मी मोनिका भाग #5
भाग# 5
आजचा दिवस ,मोनिका सोबत सगळ्यांनाच महत्वाचा होता खूप,तीच फक्त शांत बसन कशाला आमंत्रण तर देनार नव्हते ना ,की सगळ्यांनीच थोडी जास्त घाई केली होती..
“आजची आमची आपॉइंमेंट आहे ,”रवी.
“एक पाच मिनीट बसा, डॉक्टरने बोलावलं की बोलावतो” रीषेप्सीनिस्ट.
“ठीक आहे”..
पाच मिनिटांनंतर डॉक्टर ने बोलावल्या नंतर रवी ,भावड्या आणि छाया जातात,आत मध्ये.
“हिला सारखा ताप येतो,आणि त्यात ती डोळे पांढरे पण केले होते एकदा तेव्हा पासून ती अशीच शांत आहे” भावड्या सांगत होता.
“बर,हिच्या काही टेस्ट करूयात मग बघू,पण ताप तर तिला आता पण आहे”डॉक्टर.
“तेच कळत नाही काही,कधी पण ताप येतो”छाया.
“बर,हिला आपण ऍडमिट करून घेऊयात आणि मग ठरवूयात” डॉक्टर.
“ठीक आहे,बरी होईल ना पण ही नॉर्मल मुलांसारखी,”रवी.
“हो,फार काही नाही अंगात ताप खूप मुरलाय त्यामुळे” डॉक्टर.
नर्स यांना ऍडमिट करून घ्या आणि बाळाजवळ फक्त आई थांबेल..
मोनिला शेवटी ऍडमिट केलंच आणि तिच्यावर उपचार पण चालू झाले.
सगळे निघून गेले,रवी ने राहायची सोय केली होती तिकडेच..
भावड्या तेवढा बाहेर झोपला होता,हॉस्पिटलच्या आवारात..
रात्रीची वेळ होती,छाया ने जेवण वगैर करून घेतले आणि परत सगळे आले होते दवाखान्यात त्यामुळे थोड्या गप्पा पण झाल्या आणि सगळेच थोडे खुश पण होते.
रात्री ,छाया ने मोनिला दूध पाजले आणि झोपवले आणि ती पण झोपली…
पण..
रात्री 2 वाजण्याच्या सुमारास मोनि जोर जोरात कणायला लागली होती,तिच्या आवाजाने छाया ला जाग आली…शेवटी आईच स्वतःच मुलं आजारी असले की नाही येत झोप गाढ अशी…
“डॉक्टर, मोनि बघा कशी करतेय”
“चला चला”
“ओह माय गॉड,हिला खूपच ताप आहे ,सगळं ताप हिचा मेंदू पर्यंत गेलाय त्यामुळे हिला फिट आलीये ” डॉक्टर.
नर्स ,नर्स डॉ.जयवंत ला बोलावं आणि तुम्ही बाहेर जावा ताई,आम्हाला जलद उपचार करावे लागतील आणि घरातील कोणाला तरी बोलावून घ्या.” डॉक्टर.
“बर,अहो अहो करत, हॉस्पिटलच्या आवारात झोपलेल्या नवऱ्याकडे जाते,म्हणजे भावड्या..
“मोनिला अचानक ताप आला,म्हणून तिला डॉक्टर घेऊन गेलेत, बाहेर थांबायला सांगितले आहे…
छाया भावड्याच्या गळयात पडून रडत होती.
“रवीला बोलावून घेतो” भावड्या.
डॉक्टर तिच्यावर उपचार करत असतात,त्याचवेळी त्यांनी तिचा ताप पाहून, तिला अजून काय होऊ नये म्हणूम बेंबीत इजेक्शन दिल आणि त्याच वेळी तीला पॅरालीसी च चा अटॅक आला,काही समजायच्या आत ,मोनिची जीभ बाहेर पडली होती आणि हात- पाय वाकडे झाले होते आणि डोळे पांढरे…
डॉक्टर वारंवार प्रयत्न करत होते पण मोनिची काहीच परिस्तिथी समजावून घेता येत नव्हती.
इकडे रवी पण आला होता,कोणाला काहीच कल्पना नव्हती…
शेवटी पहाटे , डॉक्टर ऑपरेशन थेटर मधून बाहेर आले ,त्याच्या चेहर्यावरून दिसत होतेच की,काही तरी वाईट झालाय…
“तुम्ही ,माझ्या सोबत चला”डॉक्टर भावाड्याकडे पाहत म्हणाले.
“आम्ही कधी भेटू शकतो”छाया.
“मी सांगेल तस,ती ची प्रकृती नॉर्मल झाली की” डॉक्टर.
डॉक्टर ने भावड्या ला सोबत घेऊन गेले आणि त्याला झालेला सगळा प्रकार सांगितला..
तशी भावड्याच्या पायाखालची जमीनच सरकली..त्याला हे सहनच झालं नाही…
काळजावर दगड ठेवून डॉक्टर म्हणाले,”अपंग जगण्यापेक्षा तुम्ही हिला या सगळ्या त्रासातून मुक्त करू शकता,शेवटी तुमची ईच्छा, विपर्यास करू नका,मी जे बोलतोय ते”
भावड्या सुन्न होता,काय होऊन बसलंय, काहीच कळेना…
डॉक्टर त्याच काम करून निघून गेले…
भावड्या तसाच उभा होता,अगदी ठप्प..
थोड्या वेळाने मोनि शुद्धीवर आली होती पण नव्याने आयुष्यभराचा तल्लख अस अपंगत्व…
डॉक्टरच्या रिपोर्ट नुसार, ती फक्त शरीराने अपंग झाली होती,पण तिची बुध्दी शाबूत होती.. तिला आकलन करण्याची क्षमता होती,जाणून घेण्याची ,विचार करण्याची ही पातळी होती…
सगळं होत तिच्याजवळ…
डोकं होते पण विचार मांडायला शब्द नव्हते..
देखणं रूप होते पण तोंड थोडं वाकडं होते..
शब्द फुटण्याच्या ऐवजी फक्त तोंडातील लाळ च येत होती..
हात – पाय पण चांगले होते ,पण नकळत वाकडे होते…
बाकी सगळं छानच….
शरीराने अपंग असणाऱ्याला आपण समजु शकतो,पण मनानेच अपंग असणारे तर त्याहूनही भयानक च….
सगळे मोनिला भेटायला जातात आणि एकच आरडाओरडा चालू होतो,छाया जोर जोरात हंबरडा फोडत होती,भावड्या सुन्न उभा होता.. रवी डोक्याला हात लावून उभा होता…
आणि मोनिची आजी म्हणजे शांता मात्र मोनिच्या डोक्यावर हात ठेवून तिच्या जवळ उभी होती…
मोनिला आधार देत,तू आम्हाला हवी आहेस..
मोनिची नजर मात्र आज बोलकी वाटत होती, शांता आजी कडे पाहून नजर शांत झाली होती आणि गालावर हसू पण होते…
मोनि शरीराने अपंग झाली होती पण मनाने बोलकी झाली होती…
तिच्या ह्या बोलक्या नजरेसमोर सगळं अपंगत्व फिक होते..
पण ती अपंग आहे हे झाकलं जात नव्हते, हे पण खरंच होते…
छाया चा आरडाओरडा ऐकून नर्स छायाला समजावून सांगतात,तिच्या समोर अस काही करू नका हे पण सांगतात..
रवीला छाया दोषी ठरवत होती,त्याने नसते सांगितलं तर नसते ना आणल इथे…
बाकी कोणी काहीच बोलत नव्हत….
रवी बाहेर जातो,हॉस्पिटलच्या..
रवीला स्वतःच्याच नजरेत उतरल्यासारखं वाटत होते,स्वतःच मनच त्याला खात होते, काय करायला गेलो आणि काय झालं म्हणून तो पण ढसाढसा रडत होता अगदी लहान मुलासारखा..…
डॉक्टर मोनिच्या चेकअप ला येतात..
“तुम्ही तिची रोज मॉलिश करा,तेलाने आणि थोडा व्यायाम पण करून घ्या,कसा करायचा ते मी सांगतो आणि मोठ्याने ओरडू नका,सगळे तिच्यावर भरभरून प्रेम करा,ती तिच्या पायावर चालू शकेल पण तेवढी काळजी तुम्हाला घ्यावी लागले”
“हो घेईल ना मी” शांता आई म्हणाली…
पाच दिवसानंतर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता…
आता इथून पुढची कथा माझीच मी तुम्हाला सांगणार आहे…
हो,मी मोनिका….
हो कारण आता मी वर्षाची झाली आहे…
मला कळायला लागले…
मला कळायला लागले म्हणून मी आजी सोबतच राहणार आहे,जिथं शांता आजी तिथं मोनि….
मला बोलायला येत नाही तर आजीला सगळं कळतं माझ्या हावभाव वरून आणि हातवारे वरून….
आणि हो,आजीने माझी। एवढी मॉलिश केली की माझे हात पाय वाकडेच आहेत पण मी चालूं शकते ,एकटी.. फिरू शकते…
वस्तू उचलू शकते, ठेवू पण शकते….
माझ्या तोंडातील लाळ माझीच मी पुसू शकते….
आणि,हो मला बांगड्या पण खूप आवडतात आणि नटायला पण…
पण माझे केस मला नाही नीट करता येत माझी आजी देते ना करून पण….
इथून पुढची कथा नक्की वाचा,कारण मी तुमच्या सगळ्यांसारखी नाही ना,मी आयुष्य जगतेय म्हणायला पण सगळ्या ईच्छा दाबून आणि मन मारून तरी पण मी खूप खुश आहे…
हसत खेळणारी मी मोनिका…..