राजमाता जिजाऊ..
दिनांक 12 जानेवारी…
राजमाता जिजाऊ जयंती…
राजमाता जिजाऊ ह्या लाखोजी जाधवांच्या कन्या,त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई.
त्यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा ,बुलढाणा जिल्हा इथे झाला.
जर १५९८ साली त्यांचा जन्म झाला आणि आज २०२२ साली पण सगळ्यांना अस वाटते की आपण पण जिजाऊ सारख का नाही जगू शकत,जेव्हा शिवाजी महाराजांसारखा पुत्र पाहिजे असतो तेव्हा पण आठवते ती जिजाऊ माता.
लहानपणापासून त्यांनी युद्ध कलेचे आणि राजकारणाचे धडे घेतले होते आणि ते आत्मसात करून वेळप्रसंगी त्यांची प्रचिती पण दाखवली आहे.
जिजाऊ यांच लग्न शहाजीराजे भोसले यांच्यासोबत झाले खर पण सासर आणि माहेरच्या वैरात जे त्यांनी अनुभवलं ते कोणाच्याही आयुष्यात परत कधीच येऊ नाही म्हणून काळजी घेतली आणि ती दाखवली ही.
सई बाईंना त्यांचं माहेर तुटू नाही म्हणून शिवाजी महाराजांना समजवणाऱ्या पण त्याच होत्या.
कोण होती जिजाऊ???
याचा जेवढा विचार करायला जातो ना तेवढं ते अजूनच खोल होऊन जाते.
जेव्हा आरशात पाहतो ना तेव्हा आरशा शेजारी पण जिजाऊंचा जर फोटो लावला ना ,तरी चुकीचं काम करताना स्वतःच तोंड आरशात पाहू वाटणार नाही.
शहाजी राजांच्या सोबत लग्न करून पण वैर संपलं नव्हते,स्वतःच्या पोटच्या लेकीला अस वणवण भटकताना पाहून लाखोंजी रावांचा राग शांत करत,बापाकडे कोणतीही तक्रार न करता ,स्वतःच्या घरी म्हणजे शिवनेरीला सोडा म्हणायची ताकद फक्त जिजाऊ मध्ये,ते पण पोटात बाळ असताना…
का,तर नवऱ्याच्या वाईट परिस्थिती आणि नवऱ्याचं वैर असताना माहेरी जाण म्हणजे सासरचा अपमान आहे ,अस त्या समजत होत्या आणि मानत पण.
आणि आता आपण बापाने म्हणो किंवा न म्हणो थोडं काही झालं की भरली बॅग आणि निघालो माहेरी का तर ते पण माझंच घर आहे ना,तिथेच येऊन रात्र पण पुरत नाही सासरच्या लोकांना नाव ठेवायला, उणी दुणी काढायला,कुठेय आपल्यातील जिजाऊ……
ज्या गोष्टी पटत नाही त्या गोष्टीला धैर्याने सामोरे जाण्याचं बळ त्यांच्यात होते,माणूस म्हणून जगताना आपण जनावरपेक्षा कस वेगळं हे वाईट वृत्तीच्या लोकांना त्यांनी सांगितलं.
स्वतःच्या जाऊ बाई पाणी आणायला नदीवर गेल्या असता त्यांना मुघलांनी पळवून नेले,तेव्हा त्यांची मनाची झालेली घालमेल आणि स्त्री एवढी असुरक्षित का म्हणून ना ना मनात येणारे विचार त्यांनी अनुभवले होते.
जिजाऊंना दोन च मुलं होती,मोठा संभाजीराजेआणि छोटा आपले शिवाजी राजे.
शिवाजी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून शिवाई देवीच्या नावावरून त्याच नाव शिवाजी ठेवलं खरं.
ज्यावेळी जवळ जवळ बारा वर्षाने जेव्हा सगळं कुटुंब खऱ्या अर्थाने एकत्र आले तेव्हा त्यांना शिवाजी राजांचे नाचणाऱ्या बायकांना पाहन हे विचित्र लक्षण वाटलं म्हणून त्यांनी खूप खडे बोलही लगावले होते आणि पुन्हा सगळं सोडून पुण्याला जाण्याचा निर्णय ही त्यांचाच होता.
शहाजीरावांच्या जहागिरीत त्यांना मुघुलाच राज्य आणि तेव्ह संस्कार दिसत होते आणि ते त्यांना कदापिही मान्य नव्हती म्हणून शहाजीरावासोबत त्यांनी वाद घालून शिवाजी राजांसोबत माघारी जाणं पसंद केलं.त्यावेळी मात्र शहाजी राजांनी त्यांना अगदी उघडपणे आव्हान केले होते,”तुम्ही शिवाजींना वाढवा आणि आम्ही संभाजी राजांना वाढवतो,मग बघू कोणाचे संस्कार बळकट आहेत”.
शिवाजी राजांना वाढवताना त्यांनी सगळ्यात मोठी शिकवण दिली ती म्हणजे पर स्त्री ही आपल्याच माते सारखी ,बहिणी सारखी असते.
सून म्हणून जिजाऊ यांनी सईला कधी वागवले नाही,नवीन नवीन संसारात अगदी त्यांची मैत्रीण त्या झाल्या आणि आई पण.
लिहिताना अस वाटत की,भरभरून लिहावं त्यांच्याशिवाय हात थांबायच नाव घेत नाही आणि मन मात्र आजच्या स्त्रियांमध्ये जिजाऊला शोधतय,कुठेय जिजाऊ,का फक्त वाचायलाच मिळणार जिजाऊ प्रत्यक्षात नाही का दिसणार कधी,लिहिण्यासारखं खूप आहे त्यांच्यावर….
पण त्यांच्यावर लिहिण्यापेक्षा मला तुमच्यात जिजाऊ पहायची आहे…..
तुम्ही शिकवले का ,तुमच्या मुलाला स्त्रियांचा आदर करायला,तिच्या मतांचा विचार करायला,??? नसेल च शिकवले नाहीतर तुमचा मुलगा, तुझ्या आईचा… ,तुझ्या आईची…
असल्या घाण भाषेत स्वतःच्याच भावाला शिव्या देऊन ज्या मातेने जन्म दिला तिचाच उद्धार नसता केला ना..
हे तुमचे संस्कार आहेत,जे पहिल्या चुकीवेळी तुम्ही शांत बसला आणि परत त्याला न बदलता तुम्ही स्वतःच बदलून घेतलं आणि…..
अजून वेळ गेली नाही,जिजाऊ होणायची, प्रत्येक संकटात हार न मानता प्रयत्नशील राहण्याशी, स्वतःला कमजोर समजण्याची चूक नका करू…
स्वतःच्या जर धमक असेल ना तर स्वतः कधी हारु शकत नाही आणि आपल्या मुलांना पण कधी हार देऊ शकत नाही…
पैसा? सत्ता,प्रॉपर्टी आणि बरेच काही कमवायला शिकवतो पण स्वतःवर विजय मात्र मिळवायला शिकवत नाही.
चांगला माणूस असण आत्ताच्या काळात जास्त आहे आणि ते आताच्या तुमच्या मधील जिजाऊच्या हातात आहे.
मग अफजल खान असो किंवा शाहिस्तेखान असो लढण्याचा बळ नक्की मिळेल च….
आज जिजामाता च जयंती साजरी करताना ,त्यांना ही आत्मसात करायचा फक्त प्रयत्न करू नका,तर आत्मसात कराच,तरच खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाला मान आहे…..