मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

कथा-कादंबरीप्रेरणादायी कथा

मी मोनिका भाग # ७

भाग #7

मोनिच्या शाळेला आता कायमचा पूर्णविराम लागला होता,हे सगळ्यांनाच माहीत होते.. 

कदाचित हे मोनिला पण माहीत झालं असेल म्हणूनच की काय,तिच्या डोळ्यात आता ती उसूक्ता दिसत नव्हती…

मोनि घरात एकटी होती म्हणून ठीक होते… सगळे तिचे नेहमीच भरभरून लाड करायचे.. आणि मोनिला ती अपंग असल्याची पण कधी फार काही जाणीव पण झाली नाहि…

पण आता घरात बाकी पण मोनिची चुलत भाऊ ,बहिणी सगळे राहत होते,त्यांना मोठे होताना ती पाहत होती…

“सायकल पाहिजे मला,काका” शितली भावड्याला म्हणाली.

“चल घेऊन येऊयात आपण”भावड्या….

“अ..आ।….आ..”मोनि ओरडून सांगत होती..

“ताई तुला नाही जमणार,” शीतल सांगत होती .. तो पर्यन्त भावड्या ने मोनिला जवळ घेतलं आणि  मायेने डोक्यावरून हात फिरवला..

“आपण सामान्य माणसांसारखं जगू शकत नाही ,याच्या पेक्षा जास्त दुःखच जगात काही नाही”…..

मोनि उघड्या डोळ्यांनी पाहत होती,तिच्या भावा-बहिणींना त्यांच्या मित्र-मैत्रिणींना..खेळताना ,हसताना.. पण तीच कोणीच नव्हतं…

वाढत्या वयासोबत याची जाणीव तिला होत होती…

शब्दांना आवाज नव्हता,पण मनाची अधिरता काही केल्या शांत बसू देत नव्हती…

मोनि आता शांत होण्यापेक्षा पहिल्यापेक्षा चिडखोर होत होती,तिला समजत नव्हतं..तिला पण जगायचं होत सगळ्यांसारखं… 

डोळ्यांनी ती तिच्या बहिणीला पाहत होती ,तीच ते नटनं, मुरडन,छान छान कपडे घालणं,नवीन केशरचना करण ,आरशात पाहणं… 

मोनिला हे सगळं पाहून असह्य होयला होत होते..

आणि ,विशेष तिच्या ह्या मनाचा कोणी विचारच केला नाही…

तिला फक्त बोलता येत नव्हतं,पण तिला मन तर होते ना!!

भावड्या तिला सगळं पाहत होता… 

पण मोनाची बहीण जशी मोठी होईल तसे त्यांचा अभ्यास,शाळा कधी बाहेर घेऊन जायचं हे पण तिला सगळं कळतं होते..

“मोनिला पण वाटत ग,आपण तिला बाहेर घेऊन जावावं म्हणून”भावड्या छायाला म्हणाला…

“हो ,कळतंय मला पण बाहेर किती गर्दी असते ना,धक्का दिला कोणी म्हणजे तिला,काळजी वाटते ना”! छाया मोनिकडे पाहत म्हणाली.

“तुला काय घेउन येऊ”भावड्या म्हणाला…

तसं मोनिने खाली मान घातली ते वर काढलीच नाही..

बाहेर घेऊन जाणार नाही म्हणून ,मोनिला बहुतेक खूप राग आला होता…

भावड्या पण तिला न मनावताच निघून गेला…

आता मात्र मोनाचा राग पणाला लागला होता…

आज पहिल्यांदा मोनिला जाणवल होते की आपला बाप पण आपली काळजी घेत नाही…

मोनिने दिसेल ते फेकून दिले…सगळी भांडी फेकून दिली होती..

अर्थातच ,मोनि साठी छाया घरीच थांबली होती..

मोनि छायाला पण मारत होती,दिसेल त्या वस्तूने ती फेकून देत होती…

जोरजोरात आक्रोश चालू होता….

छायाच्या मनात विचार येऊन गेला,”त्यादिवशी एवढ्याच मोठ्याने आणि जोरजोरात मी आक्रोश करत होते आणि तेच तिच्या मनावर बिंबवलं गेलं आणि आज तिच्या आक्रोशाची मला भीती वाटायला लागलीये”

मोनि स्वतःच्या पोटचा गोळा असताना,छायाला आज भीती तिच्या आक्रोशाची भीती वाटली होती..

धीर धरत छाया ने मोनाला जवळ घेतलं आणि शांत केलं..

डोक्यावरून हात फिरवत ,तिच्याच जवळ बसली…

एव्हाना, भावड्या माघारी आला होता…

डोळ्यांना दिसलेल्या पसाऱ्यावरून त्याला कल्पना आली होती….

“मी काय घेऊन आलोय,माझ्या ताई साठी” भावड्या मोनिकडे पाहत म्हणाला..

मोनि ने मात्र वर पहिलच नाही…नंतर त्याने त्याच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज केला आणि तिच्या जवळ घेऊन गेला….

बंगड्याच्या आवाजावरून मोनि ने मान वर केली आणि हसली..

“आ… याया…….”आई कडे म्हणजे छाया कडे पहात म्हणाली.

छाया ने पण बांगड्या घातल्या..

बांगड्या घातल्यावर मोनि आरशासमोर गेली आणि स्वतःला निरखु लागली होती… 

तिच्या निराखण्यात तिच्या वाढत्या वयाची चाहूल नकळत होतीच…

प्रश्न होता मोनाचा,म्हणजे कस ना सगळं वेगळंच होते,स्वतःला पण सावरू शकत नव्हती ती…

अपंगत्व च देयचे होते तर मातृत्वाच पण कशाला देयचे ना!!! 

मोनि आता वयात आली होती,शरीराने आकार घेतला होता आणि तिला मासिक पाळी पण चालू झाली होती….

होणारा त्रास आणि असह्य वेदना ,पाहवत नव्हत्या…

या सगळ्यात मोनाचा खूप चीड चिड होत होती,कधी कधी तिचा पारा एवढा चढायचा की तिच्या बहिणीला मारायची…

बहिणी कडे पहायची पण नाही….

मोनि आणि तिच्या बहिणीमध्ये कधीच छान नात झालंच नाही….

दोघींच्या मधील तणाव वाढतच गेला..

मोनिची आता विशेष काळजी घ्यावी लागत होती,बाहेरच्या नजरापासून…

वासनेला कुठे असतो माणुसकी ,तिथे फक्त वासनाच असते…

“या सगळ्याची बळी स्वतःची मुलगीच काय ,कोणतीच अपंग मुलगी पडू नाही…”

भावड्याला तीच मोठं होणं आता शाप वाटू लागल होते..

छाया तिच्यासोबत असायची….

तिची काळजी घेत असायची,मोनिला आता गावात पण ठेवायच बंद केलं होतं..

शांता आजी पण तशी आता म्हतारी झाली होती..

मोनिला भेटायला आजी नेहमी येत असायची…

शेवटी शांता आजीमुळे च मोनि आज चालत फिरत होती….

मोनिचा चिडखोरपणा मात्र दिवसेंदिवस वाढतच चालला होता….

शांता आजी मात्र आता मोनि जवळच रहायला आली होती..

मोनि पेक्षा छोटी असणाऱ्या बहिणीच आता लग्नाची तयारी चालू झाली होती..

आणि ती तयारी मोनिला पाहायला पण छान वाटतं होती…

आपल्याच बहिणीच साडी घालणं,छान मेक अप करण ,तिला आवडत होते आणि आपण पण साडी घालावी म्हणून ती आजी जवळ मागे पण लागायची..

हौस म्हणून का होईना,आजी तिचा साडी घालण्याचा हट्ट पुरवत असायची….

भावड्याला आणि छायाला समजत होते शांता आजीचं वागणं मोनिसोबतच आणि त्यांच्या चुका पण कळत होत्या…

कारण मोनि जेवढी आजीसोबत राहायची ना तेवढि जास्त खुश असायची….

मोनिच्या डोळ्यासमोर तिच्या बहिणीचं होणार लग्न मोनिला सांगून जात होतं,ती अपंग असल्याची जाणीव करवून देत होते…

भावड्या जवळ येऊन भावड्याला जोरजोरात मोनि मारायची आणो रडायची…

वेदनाच असह्य होत्या ना…

प्रत्येक बापच स्वप्न असते मुलीचं लग्न..

आणि वाढत्या वयाबरोबर मुलींना पण नटून-थटून नवरी बनण्याचं वेधच असतात की. .

अपंगत्व तर दिलेच पण लग्न पण दिल नाही देवाने तिच्यासोबत….

भावड्याने तीच लग्न न करण्याचाच निर्णय घेतला होता तिचा,आयुष्यभर सांभाळील म्हणत मोनिला भावड्याने मिठीत घेतले…

तिच्याशी गप्पा मारू लागला…

“ताई,मला कळतंय तुला काय होतंय ते,पण तू त्रास करून घेऊ नको,माझं पण चुकलंच मी तुझ्याशी कधी बोललोच नाही आम्ही तुला तुझ्या आजी सारख कधी समजून घेतलच नाही ग” भावड्या बोलत होता आणि मोनि शांत त्याच्या मांडीवर  डोकं ठेवून झोपी गेले होती..

नक्की वाचा हा भाग आणि कसा वाटला ते comment करून सांगा.. अपंगत्व विषयी तुम्हाला काय वाटते ते पण कळवा..

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: