मी मोनिका भाग #12
भाग# 12
मृत्यू नंतरचे सगळे विधी झाले..
थोडे दिवस का होईना पण मोनि आणि छाया जवळ आपली म्हणणारी माणसं होती..
एकामागून एक जात होती…आता कोणीच राहील नाही…
“आ..आ…म्हणून मोनि छाया ला म्हणजे आईला विचारात होती..
“दादा राहील ना,आपल्यासोबत तरी” मोना तिच्या खुनाने बोलत होती…
तेवढ्यात बॅग चा आवाज आला…
सगळं आवरून दोघे पण तयार होती….
बापाचा तेरावा घालून, चौदाव्याच ताट पूजन झालं होतं ना..
मग आता काय काम राहील पोराचं..
त्या घरातुन मुलगा निघाला होता,मागे विधवा तुटलेल्या आईला आणि अपंग बहिणीला सोडून..
थांबवण्याची हिंमत कोणाला झाली नाही…
छाया ने त्याच्या कडे पाहिलं आणि घरात निघून गेली….
“येतो,माघारी पुढच्या महिन्यात,ताट जेवू घालायला” अस म्हणून निघून जातच होता….
तेवढ्यात मोना ने दादा चे पाय धरले..
“मानने नाही नको म्हणून मान हलवू लागली…आणि जोरजोरात रडू लागली..
मोनिने पाय धरले होते..आणि कृती ने सतेजचा हात….
कृतीने धरलेला घट्ट हात पाहून ,मोना ने पाय सोडला..
आणि सतेज ने घर सोडल ते मागे न पाहताच पुढचं आयुष्य जगण्यासाठी….
सुरवातीच्या काळात तो येत असे महिना जेवण घालायला पण नंतर ते पण पण येण बंद झालं…
छाया त्याला काहीच म्हणाली नाही,कधीच….
मोना आणि छाया दोघीच एकमेकींना…
दिवसामागून दिवस जात होते…जगण्याची धडपड चालूच होती….
मोनि खचून गेली होती…
उतारवयात पण छाया एकटी शेती मोठ्या कष्टाने करत होती….
त्यातच त्या दोघी खुश होत्या….
मनोमन शांत बसायच्या..
“नवरा होता तेव्हा जग पाठीशी असल्यासारखं वाटत होते आणि आता नको झालाय,मी आहे म्हणून मोनिला घर तरी आहे ,माझ्या मागे काय होणार” छाया एकटीच विचार करत बसायची…
मन थकलं की शरीर पण साथ देत नाही,हे खरं आहे….
दोघींच्यात बोलणं तस कमीच होयच..दोघी शांत होत्या….भावड्या सोबत घराची रोनक पण गेलीच होती…
पाहुण्यांची वर्दळ कमी झाली होती..
भावड्या गेल्या मुळे…कुंकू हरवलं… सौभाग्यच नाही म्हणल्यावर ,तिथल्या सुवासिनींच्या कार्यक्रमाला पण जाणं बंद झालं होतं…
छाया आणि मोनि हेच विश्व होत…
सतेज येत असायचा, कधी सुट्टी असली की पण तो काही इथे राहत नसायचं…
त्याच येण म्हणजे पाहुण्यासारखं झालं होतं…
दिवस थांबलेच नाही… आणि एक दिवस असा आला…
छाया चक्कर येऊन पडली…
शेजारच्या लोकांनी दवाखान्यात घेऊन गेले…
“हे बघा, यांच्या जवळ वेळ तसा खूपच कमी आहे,यांनी होणारा त्रास अंगावर काढला आहे त्यामुळे यांच्या शिरांचे ब्लॉकेज चे प्रमाण खूपच आहे,कधी काही होईल सांगता येत नाही…. आता वय पण झालं आहे,ऑपरेशन करू आपण पण किती दिवस जगतील ते सांगू नाही शकत” डॉक्टर बोलले..
तशी सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली…
छाया ने पण हे सगळं ऐकले होते..
छाया आता घाबरली नव्हती..
जशी माणसाला घाई असते ना ,की आता आपल्याला बाहेर जायचंय आणि आता आपण सगळं आवरून निघुयात तसच काहीच छायाच झालं होतं…
“मला सोडा आता डॉक्टर,माझी थोडी काम आहेत तेवढी मी करते” छाया डॉक्टरला म्हणाली..
“मरणाच्या दारात असताना काय काम आहेत तुम्हाला” शेजारी बसलेल्या काकू म्हणाल्या…
“आहेत काम,काही अशी पण काम असतात ,जी स्वतःच अस्तित्व संपण्याआधी संपवावी लागतात” छाया म्हणाली आणि गप झाली..
डॉक्टर ने औषध लिहून दिली आणि दोन दिवसात छाया ला सोडल..
तो पर्यत मोनि जवळ सतेज होता…
कृती पण होती…
घरी गेल्यावर मोनिकडे पाहिलं तर तिला अंघोळ पण घातली नव्हती…
“ताई जेवली का??? अंघोळ नाही केली का??” छाया जवळ जाऊन म्हणाली..
तशी मोनिने गळयात पडून जोरात हंबरडा फोडला आणि आई ला घट्ट मिठी मारली…
छाया ने तिला जवळ घेतलं आणि शांत केलं…
“ऊठ,मोना” छाया म्हणाली..
बर वाटत नसताना छाया ने,मोनिला चांगली नहाऊ घातले ,नवीन कपडे घातले आणि तिला आवडीचं सगळ जेवण बनवले…
छाया ने मोनिला भरभरून जेवू घातलं आणि मायेने जवळ घेतलं…
पण परत छाया ला त्रास होयला लागला होता..तिला आता जाणवू लागलं होतं की खरच वेळ नाही आता….
“मी जे करतेय ते आई या नात्याला काळीमा फासणार आहे,पण मी हे नाही केलं तर तीच आयुष्य खूप भयानक होऊन जाईल,मला एवढी ताकद दे की मी हे करू शकेल” छाया देवापुढे हात जोडून ढसाढसा रडत म्हणाली….
रात्रीच्या वेळी मात्र जेवनात छायाने मोनि पुरताच शिरा केला आणि तिला खाऊ घातला…
तुलसी मागत होती पण नाही दिला म्हणून कृतीने छायाशी खूप भांडण पण केला…
छाया शांत होती…
मोनिला घेऊन ती झोपायला निघून गेली….
छायाने मोनिचा हात घट्ट पकडला होता….
मोनिच्या हाताची पकड आता सैल पडू लागली होती…
तोंडातून फेस आला होता..
आईला डोळ्यात साठवत मोनिचे डोळे उघडेच राहिले….
“मला माफ कर ताई,आपण लवकर भेटुयात,मी पण आलेच…लवकर तुझ्या पाठोपाठ..”छाया मोनिला म्हणाली…
एक अंत झाला अपंगत्वाचा….एका जबाबदारीचा…एका नात्याच्या……
Visit & Subscribe to My Blog..
Inspireinmarathi.com