मी मोनिका भाग# ६
भाग # 6
“आई मला अस होईल म्हणून खरच नव्हतं वाटलं” रवी शांता आई ला म्हणाला.
“माहितेय रे मला” शांता.
“पण झाली ना माझी पोरगी अपंग ,कोण जबाबदार त्याला” छाया रडत रवीकडे पाहत म्हणाली.
“आवज ,बंद कर पहिला तुझा” शांता आई जोरात ओरडली.
“बोला,तुम्ही मलाच बोलणार ना ,तुमच्या मुलाला कशाला बोलताल” छाया म्हणाली.
“मला बोलायला लावू नको,त्या दिवशी दार बंद करून काळीज विकून आल्यासारखं नसते ना पडली तर हे झालंच नसते”शांता आई बोलली
शांता बोलतच मोनिकडे गेली आणि तिला उचलून घेत म्हणाली.
“वाटत,असेल तुला ओझं तीच ,मी घेऊन जातेय तिला माझ्यासोबत गावाला” शांता आई म्हणाली.
शेवटी शांता ने तिला या सगळ्यापासून लांब गावाच्या मोकळ्या वातावरणात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला..
दवाखाना आता करायचाच नाही असं ठरलं होतं सगळ्यांच च…
“हीची कपडे दे ,घेऊन जाते ” शांताआई म्हणाली.
” हम्म”छाया म्हणाली.
” जा ,घेऊनच एवढ्याश्या लेकराने काय काय सोसाव, अजून” भावड्या म्हणाला.
“मी सोडून जातो आईला ” रवी म्हणाला.
शेवटी मोना ,रवी आणि शांता गावी आलेच..
“कस वाटतय तुला ताई आता” रवी मोनिला मोकळं आकाश दाखवत म्हणाला…
मोनि फक्त हसली आणि लाळ रवीच्या हातावर पडली.
“त्यासाठी आपण काय करायचं,पिन लावून रुमाल लावायचा फ्रॉक ला आणि तोंड पुसायच” रवी ने त्याच्या रुमालाच्या चोकोनी घडी घालून तिच्या फ्रॉक ला लावला.
आणि रवी ने सांगितल्या प्रमाणे मोना ने तोंड पुसून दाखवलं आणि हसली..
“अशीच हसत राहा बाळा,हसली की अजून सुंदर दिसतेस” रवी ने मोनिला जवळ घेऊन म्हणाला…
“बास ,झाल्या गप्पा चला गरम गरम चपाती आणि चहा खायला”शांता तिकडून बोलली..
शांता ने दोघांना चहा आणि चपाती दिली.
मोनि खूप वेळ प्रयत्न करत होती,पण तिला जमत नव्हतं..
यावर पण उपाय काढायला पाहिजे होते..
शांताच्या लक्षात आलं की तिला हे खाता नाही येणार…
पण तिला पातळ दिल करून तर खाता येईल..
मग फक्त चहा च दिला…
चहा चपाती काही खाता आलीच नाही मोनिला…..
शांता तिच्या हातापायांची रोज तेलाने मॉलिश करत असायची, त्यांचे व्यायाम घेयची अगदी,रोज काटेकोरपणे..
तिला भाजी चपाती नव्हती जमत खायला म्हणून तिला फळांचे रस, दूध देयची, कधी कधी हळू हळू का होईना थोडं वेगळं पण बनवायची….
शांता ला फक्त मोनाचा नजरेवरून समजायचं…
मोनि शांताच्या डोळ्यासमोर मोठी होत होती…
बाहेर मुलांच्यात तिला खेळायला जाता येत नसायचं,गेली तर शांताला तिच्या पडण्याची भीती वाटायची ,चुकून कोणाचा धक्का लागला तर म्हणून शांताच तिच्याशी लहान होऊन खेळायची….
मोनिच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र शांता आजीने टिकवून ठेवल होते…
मोनि आता जवळ जवळ दोन वर्षांची झाली होती..
भावड्या आणि छाया तिला मधून मधुन भेटायला येत असायचे, तिला काय नको ते पाहत असत….
परत इकडे छाया ला दिवस गेले होते….
नंतर मग छाया चे जाणं-येणं कमी झालं,पण भावड्या आणि रवी मात्र नेहमी येत असयाचे….
दिवसामागून दिवस जात होते,मोनिला आहे तसे सगळयांनी आपलं मानलं होते..
घरच्यांच्या जीवाचा तुकडा झाली होती..
मोनि आता वस्तू तिच्या हातात चांगल्या पकडू लागली होती… सांगितलेले सगळं तिला कळतं होते..
छोट्या छोट्या वस्तू आणून देत असायची..
स्वतःच्याच घरच्या अंगणात एकटी खेळत असायची…
बोलता मात्र काहीच येत नव्हतं..
बोलायला गेली तरी आ….आ… पेक्षा दुसरा कुठला शब्दच येयचे नाही….
समोरच्याला समजावण्याची एवढी उत्कंठा होती की,तिच्या स्वतःच्याच आकलनशक्ती मधून हातवारे खुणा करून बोलायला लागली…तीच म्हणणं पटवून द्यायला लागली,प्रत्येकाला हातवारे करून गप्पा मारू लागली…
तीच न ऐकू येणार बोलणं पण सगळयांना मधूर वाटायला लागलं होतं…
छाया ला मोनि नंतर मात्र मुलगा झाला आणि छाया त्याच्यातच गुंगून गेली….
कधी छाया गावाला आल्यावर मोनि बाळाची चांगली काळजी घ्यायची..
पाळणा हलवायची तर कधी त्याच्याजवळ बसून राहायची…
मोनिची वाढ चांगल्या प्रकारे होत होती ,तिच्या मेंदूची तल्लकता दिवसेंदिवस वाढतच होती…
दुसऱ्यांकडे असणाऱ्या गोष्टी मला पण पाहिजेत अशी ती नजर शांता पासून काही लपत नव्हती….
“काय ,झालं मोने जायचं का तुला पण शाळेत” शांता आजी मोनिला म्हणाली..
तशी मोनिच्या गालावरची कळी फुलली…
मोनिच्या समाधानासाठी त्यादिवशी शांता ने ठरवलं तिला शाळेत घेऊन जायचं…
“तू इथं बस” शांता आजी म्हणाली.
“बाई ,आजच्या दिवस मोनिकाला बसू द्या वर्गात”शांता तिथळया शिक्षकेला म्हणाल्या.
“हो ,बसू द्या पण आजच्याच दिवस” शिक्षक.
“का पण,रोज नाही का बसू शकत”शांता.
” तुम्हाला माहित आहे ,मोना अपंग आहे ,तिला बोलता येत असते तर मग काय नव्हते पण तिला बोलता येत नाही ,आणि चुकून मुलांनी मारलं वगैरे तर तिला सहन नाही होणार,तुम्हाला कळतंय का”शाळेतील बाई म्हणाल्या.
“कळतंय सारं मला,पण तिच्याकडे पाहिलं की वाटत ,तिला पण चारचौघासारख आयुष्य मिळावं,तीन पण जमेल तेवढी शाळा शिकावी” शांता बोलता बोलता थांबली…
तिकडून मुलाचा गोंगाट ऐकू आला,मागे पाहतेय तर मोना दिसत नव्हती…
शाळेतील मुलं जोरजोरात हसत होती…
टिंगल करत होती,तिच्या सारख हात – पाय वाकडे करून काही चालत होती…
मोनि जोरजोरात आ… आ…. करून सगळयांना मारायला पाहत होती,म्हणजे स्वतःलाच कोणी हात लावू नाही म्हणून अगदी गोल गोल हातवारे करत फिरत होती…
तिचा आवाज,तिचा आक्रोश शांताच्या जिव्हारी लागला..
शांता पळत जाऊन मोनिला मिठी मारली…
मोनिच्या ह्रदयाचे ठोक्यांचा आवाज शांता ऐकत होती…
शांतला जाणीव झाली होती,हे जग तीच नाही…
तीच विश्व म्हणजे फक्त घरचं…
मोनि ची कितीही ईच्छा असली तरी हे जग तिला नाही सामान्य जीवन जगू देणार..
कसतरी मोनाचा आक्रोश शांत करून ,तिला घरी घेऊन जाते,शांता पण..
मोनिला पण समजलं होत शाळा आपली नाहीच….
तिने आता शाळेत जाणाऱ्या मुलांना पाहण पण सोडून दिलं होतं….
तिच्या डोळ्यातील त्या वेदना बघणाऱ्या पण जाणवत होत्या….
बाकी सगळयांना तीच अपंगत्वच दिसायचं…
मोनिसाठी शाळेची दरवाजे कायमची बंद झाली ,त्याचबरोबर मैत्री नावच नात पण तिला कधीच गवसलं नाही….
काय पण असते ना जीवन….
छोट्या गोष्टी साठी आपण जीव देण्याच्या गोष्टी करतो आणि इथे कसं जगणं म्हणजेच प्रश्न होऊन जातोय……
नक्की वाचा हा भाग आणि कसा वाटला ते comment करून सांगा.. अपंगत्व विषयी तुम्हाला काय वाटते ते पण कळवा..