मी मोनिका भाग # 2
भाग #2….
“कधी आलास रे,झोप झाली का इथे गारठ्यात”आई तिच्या दोन्ही मुलांना म्हणते.
“बराच,उशीर झाला होता,किती वाजलेत आणि तू इथं” भावड्या.
“हा,जरा आले बाहेर रवी एकटाच असेल म्हणून”आई.
“बाळ उठलं का, कधी भेटेल अस झालाय मला” भावड्या.
“उठली आहे बघ,चल ,तिला पण तुला पाहायचं असेल”आई अगदी मिश्किलपणे म्हणाली.
भावड्याने तायडीला हातात घेतल आणि तिला न्याहळतच बसला..
“माझीच दृष्ट होयची हिला”अगदी हळूच पुटपुटला.
“कधी आला” छाया.
“रात्रीच,तुला बर आहे ना?? खूप त्रास झाला का ग” भावड्या.
“नाही,होयचा तो तर होणारच ना”छाया.
“घरी गेलो कि निवांत आराम कर” भावड्या.
तायडी त्यांच्या आयुष्यात सुखाची लाट घेऊन येणार होती,हे सगळ्यांनाच माहीत होते. पाहिलं बाळ म्हणून मान पण तर तिने मिळवला होता.
मग काय लाड काय कमी होणार होय,सगळ्या बाजूनी सगळे तिचे लाड करत होते ,अगदी भरभरून….
ताई आता जवळ जवळ,महिना,दीड महिन्याची झाली होती.
रवी पण केव्हाच बाहेरच्या शहरात कामाला निघून गेला होता आणि भावड्या बायको आणि आई ला घेऊन शहरात आला होता.
बापूच पण लग्न झालंच होते म्हणून बहिणीसोबत तो गावलाच होता.
छाया आणि भावड्याच काही केल्या भांडण मिटत नव्हतं ,सारख वाद चालूच होते.
लहान मुलाच्या येण्याने का होईना ,आता त्यांच्यातील भांडण कमी होईल म्हणून वाटत होते पण उलट दुसरच होऊन बसल होते.
दोघांच्या भांडणात ताई कडे लक्ष नीट दिले जात नव्हते,आजी म्हणून सगळी काळजी घेतली तर शेवटी आई असतेच ना!!!
ताईचा नामकरण सोहळा पण मोठ्या थाटात केला आणि तिचे नाव ठेवलं ,” मोनिका”…
झालं,आत मोनिका सगळयांना ओळखत होती,हात वारे चांगले करीत होती,हसत होती ,तोंडाच्या वेगवेगळ्या हावभाव करत होती.
आणि त्यादिवशी ,नेहमी प्रमाणे या दोघांची खूप जोराची भांडण झाली आणि छाया रुसून दार लावून बसली आणि भावड्या रागाने बाहेर निघून गेला.
“तान्ह रडतेय ग ,छाया,सोड राग आणि पोरील दूध तरी पाज ग,व्याकुळ झालीये पोरगी बघ ,रडून रडून” आई सुनेला सांगत असते.
आतून एक नाही दोन नाही.
“काय ,करावं ह्या पोरीचं स्वतःच्या पोटच्या गोळ्यापेक्षा हिला राग म्हणत्वचा आहे .
“चल, मोने तुझी नाही काळजी तुझ्या आईला,मी तुला पाणी टाकून थोडं दूध पाजते” आई (शांता).
स्वयंपाकघरात जाऊन थोडं दूध आणि पाणी टाकून बाळाला आजी दूध भरवते आणि कसं तरी शांत करण्याचा प्रयत्न करते.
पण दूध वरच च कस ,लगेच पिणार..
नाही ,होय, नाही होय,थोडं सांडत ,थोड्या गुळण्या काढत शेवटी तिच्या आजी मे दूध भरवलं.
आणि बाहेर फिरवत फिरवत ,रडून रडून व्याकूळ झालेले मोनिला शेवटी आजीने झोपवले.
“अग, छाया ,ये छाया, छायडे “
आता काय म्हणावं ,जीवाचं काय बर वाईट तर नसेल ना केलं,दार का उघडं ना ही “शांता आई एकटीच बडबड करीत होती.
“अग, बया ,नको उघडू दार ,एक शब्द तरी बोल मेली का जिती बघायला” शांता आता रागाने बोलली.
तरी काही नाही,आवाज.
आई आता भावड्याची वाट पाहत होती,तोच काय ते समजावेल…
“अंधार पडायला लागलाय,परत मोनि रडायला लागलीये,आता तरी दार उघड बये” शांता ओरडत होती.
तेवढ्यात भावड्या आला…
“काय झालं आई,” भावड्या.
“दार च उघडत नाही,ही बघ,सकाळपासून पोरीच्या पोटात अन्नाचा कण नाही,मोनिला मी थोडा वरच दुध पाजलाय”आई सांगत होते.
“छायाडे दार उघड नाही तर,दरवाजा तोडून टाकलं मी”भावड्या जोर जोरात दरवाजा वाजवत होता.
तरी आतून काहीच नाही…
भावड्याचा राग आता अनावर झाला होता, शिव्यांचा भडिमारा चालू होता…आणि दुसरीकडे मोनिच रडणं…
घरातील शांतता कुठच्या कुठं हरवली होती….
“अर, हिला तर ताप आलाय रे,” आजी नातीला हातात घेऊन म्हणाली.
“बघू” भावड्या.
“आता हीच काही खर नाही, माझ्या पोरीला जर काय झालं ना,तर आयुष्यभर तुला माफ करणार नाही” भावड्या दरवाज्यावर लात घालत म्हणाला.
“आये, आये ही डोळ पांढर करतीया, मला तर काही कळेना बघ” भावड्या च्या डोळ्यात आता पाणी आलं होतं आणि तो जोरजोरात ओरडून सांगत होता.
आतून कडीचा आवाज आला आणि छायाने दार उघडलं आणि मोनिला हिसकावून घेतलं आणि परत खोलीत जाऊन ,मोनिला दुध पाजू लागली..
तिच्या वागण्यापुढे दोघांची डोकी बंद झाली होती..
“आई मी इथं एक दवाखाना आहे ,तिथं बघून येतो डॉक्टर आहे का ते ,असेल तर लगेच जाऊ आपण” भावड्या आई ला सांगतो आणि पळतच बाहेर निघून जातो.
“छाया,दूध पितेय का ग ती” शांता म्हणते.
“हम्मम,” छाया.
“थांब ,मी तिची दृष्ट काढते ,पहिली ” शांता अस म्हणून स्वयंपाक घरातून मीठ,मिरच्या घेऊन ,चांगली मोनिची दृष्ट काढून घेते.
मोनिने थोडं दूध पिले होते आता आणि झोपली होती पण ताप अंगात होताच…
तेवढ्यात भावड्या आला….
“आहे का डाँक्टर” शांता आई म्हणाली.
“नाही ग,आता सकाळी दहा वाजता”भावड्या.
“नको काळजी करू तू,आताच मी तिची दृष्ट काढली आहे ,बर वाटेल तिला,झोपली आहे बघ”शांता आई म्हणते.
” देवा, तिला काय करू नको बाबा” भावड्या हात जोडून म्हणतो.
“गप,लगेच तिला काय होत असते ,सकाळपासून आईच्या ऊबीसाठी रडतेय रे,आता जाईल तिचा आपोआप ताप बघ” शांता म्हणाली.
“बर होईल बघ” भावड्या.
भावड्या तसाच मोनिच्या जवळ बसून राहिला.
छाया पण काही न बोलता तिथेच आडवी पडली होती.
“मी दोन चार भाकरी टाकते,सकाळपासून कोणीच काय खाल नाही,” शांता म्हणते आणि स्वयंपाक घरात निघून जाते.
मोनाचा ताप काही केल्या कमी होत नव्हता..
“आय,मी पाण्याच्या पट्ट्या ठेवून बघतो”भावड्या वाटीत पाणी घेऊन म्हणाला.
शांता आईने सगळं स्वयंपाक केला पण कोणाच्या घशातून काही केल्या घास खाली उतरेना झाला होता.
ताप काही केल्या उतरत नव्हता,रात्र वैऱ्याची झाली होती,पोरगी झोपेत चावळत होती,जोर जोरात रडायची मध्येच आणि मध्येच शांत बसायची… मध्येच दचकायची आणि परत गप…
भावड्या आणि छाया पण बसून होती जवळच, आता मात्र दोघे शांत होती…
मोनि म्हणजे जीवाचा तुकडा…
आणि तिची अवस्था आपल्यामुळेच झालीये याची पुरेपूर जाणीव दोघांना पण होती म्हणूनच की काय ,आता शब्दांना पण आवाज नव्हता….