लहानपणीची परी मोठेपणी पाहुणी का??
“लहानपणीची परी मोठेपणी पाहुणी का?? “
आई या शब्दात ताकद आहे,हे ज्याला कळलं त्यालाच आईची महती समजते.
प्रत्येक जन्म देणारी स्त्री ही आईच असते पण जन्म न देऊन पण आईसारखी सांभाळणारी पण आईच की….
भगवान कृष्ण याला साक्षी आहे म्हणून तर जगाला विश्वास ठेवायला सोपं जातेय….
“मी आज खूप खुश आहे बघ,माझ्या घरात प्रत्यक्ष लक्ष्मी अली आहे ”
“हो ना ,मी माझ्या परीला कधीच लांब नाही करणार ”
“तिला ना मी खूप लाड करणार आहे ,तिला जे पाहिजे ते देणार,माझ्या डोळ्याचा तारा आहे ती”
“आयुष्यात जर सगळ्यात महत्ववाच काय असेल तर माझी लेक,माझा अभिमान ,माझा सन्मान आणि माझी ओळख….”
“लेकीच्या लग्नात मी काही कमी नाही पडू देणार ,तिला पाहिजे ते देणार…”
“बोट ठेवले ते वस्तू घेणार अगदी कितीही महाग असली तरी चालेल…”
“तिच्या डोळ्यात मी सुख बघणार आहे…..”
“तीच सासर स्वतः मी शोधणार आणि चांगल्याल चांगलंच…”
“एकदा लग्न झालं की झालं ,आपलीच परी आता पाहुणी म्हणून येणार मग मात्र मी पाची पक्वान्न घालणार…”.
“पण तिच्या सासरच्या आयुषयात मात्र मी काही दखल देणार नाही….”
“देवा,तुझ्याच हातात रे सगळं आता दिल्या घरी सुखी ठेव तिला ,बाकी मला काहीच नको….”
“माझ्या नंतर माझ्या मुलीला नीट सांभाळ रे पोरा..”
तुम्ही म्हणत असताल काय आहे हे,तर ही वाक्य ऐकूनच तुम्ही पण मोठी झाला असताल,आणि लग्नाआधी ठीक असते सगळीकडे जेमतेम म्हणजे असतच असत पण एकदा का लग्नाचं मंगळसूत्र घातलं की झालं का वो तुमचं काम…
सगळ्याच आई बाबांना वाटत की आम्ही तिच्यासाठी बेस्ट च सासर दिलाय म्हणून आणि हो आई बाबा आहेत म्हणल्यावर देणारच त्यात काही दुमत नाही,हे फक्त एक आई बाबा झाल्यावरच समजते.
लग्न झालं की स्वतःच्याच मुलीला भेटायला जायचं म्हणलं तरी दहा वेळा विचार करावा लागतो,का वो ती तुमची मुलगी आहे ना,तुमच्या काळजाचा तुकडा आहे ना मग जा ना हक्काने भेटायला….
तिला तुमच्या आधाराची गरज नेहमीच असणार आहे ,तुमच्या मुलाला नसते का ती असते ना, तूच मात्र सगळं तुम्ही स्वतःच असल्यासारखं करता भले मग मुलगा नीट वागत नसला तरी ते सगळं चालत तुम्हाला….
मुलींच्यावर वेळ येत तेव्हा सहज म्हणून जाते आई तू पण आहे ना तुझी सासू घेतील ना त्या काळजी पण,” अग ,आई मला तुझी कूस हवी आहे ज्या कुशीत मी नऊ महिने काढले ना तीच ,सासू आहेच माझी छान पण त्या वेदना त्यांना नाही येणार ग ज्या तू सोसल्या आहेत,मग आई का नाही हक्काने तू राहत माझ्याजवळ माझ्या आजरपणात पण”
“तुम्हाला सांगू बाबा,खूप मारतो वो नवरा माझा, तुम्हाला माहित असून पण तुम्ही गप्प का वो,लहानपणी साधं शिक्षकांनी मारलं तर तुम्ही शाळेसोबत भांडण करायला आला होता ना मग आता फक्त लग्न झालं म्हणून मी तुम्हाला परकी झाली का वो,विचारा ना त्याला येऊन बाप असल्यासारखं…..
भीती वाटते ना तुम्हाला लग्न झाल्यावर मुलीला माहेरी कस ठेवायच,लोक काय म्हणतील…”
“अहो ,हाच समाज आहे ज्याने ठरवलं की मुली ने लग्न झालं की तिची अर्थी जोपर्यंत उठत नाही तो पर्यंत माघारी येयचे नाही”
मग इतिहास तुम्ही घडावा ना आता….
माझी मुलगी माझी मरे पर्यंत जबाबदारी आहे,तिला स्वतःला कोणाच्या आधाराची गरज नाही एवढं मी तिला शिकवेल ,कामाला लावेल ,आधी तिला पैशाने बळकट तर करेलच पण मनाने पण ती खंबीर असेल,ती कधीच माहेरचं ओझं नसेल,तिच्या प्रत्येक पावलासोबत मी आई म्हणून तिच्या पाठीशी असेल ,नाही मी दुबळी आहे आणि नाही तिला दुबळी कधी पडून देणार,एवढं च करा फक्त आणि बघा स्वतःचीच लढाई स्वतःच जिंकेल ती”
आता,काळ बदलतोय मुली सक्षम आहेत पण अजून पण काही ठिकाणी आई वडीलच मुलींना आधार द्यायला कमी पडतात, समाज्याच्या भीतीने…
स्वतःच्या मुलाला आयुष्यभर सांभाळण्याची ताकद तुम्हीच ठेवता ना मग एक मुलगी ती पन तुमचीच परकी का करता….
नक्की वाचा हा भाग आणि पुढचा भाग पण ,आई नावाच्या शब्दात काय काय ताकद आहे ते आपण पाहणार आहोत आणि comment करायला विसरू नका आणि rating पण….
Copyrights : Inspire In Marathi