ध्येयवेडी- मंगल (लघुकथा )
“ध्यास ध्येयाचा अविरत असावा,प्रयत्नांचा आनंद मनी रुजावा”
उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहणं म्हणजे त्याला कतृत्वाची जोड असावी लागते,अंधारलेल्या रात्री तर रोजच स्वप्न पडते,त्याच स्वप्नात रमून अंथरूणावर लोळत,बसावं वाटत पण जेव्हा स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहतो तेव्हा मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.असच एक स्वप्न पाहिलं,मंगल ने आणि ते पूर्ण करण्यासाठी नशीबाशी लढली.
घरची परिस्तिथी तशी हलाकीचीच,पण जगण्याला उमेद लागते मग मात्र परिस्तिथी बदलण्याची ताकद आपोआप मिळते.
मंगल,वयाने खूपच लहान पाच भावांमधील दोन नंबरची मुलगी,जस कळायला लागलं तस जगण्याची धडपड तिला दिसत होती, प्रत्येक गोष्टीसाठी कसरत करावी लागतात ती पाहत होती.
एक ना एक दिवस नक्की सगळं बदलेल एवढीच आशा..
“आज एवढा उशीर का केला घरी यायला,मंगल??” मंगलची आई विचारते.
“अग, आई माझा ड्रेस सगळा फाटला आज रानात शेरड राखताना,मग गावातील सगळी पाहतील ना म्हणून म्हणलं,अंधार पडल्यावर जावाव घरी”मंगल आईला सांगत होती ,ह्या गरिबीचा तिला आता तिटकारा आला होता.
“पेट झाला,या जगण्याचा नको नको झालाय” मंगलची आई म्हणाली.
“नको काळजी करू आई तू,मी आणि अण्णा खूप शेतात काम करू आणि सगळं नीट करू, जातील हे दिवस पण… आज खायला काय केलंय ग” मंगल.
“आज एवढंच ज्वारी भेटली ,त्याच्या भाकरी सगळ्यांना नाही पुरायच्या त्यामुळे ह्याच्या लाह्या करून घेते आणि लाह्या खाऊन वरून पोट भर पाणी पिऊन घ्या,म्हणजे रातच्याला झोपा पण लागतील, अण्णा,मंगल,आप्पा, संगी आणि किसण्याला पण तेच खावा”मंगलची आई अंधाऱ्या रात्रीत मंद प्रकाशात अजूनच गरिबीची शिकारी दिसत होती.
तसा,अण्णा मोठा त्यानंतर आप्पा आणि संगी ,किसना लहान होते,अण्णा आणि आप्पा शाळेत जायचे पण मंगल ला काही शाळेत जाता येत नव्हतं,संगी आणि किसना खूपच छोटी होती त्याच्यामुळे आई कामावर गेल्यावर त्यांना सांभाळायला त्यांना लागत असायचं.
त्यादिवशी मात्र अभद्र च घडलं,आणि मंगलची साहसी वृत्ती सगळ्या गावाने पाहिली….
“आज शेळ्या बुजत बुजतच खातायेत,कस तरी करुन एवढ्या शेळ्या वाढवल्या आहेत आणि आता ह्यांना वाढवून ,विकून काय पैसे येतील,त्यात घराचं थोडं काम करून घेऊयात,”मंगल एका दगडावर बसून शेळ्यांकडे पाहत होती.
तेवढ्यात समोरून तिने लांडगा आला आणि लांडग्याची सगळी नजर मंगलच्या शेळ्यांवर होती.
शेळ्या वाचवण्यासाठी मंगल लांडग्याच्या समोर आली ,स्वतःच्या जीवाची बाजी लावली.
अगदी प्रसंगधाव राखून तिने समोरच दगड उचला आणि लांडग्याच्या डोक्यात घातला आणि मोकळा श्वास सोडून ,जोरजोरात रडली…
शेळ्या वाचल्याचं आनंदही जास्तच होता ,स्वतःच्या जीवापेक्षा…
तिच्यासाठी शेळ्या म्हणजे जीवन जगण्याचा साधन होते.
“बाळा,तुला काय झालं असते तर” आई मंगल ला म्हणाली.
“मला काय कसं होईल ग, माझ्या डोळ्यात तुम्ही सगळे आहेत ना” मंगल म्हणाली.
मंगलच्या आईने मंगलला जवळ घेतलं आणि दोघी उद्याच्या दिवसाची वाट पाहू लागले…
“आई ,कधी ग संपणार हे सगळ,संपेल ना सगळं ,नाही संपलं तर मी संपावेन”मंगल आईशी बोलत बोलत झोपी गेली.
घरातील पडतील ती काम ,शेतातील काम ,कधी कुठे रोजाणे भेटतिल ती काम मंगल अगदी जिद्दीने करत होती,कोणत्याही कामात तिला कमी पणा वाटत नव्हता, डोक्यात एकाच विचार असायचा पोटाची खळगी काशी भरायची आणि आपली चार भावंड कशी मोठी करायची.
दिवसामागून दिवस सरत होते,परिस्थिती तिची कूस काही बदलत नव्हती ,परिस्तिथी शी तडजोड चालूच होती.अण्णा ने पण तिचे शिक्षण आता सोडलं होते,लिहायला वाचायला येईल एवढंच त्याने पण शिक्षण घेतलं आणि बहिणीला साथ देण्यासाठी दोघांनी मिळून कष्टाची सांगड घातली.
दोघांच्या कष्टाने परिस्तिथी थोडी फ़ार बदलत चालली होती,आता दोन वेळेचं जेवण तरी मिळत होते आणि अजून थोडी फार जमेलतस शेती करत होती. सुख काय असते ते काही मंगल ला माहेरी मिळालेच नाही.
कुठे सुखाचे दिवस डोकं वर काढत होते तर मंगल चे लग्न करण्याची वेळ ही जवळ आली होती.लग्नानंतर तरी दिवस चांगले असतील अस सगळ्याच मुलींना वाटत असते आणि मंगल ने पण हाच विचार केला पण स्वप्न ही तुटण्यासाठीच असतात,असच काहीसं तिच्या बाबतीत झालं.
लग्न करून मंगल सासरी तर आली पण म्हणावं तस काही सासरची परिस्तिथी पण नव्हती. लग्नाला महिना पण झाला नाही आणि मंगल दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊ लागली.
मंगल च शिक्षण कमी होते पण बुद्धी भयानक तल्लख होती, हिशोब मध्ये तर एखाद्या शिक्षकाला मागे पाडेल एवढं तीच ज्ञान होते.मंगल ला फक्त वाचायला जमत नव्हतं आणि लिहायला पण व्यवहारज्ञान मात्र उत्तम दर्जा चे होते आणि हुशारी हीच तिची ओळख होती.
वारसा हक्काने मिळालेली जमीन थोड्या जमिनीचे तिने सोन केलं आणि यासगळ्यात तिला तिच्या नवऱ्याची पण चांगली साथ लाभली.
उघड्या डोळ्यानी स्वप्न पाहणं आणि ते पूर्ण करण्याची धमक च लागते ते काही खोटं नाही.
“आपल्या मुलांना आपण खूप शाळा शिकवायची,मला नाही भेटलं शिकायला पण ह्यांना खूप शिकवायचं” मंगल चुलीला जाळ घालत नवऱ्याला सांगत होती.
“माझी जी हौस नाही झाली ती पण सगळी पूर्ण करायची,आता मला पण चांगला पगार चालू झाला आहे ,आणि तुझ्या शेतीची जोड सगळी परिस्थिती लवकर बदलेल.
तुटपुंज्या पगारात आणि वडिलार्जित भेटलेल्या जमिनीमधून कष्टाची जोड देत ,मुलीला त्यांनी स्वतःच्या पायावर उभे केले ,तिला चांगलं शिक्षक बनवले आणि मुलाला अधिकारी बनवण्याचं स्वप्न पण तिने बाळगलं आणि पूर्ण केलं.
स्वतःच्या आई कडूनच मुलांना बाळकडू मिळालं होतं ,पाहिलेली स्वप्न नक्की पूर्ण होतात फक्त ती उघड्या डोळ्यांनी पहिली पाहिजे आणि सतत ती अखंड ज्योती सारखी तेवत ठेवली पाहिजे.
पायरीवर बसुन मंगल तिच्याच विचारात बसली होती,”आज हा दिवस यावा म्हणून मी रोज प्रार्थना करत होते,फक्त आजचा दिवस याववं म्हणून स्वप्न तर माझ्या डोळ्यात होते पण आज जेव्हा ते स्वप्न मी उघड्या डोळ्यांनी पाहतेय तेव्हा विश्वासच बसत नाही,पाहिले दिवस आठवले तरी अंगावर काटा येतो,गरिबीसारखी आग जगात कुठेच नसेल,लहानपणीच बालपण हिरावून घेतलं,माझं शिक्षण ,शाळा काय असते ते सुद्धा माहीत नाही मला,नाही मला मैत्रिणी आणि नाही कोणी नातेवाईक,तरुणपणातील नखरे पण सगळे गेले,वाढत्या वयाबरोबर सगळंच हिरावून घेतलं फक्त काम आणि कामच करावं लागलं,त्यावेळी काम नसते केलं तर आज अस निवांत पण बसता आले नसते. माझ्या भूतकाळावर माझं भविष्य आहे खरं,आणि ह्याच माझ्या भूतकाळावर कोणी विश्वास पण ठेवनार नाही,पाहणाऱ्याला फक्त आज माझा बंगला दिसतोय पण त्यामागची यातना दिसत नाही.डोळ्यांना पण ते दिवस पाहू वाटत नाही ,आजचा दिवस साक्षीदार आहे त्या मागच्या कष्टाला आणि माझ्या स्वप्नांना.हो,हे पण नक्की आहे आजच्या वर्तमानकाळावरच उद्याच भविष्य आहे,” मंगल विचारत असतानाच तिच्या हातातील चहा कधी संपला हे पण नाही समजलं,तेवढ्यात आवाज आला तिकडून.
“किती सुंदर घर आहे हे,किती श्रीमंत असतील ना ही लोक” बाहेरून जाणारी छोटीशी तोडकरी मुलगी बंगल्याला न्याहाळत होती ,आणि तिची आई पण.
“गप,बाय आपल्या नशिबात नाही असल घर” तोडकरी मुलीची आई म्हणाली.
मंगल हसत होती जणू तिला तिच्यात छबी दिसत होती.
आज मंगल कडे सगळं आहे,तिचा स्वतःचा बंगला आहे,खूप सारी जमीन आहे,तिची मुलं चांगल्या हुद्द्यावर आहेत, घरात आणि शेतात पण कामाला लोक आहेत,आज सगळं आहे तिच्याजवळ आणि सगळ्यात मोठ म्हणजे तिच्या मुलांची ती प्रेरणा आहे,कधीही हार न मानण्याचा अखंड स्रोत आहे,मंगल. नसेल झालं शिक्षण तिचे पण जी परिस्तिथी आली त्या सगळ्या परिस्तिथी वर मात करून आज ती एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनली आहे.
ध्यास ध्येयाचा असावा आणि अखंड ज्योत कर्तृत्वाची असावी…
www.inspireinmarathi.com