सासूबाई,मी तुमची कोण??”(वैचारिक कथा)
“सासूबाई,मी तुमची कोण??”
आता सासू म्हणल की ,सासू कोण असते आपल्या नवऱ्याची आई…..
आई ही आई असते ना पण…
म्हणूनच तुमच्या मानाचा आणि तुमच्या माझ्यावर असणाऱ्या अधिकाराचा विचार करूनच मी शांत आहे….
मी ज्याच्यावर जीवापाड प्रेम करते ना त्याच्या तुम्ही आई ,त्यांच्या आई म्हणल्यावर माझ्या पण आईच ना!!!
मला माहित नाही,पण तुम्ही माझ्याशी अस काही वागलात की आता मला च प्रश्न पडतोय की मी,”सासूबाई ,मी तुमची कोण???”…..
लग्न करून घरात आले मी,मागचं सगळं मागेच सोडून पुढे आले,मी पण वेडीच की मागचं धरून पुढे येयच असते ,सगळं सोडून नाही हे मला तिथे आल्यावरच समजलं.
जीवापाड प्रेम करते मी तुमच्या मुलावर,आणि तो पण त्याचा माझ्यावर जीव आहे म्हणून तरी….
मी आज ज्या अवस्थेमधून जातेय त्या अवस्थेमधून तुम्ही पण कधीतरी गेलाच असताल ना,
अपेक्षाच काय होती माझी????
माझं लग्न झालं म्हणून तुम्ही माझं शिक्षण सोडायला लावलं,नडीच्या काळात ज्या आई – वडिलांनी एवढ्या खस्ता खाऊन मोठं केलं त्यांनाच मदत करून दिली नाही…
आई आहात ना तुम्ही,मग का नाही समजू शकला तुम्ही सगळं…..
माझ्यासाठी तर सगळं हे नवीन होते पण तुम्ही सून होऊन मग सासू झालात ना…..
तुम्हाला वाटलं नाही का, की सुनेला आपल्या आधाराची गरज आहे म्हणून….
सून घरात घेऊन आलाय तुम्ही ,एक स्वतःच अस्तित्व असलेले नवा जीव, उलट अस नाही की तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागणारी वस्तू….
माझे आईवडील घरी आले तर तुम्ही साधं बोलत नाही त्यांच्यासोबत,का वो एवढा उर्मिटपणा….
मुलगी नाही तुम्हाला आता पण तुम्ही पण कधी तरी सून होताच की….
माझ्या बापाने त्यांच्याजवळ पैसे नसताना ,कर्ज काढून मला चांगलं शिक्षण दिले, स्वतःला स्वावलंबी बनवलं पण तुम्ही तर माझं स्वावलंबन च हिरावून घेतलं की…..
अस का बरं….
मी मुलगी आहे म्हणून का?? मी एक सून आहे म्हणून……
एवढंच नाही,तर मी माझे दागिने मी तुमच्याकडे सोपविले,का मला ते सांभाळता येत नव्हते म्हणून नाही…. माझं जे आहे ते सासुच पण आहे हे माझ्या आईने मला सांगितलं होतं… आणि कारण दुनियेची रीत आहे ना सासूचे सुनेला वारसाहक्काने मिळतच म्हणून….
मी माझं तुम्हाला दागिने दिले,ठेवण्यासाठी तुम्ही मोठ्या आहात घरातल्या म्हणून ….
पण तुम्ही तर ते मोडून टाकले, मला विचारायची तसदी पण नाही घेतली…
तुम्हाला माहित आहे,माझ्या आई – बापच रक्ताचा घाम आहे त्या दागिन्यांमध्ये…
त्यात फक्त सोन्याचा भाव नाही किंवा मिरवायची वस्तू नाही..
पोटाला तिढा टाकून ,आपल्या पोरीसाठी आयुष्याची कमाई असते त्यांची….
तुम्ही अगदी कवडीमोल भावात विकली पण ती….
जेव्हा तुमचा मुलगा मला घाण घाण शिव्या देतो,तेव्हा तुम्ही फक्त बघ्याची भूमिका घेता…
हेच तुमच्या मुलीसमोर झालं असते तर….
आई आहात ना,मग तुमच्या मुलाला तुम्ही स्त्रीचा सन्मान नाही शिकवला का???
स्त्री कोण आहे,तिचा आदर करायला नाही शिकवलं का????
तुमच्या डोळ्यासमोर तो चुकतोय मग तुम्ही डोळे बंद करून कसं बसू शकता….
आई ही आईच की फक्त एका मुलाची आई होण्यापेक्षा घरातील सगळ्याच तुमच्या पेक्षा लहान असणाऱ्यांची आई का नाही होऊ शकत…
घरात थोडं काही झालं की समजावण्याची भाषा तुम्ही अगदीच विसरून जाता आणि भांडण चालू करता…
तुमच्या मुलाने किंवा मुलीने हीच चूक केली तरी तिच्यावर थोडं रागावून परत मायेने जवळ घेताच ना,मग माझ्याशी चार – पाच दिवस अबोला का असतो…..
मी पण बाहेरच राहते माझ्या आईवडील यांपासून लांब तुमच्या मुलाची बायको म्हणून आणि तुमचा मुलगा पण राहतो माझ्यासोबत माझा नवरा म्हणून,आमच्या कामामुळे राहतो आम्ही शहरात अगदी आनंदात,पण गावी येयचे म्हणलं ना की तुमचं वागणं आठवत आणि मनं च तयार होत नाही यायला…
किती आनंद होतो तुम्हला मुलगा आला म्हणून पण सून दिसल्यावर साधं तिच्याशी बोलत पण नाही तुम्ही…
बाहेरून आलेल्याला पाणी देणे ही आपली संस्कृती आणि संस्कार आहे ,एक ग्लास मुलाला देता त्यांच्यासोबतच सुनेला दिला तर आयुष्यभर आठवणीने तिच्या तुमच्या मनात आदरच राहनार आहे..
तुम्हाला मान देणं सुनेचे कर्तव्य आहे ,तो तुम्ही वयाने मोठे आहात म्हणून मान आहे पण जर तो मान मनातून आला ,तर सासू – सुने मधील अंतर राहील कशाला…. सगळा गॅप भरून निघेल…
दिवसभर घरात आपण दोघीच असतो, त्या दोघांना बाहेरची काम आली तर ते आठवडाभर घरी नसतात मग आपण चांगल्या मैत्रिणी तर होऊच शकतो ना….
मैत्रीचा हात तर धरू च शकतो ना…
घरातील सगळेच वातावरण हसतमुखाने नाही का रहाणार….
तुम्ही तुमच्या नातेवाईक किंवा मैत्रिणीने कडे जाता,तेव्हा तुम्ही माझ्या बद्दल तुम्हाला न अवडलेल्याच गोष्टी बद्दल सांगता ,कधी कधी बाहेरच्या लोकांना आपलं काहीच न सांगणं च जास्त गरजेचे असते पण जर सांगितलं तर चांगलंच सांगा ना,थोडं कौतुक तर करूच शकता ना…..
कारण, चार भीतीमधील गोष्ट तेव्हाच बाहेर जाते जेव्हा त्या चार भिंतीमधल्या व्यक्ती ती बाहेर काढतात…
मग तुम्हीच ठरवा… तुम्ही काय करताय ते…
आता प्रश्न असेल की हे सगळं सासू ने च का करायचं…
तर सासू ने सून पण अनुभवलं आहे पण सून तर अजून नवीन आहे ना….
तिला गरज आहे सासुमधील आईची,जी नेहमी पाठीशी उभी असेल एक स्त्री म्हणून नेहमी खंबीर…
सगळ्यात सुंदर काय आहे माहीत आहे,तर ते आई होणं….
जन्म देऊन आई होणं,ही निसर्गाची किमया पण मनाने आई होणं ही तुमची वृत्ती…..
तुमच्यातील आई एकदा सगळ्यांना दाखवाच मग बघा,सुनेला कधी परक नाही वाटणार सासर..
सासरची ओढ सासू ने निर्माण करायची असते,सुनेला ती लादवायची नसते….
नक्की वाचा हा भाग आणि पुढचा भाग पण ,आई नावाच्या शब्दात काय काय ताकद आहे ते आपण पाहणार आहोत आणि comment करायला विसरू नका आणि rating पण….
Copyrights : Inspire In Marathi