मी मोनिका भाग # 4
भाग #4
रवी थोडे दिवस राहून परत त्याच्या कामाच्या ठिकाणी निघून गेला.
आता सगळ्यांना सवय पण झाली होती,मोना च्या शांत असण्याची पण छाया आणि भावड्या काही शांत नव्हते आले अजून,त्याच्यात वाद चालूच होते.
रवी च काम चालूच होते आणि काम करता करता तो गावी पण शेती पाहायचं..
शांता आई पण आता गावी गेली होती,शेतीमधील काम चालू होती ,मोनि पण मोठी होत होती त्यामुळे पण का होईना गावाला जात होती तिचि आजी.
रवीच्या डोक्यातून अजून काही केल्या जात नव्हते,कधी एकटा बसला तरी त्याच्या डोक्यात तोच विचार असायचा.
“जेव्हा पहिल्यांदा मोनिला पाहिलं तेव्हा,तीच जे तेज होते ते आता दिसत नव्हतं हे काही खोट नव्हतं पण भावड्या काही तरी म्हणाला असता ना” रवीच्या डोक्यात चालूच असायचं.
पाहिले सहा महिन्यांची झाली की ,तिला इथेच घेऊन येतो आणि मग कळेल आणि तितल्या पेक्ष्या इथे चांगले हुशार पण आहेत डॉक्टर.”
मोना सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत होती पण तिच्यात झालेला बदल काही कोणी मनावर घेत नव्हते.
जवळ जवळ आता मोना सहा महिन्यापेक्षा पण जास्त झाली होती.
मोनाला अधून मधून सारखा ताप यायचा पण ,औषध दिल की बर पण वाटायचं ,काही केल्या तीच काय दुखणं ते कळेना.
“तार, आलीये ग रवीची” भावड्या छायाला म्हणतो.
“काय म्हणतात,भाऊजी,मोनिसाठीच आली असेल” छाया तिच्या कामात असते,काम करतच म्हणते.
“थांब ,वाचतो” भावड्या.
“वहिनी आणि भाऊ,
तुम्हाला नमस्कार..
सगळे तुम्ही कुशलच असाल,याची खात्री आहे मला. आई अजून गावीच आहे ना,मी गेलो होतो गावाला तेव्हा भेट झाली ,गावाकडे सगळं कुशल-मंगल.
भाऊ आणि वहिनी,मला तुम्हाला सांगायचं आहे त्याचा वेगळा अर्थ काढू नका,जशी तायडी तुम्हाला आहे तशीच मला पण ,थोडी जास्त म्हणाला तरी चालेल.
तायडी खूपच शांत बसतेय तिच्या वयानुसार ,मी हे वहिनी कडून आणि आई कडून ऐकले होते म्हणून म्हणले की इथे मोठे दवाखाने आहेत तुमची इच्छा असेल तर एकदा आपण दाखवून घेऊयात फक्त,सगळयांच्या मनातील शंका काढून टाकता येईल.
तुम्हाला काय वाटतेय ते सांगा,किंवा डायरेक्टच तुम्ही आला तरी चालेल.
मी आईच्या पण कानावर घातलं आहे.
सगळे काळजी घ्या आणि काय चुकलं असेल तर माफी असावी”
तुमचा छोटा,
रवी.”
“नुसतं म्हणलं होते आम्ही भाऊजीना,शांत झालीये म्हणून त्यानी तर खूपच मनावर घेतले” छाया म्हणाली.
“त्याच म्हणणं बरोबर आहे म्हणा,तसं तिने आता मान तरी धरायला पाहिजे होती”भावड्या केविलवाण्या नजरेने मोनिकडे पाहत होती.
जणू मोनि त्याला सांगत होती, मी नाही ये ठीक.
“काय करायचं” भावड्या छायाला विचारतो.
“तुम्हाला बघा कस वाटतय ते”छाया.
आई असते तर बरं झालं असते.
“मी कुठं जाणार,हाय की इथेच, शांता आईचा आवाज आला.
तशी भावड्याने तिला मिठी मारली.
“तार नाय काय नाय,अचानक” छाया.
“जेवढा वेळ तार यायला लागेल ना ,तेवढ्या वेळात म्हणलं जाईल मी पोरांकडे”शांता म्हणाली.
“ते पण हायच” भावड्या.
आताच रवीची तार वाचली ,ये म्हणतोय मोनिला मोठ्या डॉक्टर ला दाखवू.
भावड्या आई ला सांगत होता.
“मी बी त्यांच्यासाठीच आलेय बघ,रवी बाहेर फिरतो त्याला आहे जरा माहिती त्यातल आणि मोनि कडं पाहून पण काय ठीक आहे ती म्हणून वाटत नाही रे,मी बी पाच पोर सांभाळली की पण सहा महिन्यात बोलत होती,हुंकार टाकत होती” शांता आई बोलत होती.
तसा भावड्याच्या चेहरा अजूनच गंभीर आणि घाबरला झाला होता.
“तुम्ही चहा घ्या ,थोडं आराम करा आले की झालं चालू लगेच मोनि च”छाया म्हणाली.
“हम्म, शंका नको मनात काही” शांता आई म्हणाली.
भावड्याला काय करावं कळेना, शेवटी मग खूप विचार करून मोठ्या डॉक्टर ला दाखवायचं ठरवलं ,त्यात सगळ्यात अजून महिना कधी गेला तेच कळल नाही.
भावड्याने त्याच रात्री उशिरा, रवीच्या मित्राला फोन करून सांगितले की आम्ही सगळे येतोय डॉक्टर कडे.
आता डॉक्टर काय म्हणतील ,या विचाराने जेवढं टेन्शन येत ना ,तेवढं तर आजार कळल्यावर पण येत नाही ,असच काहीसं झालं होतं सगळ्यांचे.
“तिखट पुऱ्या, कापण्या आणि थोडं धपाटे घेऊन जाऊ ,तिथं शहरात रवीची राहायची पंचायत तिथे आपण सगळी,किती दिवस लागतात आणि किती नाही कोणाला माहिती” शांता आई छायाला सांगत होती.
“खरं च आहे” छाया म्हणाली.
इकडे भावड्याने पण ,पैशांचा बंदोबस्त केला होता,जेवढे जमतील तेवढे त्याने घेतले होते आणि काही डाग -दागिने पण घेतलं होतं.
शेवटी सगळी आवराआवरी झाल्यावर निघायचा दिवस ठरला,जायला चार पाच तास लागणार होते ,म्हणून पहाटेच निघायचं ठरल म्हणजे दहा पर्यन्त दवाखान्यात जाता येईल.
मोनाचा भविष्य डॉक्टर च्या हाती होते, तिला खरच काय झालं होतं का,की फक्त एक शंका होती ,ते मात्र आता अंदाज लावण्यात काही अर्थ नव्हता, हे च खरं.