मी मोनिका भाग # ८
भाग # 8
बहिणीचे लग्न झाले,संसार चालू झाला,पाहुण्यांची ये – जा चालू झाली..
मोनि नेहमी बसलेली असायची तिथेच जवळ..
नवीन येणाऱ्या पाहुण्यांनी तिच्यासोबत पण बोलावं,ह्या आशेने ती पाहत असायची पण…
पण नवीन लोक तिची किसळ करायचे, तिच्याकडे पाहिलं तरी तोंड फिरवायाचे..
तिला कळत नव्हतं, अस मुळीच नव्हतं..
तिला आता समजलं होते,आता बाहेरच कोणी आल्यावर तीच लांब जाऊन बसत होती..
हे जग आपलं नाहीच,म्हणून तिने स्वीकारलं होते..
जे मिळणं त्यात खुश राहायला शिकायचं,म्हणून तिला नको असेल की ती लांब रस्त्याच्या कडेला जाऊन बसायची..
येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पहायची,अनोळखी माणसांच्या कडे हसून पहायची..
कोणी तिला पाहून तिच्या हसण्याला,स्मित हस्याला प्रतिउत्तर दिले की ती पण खुश होयची आणि एक हात वर करायची ,मनातल्या मनात आशीर्वाद द्यायची..
“तुम्ही असंच हसत राहा,खुश राहा”
मोनाचा नकळत लागणारा आशीर्वाद पण शुभ वाटायला लागला होता,काही लोकांची काम होयची,कोणाचा दिवस चांगला जायचा.. कोणी तिच्यासोबत बोलायला येयचे…
तिला वाटलं तर बोलायची,नाहीतर तिथून लगेच घराकडे माघारी..
मोनिच घर थोडं जवळच होते ना,म्हणून जमून जायचं..
मोनि खुश राहायला लागली होती…
आणि अचानक गावाकडून बातमी आली..
“मोनिची आजी आजारी पडली आहे,एकाच जागेवर आहे”
भावड्या ने हे सगळे घरी सांगितलं..
आजी आजारी आहे हे ऐकल्यावर मात्र,मोनिची पुन्हा चिडचिड होयला लागली..
“भावड्याच्या हाताला धरून ,सांगायला लागली,मला जायचं आहे जणू,आजी कडे”…
भावड्याला मोनिच्या भावना कळतं होत्या,म्हणून मोनिला भावड्या गावाला घेऊन गेला खरं आणि तिथेच ठेवलं…
शांता झोपून होती,जरा जास्तीच आजारी होती…
शेवटच्या घटकाच मोजत होती म्हणायला काही हरकत नव्हती..
शांताने पण बोलण सोडलं होते आणि मोनिला तर बोलायलाच येत नव्हतं..
पण म्हणतात ना,प्रेमाला शब्दाची गरज नसते फक्त भावनांची जाण असावी लागते…
शांताच्या डोळ्यात मोनि दिवस दिवस पाहत असायची आणि समजून जायची…
शांता आजीला अस पाहून अजून मोनिची चीड चीड होत असायची…
मृत्यू ही गोष्ट निसर्गानेच दिलेली आहे ,हे अजून मोनिला माहीत नव्हतं…
आणि तिच्यासाठी हे सगळं नवीनच ना!!
तिला अस वाटायला लागाल होते की ,आजी माझ्यासोबत राहून राहून ती पण बोलायची बंद झाली काय..
पण खर सांगायचं,मोनि तिच्या अशा अवस्थेत कधीच शांता आजी पासून बाजूला झाली नाही…
जस जमेल तसं,आजी च्या डोक्यावरून हात फिरवायची, तिच्या तोंडावरून हात फिरवायची….
नातच घट्ट होते ते..
मोनिने एवढा जीव मात्र कोणालाच लावला नव्हता,मोनि जीव लावू शकते,तिला प्रेमाची भाषा समजते,आणि ती दाखवता पण येते हे नकळत घरातील बाकी मंडळींना जाणवत होती…
“मला तर वेगळाच टेन्शन आलाय बघ,रवी” भावड्या म्हणाला…
“का रे,काय झालं” रवी…
“आपली आई आजारी पडली आहे, किती दिवस राहील म्हणून नाही सांगता येत पण मोनिच काय” भावड्या.
“हो र,दिसतेय ते,देवालाच काळजी” रवी.
“अजून मोनिला काही त्रास नको,देऊ देवा एवढीच अपेक्षा आहे माझी” भावडयाने हात जोडून म्हणाला…
शांता ची तब्येत अजूनच खराब होत चालली होती..
आणि शेवटी तो दिवस आलाच…
“रवी,मोनिला घेऊन नानांच्या घरी जा आणि तिथेच टीव्ही लावून दे,आई नाही राहिली आपली, तिला कळता कामा नये” भावड्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंना वाट देत रवीला सांगत होता..
“नको,काळजी करू,नानांना सांगतो मी तस”रवी.
शांता आता कायमची जग सोडून गेली होती, शांता एक चांगली आई होतीच पण चांगली आजी पण झाली होती.
शांता ला जवळ जवळ सहा- सात नातवंड होती पण मोनि तिच्या जवळची सगळ्यात ,अगदी पहिल्यापासून ते अखेरच्या शेवटच्या दिवसात पण सोबत राहिली..
ठरल्या प्रमाणे रवी ने नानांच्या घरी सोडलं तिला..
दुपार पर्यन्त मोनि तिथे थांबली खरी..
पण नंतर तिच्याच जीवाची घालमेल होयला लागली होती…
काही केल्या तिथुन तिला कोणी जाऊ देत नव्हतं, मग मात्र तिने दिसेल ते फोडायला , टाकून द्यायला सुरुवात केली होती..
स्वतःच्या शब्दांना आवाज नव्हता खरं, पण वस्तूंचा आवाज ऐकून तरी माझं म्हणणं ऐकतील,अस मोनिला वाटायचं म्हणून ही सवय मोनिला लागली होती….
शेवटी नानांच्या मुलाने मोनिला मयत स्थानी सोडलं…
भावड्या मुखाग्नी देत होता,ते मोनि ने लांबून पाहिलं आणि जोर जोरात रडायला लागली..
गर्दीच्या मध्येच एकटी होती..
घरातील सगळी पुढे होती,कोणाचं लक्ष नव्हतं तिच्याकडे…
माहीत पण नव्हतं कोणाला की ती इथे आहे म्हणून..
न राहवून मोनि खाली बसली, त्या गर्दीत आज मोनि खरी दुबळी वाटली..
सगळ्यांच्या घोळक्यात आपण एकटाच असल्याची भावना तिच्या मनात आली..
मोनि तिथे जास्त वेळ न थांबता घरी केली..
आजी असलेल्या खोलीकडे ती ,जमेल तसं चालत ,पडत पाहायला गेली..
आजी असेल तिथे,आपली वाट पाहत,आज आजीला भेटली पण नव्हती ना…
आजी तिथं नव्हती म्हणजे ती आजीचं होती,सगळ्यांच्या घोळक्यात, तिच्याकडे सगळे फक्त पाहत होते आणि माझा बाप… माझा बाप…
तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हत,आपलाच बाप आपल्याच आजीला अग्नी देतोय..
मोनिला हे समजणे अशक्य होऊन बसले होते,जन्म-मृत्यच्या चक्रात पुरती फरफट झाली होती तिची..
घरी आल्यावर मात्र तिने, एका कोपऱ्यात बसणं च पसंद केलं..
अंधारा एक कोपरा ,तिथं उजेडाची एकही किरण येऊ शकणार नाही अशी जागा…
सगळं झाल्यावर सगळे जण मात्र घरी आले…
“अर, रवी मोनि आली होती मैतिला, काहीच एकेना पोरगी,घरात सगळं तोडफोड केलीये” नाना रवीला सांगत होते..
हे ऐकताच रवी पळत घरी गेला..
“ताई ,ताई.. मोनिका.. मोनिका”…..
रवी तिला एकसारखा आवाज देत होता पण,कुठेच काही नाही…
शेवटी त्याने सगळ्या लाईट लावल्या, एक ना एक जागा शोधून काढली आणि मग त्याला एक अडगळीच्या कोपऱ्यात मोनि पडलेली दिसली..
अंथरून ओल झालं होतं सगळं,मोनिच्या डोळ्यातुन अश्रूंच्या धारा होत्या,लाल बंद डोळे झाले होते,केस विस्कट लेले होते, हात-पाय पोटात घालून बसली होती…
हे पाहून रवी पुरता घाबरला होता,काय करावं तेच कळेना…
मोठ्या धीराने तो हळू हळू मोनिजवळ जात होता…
“ताई,चल बाहेर ये”रवी…
ताई…
तस,मोनि ने त्याच्यावर तिथंच पडलेला पातेले फेकून मारल..
आणि अजूनच घाबरून गेली…
तस रवीला काही करावं तेच कळेना..
“आज तिला सोड तिच्याच हवाल्यावर,आज काहीच नको बोलायला,”भावड्या म्हणाला.
आई सोबत पोरीला पण गमावतोय की काय याची भीती भावड्याच्या मनात होती..पण मन दुःखी नव्हतं..मोनि देवाजवळ गेली तर ,दुःख तिलाच कमी होईल असं त्याला आता वाटू लागलं होते…
डॉक्टरनांनी परत विचार करायला लावला होता ,जेव्हा तिचा अपंगत्वाचा झटका आला होता…
न कळून चुकलं होते ,डॉक्टर बोलत होते ते योग्यच होते ते..
मोनिची काळजी अजून आता जास्त वाटायला लागली होती….
खरंच आहे..
“आईविना जग खरच भिकारी आहे”…