मी मोनिका भाग #१०
लग्न थाटात झालं….कृती वहिनी घरात रुळून गेली..पण रोजच तिच्या चेहऱ्यावर प्रश्न होता, इथून कधी शहरात जाईल एकदाच परत इकडे यायला नको…
कृती वहिनी जीवापाड प्रेम करत होती सतेज दादा वर,तस अजूनच .. दादा वाहिनीवर फिदा होयला लागला होता..
मोनि सगळं लांबून पहायची आणि गालातच हसायची…
वहिनी सगळ्यांसमोर मोनिकडे पाहून हसायची ,छान बोलायची पण एकटी असले की मग मात्र मोनि कडे पहायची पण नाही…
मोनिला तीच वागणं कळायला लागाल होते..
आणि मोनिच्या हावभावावरून छाया आणि भावड्याला कल्पना आली होती..
दादा ने नेहमीच आपल्या आई -वडिलांची भाडंण पाहिलं होते,बायकोवर प्रेम करावं,तिला जपावं म्हणून तो नेहमी चांगला नवरा म्हणून राहत असायचा..
त्यांचा नवीन संसार चांगला बहरत होता…
कृती वहिनीला दिवस गेले होते…
हे ऐकल्यावर मोनिला आनंद गगनात मावत नव्हता..
मोनिच्या चेहऱ्यावर च हसू सगळ्यांना दिसत होतेच,मोनि नाचत होती..बागडत होती…
वहिनीला मदत करायची..
बसल्या बसल्या दळण करायची,झाडून काढायची…. झोप म्हणायची वहिनीला सारख…
मोनिच्या मनात येणाऱ्या बाळाबद्दल प्रेमच होते आणि काळजी पण…
मोनि अपंग होती पण तिला समज पण होती..
“वहिनीच्या मनात मात्र सारखी भीती होती,हिच्यावर सावली तर पडायची नाही ना,माझं बाळ पण असच तर नाही होणार ना!!!”वहिनी विचारातून बाहेरच येत नसायची..
तिच्या मनातील भीती आता कधी ओठावर येईल हे तिला पण जाणं नव्हती… आणि त्यादिवशी..भीतीपोटी आणि काळजीने तिच्या तोंडातून गेलेच….
“अहो,आपण जायचं का ,तुम्हाला पण येऊन जाऊन करावं लागतं??”कृती वहिनी..
“कुठे जायचे म्हणतेय”सतेज दादा…
“म्हणजे,बाहेर गावी राहायला” कृती…
“असल्या अवस्थेमध्ये,कुठेच नाही जायचं,इथेच राहायचं,आई आहे,बाबा आहेत आणि ताई तर दिवसभर असतेच ना तुझ्या आसपास”सतेज कृतीला म्हणाला..
“तीच तर मोठी अडचण आहे” कृती हळूच बडबड करते..
उगीच वाद नको म्हणून ती पण शांत बसते…
पण कृतीला आता वेध लागले असतात,तिला काळजी असते की तिच्या बाळावर काही याचा परिणाम तर होणार नाही ना…
कृतीच्या वागण्यात आता खूप बदल जाणवत होता…
पण मोनि ती जिला कोणीच कधीच समजलं नाही…
वहिनीने बाहेर काढलं तरी ती तिथेच बेडरूम च्या बाहेर थांबून बसायची…वहिनीला काही मदत लागली तर…
काही अडचण आली तर…
भले ती काहीच करत नसेल पण ती आई ला बोलावून तर आणू शकते ना, शेतामधून एवढं तिला वाटतं होते..
दिवसामागून दिवस जात होते.. आता जवळ जवळ नऊ महिने पण संपत आले होते…
मोनिने खरी साथ दिली होती,वहिनीला….
शेवटच्या दिवसात मात्र वहिनी तिच्या माहेरी गेली…
मोनिला ला मात्र आता करमत नसायचं… वहिनीला बघत बसायचं तीच रोजच काम झालं होतं….
त्यादिवशी आनंदाची बातमी घरी आलेच…
“ताई ,हे घे पाहिलं तुलाच” दादा ताई ला म्हणाला.
“अरे हळूच तिला ठसका लागेल” छाया म्हणाली…
“खाऊ दे ग,आत्या झाली आहे आता”भावड्या म्हणाला.
दादा ने दुसरा पण पेढा तिच्या तोंडात घातला..
मोनिने आवडीने पेढे खाल्ले..
मोनिला पेढे खूप आवडले पण त्यानंतर मात्र तिच्या तोंडातून जास्तच लाळ जायला लागली…
तिच्या तोंडाला कोरड पडायला लागली आणि त्यादिवशी दोन पेढ्यांनी पण तिला खूप त्रास झाला होता..
आनंद खूप झाला होता त्यामुळे ती हा त्रास पण तिने आनंदाने काढला…
बाळाला कधी एकादच घरी घेऊन येईल असच सगळ्याची अवस्था झाली होती…
सगळ्यात जास्त वाट जर कोणी पाहत असेल तर ती मोनि..
“आई,मला वाटतय की मी आपण घेऊन याववं कृतीला ,इथे ताई पण आहे दिवसभर आणि तू पण असतेस की” सतेज छाया आई ला म्हणाला..
“हो घेऊन येऊयात,सव्वा महिना झाला की ” छाया म्हणाली.
मोनि आनंदाने नाचत परत टाळया वाजवू लागली,आणि अगदी मजेत होती….
भावड्या मनोमन विचार करत होता,”बर झालं माझ्या नंतर मोनिला एकट नाही वाटणार”…
सगळ्याच बापांना अजून काय हवं असते….
दिवस निघून जात होते,मोनि एकदा वहिनीच्या माहेरी जाऊन भेटून पण आलेली असते..
सासरी जायचं म्हणून कृतीची जरा जास्तच चीड चीड होत होती, स्पष्ट भाषेत काही सांगत नव्हती…
शेवटी कृती बाळाला घेऊन आलीच…
मोनि खूपच खुश होती अगदी मनापासून….
पण कृती वहिनीच्या मनात मात्र वेगळंच काही चालू होते..
बाळ मोनिसोबत वाढत होते..
मोनि त्याच्याजवळ बसून होती..
त्याला रोज न्याहाळात..तिच्याशी खेळत….
“मग ताई काय नाव ठरवलं की नाही”दादा…
“आ..आ….” मोनि म्हणाली..
“बर बर, तुला जे आवडते ना तेच ठेवू…तुलसी कस वाटतय तुला”दादा म्हणाला….
तशा मोनिने टाळया वाजवायला सुरवात केली आणि नाचायला लागली..
“मग ठरलं तर तुलसी नाव ठेवायच बाळाचं” दादा सगळ्यांना म्हणाला…
मोनिचा दिवस आता तुलसी सोबत जात होता…
तुलसी पण मोनिला पाहिलं की हसायची.. हातवारे करून तिला बोलवायची….
तिच्या कडे जायला झेपायची….
कृतीला हे अजिबात आवडत नव्हतं…
तिला भीती वाटायची मनोमनच… तुलसी ताई सारखी झाली तर…
बोलून कोणाला काहीच दाखवता येत नव्हतं..
पण खर सांगायच.. तुलसी खूप खुश असायची मोनि सोबत…
तुलसी हळू हळू मोठी होत होती…
तिच्या इवल्या इवल्या पावलांनी सगळं अंगण फिरत होती….
बारसं आणि वाढदिवस मोठ्या थाटात झाला…
सगळे पाहुणे आले होते… मोठा कार्यक्रम पार पडला…
तसे सगळ्यांच्याच तोंडावर प्रश्न होता…
“अगं, वर्षाची झाली ना ,तरी बोलत का नाही” काकू म्हणाल्या..
“बोलेल की सगळेच कुठे बोलतात तेव्हा” छाया म्हणाली…
लांबून सगळं कृती ऐकत होती…
कृतीच्या डोक्यातून काही केल्या हे जातच नव्हत..
रोज हळू हळू ती सतेज च्या डोक्यात भरवू लागली होती…
तुलसी मोनिताई सारखी तर नाही होणार ना?? त्यांच्यासोबत ती पण बोलली नाही तर…
नको त्या विचारांनी तिने सतेज ला भंडावून सोडलं आणि शेवटी कृतीच्या मनासारखं झालं…
“आई आणि बाबा मला तुमच्याशी बोलायचं” सतेज , छाया आणि भावड्याला म्हणाला..
“बोल की काय झालं”भावड्या..
“मी विचार केलाय की मी आणि कृती जातो कामाच्या ठिकाणी तिथे रूम पहिली आहे आणि राहण्याची सोय पण होईल आमची, सुट्ट्या असल्या की येत जाऊ”सतेज थोडं हळू आवाजात म्हणाला..
तस मोनि बसून च घसरत घसरतच जाऊन दादाच्या पायाला धरलं, आणि जोरजोरात ओरडायला लागली…
नाही….नाही..म्हणून मान हलवायला लागली…
तिच्या तो तुलसी बद्दलचा लळा पाहून सतेजच्या डोळ्यात पाणी आलं…
“हे ,काही निर्णय बदलायच्या आत मला ताईला समजावून शांत करायला पाहिजे”कृती मनातल्या मनात विचार करते..
“अहो,ताई आम्हाला पण नाही जावं वाटत पण रोजची दगदग होते ना,त्यापेक्षा राहतो आम्ही तिथे आणि भेटायला घेऊन येत जाऊ….नाहीतर अस करता का?? तुम्ही पण चला आमच्यासोबत” कृतीच हे बोलणं ऐकूण सगळे तिच्या तोंडाकडेच पाहत बसले…
भावड्याने ओळखलं..
“बिनधास्त जावा तुम्ही..राहू आम्ही इथे..तुम्ही पण तुमचा विचार करायला पाहिजे ना??” भावड्या म्हणाला..
भावड्या मोनि जवळ जाऊन तिला कुशीत घेतो आणि शांत करतो….
कुठे तरी मोनि हसायला लागली होते ते पण हसू असं दूर गेलं होतं…..