मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

ललित लेख

रंगबेरंगी आयुष्य…..

#रंग आयुष्याचे….

रंगाशिवाय नाही रांगोळीला मजा आहे आणि नाही आयुष्याला…

काही रंग छान वाटतात पाहिलं की मन खुश होऊन जाते,मनाला वेगळेच समाधान देऊन जातात,रंग..

म्हणून तर प्रत्येक रंगाला अर्थ आहे आणि प्रत्येक रंगाचं वेगळंच नात आहे..

काही रंग नकोशे वाटतात… भडक नकोच असतात पण भडक रंगामुळे सौन्दर्य अजून खुलून पण दिसते ना!!!

प्रत्येक रंग आपलं वेगळं पण जपून आहे ,त्याचे गुणधर्म ,त्याच अस्तित्व म्हणजेच त्याचा मूळचा गुण आहे..

पण जर सगळेच रंग जर एकत्रित केले तर त्याला काही अर्थ राहत नाही.. त्याच अस्तित्व नीटसं समजलं जातं नाही.. जरी त्याचा रंग काळा झाला तरी तो काळा म्हणूनही प्रसिद्धीत उतरत नाही…

म्हणून प्रत्येक रंगाची एक खासियत आहे आणि जपली पाहिजे आणि समजली पण तर पाहिजेच ना..

आयुष्याच्या वाटेवर, सगळ्यांच्या जीवनात अशीच रंगाची उधळण असते.. काहींना ते रंग वेगल्याप्रकारे जपता येतात तर काही जणांना नाही जमत ते.. 

रांगोळी मधील रंग सगळे मिक्स झाले तर जसे वेगळे करू शकत नाही पण विकत आणू शकतो खऱ्या आयुष्यात असं नाही होत ना.. आयुष्याचा मुख्य रंगच गेला तर तो परत आणता येईलच म्हणून काहीच भरोसा नसतो ना..

सगळ्यांच्या आयुष्यात सगळेच रंग असतील अस नाही पण जे आहेत ते तरी जपता येतात का आपल्याला…???

प्रेमाचा रंग नेहमीच लाल आहे.. पण काहींना लाल रंग म्हणजे द्वेषाचा पण वाटतो.. रक्त पण तर लाल आहे आणि स्त्रीच्या कपाळावरील कुंकु पण लालच आहे ना.. तिच्या सौभाग्याचे लेणं आहे..

फरक तर तेव्हा पडतो जेव्हा समोरच्या नजरेतून तो कसा पहिला जातोय..

कधी कधी कस होत,म्हणजे…

हो… नेहमी सगळ्यांशी छान वागणारी.. सगळ्यांना मदत करणारी… सगळ्याच कामात अगदी परिपूर्ण असणारी.. आणि तेवढ्याच ताकदीने संकटांना सामोरी जाणारी….

पण घरात ती सगळ्यांना नाही आवडत ना… काही लोकांना ती छान वाटते तर काहींना खूपच धूर्त वाट्ते..

तिचा मूळचा रंग फक्त तिला माहीत आहे,पण स्वतःला सगळ्या रंगात ती मिसळून घेऊन स्वतःच  अस्तित्व टिकवून आहे… प्रत्येक वळणावर आयुष्य बदलत असते,कधी चांगले दिवस असतात तर कधी वाईट असतात…

आयुष्याच्या प्रत्येक रंगामध्ये आपल्याला ढळता आलं पाहिजे,कधी पिवळा रंग बनून सगळ्याची मैत्री टिकवता आली पाहिजे तर कधी पांढरा रंग बनून शांतता टिकवता आली पाहिजे,आपल्या सभोवती हिरव्या रंगाची उधळण नेहमीच भरभराटीचे लक्षण आहे..तसेच आयुष्यात नेहमी सातत्य राहावं म्हणून नारंगी रंगाला प्राधान्य आहे..

 परिस्तिथी नुसार रंग बदलणारा तो गिरगीट..स्वतःच्या रक्षणासाठी तो वारंवार रंग बदलत असतो आणि समोरच्या परिस्थितीत स्वतःला सामावून घेत असतो पण हे सगळं करत असताना आणि वारंवार रंग बदलत असल्यामुळे त्याच स्वतःच अस्तिव मात्र तो विसरून जातो.. म्हणून च की काय गिरगीट सारख वागणं कोणाला नको असते..

पण जर स्वतःच अस्तित्व जपत स्वतःला सगळ्यांसोबत सामावून घेत,परिस्थिती नुसार सगळ्यांसोबत जर चालत राहिलो तर हेच रंग आयुष्य परिपूर्ण करायला मदत करतील..

अस होऊ शकते ना?????

जस बागेतील विविध फुल मनाला मंत्रमुग्ध करून सोडतात ना तसेच काहीसे आपलं आयुष्य असावा..

एखादा टॅग घेऊन जगण्यापेक्षा प्रत्येक टॅग,प्रत्येक परिस्थिती नुसार वापरता आला पाहिजे,तर खरी मजा आहे…

परिस्थिती नुसार रंगाचे प्रतीक समजून आयुष्य सुंदर करायचं आहे,पण योग्य वेळी आणि योग्य रंग परिधान करून,सत्याची कास धरून..नाहीतर प्रत्येक वेळी रंग बदलत राहिलो तर गिरगीट नावाचा टॅग पण लागल्याशिवाय राहणार नाही..

गिरगीट न होता आयुष्याचे रंग जपन ही कला फक्त आपल्यातच!!!

राहिला विषय बाहेरच्या रंगाचा तर ते काही खास मॅटर करत नाही.. आणि जरी केलं तर मेबलीन आणि लॅकमे आहेतच की ढीग भर शेड घेऊन आपल्याला रंगवायला…

ते जातील हो रंग पुसून पाण्याने आणि हो नाहीच गेले पाण्याने तरी मेकअप रीमुवर असतेच की…

पण आयुष्यात असे रंग भरायचे आहेत जे कशानेच  आणि कधीच पुसले गेले नाही पाहिजेत.. तर ती आपली ओळख असली पाहिजे.. आपलं अस्तित्व असल पाहिजे…

आयुष्यातील रंग म्हणजे आपली ओळख आहे…!!!…..

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: