मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

वैचारिक कथा

लहानपणीची निरागसता मोठेपणी जाते कुठे???

लहानपणीची निरागसता मोठेपणी जाते कुठे ???

“लहानपण देगा  देवा मुंगी साखरेचा रवा

ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मारा,

बालपण किती सुख विलासात गेले 

हवेचे झुळूक जसे झाडवरची फुले ,

खेळता बागडता क्षणात दिस गेले 

मस्ती मौज करता तरुणपण आले ,

मित्रांची मैफिल घेऊन सारे गाव पिंजले

वेशीवारची आमराई शिवारातील फुले 

झाडवरचा तो झोपडा नदीकाठाची घरे “

ही कविता कोणी ऐकली नसेल अस कोणी नसेलच,सगळ्यांना आवडते ते म्हणजे बालपण आणि आयुष्याच्या कुठल्याही स्तरावर विसरता न येणार सगळ्यांच्या आवडीचे म्हणजे बालपण.

लाडाकोडाचे,भरभरून प्रेम मिळणार आणि तेवढेच मोठे होण्याचे वेध लावणार.

लहानपणी सगळ्यात जास्त वेध लागतात ते मोठे कधी होणार आणि मोठे झाल्यावर तेच वेध नको वाटतात आणि शांत आईच्या कुशीत परत लहान होऊन जावावे वाटत,अस सगळ्यांच्याच बाबतीत होते.

लहानपण निरागसतेने परिपूर्ण भरलेले असते,तीच निरागसता मोठेपणी जाते कुठे ते मात्र कळत नाही म्हणून त्यालाच नाव दिले जाते,”आता मोठा झालाय”.

पुन्हा प्रश्न येतोच की,”आपली मुले आई -बाबांसाठी खरच मोठी कधी होतात ?”

अर्थातच प्रत्येकाची उत्तरे यासाठी नक्कीच वेगळीच आहेत.

पण तरुण वयात जबाबदारीचे भान असणारे मात्र थोडेच.

पण जे नाहीत त्यांचे काय,असो!

मूल जशी वाढायला लागली की त्यांचे बोलणं कमी होते ,ती फेज नको वाटते आई म्हणून, साहजिकच काळजी वाटू लागते.चूक कोणाची असते आणि खर सुरवात केली कोणी असते हेच मात्र कळत नाही आणि मुलांच्या वागण्याला संस्कराचे नाव देवून रिकाम होते. नकळत का होईना आईला च जबाबदार धरले जाते.हेच बघा ना,सुरवात झाली कधी आणि कशी आणि शेवट जातोय कुठे.

रोहन,अगदीच लहान पण ना एक ना एक ओळ आईला सांगत होता अगदी तोंड भरून,गीता ला छान वाटत होते.

रोहण एकदा आईला न विचारताच त्याच्या मित्राच्या घरी जेवून आला,पहिल्यांदा त्याने आईला आल्या आल्या संगितले की,”आई ,आज ना मी सुरेश च्या घरीच जेवून आलोय मला त्याच्या आई ने केलेले  सँडविच खूप आवडले ना म्हणून.” 

“कशाला खाल्ले तू,तुला खायचेच होते ना तर तू मला का नाही संगितले,अस कोणाच्या घरी काही पण खातात का, त्याला हलकेच दोन फटके पण दिले.’ गीता.

“आई मारू नको,रडत रडत ” रोहण.

“परत अस केले ना तर बघ” दम देतेच गीता त्याला बोलली.

पण त्याचा परिणाम काय होईल याचा विचार तिने केलाच नव्हता.

“रोहण ला आता समजले होते की आईला घरी संगितले तर आई चिडते,त्यापेक्षा आईला सांगायलाच नको. अस पण जेव्हा सुरेश आपल्या घरी येतो तेव्हा तर आई त्याला पण बळजबरीने खायला घालतेच की,” सुरेश स्वतशीश बडबड करत होता.

कितीही केल तरी तो नुकताच दुसरीला गेला होता.

चांगलं आणि वाईटाची समज थोडी ने या वयात कळणार आहे.

नकळत का होईना त्याच्या मनावर एक संस्कार त्याच्याच आईने म्हणजे गीता ने कोरला होता.बाहेर खाललेल आईला सांगायचे नाही ,ती खूप ओरडते.

“पण इकडे गीताला खूप अभिमान वाटत असतो की माझ्या मुलाने माझे सगळ ऐकतो,आता त्याने बाहेर खान पण बंद केल आहे,तो माझ्याशी खोट पण बोलत नाही काहीच.”गीताच्या मनातच विचार चालू होते.

इकडे रोहण पण खुश होता,त्याला अजून एक गोष्ट नकळत समजत गेली,आईला सगळच सांगावं अस  काही नाही,बाहेर खावून येण,शाळेत उशिरा पोहचणे,अभ्यास नीट नव्हता करत,सगळ काही तो  ज्या त्याच्या वयात त्याला वाटत असे की आई या गोष्टीसाठी त्याला ओरडेल ते त्या 

सगळ्या गोष्टी लपवू लागला होता.

गीता ला पण खरच तो त्याच्या गुणी बाळ आहे ,म्हणून अजून जीव लावू लागली.

लहान होता तेव्हा ठीक होते पण याच गोष्टी तरुणपनात म्हणले की टेंशन चा विषय बनून जातो.

सगळ्यात रामबाण उपाय म्हणजे,हाच विचार आपण थोडा आपल्या पातळीवर येऊन करुयात.

जर त्याच जागी ,गीता ने त्याला त्याचे म्हणणं ऐकुण घेऊन त्याला आहे तसे स्वीकारले असते आणि त्याचे परिणाम संगितले असते,तसेच तिच्या नाही म्हणण्यामागचे कारण पण ती त्याला सांगू शकली असते आणि तो लहान आहे म्हणून गीताला ही पटवून देता आले असते.

जे झाले ते झाले,गीताला ही तिची चूक समजली होती आणि आता पुढे ती चूक परत करू नये म्हणून तिने,तो जे काही सांगेल ते पहिले एकुन घेण्याची सवय लावली होती आणि त्यावर लगेच रीयाक्ट न होता,त्यालाच विचारू लागली होती उत्तर ही त्याच्याकडूनाच मिळवू लागली होती.

आपल्या मुलांना आहे तसे स्विकारण आणि त्यांना आधार देन की तुझ्या कोणत्याही प्रसंगी आम्ही तुझ्यासोबत आहोत,हे खूप गरजेचे आहे.

त्यांना विश्वास द्या ,त्यांना स्वीकारा जे जसे आहेत तसे अगदी त्यांच्या चुका सुद्धा,जर तुम्ही त्यांच्या वयात त्यांचे मित्र बनून गेलात तर त्यांना तुमच्यापासून काही लपवण्याची गरजच नाही पडणार आणि लहानपणीची निरागसता मोठेपणी पण नक्की तशीच राहील”.

copyrights: Inspire In Marathi

(((नक्की वाचा आणि तुम्हाला कसे वाटते लिखाण ते बिनधास्त comments करून सांगा,मला ती मिळालेली लिखाणाची पावती असेल आणी सुधारण्यसाठी chance असे,आणि हो पुढचा topic आहे,”लग्नाआधीची परी लग्नानंतर पाहुणी का ?” वाचण्यसाठी नक्की follow करा आणि आवडले असेल तर like करा.)))

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: