मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

प्रेरणादायी कथालघुकथा संग्रह

तू माणुसकीचा झरा..(लघुकथा)

“थोडी कणकण च वाटतेय,कदाचित झोप झाली नसेल म्हणून अस होत असे,नाश्ता बनवून थोडे झोपावे ,”प्रीती मनाशीच पुटपुटली.

गॅस चालू केला,शिरा बनवावा म्हणजे छोटू पण खाईल आणि सगळ्यांचे पोट पण भरेल.

माझ डोक खूपच दुखतय गं, नाश्ता बनवून ठेवते आणि मग झोपते थोडावेळ,दिदीला प्रीती म्हणता म्हणता नाश्ता बनावत होती.

शेखर ला पण तिने संगितले,माझ डोकच खूप दुखतय रे आणि थोडे जड झाल्यासारखे होतय.

शेखर ,”झोप नसेल ना म्हणून त्रास होत असेल,मेडिसीन घे आणि झोप थोड,पण खावून घे.”

“हो ” प्रीतीने मान हलवत च उत्तर दिले.

नाश्ता सगळ्यांना दिला तिने,छोटू ,दीदी आणि शेखरला पण दिला.

तिने मात्र खाल्ला नाही.

छोटू खाली सांडत होता म्हणून तिने त्याला भरवला आणि पाणी पाजले.

छोटू म्हणजे दोन वर्षाचा प्रीती आणि शेखरचा मुलगा आणि आरोही म्हणजे त्यांचीच मोठी मुलगी साधारण असेल सात वर्षाची,आणि शेखर तिचा नवरा. छोटेसे लहानसे गोड कुटुंब ,पुण्यात राहणार,अगदी कोरोनाच्या काळात पण पुणे सोडले नाही त्यांनी,शेखर केमिस्ट म्हणून एका मोठ्या हॉस्पिटलच्या मेडिकल मध्ये कामाला जात होता आणि प्रीती उच्च शिक्षण घेवून पण मुलांना पाळणाघरात ठेवण्यापेक्षा त्यांची आई आणि नवर्‍याची फुल टाइम बायको होण्याचा जॉब तिने मनापासून स्वीकारला होता.

डोकच खूपच दुखतय,म्हणून तिने एक पॅरासिटामॉल घेतली आणि झंडूबाम डोक्याला लावून ,अंगावर पांघरून घेवून निवांत झोपली,

मुलांचा गोंधळ कानावर येतच होता,कणकण वाढतच होती,ताप आल्यासारखा वाटत होता.

त्याच काळात कोरोंनाची नुकतीच दुसरी लाट डोक वर काढत होती,मनात ती पण भीती होतीच.

फोनची रिंग वाजली……

“हॅलो,बोलना आजी,मम्मा झोपलीये ,तिला बर वाटेना झालाय,” दीदी 

“………………………..”आजी 

“हो हो ,शिरा खाल्ला आहे आम्ही,खेळतोय,मम्मा उठली की करायला सांगेल फोन मी,

बाय आजी”दीदी .

अंगात अजिबातच ताण नाही,यावेळची कणकण थोडी वेगळीच दिसत होती,दिदीला बोलवायाचे पण अवसान येईना.प्रीती पूर्णच बेहाल होऊन पडली होती.

पुन्हा फोन वाजतो.

“हॅलो,पापा ,”दीदी.

………………………………,पापा.

“झोपलीये मम्मा,तिला अजूनच बर वाटेना झालाय,हो सांगते,”दीदी.

दीदी हळूच  दबक्या पावलांनी प्रितीच्या जवळ येते.हळूच ब्लॅंनकेट ओढून म्हणते,

“मम्मा,पापा नि आवरून खाली बोलावलय,डॉक्टर कडे जायचे आहे,उठ.” दीदी 

“हम्म ,आज वेगळच काही तरी होतय,फोन घरीच ठेवते माझा,छोटूला तेवढे नीट सांभाळ,काय लागले तर लगेच फोन कर पापा च्या फोन वर,आम्ही लगेच येतो.”प्रीती उठत ,स्वता:ला सावरत होती.

सगळं ताण गेला होता तिचा,छोंटुला संगितले तिने दिदीचे ऐईक,मी लगेच खावू घेवून येते. 

छोटुचा आणि दिदीची पप्पी घेऊन तिने दरवाजा बाहेरूच लावून घेतला आणि हळू हळू जिना उतरत खाली आली

एव्हाना शेखर खाली गाडी घेऊन आला होता.त्याला पण बर नव्हते पण हिला थोडे जास्तच झालाय अचानकच,तो त्याच्या मित्राला सांगत होता.

शेखरला पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले.

“गप्प वेडाबाई,नॉर्मल कणकण असेल,होईल सगळं नीट,पहिले डॉक्टर कडे जावू,”शेखर.

“हम्म ” प्रीती.तिला बोलावले पण जात नव्हतं.

डॉक्टर कडे गेल्यावर ,”अरे बापरे पेशंट ला तर खूप ताप आहे,कधी पासून आहे ताप,”

“आताच आलाय  अचानक” प्रीती.

“हम्म,मी मेडिसीन देतो,उद्या सकाळपर्यंत ताप राहिला तर ठीक आहे नाहीतर कोरोंना टेस्ट करून घ्या.” डॉक्टरने दोघांना संगितले.

प्रीतीला अजूनच कस तरी वाटायाला लागले,दोन छोटयांचा चेहरा तिच्यासमोर दिसायला लागला.

मुलांचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता,पुढे काय आणि कसं करायचे ते कळत नव्हते.

उद्या ताप जायलाच पाहिजे कसल्याही परिस्थिति,मनाशीच पुटपुट चालू होती,प्रीतिची.

त्याचा मित्र,नीलेश नका काळजी करू नसेल काही झालेले,दोघांना ही म्हणाला.

शेखर आणि नीलेश ने तिला घरी सोडले आणि ती वर गेली.

दवाखान्यातून आलेय म्हणून तिने आंघोळ केली पण तिला काही आंघोळ जमलीच नाही,बाथरूम मध्येच कड्याकाची थंडी वाजून आली,कसबस आवरून ती बाथरूम मधूनच दीदी दीदी म्हणून जोरात ओरडली.

दीदी माझ्या आंगवर ब्लंकेट दे ग,मला थंडी वाजतेय खूप,” प्रीती दिदीला थरथरत्या आवाजात म्हणत होती.

दिदीने प्रीतीला सगळे ब्ल्यांकेट ने झाकून दिले आणि छोटूला घेवून ती त्याला समजावत होती.

दीदी सात च वर्षाची पण खूप समज लहानवयातच,प्रीतीची तर ती मैत्रीण म्हणून आणि छोटूची आई म्हणून सगळी काळजी घेत होती.

छोटू तसा खूपच रडका होता,आणि खूप किरकोळ,प्रीतीशिवाय कधीच राहत नव्हता,शेवटी दोन वर्षाच्या मुलाकडून अजून काय अपेक्षा करणार.

बेडरूम मध्ये प्रीती सगळ अंग गोळा करून एकवटुन झोपून राहिली होती.

शेखर अजून आला नव्हता,एव्हाना दुपारचे तीन वाजले होते,मूल पण उपाशीच होती,तिने पण सकाळपासून काही खाल्ले नव्हते,घरात शांतता होती,मूल टी.व्ही. पाहत होते.

डोरबेल वाजली,दिदीने विचारले, “कोण आहे.”

मीच आहे,उघड,शेखर.

शेखर आतमध्ये आला,त्याच्या हातात डब्बा होता,नीलेश ने दिले होता. 

शेखरने सगळ्यांना वाढून घेतले,प्रीतीला उठवले आणि तिला पण भरवले.जेवण जात नव्हते पण खायला तर लागणारच होते ना.

मेडिसीन खावून झोपली ती.

शेखरची तब्येत ठीक नव्हती पण प्रीती सारखा झोपून नव्हता.त्याची मोठी कसरत होत होती.घर आणि मुले त्यालाच पहावे लागत होते. 

संध्याकाळ झाली होती,प्रीतीचा ताप काही कमी नव्हता झाला,आता चिंता वाटू लागली होती,काळजी होती ती दोन्ही मुलांची,त्यांचे काय करायचे,छोटू राहील का गावी ठेवला तर,नको त्या प्रश्नांनावर विचार करत शेखर बसला होता.शिवाय संध्याकाळी जेवण काय आणि कुठून घेऊन येयचे,हॉटेल मधील चालणार नाही,घरगुती तरी कुठून सांगायचे,विचार चालूच होता तेवढ्यात फोन वाजला.

“हॅलो,बोला की,” शेखर..

……………………. ,नीलेश.

“अहो कशाला तुम्हाला त्रास,मी पहिला असते ना काही तरी,अहो खरच नको,”शेखर.

…………………………,नीलेश.

“बर,ठीक आहे एवढ्यावेळेस द्या पण उद्या नको,इथेच माझी बहीण आणि चुलत भाऊ पण आहेत त्यांच्याकडून घेऊन येईल मी,ओके,आलोच,”शेखर.

तर संध्याकाळचा डब्बा नीलेश ने दिला होता,आताचा प्रश्न मिटला पण उद्याच काय,प्रीतीला बर  वाटले म्हणजे झाल.

मुलांकडे पाहून कसेबसे प्रीतीने जेवण केले आणि मेडिसीन घेऊन झोपली. उद्या नक्की बर वाटेल अस वाटतच होते तिला.

ईकडे शेखर ने सगळं आवरून घेतले,छोटूची रडत रडत समजूत काढून त्याला दीदी आणि स्वता: सोबत झोपायला तयार केले,छोटू खूप त्रास देत असायचा नेहमी ,आज तो पहिल्यांदा त्याच्या पापा जवळ झोपला होता.

सकाळ झाली,प्रीतीचा ताप काही कमी नव्हता,त्याने बहिणीला फोन करून सांगितले,प्रीती आजारी आहे दोन दिवस डब्बा दे,मुलांसाठी,बाहेर काय खाणार ना,या दिवसांमध्ये ,प्रीतीला कोरोंना असण्याची शक्यता असेल म्हणून,तिच्याकडून डब्बा येणार म्हणून शेखर थोडा निवांत च होता.

प्रीतीला अचानक खूप त्रास होयला लागला म्हणून तिला ताबडतोप डॉक्टर कडे घेऊन जावे लागणार होते,आणि आता या दोघांना परत आज एकटे ठेवणे शक्य नव्हते. पण प्रीतीला पण तर डॉक्टर कडे सोडण जास्त गरजेचे होते.

काळजावर दगड ठेवून दीदीच्या भरवशावर छोटू ला ठेवून तो प्रीतीला डॉक्टर कडे सोडले आणि परत घरी येऊन दोघांचे आवरून त्यांना प्रितीच्या घरी पाठवायचे ठरवले,तिच्या घरून कोणी येत नाही तो पर्यन्त तो घरीच थांबला.त्याने प्रितीच्या वडिलांकडे दोन्ही मुलांना पाठवून दिले. आणि तेवढ्याच लगभगिने तो प्रीती कडे गेला.

दुपार झाली होती,तीन वाजून गेले होते.

“सलाईन संपत आली होती,घरी जावून आपण जेवन करून घेऊ,”शेखर.

“हम्म” प्रीती.

तेवढ्यात फोन येतो,

“कुठेस,घेऊन आली का तू डब्बा ,आम्ही येतोय दहाच मिनिटात घरी,”शेखर.

………………………. ताई .(शेखरची बहीण )

“ठीक आहे,तुझ वागणं लक्षात राहीन,बघतो माझ मी काय करायचे  ते” रागाने फोन ठेवला.

दोघांचे बोलणं लांबून ,नीलेश ऐकत होता.

त्याला समजले होते,त्याने त्या दोघांना काहीच न म्हणता,त्यांचा डब्बा घेऊन येण्याचे ठरविले.

सकाळचे जेवण,प्रीती आणि शेखर ने साडेचार वाजता केले,नीलेश ने संध्याकाळाच पण डब्बा अगदी न चुकता दिला.

प्रीतीला इकडे बर वाटत नव्हते आणि प्रितीच्या आजारपणात शेखर त्याचे आजारपण जणू विसरूनच गेला होता पण शरीर थोडी ना विसरून जाते,त्याला पण त्रास होत होता पण प्रीतीकडे पाहता पाहता त्याने अंगावर काढले.

तिसर्‍यादिवशी मात्र तोच चक्कर येऊन पडला आता मात्र सगळ्यात अवघड अशी वेळ आली होती,प्रीतीने स्वता:ला कसबस सावरून घेतले आणि त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला सरबत दिले.

तेवढ्यात योग्य वेळेला नीलेशचा फोन आला आणि त्याने शेखर ला डॉक्टर कडे घेऊन गेला.

प्रीतीला पण अजून बर वाटत नव्हते,म्हणून दोघांच्या टेस्ट केल्या आणि त्या पॉजिटिव आल्या.

आता कोण मदत करणार,दोघे आजारी,नीलेश सोबत होताच पण….

घरातील कोणी असते तर बर झाले असते ,अस दोघांना पण मनातल्या मनात वाटून गेले..

सी टी स्कॅन केले आणि नको तेच झाले,शेखर ला लगेच अॅडमिट करायला सांगितले आणि प्रीतीला घरीच कोरांटाईन होण्यास सांगितले.

दोघे सोबत होते तेव्हा थोडे तरी बळ होते पण आता ते पण सहन होईना झाल.

जवळचे सगळेच पाठ फिरवून रिकामे झाले.

फक्त फोन वर चर्चा चालू होत्या,खरोखरीची मदत मात्र कुठेच मिळत नव्हती.

डोक सुन्न झाले होते,पण नीलेश मात्र पहिल्यापासून सोबत होता,त्याच्याकडून सगळ्या प्रकारची मदत मिळत होती,प्रितीच्या  अंगामध्ये जास्तच अशक्तपणा होता तेव्हा त्यांच्या घरून रोज सलग तीन चार दिवस डब्बा येत होता,शेखरला अॅडमिट करण्यापर्यंत ते त्याच्या सगळ्या उपचारादरम्यान तो नेहमी सोबत होता.

कोरोंनाच्या काळात खरा चेहरा समजला होता सगळ्यांचा,ज्यांना रक्ताच्या नात्यामध्ये बांधले होते,त्यांनी सगळ्यांनी पाठ फिरवली होती,आपले कोण आणि लांबचे कोण यातील फरक एवढा स्पष्ट दिसत होता की तो फरक डोळ्यासमोर नसता आला तर बर झाला असता,वाईट तर या गोष्टींचे वाटत होते की सख्या नात्यांनी पण कोरोंनाच्या लढाईत माणुसकीचा मार खाल्ला होता.कोण कुठला तो नीलेश,मागच्याच आठवड्यात फक्त ओळख झाली होती,पण संस्कारच ते शेवटी ते लहानपणापासून आणि वेळोवेळी प्रत्येक वेळेला माणुसकी जपण्याचे आणि ते टिकवण्याचे असतात. माणुसकी हो फक्त,अशी भावना जी सहज होते जिथे कशाचीच अपेक्षा नसते,आपल्याला बर वाटते म्हणून सहज,नकळत केलेली मदत,लाख मोलाचा सल्ला देऊन गेली.माणुसकी दाखवणं ही गरज आहे आणि ती एक सामाजिक बांधिलकी आहे.नीलेश सारखा देवमाणूस प्रीती आणि शेखर ला भेटला होता,तो नसता तर कदाचित आज चित्र काही वेगळेच झाले असते,कदाचित शेखरच्या जिवावर पण ते बेतल असते.

कोरोंना आला आणि खरी माणुसकी पण समजली,ज्यांनी ती दाखवली ती मनावर राज्य करून गेली आणि ज्यांनी ती दाखविली नाही ते मात्र मनातून उतरून गेले कायमचे मग ते सख्खे रक्ताचीच,आपलीच नाती का असेनात.

माणुसकी दाखवणं गरज आहे,काय माहिती कधी कोणाला आपली थोडी माणुसकी ,आपलाच भाग्य बननून आलेली असेल.

माणुसकी तुमच्या आमच्यातील फक्त दाखवण्याची गरज आहे,ती पण योग्य वेळेवर !

copyrights: Inspire In Marathi 

(नक्की वाचत रहा,नवनवीन कथा,आवडल्या तर like करा आणि अजून वाचण्यासाठी follow करा..)

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: