग हा रुसवा आणि आम्हाला ही सण साजरे करू देत.” सरिता हात जोडत देवासमोर मनातल्यामनात बोलत होती.

सरिता आणि राकेश दोघे मोठ्या कंपनी मध्ये कामाला होते,त्यामुळे घरात भरपूर पैसे होते,कशाचीच कमी नव्हती. कशाची कधीच चणचण जाणवली नाही. सगळं अगदी मजेत होते,तुफान खर्च कोणी मोठ्यांनी सांगितले की थोडे saving करा तर त्या दोघांना जुने विचार वाटायचे आहे तो पर्यन्त मस्त आयुष्य जगायचं,धमाल करायची आणि उद्याची चिंता कशाला आता,अस म्हणून आहे तो आजचा वर्तमान काळ ते हसत घालवत होते.

पण जणू वरून पाहनाऱ्या लक्ष्मी ला जणू सगळं माहीत असाव,आणि त्यांचं वागणं ही पटत नसावं म्हणून एक अनहोनी झाली आणि सगळ्यांनाच्या डोळ्यात पाणी आणणारा महाविषाणू समोर उभा राहिला. 

हो, कोरोनच,कोरोना आला तसा सरीताला कामावरून कमी केले आणि राकेशचा पण पगार कमी केला,सुरवातीचे दिवस तडजोड करण्यात गेले पण थोडे दिवस निघतात पण अख्खी दोन वर्षे काढायची म्हणजे मोठी पर्वणीच. 

या वर्षीच्या दिवाळी ला तर खूपच वाईट दिवस आले,नाही म्हणाले तरी काहीच करता येत नव्हतं,गरिबांची दिवाळी पण त्यांना साजरी करता येत नव्हती. 

पूर्वी केलेल्या चूक लक्षात येत होत्या,लक्ष्मी रुसली होती पण हातात अजून बळ आहेच की,कोरोना नसता आला तर समजले पण नसते की किती आणि काय चुकीचे वागतोय ते.

आहे म्हणून उधळण्यात मजा नाही,आपल्याकडे आहे म्हणून त्याचा आदर करून च त्याचा योग्य वापर करावा लागणार आहे. 

ह्या एका अंधारलेल्या दिवाळाईतून पुढच्या सगळं आयुष्य प्रकाशात घालवण्याचे बळ मिळाले आहे,नाहीतरी सगळे सांगतच होतेच की थोडे जपून वापरा,दिवस आज आहेत,उद्या कदाचित हेच दिवस नसतीलही.

हा खरा धडा मिळाला,तिमिरातून आयुष्यभरासाठी तेजाकडे जाण्याचा!!!

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: