मी मोनिका… भाग # १
“तासाभरात तुम्ही भेटू शकता,आई आणि बाळ छान आहेत.” डॉक्टर सांगून जातात.
तेवढ्यात….
“आई तर भेटू शकते ना वहिनीला” रवी डॉक्टर ला विचारतो.
“हो ,त्या भेटू शकतात” डॉक्टर म्हणाले.
“अरे,भावड्या ला फोन केला होता का ?”आई ( शांता )म्हणाली.
“हो ,आई केला होता पण तो कामावर गेलाय ,आलं की सांगतो म्हणालेत” रवी आई ला म्हणाला.
“तू जा ना भेटून ये ,मी तुला आणि वहिनीला खायला घेऊन येतो काहीतरी”रवी म्हणाला.
आई सून बाई म्हणजे छाया कडे जाते.
“पैसे तर नाहीत जवळ आणि भावड्या जर आला नाही तर ,हॉस्पिटलच बिल कशाने भरणार…भावड्या आणि वहिनी असतील भांडत सारखे पण बाळासाठी तो नक्की येणार”रवी एकटाच बडबड करत होता.
“दोन चहा आणि बिस्कीट चा एक पुडा द्या?” रवी चहावाल्याला म्हणाला.
“हे घ्या,काय झालं पाहून चेहरा पडलाय” चहावाला.
“काही नाही,तुमच्याकडे काही काम असेल तर सांगा मला” रवी म्हणाला.
“हो हो सांगेल,कुठल्या गावच म्हणायचं,इथं कसं” चहावाला.
“तस विदर्भातील,आलोय वहिनीला दवाखान्यात घेऊन,बर ते जाऊद्या…काय काम असेल तर सांगा… ” रवी.
“जाता जाता एकदा परत फोन करून बघतो,कॉइन बॉक्स वरून म्हणजे समजेल” रवीच्या मनातुन अजून भावड्या आणि वाहिनीच भांडण काही केल्या जात नव्हत.
“हॅलो,शिवाजी तांबे ,आले का कामावरून ,मी त्यांचा छोटा भाऊ बोलतोय” रवी ,भावड्याच्या कामाच्या ठिकानी फोन करून सांगतो.
“…….” तिकडून.
“बर” म्हणत,रवी फोन ठेवतो.
म्हणजे अजून निरोप भेटला नाही तर ,भावड्याला.
स्वतःशीस बोलत दवाखान्यात जातो आणि चहा देतो.
आई त्याच्या तोंडकडे पाहुन अंदाज बांधते की ह्याच काही बोलणं झालेलं दिसत नाही.
“अरे,अजून दोन दिवस तरी सोडत नाही बघ हिला, तेवढ्यात तर येईलच तो”आई रवीची समजूत काढते.
“मला पाहायचं ,आपल्या ताईडीला”रवि म्हणतो.
“नाव बी ठेवलास होय तू” आई म्हणाली.
“व्हय,लाडाने ग ,ताई,म्हणजे तायडी” रवी म्हणाला.
“व्हय,तर नाही तर नंदा बरी तुला नाव ठेवून देईल” आई म्हणाली.
“चल तू पण”रवी म्हणाला.
दोघे बाळाला भेटायला जातात.
“किती गोड आहे वहिनी, दुधावणी पांढरी, अगदी भावड्यावर गेलेय नाक तर” रवी तिला न्याहळतच बोलत असतो.
“घे की तू पण हातात” आई म्हणते.
“नको,मी लांबूनच बरा, माझं असलं हात आणि लहान आहे ना ग खूपच” रवी.
“घ्या की भाऊजी” छाया म्हणते.
“मी च घेणार तिला खूप लाड करणार तिचे पण थोडी मोठी होऊद्या,आणि तुम्हला बर वाटतंय ना” रवी विचारतो.
“हो,आहे,ह्यांचा काय निरोप” वहिनी थोड्या दबक्या आवाजातच म्हणते.
“हो,येणार आहे तो येईल आज रात्री किंवा उद्या तर नक्कीच” रवी खोटंच बोलत म्हणतो.
“हम्म,माहितेय मला” वहिनी.
“तुम्ही दोघी करा आराम,मी आहे बाहेर,माझा मित्र डबा देईल आणून” रवी म्हणाला.
“बर “आई म्हणते.
रवीच्या मनात भावड्याचाच विचार चालू होता,बाकी त्याला काही सुचत नव्हतें.
संध्याकाळची वेळ पण झाली होती आणि आता त्याचा मित्र पण आला होता ,रवी त्याच्यासोबत वेळ घालवतो आणि डबा पण त्या दोघीना देतो.
रात्रीचे नऊ वाजलेले असतात.
“आई तू झोप वाहिनीजवळच मी,आहे बाहेर पोर्च मध्ये ,काय लागलं तर सांग मला” रवी आई ला भेटून येतो.
डोळ्याला झोप तर येत नव्हती,पण शरीर एवढं थकलं होते की डोळा कधी लागला तेच समजल नाही….
“अरे,रवी उठ,रवी उठ,मी आलोय”
“कोण,आलास व्हय तू”
“मग ,येणार नाय व्हय”
रवी घट्ट मिठी मारतो,भावड्याला.
“लय,वाट बघितली बघ, आला नाही तू लवकर” रवी.
“अरे,दोन ट्रीपा मारून आलोय ,आता आहे बघ आठवडा बर,इथेच”भावड्या.
“बर झालं,तायडी बघ तुझ्यासारखीच आहे नाकशार आणि वहिनी सारखी पांढरी” रवी.
“खर काय,चल की बघू मग मला पण ” भावड्या.
“झोपली असत्याल रे आता” रवी.
“हा,एक वाजलाय ,तस पण”भावड्या.
“झोप थोडं मग पहाटे जाऊ” रवी.
दोघे शांत झोपतात, रवी आता खऱ्या अर्थाने शांत झोपतो…….
******
शांता आई ची पाच मुलं, भावड्या,बापू,रवी आणि नंदा, चित्रा.. तीन मुले आणि दोन मुली.
थोरला भावड्या त्याच नुकतंच लग्न झाले होते छाया सोबत पण छाया अनाथ…
छाया त्याला अशीच ट्रिप वर गेल्यावर भेटली असते आणि तसाच त्याच्याशी लग्न करून आलेली असते.
पण काही केल्या त्यांचं पटत काही नाही,रोज भांडण ,रोज भांडण…..
त्यांच्या घरात पहिलेच बाळ आलेलं असते,ती ही तायडी आणि आपली “मोनिका”……