तू माझी सहचारिणी…
#गृहिणी नव्हे सहचारिण
“मम्मा, उद्या मिटिंग आहे स्कूल मध्ये” प्रीशा.
“बर,” मालिनी..
“बर ,काय मम्मा, बाबा आहे ना उद्या घरी” प्रीशा..womanpower
“तो कसा असेल बाळा,त्याला ऑफिस आहे ना” मालिनी…
“मग तू येणार का?” प्रीशा..
“हो, का ग” मालिनी..
” काही नाही” प्रीशा निघून जाते…
“अशी का गेली असेल ही,हिला आवडलं नाही का??माझं मिटिंगला तिच्या शाळेमध्ये येणं…कोरोना नंतर खूप वर्षातून शाळा चालू झाली ना .. म्हणून कदाचित..जास्त नसेल काय..” मालिनी मनातल्या मनात विचार करत असते..
बराच वेळ होऊन जाते,प्रीशा बोलत नाही काहीच…
“काय झालं प्रीशा सांगशील का?? ” मालिनी…
“बाबा का आज उशीर करतोय,मला बोलायचंय ” प्रीशा..
“येईल ग” मालिनी..
तेवढ्यात गाडीचा आवाज येतो आणि प्रीशा बाहेर पळत जाते..
“मम्मा, मी आले,तू चहा करतेस का??” प्रीशा जाता जाता मालिनी आई ला सांगून जाते…
मालिनीच्या लक्षात काही येत नाही, तसा विचार ती करत नसते…
अस पण नवरा आलाय म्हणल्यावर ती पण अगदी खुशी,खुशी चहा ठेवत असते…
“अरे,बच्चा बाहेर..मी आताच येत होतो” मयांक म्हणत होताच..
तेवढ्यात….
“मला तुझ्याशी बोलायचंय बाबा, आणि ते मी आई समोर बोलू शकत नाही” प्रीशा..
“काय झालं,कोणी त्रास दिला का?? का टीचर ओरडल्या” मयांक..
“तस काही नाही, उद्या मिटिंग आहे शाळेमध्ये आणि मला वाटतय की तू याववं म्हणजे…” प्रीशा..
‘कस सांगू बाबाला की आई ,गृहिणी आहे हे मला सांगायला लाज वाटते मैत्रिणींना’ प्रीशा शांत होऊन मनातच विचार करत असते…
“मी??? माझ्यापेक्षा आई तुझी चांगलं हँडल करेल आणि तुझा दादा उगाच टॉपर नाही” मयांक म्हणाला..
“नाही बाबा,मला तूच हवा आहेस”प्रीशा..
“ठीक आहे पण मला खर कारण कळायला हवं” मयांक थोडं गंभीर होत…
प्रीशा थोडं शांत होतच.. आणि अगदी हळू आवाजात…
“बाबा,मला ना लाज वाटते की माझी आई घरीच आहे म्हणून उद्या सगळयांना सांगावं लागणार आहे की तुमच्या आई काय काम करतात म्हणून आणि आई तर आपली गृहिणी आहे ना,आणि माझ्या क्लास मध्ये आणि फ्रेंड मध्ये सगळ्या मॉम्स जॉब करतात आणि काही बिझनेस पण..त्यापेक्षा तूच चल ना” प्रीशा बोलत असते…
प्रीशा चे बोलणं ऐकून मयांकला धक्का बसतो…
“तुझी आई गृहिणी आहे कारण ,तिला तुम्हाला पाळणा घरात ठेवू शकत नव्हती..आणि ती माझ्या कॉलेजची अतिशय हुशार विद्यार्थीनी होती…तुला हे कधीच नाही समजणार…कारण तिने तुला कधी सांगितले नाही आणि मी पण” मयांक स्वतःला सावरत म्हणाला…
“बाबा ,पण ती गृहिणी आहे ना??” प्रीशा…
“हो,त्याला कारण पण तुम्हीच आहात” मयांक थोडा आवाज चढवतच म्हणाला..
“सॉरी बाबा” प्रीशा.. अस म्हणतच घरात पळत गेली..
पळत जात असताना मालिनी ने पाहिलं..
तोच मागे मयांक पण येत होता…
मयांक ने आल्या आल्या मालिनीला मिठी मारली..
“काय झालंय तुम्हा बाप- लेकीला” मालिनी विचारते…
“काही नाही, मला तुझा ना नेहमीच अभिमान वाटतो” मयांक असं बोलून बेडरूम मध्ये निघून गेला…
मालिनीला आता समजत नव्हतं की नक्की काय झालंय ते!!
“प्रीशा ला समजाऊन सांगून तिला समजणार नाही आणि मालिनी ला मी हे सांगू शकत नाही कारण प्रीशा तिच्याबद्दल असा विचार करतेय हे सहन च नाही होणार तिला, मी शांत बसूनच पाहतो काय होतंय ते” मयांक विचार करत म्हणाला..
रात्रीच्या जेवणाची वेळ असते..
सगळे बसलेले असतात..
“भारी जेवण बनवलय” मयांक..
“हो का” मालिनी..
“काय मग,कसा चालू आहे अभ्यास..भेटच होत नाही आता आपली..” मयांक सुशांतला विचारतो..
(सुशांत आणि प्रीशा,मालिनी आणि मयांक ची दोन मुले)
“हो ना,बाबा मी क्लास वरून येतो तेव्हा तुम्ही आणि प्रीशा झोपलेला असता आणि सकाळी मी झोपेत आणि तुम्ही दोघे तुमच्या कामाला” सुशांत म्हणाला..
थोडं थांबून….
“ठीक आहे बाबा सगळं,आई असते ना रात्री माझ्यासोबत..खर तर आई ला जास्त त्रास होऊ नाही म्हणून मी क्लास लावला,प्रीशाचा पण अभ्यास घ्यावा लागेल ना म्हणून ,पण आई सारख कोणी सहज भाषेत समजावेल तर ना” सुशांत म्हणाला…
“आई चे लाड ना कोणी कसे करावेत ना ते तुझ्याकडून शिकावं.. हो ,प्रीशा चा नाही घ्यावा लागत काही अभ्यास,तिला विचारलं तर बाबा कडे पळते” मालिनी हसत म्हणाली..
“तेच बाबा- बाबा करणं,किती चुकीचं होऊन बसलंय”मयांक मनातल्या मनात म्हणला..
“मालिनी उद्या मिटींग ला,तू जातेस प्रिशाच्या आणि हो.. परेटिंग ग्रुप च्या इलेक्सशनच्या मेंबरशिप चा फॉर्म पण घेऊन ये ,तुझ्यासाठी”मयांक ने प्रीशा कडे पाहून सांगितले..
“बाबाब…” प्रीशा….
“हो,जाणार आहे मी च…पण लेकीचा हट्ट आहे ना बाबाच हवाय म्हणून” मालिनी.
“हम्म” मयांक म्हणाला.…
सगळ्यांच झालं होतं जेवण…
“मला प्रीशा सोबत बोलायला पाहिजे,मालिनी फक्त एक गृहिणी नाही तर एक माझी सहचारिणी आहे..माझी चालती-बोलती सोबत…तिला आजच समजावून सांगायला पाहिजे…. जो पर्यंत सांगत नाही तो पर्यन्त मला चेन मिळणार नाही” मयांक स्वतःशीच विचारात गुंतला होता…
“ए मालिनी , मी आणि प्रीशा आईस्क्रीम आणायला जातोय,येतो थोड्या वेळात” मयांक ने मालिनी ला आवाज देऊन सांगितलं आणि प्रिशाला सोबत घेऊन निघाला…
“आई ,मी थोड वाचत….आज मला खूप कंटाळा आलाय बघ.. थोड्या वेळात मी पण बाबा आणि प्रीशा कडे जातो” सुशांत म्हणतो,आणि बेडरूम मध्ये निघून जातो…
मालिनी किचन आवरत असते आणि उद्याच्या मिटिंग ला पण कस छान करता येईल याचा विचार डोक्यात घोळवत असते…थोडक्यात तयारी चालू असते ,उद्याची…
“बाबा ,आज अचानक आईस्क्रीम,कस काय ” प्रीशा…
“सहजच,तुझ्याशी बोलायचं होते थोडं”मयांक..
“आई वरून का?? “प्रीशा..
“हो..आईवरून नाही ,आई काय आहे ते ती उद्या दाखवून देईलच पण आता तुझ्या ज्या गृहिणी शब्दाबद्दल”मयांक म्हणाला….
“सॉरी ना बाबा,फ्रँड्स च्या नादात झाले माझ्याकडून” प्रीशा…
“हो ग ,झालं ते आलं माझ्या लक्षात” मयांक..
“पण ना बाबा तरी पण आवडेल मला आई बद्दल अजून जाणून घ्यायला” प्रीशा म्हणते…
तेवढ्यात जोरात पळत पायाचा आवाज येतो…
दोघे मागे वळून पाहतात..
“सुशा…. दादया……”
“हो ,चला म्हणलं आज आहे घरी तर द्यावा वेळ तुम्हाला”सुशांत..
“मग,आई का नाही आली” प्रीशा..
” आई उद्याची तयारी करत असेल, तिला ना खर एकटीला थोडा वेळ हवा असतो, तिझ्यासाठी.. आता वेळ भेटेल ना मग जागरण नाही होणार” सुशांत म्हणला..
” हो ना,माझ्या एवढ्या मोठ्या यशामागे पण तीच आहे खर..तिचे निर्णय म्हणजे विचारविनिमय करून घेतलेले असतात…तुला सांगू का जेव्हा मी जॉब सोडला ना.. तेव्हा घरात माझ्याशी कोणीच बोलत नव्हते… माझ्या अचानक जॉब सोडण्याने सगळेच वैतागले होते… घरची सगळी जबाबदारी माझ्यावर होती ना.. तेव्हा सुशा पण लहान होता ग.. आणि जवळ होते तेवढ्या पैशात घर चालवणं कठीण होते बघ,तेव्हा आई ने खूप साथ दिली…शेवटी तर अशी वेळ आली होती की,सगळं सोडून आपल्याला गावी जावं लागणार होते ,तेव्हा पण ती नाही डगमगली.. आहे त्या पैशात नवीन बिझनेस उभारण्याच धाडस तिने च दाखवलं बघ.. निर्णय घेण्याची क्षमता खूप आहे ,तिच्याकडे आणि तो पटवून पण देण्याची… आज जर मी मोठा माणूस आहे ना तर फक्त तिच्यामुळेच…” मयांक बोलत होता,स्वतःच्या बायको बद्दल आणि मुलाच्या आई बद्दल….
“हो ना, मी आजरी असताना डॉक्टर ने पण साथ सोडली होते पण आई च होती जी ने मला जगवल आणि प्रत्येक वेळी काळजी घेतली…मी नशीबवान आहे की मी जेव्हा पण घरात येईल ना, तेव्हा ती माझ्या समोर असते.. अगदी माझ्या मैत्रिणीची पण मैत्रीण आहे आई…” सुशा म्हणला…
“हो ना, तुमच्या आजी- आजोबांची पण एवढी काळजी घेत असायाची ना की कधी त्यांना स्वतःच्या मुलीची पण आठवण नाही झाली कधी…
फरक एवढाच दिसतो समोरच्याला की ती किचन मध्ये आहे.. म्हणून..
पण आज ती आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन चालतेय.. मी फक्त कंपनी पाहतो रे पण ती घर,मुलं आणि हो,सगळे नातेवाईक पाहते.. आणि स्वतःला पण..”
स्वतःची आवड- निवड पण जपते.. छंद जोपासतो…. आणि आता इंटरनेटवरन छान छान ब्लॉग लिहून स्वतःचे पैसे पण कमावते….सगळ्या बाजूनी ती परिपूर्ण आहे बघ …” मयांकला भरभरून बोलावसं वाटत होते…
पण तेवढ्यात फोन ची रिंग वाजली…लाऊडस्पीकर चालू करतो….
“अहो, कुठेय…उद्या लवकर उठायचं आहे…कधी घेऊन येताय आईस्क्रीम” मालिनी फोन मध्ये बोलत असते..
“आई ,मी प्रीशा… सॉरी”
“का ग,माझं आईस्क्रीम नाही मिळालं का??” मालिनी…
“आई मिळालआहे,आलोच..” सुशा.…
“अशी गृहिणी असल्यावर का नाही कोणाला आवडणार…गृहिणी फक्त घर सांभाळत नसते तर घरी बसून सगळ्या गोष्टी अगदी छान पद्ध्तीने सांभाळत असते….तिला अडाणी समजण्याची तर अजिबात गरज नसते,बॉस समजू शकता.. सावली असते ती…” मयांक म्हणला….
मयांक ला समजले असते आणि त्याने ते अनुभवलं पण असते…. आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने मान्य केलं असते… की गृहिणी नाही ती तर त्याची सहचारिणी आहे…..
गृहिणी होणं सोपं नाही,स्वतःची स्वप्न स्वतःच्याच हाताने तोडून टाकण आणि दुसऱ्याची स्वप्न बनवणं,तस अवघडच…
एका नवऱ्यासोबत ,सावलीपेक्षा पण जास्त कोण असेल ते तुम्हाला समजलंच असेल….
Visit & Subscribe to My Personal Blog site…
मराठी कथा-कादंबरी-लेख – “वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी