मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

प्रेरणादायी कथा

बार्बी आणि सुपरहिरो – माझाचं.

#मुलाची आई & # मुलीची आई – एकच…

माझं भाग्य की मी एका बार्बी डॉल ची आई आहे आणि एक सुपरहिरोची पण आई आहे….

मोठी माझी बार्बी… त्यानंतर जवळ जवळ तीन वर्षाने झाला तो सुपरहिरो..

आई म्हणून जगताना,दोन्ही मुलं सारखीच असतात..पण फक्त प्रेमाच्या बाबतीत..

जर चुकून दोघे पडली तर नकळत सगळयाच आई चा कल छोट्या कडे ,सुपरहिरो कडे झुकतो पण त्याच वेळी आईला समजून घेणार मोठी बार्बी  पण तिथेच असते…

त्यावेळी त्या बार्बीने समजून घेणं ,हे आईसाठी खूप महत्त्वाचं असते…

आई म्हणून त्याचवेळी तिने सगळं जिंकलं असते…

नाहीतर आज ही त्यालाच का घेतलं म्हणून रडणारी मुलं पण काही कमी नाहीत…

हौस तशी दोघांची पण मला खूप….

नटून थटून बार्बी ला तयार करावे तर कधी स्मार्ट हँडसम म्हणून सुपेरहिरोला तयार कराव… 

दोघे असले की आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटत..शेवटी हा भाग प्रत्येकाचा वेगळा आणि जिवाहळ्याचा….

बार्बी ला लागते वेळोवेळी आई सारखीच..कधी हेअरस्टाईल करताना तर कधी वेगवेगळी कपडे घालताना ,कधी नॉड च लावता येत नाहि तर कधी काय तरी होत असते पण ते कळतच नाही…

सुपरहिरो च नाही करावं लागतं एवढं… पाहिजे ते कपडे घातले की झालं ,कधी वॉच आणि शूज वरून होते मग..पण बार्बी एवढं नाही लागत वेळ….

हे झालं, बाह्य जीवनाबद्दल पण…

मनाचं आणि आंतरिक आयुष्याबद्दल…

माझा नेहमी हाच हट्ट होता की,माझी दोन्ही मुलांच्यात तेवढाच संवेदनशील पणा आणि तेवढाच कठोरपणा पण पाहिजे आणि निर्णय घेण्याची ताकद पण…

माझी बार्बी जर संवेदनशील असेल तर ती तेवढीच ताकदवर आणि कठोर पण असायला हवी..स्वतःच्या पायावर स्वतःच आयुष्य रंगवणारी..आणि अगदी बेधडक जबाबदारी चे ओझे पेलणारी…

त्याच्या सोबत सुपरहिरोच म्हणाल तर हो, हवाय मला तो पण स्वावलंबी अगदी स्वतःच जेवण स्वतः बनवणार.. तेवढ्याच काळजीने आई उपाशी असेल म्हणून धावतपळत येणारा….कठोर मनाप्रमाणे तेवढेच संवेदनशील मनाचा….

संस्कार करताना या गोष्टीच भान मी ठेवलंय…

बार्बी आहे म्हणून तिने जास्त बाहेर जाऊ नये किंवा पाहिजे ते कपडे घालू नये… किंवा उशिरा पार्टीला ला जाऊ नये …अस नाही कधी मी तिला सांगितले..

त्याच्या उलट एकटी बाहेर असताना दोन हात कसे करायचे, स्वतःला संरक्षित कस ठेवायच हे पण सांगितलं आहे..

तू बार्बी आहेस म्हणून तुला प्रत्येक वेळी कोणाच्या खांद्याची गरज नाही….तोच धाडसीपणा मला हवा आहे ,जो तुझ्या भावाच्या मध्ये आहे….

सुपरहिरो च म्हणाल तर प्रत्येक वेळी सुपरहिरो वागायची गरज नाही…प्रत्येक वेळी तुझ्यातील मर्दांगी बाहेर आलीच पाहिजे असं नाही.. स्त्रियाचा आदर करण्यापासून त्यांना देवीचा दर्जा पण द्यायला,नाही विसरले. आपण सुपरहिरो आहोत,आपलं काम फक्त पैसे कमवायचा नाही तर त्या कमावलेल्या पैशांनी फक्त बाह्य गरजा भागवल्या जातात,अंतरिक गरज भागविण्यासाठी आपुलकीची आणि  तुझ्यातील माणुसकीची गरज आहे….

तीच संवेदनशीलता हवी आहे मला, जी तुझ्या बहिणीच्या मध्ये आहे…

बार्बी आणि सुपरहिरो कधी एकसारखे नाही होऊ शकत हे सगळयांना माहीत आहे पण ,आपण त्यांना वाढवताना तर सांगू शकतो ना…

बार्बी आहे म्हणून सारख मेक अप आणि कुरवाळत बसण्यात मजा नाही ना…..

आणि सुपरहिरो आहे म्हणून त्याचीच सारखी मनमानी करून देणे पण चुकीचं आहे ना….

आई म्हणून जगताना दोघे सारखीच आहेत मला..

“मी आजारी आहे म्हणल्यावर,तेवढ्याच तत्परतेने मला दवाखान्यात घेऊन जाणारी आणि ऍडमिट करून सगळ्या हॉस्पिटलच्या फॉर्मलिटी पूर्ण करणारी बार्बी हवी आहे आणि आई च्या जेवनाच्या डब्याला काय करू म्हणून काळजी करणारा सुपरहिरो पण हवाच आहे…”

“हे मी कसं करू,मला येत नाही…त्यासाठी मला दादा किंवा बाबा हवे आहेत म्हणून रडत बसणारी बार्बी नकोच मला…

आणि 

आई नाही ताई नाही म्हणून काय करू ,कसं करू म्हणून गोंधळून जाणारा सुपरहिरो पण नकोय मला…”

दोघे हवेत मला,एकमेकांच्या साथीने,सोबतीने चालणारे पण वेळ आली तर एकट्याच्या खांद्यावर दोन्ही जबाबदारी तेवढ्याच ताकदीने पेलणाऱ्या….

Visit & Subscribe to Blog..

Search on Google 

🔎Inspireinmarathi.com

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: