सिंधुताई सपकाळ (ललित लेख )

सिंधुताई सपकाळ

सिंधुताई यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी झाला,वर्ध्या जिल्ह्यातील एक गावात झाला. आणि काल म्हणजे ४ जानेवारी २०२२ या दिवशी त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला…

खास अशी त्यांची भेट झालीच नाही… पण त्यांना ऐकून जी प्रेरणा मिळाली ती खूपच मूल्यवान आहे.

वयाच्या विसाव्या वर्षी घर सोडुन म्हण्यापेक्षा घरातून काढून टाकल्यानंतर स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी रेल्वे स्थानकावर भीक मागून पोट भरवलं आणि स्वतःसोबत त्यांच्या जवळ जेवढे भिकारी होते त्यांना पण त्यांच्या घासातील घास त्यांना दिला.

मुलींचं तरुणपण म्हणजे समाजाला मिळलेलं आयतं कोलीतच की. वीस-बावीस वर्ष वय म्हणजे नको त्या गोष्टींना समोर जावं लागणार वय, हे अस वय असते जिथं खरच आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या मदतीची ,आधाराची गरज असते आणि सगळ्यात जास्त भीती असते माणसातल्या राक्षसाची… या सगळ्या पासून वाचण्यासाठी त्यांनी रात्री स्मशानभूमीत वापरली ,तिथेच त्या राहिल्या.

चौकट कोण करते??? नाही समजलं ना ….. बाकीच्या जगण्याची चौकट सगळ्यात आधी कोण करते???

तर स्वतः ती च… कोणी काय म्हणेल हे नंतरचा भाग आहे पण आपल्यात ताकद आहे का की मी माझा स्वतःचा जीव सांभाळू शकते किंवा मी स्वतःला सगळ्या संकटापासून वाचवू शकते,हा विश्वास आपल्यात मुळी नसतोच. पण जेंव्हा ताई कडे पाहतो ना तेव्हा प्रचिती मिळते ,स्वतःच स्वतःच अधिक चांगल्या प्रकारे रक्षण करू शकतो,त्यासाठी आपल्याला चारी बाजूने चौफेर अगदी चाणाक्षपणा ने राहील पाहिजे,ते तर आपण करूच शकतो म्हणून स्त्री कधीच दुबळी होऊ नाही शकत.

जो पर्यंत ती स्वतः दुबळा पणा स्वीकारत नाही तोपर्यंत तिला दुबळ कोणीच करू शकत नाही.आणि हो,स्त्रीला कोणाच्याही आधाराची कधीच गरज लागत नाही याचं उत्तम उदाहरण त्या होत्या.

स्त्रीच स्त्रीची चांगल्या प्रकारे मदत करू शकते आणि समजू पण शकते,हे त्या नेहमी म्हणत.

आई होणं म्हणजे काय असते ,आपल्या पोटाच्या लेकराला वाढवण म्हणजे आई होणं नाही … जन्मदेणारी तर नेहमीच आई असते पण वाढवणारी त्याहून ही महान असते.

स्वतः यातना भोगल्यावरच त्याची जाणीव होते ते उगीच म्हणत नाही. सिंधू ताई सगळ्यांच्या आई झाल्या आणि त्यांची प्रेरणा घेऊन अजून त्यांच्यासारख्या आई ना प्रवृत्त केलंय.

प्रत्येकाने स्वतःमधील सिंधुताई नेहमी जागी ठेवली पाहिजे आणि सतत कार्यरत देखील राहिल पाहिजे. आज त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र तर पोरका झालंयच पण त्याचा विचार मात्र कधीच पोरका करायचा नाही ,ही आपली जबाबदारी..

चांगल्या कामाची नेहमीच पावती भेटतेच,म्हणूनच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले… आणि त्यांच्या खूप साऱ्या अनाथ संस्था पण कार्यरत आहेत.

जे समोर येईल ते फक्त लढाऊ वृत्तीने करत राहायचे ही त्यांची शिकवणं आपण ही आपल्या जीवनात अवलंबून जगायला शिकलं पाहिजे…

लाखो लोकांना प्रेरणा देणाऱ्या सिंधुताई ना मनापासुन श्रद्धांजली!!!!!!

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: