मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

कथा-कादंबरीप्रेरणादायी कथा

मी मोनिका भाग #3

सकाळी उठल्या उठल्या डॉक्टर कडे जायची घाई होती ,दोघांना पण.. रात्रभर पोरीच्या अंगात ताप मुरला होता आणि शांत पडून होती… अंगावर थोडं दूध अधून मधून पित असायची…..

पहिला काळच खूप वेगळा,नाही डॉक्टरचा काही नंबर आणि नाही पत्ता,कधी कुठलं औषध घेयचं ते पण कळत नसायचं,शक्यतो डॉक्टर त्यांच्या जवळच देयचे, म्हणून की काय… कधी कोणी मेडिकल नावाचा प्रकार जास्त प्रचलित पण नाही केला….

“चल ,साडे नऊ झालेत,आलं असत्याल डॉक्टर”भावड्या छाया ला म्हणाला.

“चला” छाया.

दोघे पण लगबगीनं डॉक्टर कडे गेले,डॉक्टर आलेले असतात.

“काल,रात्रीपासून ताप आहे हिला,कमीच होईना आणि रडतिये मधेच आणि गप पण पडतीये” भावड्या सांगत होता.

“हो तुम्हीं व्हा,बघू द्या मला”डॉक्टर.

मी काही औषध देतो ,दोन तीन दिवसात होईल ताप कमी आणि नाही झाला तर मग तुम्ही तिला शहरातील मोठ्या डॉक्टर कडे घेऊन जाऊ ,तस तुम्ही या आधी मग जाऊ” डॉक्टर.

“बर,”दोघे म्हणतात.

“माझं लयच चुकलं,मी एवढं तानायला नव्हतं पाहिजे,मला नव्हतं वाटलं एवढं वाढत जाईल म्हणून,कसली आई आहे मी,कलंक आहे आईला”छाया एकटीच बडबड करीत होती.

भावड्या शांत चालत होता,त्याच्याच विचारात…

घर कधी आलं ते च समजलं नाही.

बापाची काळजी कोरड्या मायेपूरती कधीच नसती,वास्तवापलीकडे त्याची काळजी असते,याची कल्पना फक्त बापच अनभवू शकतो,याची जाणीव बाप म्हणणाऱ्यांना नक्कीच माहीत आहे.

आई सारखी माया कोणी लावत नाही म्हणतात,कारण आईची माया दिसते ,तिच्या जेवू घालणाऱ्या हातातून,तिच्या कुशीत झोपल्यातवर,सगळ्या गोष्टीत ती इतरांना दिसत असते आणि जाणवत पण असते पण अगदी उलट बापच असतं जेवू घालणाऱ्या ताटा मागे त्याच कष्ट असते, मेहनत असते ,ती नाही  दिसत कोणाला…

भावड्याच पण असच काहीसं झाले होते… जाईल मोना चा ताप पण नाही गेला तर प्रश्न आहेच की तो काय मागे सुटतो का??? पैशांच्या तयारी सोबत मनाची पण तयारी ठेवावी लागणार होतीच…..

इकडे छाया ने मोनाला औषध  पाजून झोपवले आणि ती पण भावड्याजवळ जाऊन बसते,डोक्याला हात लावून…

“नको, काळजी करू,होईल लवकर बरी” भावड्या.

“माझी लय मोठी चूक झाली”छाया.

“बोलून काय उपयोग आता,गेली ती वेळ आता”भावड्या.

छाया मात्र रडत होती,ते पण खूप मोठयाने…

“आता काय रडून उपयोग,काल पोर रडत होती तेव्हा नाही पाझर फुटला आणि आता रडतेय” शांता आई म्हणाली.

कोणीच काही म्हणत नाही…

तेवढ्यात परत मोनाच्या रडण्याचा आवज येतो…

“उगी उग्गी,माझी चिऊ” छाया म्हणत तिला मांडीवर उचलून घेते.

“ताप गेला का ग तिचा” भावड्या.

“हो ,गेलाय अंग थंड आहे आता, चांगला आहे डाक्टर, पडला की फरक हिला” छाया.

“पण ,तरी तिला औषध दे,चुकवू नको अजून दोन दिवस तरी डॉक्टर ने सांगितलं आहे” भावड्या.

“बर ” छाया…

” मी आलोच बाहेरून,कामाचं बघतो काय झालं ते” अस म्हणून भावड्या निघून जातो.

शांता पण जाऊन थोडं पडते,फरशिवरच…

छाया मोनाला झोपवत ती पण झोपी जाते…..

दोन दिवस झाले आता मोनाला बर वाटत असते म्हणजे ताप गेलेला असतो पण तिच्या मनावर काय परिणाम झालाय का नाही ते काही समजत नव्हतं ,कितीही केलं तरी लहानच ना…

मोनाच वागणं पहिल्यापेक्षा आता शांत झाले होते,तीच हसणं गायब होते ,हातापायांची हालचाल होत होती पण म्हणावी तेवढी नाही,काही कळायला मार्ग नव्हता.

“अग, आजरी पडल्यापासून हिच्यात काय फरक नाही का वाटत तुला”शांता बसल्याबसल्या छाया ला म्हणाली.

“थोडी शांत च आली ये” छाया.

तेवढ्यात बाहेरून आवाज आला.

“काकांची आठवण काढत असेल ,म्हणून शांत बसली असेल”रवी म्हणाला.

रवीला पाहून दोघीना आनंद झाला आणि आधार पण झाला.

“अस होय,आमच्या तर लक्षातच आले नाही” छाया म्हणाली.

“हो ना,बरेच दिवस झाले म्हणून म्हणलं जाऊन यावं आणि तायडीला खूप खाऊ पण आणलाय ” रवी.

“जस तिला खाता येणार आहे,”शांता आई म्हणाली.

“मग तू खा की ग माझी आई”रवी आईच्या गळ्यात पडून म्हणाला.

छाया,रवी आणि शांता निवांत गप्पा मारत बसतात,झालेला सगळा प्रकार रवीला सांगतात आणि मोनाच्या शांत होण्याचं कारण पण त्या सांगतात.

“हम्म,बघू अजून लहानच आहे ,दोन महिन्यांत बघू काय वाढ आहे का ते”रवी म्हणतो.

आता सगळ्यांच्या डोक्यात तोच विचार चालू असतो.

रवी शांत बसेल तर ना!!

सहज बाहेर फिरता फिरता ,डॉक्टर कडे जातो.

“मला तुम्हाला काय तरी विचारायचे आहे “रवी डॉक्टरला विचारतो.

“काय विचारायचं आहे आणि तुमचं पेशंट कुठेय” डॉक्टर…

“म्हणजे,मी सहज चालत होतो इथून पण डोक्यातून काही केलाय जात नव्हत मग म्हणले तुम्हाला विचारावं” रवी.

“काय आहे असं”डॉक्टर.

“माझी पुतणी दोन महिन्याची असेल ,तिला ताप येत होता खूप,खूप त्रास पण झाला तिला पण आता ती पहिल्यापेक्षा खूप शांत झालीये,एकीकडे तर एकीकडे पाहत बसते, हात पाय हलवत नाही,सु-शी केल्यावर रडत नाही म्हणजे आई आणि वहिनी सांगत होत्या की खूप बदलली आहे” रवी बोलत होता जस काही हे सगळं त्याने अनुभवल होते…

“हे ,बघा आधी तर पेशंट ला पाहिल्याशिवाय काय होतंय ते सांगता येणार नाही पण ना हे नॉर्मल आहे ,सहा महिन्यांची झाली की पाहुयात घेऊन या तुम्ही” डॉक्टर.

रवी मान हलवून बाहेर आला.

“माझं थोडं अतीच होतेय का म्हणजे,दवाखाना दिसला म्हणून विचारायला गेलो बर,डॉक्टर चांगला होता,नाहीतर बाहेरच काढलं असते मला” रवी मनातच विचार करत होता…

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: