एक दिवस तुळजापूरला…
एक दिवस तुळजापूरला…
दिवस असा असावा,विसरता विसरता नव्याने आठवावा… मनाला नवीन काही देऊन जाणारा आणि अशी काही शिकवण देऊन ,विचार करायला लावणारा….स्वतःला काहीतरी कृती करायाला भाग पाडणारा!!!
वार शुक्रवार
छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्यदैवत अस ठिकाण ,जे नेहमीच महाराष्ट्राच्या प्रत्येक काळजात आहे,जिथे पाहतच क्षणी मस्तक टेकते आणि लढण्याची ताकद तेथूनच मिळते. सगळ्या महाराष्ट्राला ला अविरतपणे लढाऊ वृत्ती प्रेरित करणारी आपली तुळजाभवानी माता…
तुळजापूर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील गाव आहे,तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलपिता आहे. कुलस्वामिनी म्हणजे महाराष्ट्रातील लोकांची अग्रगण्य देवता. तुळजापूरच्या या तुळजा भवानी मंदिराचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर दक्षिणेकडे तोंड करून दिसते. तुळजाभवानी ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक ठिकाण आहे.
त्यादिवशी, सकाळी साधारणतः तिथे पोहचायला जवळ जवळ अकरा वाजलेच होते,गर्दी तर खूप होती तसा वर्षातील आजचा शेवटचा दिवस त्यामुळे आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा शुक्रवार पण होताच की,भाविकांनी कमालीची गर्दी केली होती. सगळं वातावरण गर्दीने भरून गेले होते,सगळे घाईत होते,तोंडाचे मास्क सांभाळत काही जण तोंड रुमालाने झाकत ,आपल्या जवळच्या लहान मुलांना ओढत देवीच्या दर्शनासाठी जमेल तसं येत होते. तशी सगळ्यांच्या चेहऱयावर कोरोनाची भीती तर होतीच पण देवीला जाण पण तितकेच म्हणत्ववाच वाटत होते,त्यात नव्याने ओमायक्रॉन नव्याने आला होता, त्याच वेगळंच दडपण. काहींनी लस घेतल्या असतीलही पण काहींनी बनावट लसीची कागदपत्रे पण बाळगली होती.
असो,ओढ होती देवीच्या दर्शनाची,किती ही केलं तरी ती भक्तीच. मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे मंदिर पण बंद होती आणि अजून नवीन लॉकडाऊन पडले तर दर्शन होणार नाही याची पण शंका मनात येतच ना!
तुळजापूर मध्ये पोहचलो आणि पाहिले दर्शन झाले,ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरच्या,मोठ्या ऐटीत घोड्यावर बसलेले राजे पाहिले ना की मराठ्यांच्या रुबाबची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.
तिथून आत गेल्यानंतरच रेलचेल चालू होती ती, पुजाऱ्यांची… गाडी मधून उतरू पण देत नाही,तो पर्यंत जोर जोरात ओरडत असतात म्हणजे आपल्याच सेवेसाठी तत्पर असतात,आपण आपल्याच भवानी मातेच्या दर्शनाला त्यांच्या तुळजापूरला आलोय असं काहीसं त्यांना वाटत असावं,आपल्याला पण तसं फारस काही माहीत नसते त्यामुळे आपण नव्याने आलो असेल तर नक्कीच पुजारी यांची मदत घेतो पण जून झाल्यावर…….
“अहो, काका इकडे या,एका तासात दर्शन करून देतो,आणि गाडी लावायची पण सोय आहे ,तुम्ही शिदा आणलाय का तुमचा नेवेद्य पण देवीला दाखवतो,जेवण करूनच जायचं तुम्ही” पुजारी गाडी थांबवून सांगत होता.
“नाही ,नको” म्हणत गाडी पुढे जे संस्थानाने ठरवून दिले आहे ते पार्किंग आहे तिकडे घेऊन जायचं, कारण तसे बोर्ड लावलेले असतातच ना…
“बापरे, केवढी ही गर्दी गाडी लावायला जागा नाही ,आता गाडी लावायची कुठे,कुठे लावावी कळत नाही,गाड्यांच्या संख्येवरून कल्पना येत होतीच की मंदिरात भाविक किती आणि कुठून कुठून आले असतील,गाडी लावायची म्हणजे सुरक्षित ठिकाणीच लावावी लागेल,सगळंच बहुमूल्य समान तर घेऊन जाऊ शकत नाही,ना आपण मंदिरात ; दर्शनाच्या नावखाली चोरांचा पण सुळसुळाट असेलच की नाही म्हणत तरी मनात येऊनच गेलं.तस मनात येन चुकीचं च,देवीच्या दारात अस का करेल भलं कोणी???”
“हो ना,पटलं ना तुम्हला पण”….
शेवटी मग ,साधारण तरुण वयातील मुलगा थोडा सुशिक्षित दिसत होता, जरा बराच… “चला माझ्या घराजवळ गाडी लावायला जागा पण आहे आणि तुमचं एका तासात दर्शन करून देतो,तुमच्या जेवणाची सोय पण करून देतो ,शिदा आणला असेल तर नेवेद्य पण दाखवुन घेऊयात” पुजारी नेहमीच्या शैलीत बोलत होता.
“ठीक आहे, आता जास्त फिरण्यात मजा नाही,असं पण सगळीकडे एवढी गर्दी होती ना की कुठे थांबन पण शक्य नव्हतं,म्हणून पुजाऱ्यांच्या मदतीने दर्शन घेऊ म्हणजे जरा लवकर होईल या विश्वासावर आम्ही त्याच्यासोबत गेलो.”
तसं जेमतेम जागेत घर, आता एवढी लोकांची रेलचेल म्हणलं की घाण आलीच.स्वछता खर व्यक्तीत भाग आहे ,अस मला वाटते प्रत्येकाने जर ठरवलं की मी सस्वछता बाळगेलं अस म्हणलं तर घाण नावाचा प्रकारचं होणार नाही,असो.
“तुम्हाला फ्रेश होयच असेल तर होऊन घ्या,आणि हो अगदी निवांत राहा,तुम्हाला साडी- चोळी ओटीच सामान देतो इथूनच घेऊन जा आणि लगेच गाभाऱ्यात दर्शन पण देतो, नऊवारी साडीचे होतील साडे सातशे म्हणजे सगळंच आले त्यातील” पुजारी सांगत होता.
“आता,नऊवारी साडी म्हणलं की थोडी महागच असते म्हणून आणि दर्शन पण होईल म्हणून ,देऊन टाकले पैसे,म्हणजे तसे तिथे पैसे आधीच द्यायचे होते आणि मग बाकी काय असेल तर,तसा पुजारी भला माणूस वाटला”
त्याने दिलेले ताट आणि एक त्याच्या नावच कार्ड घेऊन आम्ही सगळेच मंदिरात निघालो,काय ते बांधकाम मान उंच करून पाहावं लागत होते ,खूप मोठ्या अक्षरात “आई साहेब ” नाव…दगडी म्हणजे अखंड बांधकाम… पाहवत राहावं अस…
बाहेरच्या बाजूला खर बोर्ड होता प्रशासनाचा तिथे ई-पास मिळत होते,पन्नास रुपयात आणि लगेच दर्शन पण होते. पण ई – पास च्या भानगडी पेक्षा आम्ही पुजारी निवडला होता ना…
आता,अस वाटलं डायरेक्ट देवीच्या गाभाऱ्यात दर्श मिळेल म्हणून सगळे खुश होतो,पहिली लाईन चालू झाली आता ही संपली की मग दर्शन भेटेल पण अस काही झालेच नाही चार मजले लाईनला थांबवा लागले आणि तेवढेच उतरून परत पहिल्या मजल्यावर दर्शन करायला मिळाले,गाभाऱ्यात गेलो तर एक हाताने पुजारी ओढत होते आणि ‘देव बघा,” एवढं म्हणून बाहेर पण काढत होते,ओटीच सामान तर बाजूलाच राहिले पण फक्त साडी घेतली आणि देवीची मूर्ती तेवढी पाहायला भेटली,हात पण जोडून दिला नाही..
फक्त एकाच आरडाओरडा होता,”बाहेर चला,काढा बाहेर,पटापटा आवरा”सगळे पांढरे धोतर घातलेले नावाचे पुजारी…
कदाचित,कालच कोल्हापूरच्या राजाच दर्शन घेऊन आलो होतो ,म्हणजे जोतिबाचे दर्शन.तिथे मात्र सगळं शिस्तीत झाले होते,पुजाऱ्यांनी ठरल्या प्रमाणे डायरेक्ट गाभाऱ्यात दर्शन करून दिले होते आणि ते पण अगदी निवांत दिवशी गप्पा मागण्या इतपत… जे त्यांना जमत ते तुळजापूरच्या प्रशासनाला नाही जमू शकत का???
देवाच्या दारात समाधान का भेटत माहितेय का कारण तिथली लोक जे खूप श्रद्धेने त्याची पूजा करत असतात ,भाग्य समजत असतात आणि अविरत तोंडात साखर ठेवून आणि मानत प्रेमाचा भाव ठेवून पूजा करत असतात ,तेच जर हरवलं तर मग काय उपयोग होणार ,मग तर देव आपल्या घरात पण असतोच की ,मनुष्य कधी वरचढ होऊ नाही शकत पण …..
असो,अजून काय बोलायचं…..
आता मात्र डोक्यात सनक गेली होती,सकाळी बारा वाजल्यापासून लाईनला थांबलो होतो आणि आता कुठे अडीच वाजता दर्शन मिळालं होतं ते पण अस की जणू कुठे शोपीस पाहतोय.
काय हे,कसला हा गोंधळ… म्हणजे पुजाऱ्याने खोटं बोलून पैसे घेतले का??? मनात न राहून विचार येत होता परत अस वाटलं देवीचा भक्त तो अस का वागेल…. आणि अस ही तो त्याच काम करत होता ,भक्तना दर्शनाला घेऊन जाण हा त्याचा धर्म होता आणि उदरनिर्वाहासाठी तो पैसे कमवत होता आणि बळीचा बकरा मात्र भावीकच होत होते.
खूप पश्चाताप होत होता,उगीच पैसे दिले म्हणून शेवटी लाईनला थांबायचं ते थांबावं लागलच ना…
पण परत मनात आले,आपण पण तर लवकर दर्शन मिळावं जास्त उशीर नको म्हूनन गेलो ना…
चूक कोणाची आणि बरोबर कोणाचं माहीत नाही पण आज देवीच्या दारात ती प्रसन्नता हरवली होती… सगळीकडे फक्त ओढाओढीच चालू होती…. मंदिरात असून पण ती भावना नव्हती… मन तृप्त झालं नव्हतं.. पुजाऱ्यांच्या बोलण्याला बळी पडण्यारांची संख्या काही कमी नव्हती, त्यामुळे साध्या आलेल्या भाविकांच्या मनातले बोल नकळत का होईना तिथल्या परिस्तिथी वर पडत होते. तृप्त अस कोणीच नव्हते,सगळू त्रागा होतो.
जी ऊर्जा घेऊन जायला आलो होतो ती ऊर्जा काही मिळाली नाही,देवी तर सगळयांना च्या मध्ये राहून कसं एवढं सहन करत असेल याची नकळत जाणीव होत होती.. आणि परत एकदा सहनशक्तीच दुसर नाव स्त्री का हे समजलं….
दोष कोणाला द्यायचं,आम्ही नवीन होतो आणि आमच्याकडे पैसे होते म्हणून आम्ही पुजाऱ्याकडे गेलो आणि त्याने त्याचा मोबदला घेतला….. मग पुजारी वाईट कसा…..
जर आमच्याकडे पैसे नसते तर आम्ही सरळ मार्गाने च दर्शनाला गेलो असतो ,त्या लाईन आमच्यासाठी कदाचित काहीच नसत्या वाटल्या….
शेवटी चूक आणि बरोबर काय हे परिस्थिती पेक्षा जास्त कोणालाच माहीत नसते,मग ते देवाच्या गाभाऱ्यात का असेना….